सखी

Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 December, 2014 - 05:32

॰ सखी ॰

तू ठुमकत येताना,
हिरवा बांधही गर्द होतो.
तुझ्या नगमोडी चालीने,
मी ही आनखीनच मर्द होतो.

तु शेतातून चालतेस तेंव्हा,
शेतातली पिकेही डोलतात.
अंबराईतले पोपटही मग,
एकमेकांना हळूच बोलतात.

पाठीमागून तू चालत होतीस,
तुझी बांगडी जराशी वाजली.
तू पटकन वळून पाहीले तर,
झाडावर कबुतरांची जोडीही लाजली.

नदी काठी तू नजरेला नजर भिडवली,
तेंव्हा डोळ्यातून अश्रू गालावर ढळले.
तुला नजरेच्या भाषेतून काय सांगायचयं,
ते माझ्या आधी नदीलाही कळले.

परवा बालकवींच्या कवितेतल्या सारखा,
ऊन असतानाच धो धो पाऊस आला.
तुझ्या आणि माझ्या शेतासह,
सर्व शिवार ओलाचिंब झाला.

शिवारातली सर्व पाखरे,
निवा-याच्या शोधात गेली.
तू मात्र निवारा समजून,
माझ्याच आडोशाला आली.

माझाही मग विश्वमित्र झाला,
जेंव्हा पाऊस तुझ्या डोळ्यातून गळत होता.
मेघानी प्रचंड गडगडाट केला,
मला वाटले तो माझ्यावर जळत होता.

कवीः-जे.डी.भुसारे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमा, सरेखा कुलकर्णी,
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!

तु शेतातून चालतेस तेंव्हा,
शेतातली पिकेही डोलतात.<<

येथे कविता संपली. Happy

छान ओळी.