दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु ने दाढी केली थोडीतरी तर बराच चांगला दिसेल...

सुजय, मीनल आणि आशु एकदम मस्त काम करत आहेत...

कैवल्य अभिनयामध्ये मार खातोय पण तो पुढे स्मार्ट काम करेल अशी आशा आहे...

रेश्माने आता बावळट दिसायचंच असं ठरवलं आहे का?

अ‍ॅना कधी कधी चांगला अभिनय करते. तिने सातत्य ठेवले तर अजून मजा येईल ....

सुजय आणि कैवल्य मधलं ट्यूनिंग मस्त जमतंय. बोलता-बोलता दोघं अलगद कोणालातरी जाळ्यात घेतात आणि येडा बनवतात. आशु-अ‍ॅना नेहमीचेच बकरे ! कालच्या भागात पण दोघं आशुला मस्त पटवून देतात की तो शब्द खराच आहे, आणि त्याबद्दल आशुलाच फक्त माहित नाही.

एका एपिसोडमध्ये उत्तम मराठी कविता सादर करणारा दुसर्‍या भागात "धाबे दणाणणे" म्हणजे काय विचारतो??

लेखन फक्त एपिसोड टू एपिसोड करतायत बहुतेक.... आजच्या एपिसोडचा एक विषय घ्या आणि त्यानुसार संवाद लिहा.

.

पण मला आवडला. आशुने जाम धमाल केली. हसून वाट लागली. टिपीकल नाचत होता तो. मीनल पण सहज वाटली त्यात. रेश्मा चे शिकवणे पण आवडले. निदान या डान्सच्या भागात तिचा नेहेमीचा आरडाओरडा आणी रडुपणा नव्हता.

मी पाहिला. रेश्मा बरी वाटते तिच्यासमोर.

निशा राकेशला झापत होती म्हणजे काय करत होती तेच कळलं नाही. वाट्टेल ते बोलत होती. आणि एकच मुद्दा आणि सेम वाक्य परत परत बोलत होती. त्याच्यातच फार जास्त भाग खाल्ला.
मुळातच निशा अज्जिबात आवडत नाही. तिला अॅक्टिंग जमतच नाही असं वाटतं. नेहमीच्या सहा जणांसमोर अॅक्टींग करताना ती फार कृत्रिम वाटते.
राकेशने काल मस्त काम केलं.

निशा राकेशला झापत होती म्हणजे काय करत होती तेच कळलं नाही. वाट्टेल ते बोलत होती. आणि एकच मुद्दा आणि सेम वाक्य परत परत बोलत होती. त्याच्यातच फार जास्त भाग खाल्ला.>>>>>>

हो, त्या निशाचे डायलोग रिपीट होते, सम हावू ती नाही पटत.

मला राहून राहून असं वाटतय की पुढे कधीतरी राकेश ला रेश्मा आवडू लागेल आणि रेश्मा राकेश सुखाने एकत्र नांदू लागतील. साधारण लक्षणं अशीच दिसतायत.

बाकी रेवा, निशा ही पात्र इतर ६ जणांच्या तुलनेत फिक्कीच पडतायत. राकेश आणि नागवेकर मात्र या ६ जणांना काटेकी टक्कर देत आहेत.

अरुण मलाही तसच वाटतय कारण मागच्या एका एपिमध्ये जेव्हा राकेशच्या समोर सुजयला रेश्माचा नवरा म्हणुन ओळखणारा माणुस राकेशसमोर आल्याने राकेशला त्याचा राग आला होता.. तेव्हाच हा डौट आला होता.

कालचा भाग आवड्ला..
सकाळच्या लंचला खिचडी.. दुपारच्या ब्रेक्फास्टला खिचडी.. आणि रात्री किंजलकडे करतात तशी आसट-आचरट खिचडी.. आशुची खुपच व्हराय्टी होती जेवणात.... Proud

नागवेकर??? Lol

मला राहून राहून असं वाटतय की पुढे कधीतरी राकेश ला रेश्मा आवडू लागेल आणि रेश्मा राकेश सुखाने एकत्र नांदू लागतील. >> मला वाटतंय मग रेश्मा ने "क्वीन" सारखं "नाकारावं राकेशला!

Pages