तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

Submitted by अत्रुप्त आत्मा on 10 July, 2015 - 06:46

तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी
हसता हसता अवचित रडू लागला
भरुन आलेला होता आतून .. हसतानाच!
हे मात्र तो रडल्यावरच कळलं
शब्द बंद झाले..भावना अबोल झालि
कारण आता मुलीला सोडून बापच जाणार होता
लग्न मंडपातून त्याच्या आपल्या घरी..
एक न तुटणारि फिल्म काही क्षणात सलग दिसून गेली त्याला
आणि त्या पुढला मुलीच्या आयुष्यातला सुखाचा भाग त्याला दिसणार नाही याची खंत ..उरलेल्या उपस्थितांना
आणि मग काही क्षणातच , आदल्या दिवशीचं कार्यालयातलं स्वागत कमानिचं दार..
परतीच्या गाड्यांनि भरुन येऊ लागलं
आणि याचीही पावलं जड होऊ लागली मग
!
अखेर तो अटळ क्षण आला ..त्याच्या अंतर्मनात त्याच्याच संवादांना कुणीतरी कोंडल्याचा भास होउ लागला त्याला..
त्याची लाडकी छकुलि निघाली...दुसय्रा घरी जायला..
आता त्याला ती भेटूहि शकत नाही मनापासुन ,त्याच्याच खांद्यावर पडून रडत असली तरी!
एकामेकाचे अश्रू पुसणे ही तर एक कृतीच असते नुसती..
परतीच्या वेळी , त्या ताटातुटिला सामोरं जाताना घडलेली..
खरा संवाद आत चाललेला असतो, ज्याचे.. केवळ काही शब्द वर येतात.. त्या संवादातल्या ..बाप लेकीच्या नात्याचे!
.
"सोन्या नीट रहा गंss!" असली औपचारिक वाटणारी ओळ आपण ऐकतो. तिच्या मागे प्रेमच असतं काळजितून आलेलं .. पण आत तो बाप बावरलेला असतो स्वत:च्याही काळजिनि ..आणि आठवत असतात त्याला छकुलिचे कपाळावर "थापटि थापटि" करणारे चिमुकले हात.. "बाबा गाइ गाइ कल ना ले लवकल!" असं म्हणणारे.
"मुलगा आईजवळच राहतो,पण मुलगी मात्र नेहमीच सोडून जाते बापाला!" .. असलं काहीतरी अश्यावेळि सुचवणारि..
हीच विभागणी त्याला नको असते..

पण मग काही ठिकाणी थांबावं लागतं .. गुंत्यातूनच गुंता आहे हा..हे कळल्यावर!
म्हणून तो गप्प बसतो.. आणि मंगल कार्यालयाच्या त्या कमानी जवळ उभं राहुन गाडीत बसलेल्या मुलीला तो सगळ्यांसह हसतमुखाने 'टाटा बाय' करतो...मनातून शांत शांत.. होत असतानाच.
=================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान