Submitted by गजानन on 8 July, 2015 - 02:37
बर्याचदा वैद्यकीय रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, हिस्टरी नोट, रेफरंस लेटर, इ. आरोग्यविषयक कागदपत्रांत वापरल्या गेलेल्या लघुरूपांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. उदा. c बार, K/C, c/o, इ. (किंवा बर्याचदा ते लघुरूप, संज्ञा लिहिली आहे, हे ओळखता येत नाही.) त्यासंदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरता हा धागा काढतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातली मायबोलीकरांनी इथे जरूर लिहावे. धन्यवाद.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप आहेत. आपल्याला विस्तार
खूप आहेत.
आपल्याला विस्तार हवा असलेल्या शब्दाचे लघु रुप दिल्यास त्याचे विस्तारीकरण करता येईल.
USG = सोनोग्राफी आकडा - आकडा
USG = सोनोग्राफी
आकडा - आकडा - आकडा = आकडा लिहिल्या एवढा डोस सकाळी, दुपारी व रात्री घेणे
-----
अश्या टाईपचं हवंय का गजा?
गजानन, माझ्या डॉक्टर मित्राला
गजानन, माझ्या डॉक्टर मित्राला भरीला पाडू शकेन, पण त्याचे म्हणणे असे कि हे लेखन वेळ वाचवण्यासाठी केलेले असते आणि खास करून त्यांच्या फिल्ड मधल्या लोकांसाठीच असते. पेशंटसना हवे तर वेगळे लिहून देतात !
लघुरूपांचा मला तिटकारा आहे..
लघुरूपांचा मला तिटकारा आहे.. राग आहे. अन SMS च्या जमान्यात त्यांचे पेव फुटले. तरी असो.
गजाभौ... पुढील लिन्क बघा..
http://www.globalrph.com/abbrev.htm
मी खरे तर कॉपीपेस्ट करुन इथे देणार होतो, पण एकंदरीत आवाका बघता तुम्ही स्वतःच तिथे बघावेत.
माझे डोके बधीर झाले पहिले पान वाचतानाच.
दिनेश, हो. पण एक सर्वसाधारण
दिनेश, हो. पण एक सर्वसाधारण माहिती म्हणून त्यांचे अर्थ माहीत असावेत म्हणून हा धागा.
अश्विनी, हो तसेच काहीसे. USG सारख्या बहुतेक लघुरूपांविषयी नेटवरही माहिती मिळते. हे मुख्यतः लिखित स्वरुपाच्या ज्या नोंदी असतात त्यातल्या लघुरूपांविषयी, चिन्हांविषयी. उदा. c बार, K/C, c/o, ↑↑ इ.
डॉ. कैलास गायकवाड, धन्यवाद. K/C, c/o, ↑↑ यांचे अर्थ काय?
LT, तिटकारा असला तरी काहीवेळा त्यांना पर्याय नसतो. दुव्याबद्दल धन्यवाद.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वर सुरवातीला Rx लिहलेले असते त्ये कशासाठी
ती एक प्रार्थना आहे,
ती एक प्रार्थना आहे, औषधोपचारांना यश यावे म्हणून.
ती एक प्रार्थना आहे,
ती एक प्रार्थना आहे, औषधोपचारांना यश यावे म्हणून.
>>
खरच का?
>>> ती एक प्रार्थना आहे,
>>> ती एक प्रार्थना आहे, औषधोपचारांना यश यावे म्हणून. <<<<
आमच्या ज्योतिषशास्त्रात तीच खूण हल्ली "वक्री" ग्रह दाखविण्याकरता वापरतात.
RX = A medical prescription.
RX = A medical prescription. The symbol "Rx" is usually said to stand for the Latin word "recipe" meaning "to take." It is customarily part of the superscription (heading) of a prescription.
असे गूगलल्यावर कळते.
ही बघा काही उपयुक्त
ही बघा काही उपयुक्त .....
१. DAMA = discharge against medical advice
2. (1 tab) SOS = Si Opus Sit = गरज लागेल तेव्हा
3.(1 tab) h.s. = hora somni = रात्री झोपताना
4. DM = Diabetes Mellitus = मधुमेह ( सामान्य माणसे फक्त ' डायबेटीस' म्हणतात, ते अर्धवट आहे )
5. DNR = Do not resuscitate ( रुग्ण अत्यवस्थ असेल व बरा होणार नसेल तर उगाच Ventilator आदी सोपस्कार करू नका.) . 'अनुमती' चित्रपट आठवतोय?
कुमार, अनेक धन्यवाद. K/C आणि
कुमार, अनेक धन्यवाद.
K/C आणि पुढे DM असेल तर काय समजायचे? DM चे समजले तुमच्या वरच्या पोस्टवरून.
ती एक प्रार्थना आहे, औषधोपचारांना यश यावे म्हणून. <<< दिनेश, खरेच काय?
Injections संबंधी कही नेहमीची
Injections संबंधी कही नेहमीची रुपे :
IM = intra muscular (स्नायुमध्ये)
IV = intra venous ( शिरेतून , म्हणजे नीलेतून )
SC= subcutaneous (त्वचेखाली ). हे इन्शुलिन घेणार्याना परिचित असेल.
तर खालील काही 'अतिविषिष्ट' परिस्थितितच देतात ....
IA = intra arterial ( रोहीणीतून)
IC = intra cardiac ( थेट ह्रुदयात सुइ खूपसून !)
गजानन, हा बघा एक नमुना : K/C
गजानन, हा बघा एक नमुना :
K/C of DM & HTN now admitted with chest pain & diagnosed as AMI may be considered for CABG......
K/C= Known case
HTN= hypertension ( उच्च रक्त दाब)
AMI = Acute Myocardial Infarction ( ह्रुदयविकाराचा झटका)
CABG = coronary artery bypass graft ( म्हन्जी आपला 'बायपास वो ! )
काही मजेदार लघुरुपे शोधतो व मग लिहीतो....
रच्याकने... तेव्हडे ते 'हार्ट' मराठीतून नीट कसं टंकायचे ते सांगा की वो....
ओह! नोन केस का! मराठीतून
ओह! नोन केस का!
मराठीतून हार्ट लिहायला हे टाईप करा: hRuday
ती एक प्रार्थना आहे,
ती एक प्रार्थना आहे, औषधोपचारांना यश यावे म्हणून.>>>>>> I treat,He cures.असा त्याचा अर्थ आहे.
Rx = Take Thou, किंवा रेसिपी
Rx = Take Thou, किंवा रेसिपी हे बरोबर. प्रार्थना वगैरे काही नाही.
मेडिसिनचा सिंबॉल म्हणजे तो सापाची वेटोळीवाला पंखवाला स्टाफ ऑफ अस्केलॉपियस हे मात्र ग्रीक धन्वन्तरी(गॉड ऑफ हीलिंग)ला नमन आहे.
बाकी,
C/O = (patient) Complains Of
↑↑ = अमुक व्हॅल्यू वाढलेली आहे. उदा. urine sugar ↑↑ म्हणजे लघवीतली साखर (आधीच्या तुलनेत) वाढली आहे
c वर बार दिलेला असल्यास त्याचा अर्थ 'विथ' असा होतो.
C च्या खाली बार किंवा S वर बार दिला तर सान्स उर्फ विदाऊट.
इथे थोडे अॅब्रिव्हिएशन्स आहेत : https://en.wikipedia.org/wiki/List_of_medical_abbreviations
या पानाच्या सगळ्यात खालीवअ सुरुवातीलाही, एका टेबलमधे अल्फाबेटिकली सॉर्टेड लघुरूपांची यादी सापडेल. टिच्कल्यावर नवे पान.
पोलाईट घोस्ट, धन्यवाद!
पोलाईट घोस्ट, धन्यवाद!
http://www.todayifoundout.com
http://www.todayifoundout.com/index.php/2014/06/rx-mean-come/
आर एक्स चे ३ अर्थ मानले जातात.. प्रार्थना हा कमी मान्यता असलेला आहे ( पण आहे ! )
पोलाइट घोस्ट डॉक्टर किंवा
पोलाइट घोस्ट डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे दिस्ताहेत.चांगली माहीती!
र् RVD .. retro viral
र् RVD .. retro viral disease .. म्हणजे एच आय व्ही.
k/c/o नोन केस ऑफ.. त्यापुढे काल व उपचार लिहिले तर माहिती परिपूर्ण होते.
k/c/o HTN since 5 years . on Tab . Amlo 5 mg OD.
म्हणजे हायपरटेन्शन गेली ५ वर्षे आहे व ती गोळी रोज एकदा सुरु आहे.
Koch's म्हणजे टीबी , क्षय
अजून काही : Ct all : Continue
अजून काही :
Ct all : Continue all (medicines)
NBM ;Nil By Mouth : तोन्डातून काही न देणे (साधारण मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी व नन्तर काही काळ ) .( याचा एक मजेशीर उपयोग वैद्यक व्यवसायीक असा करतात : जर एखादे दिव शी दवाखान्यात एकही रूग्ण आला नाही तर 'आज NBM झाले!"
F : Fasting उपाशीपोटी
PP: Post Prandial : जेवणानंतर (२ तासांनी) :मधुमेहींना हे परिचीत असेल.
stat : immediately ; एखादे औ ष ध ताबडतोब देणे
TPN : Total Parenteral Nutrition : सर्व पोषण घटक शिरेवाटे रक्तातून देणे.
त्या Rx चा अर्थ लहानपणीच कळला
त्या Rx चा अर्थ लहानपणीच कळला कारण एक टाटा सॉल्ट ची जाहिरात होती त्यातली मुलगी Rx म्हणजे काय याचा अर्थ सांगत असे..
TPRN चा अर्थ टेंपरेचर, पल्स व
TPRN चा अर्थ टेंपरेचर, पल्स व रेस्पिरेशन नॉर्मल आहेत असा आहे
**
त्यातली मुलगी Rx म्हणजे काय याचा अर्थ सांगत असे..
<<
नक्की काय अर्थ सांगितला म्हणे मग तिने?
Rx म्हणजे 'हे घ्या' असं ती
Rx म्हणजे 'हे घ्या' असं ती मुलगी सांगत असे. (मराठी चॅनल्स वर लागणारी जाहिरात)
मस्त माहिती.
मस्त माहिती.
अलिकडे जर कोणाला रुग्णासाठी
अलिकडे जर कोणाला रुग्णासाठी cardiac ICU मध्ये जायची वेळ आली असेल तर ' SCD' असे लघुरुप लिहीलेले दिसू शकते. अर्थ आहे : Sudden Cardiac Death.
आता SCD चा पारंपरिक अर्थ वेगळाच आहे तो म्हणजे Sickle Cell Disease. पूर्णपणे भिन्न !