तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 July, 2015 - 16:09

खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअ‍ॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अ‍ॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्‍या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले. थोडीफार शोधाशोध करता करता हाताला खालचा फोटो, नेमके कसले प्राईड आणि आपल्या प्रोफाईलला रंगीन करणारे नक्की कश्याचे समर्थन करत होते ते समजले. अर्थात जाणतेपणी वा अजाणतेपणी, दिखावा करायला वा मनापासून हे त्यांनाच ठाऊक.

तर यामागचे कारण असे की नुकतेच अमेरीकेत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळाली. तर ज्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे त्यांनी तो दर्शवायला आपले प्रोफाईल पिक्चर रंगीत पट्ट्यांत रंगवायचे होते.

gay colour code 1.jpggay colour code.jpg

सेक्शुअल ओरिएंटेशन - Sexual orientation (मराठीत काय म्हणतात देव जाणे)
पण हा शब्द मला पहिल्यांदा ऑर्कुट प्रोफाईलवर समजला. त्यातील नाव-गाव-फळ-फूल माहितीत आपापले सेक्शुअल ओरिएंटेशन सुद्धा लिहायचे होते. गंमतच वाटली होती. आणि त्यापेक्षा जास्त गंमत तेव्हा वाटली होती जेव्हा काही महाभागांनी आम्ही "स्ट्रेट" आहोत असे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का?

.. पण बघता बघता दिवस बदलले, आणि आता ही सांगायची गोष्ट असू शकते असे माझे मतपरिवर्तन झालेय.

असो, तर मग मला माझ्या त्या सर्व फेसबूक बंधूंची फिरकी घेण्याचा मोह झाला.

एकाला सहज विचारले, काय रे तुझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?
तर गडी चिडला!
लगेच मला समजून चुकले की याने आपले प्रोफाईल पिक अजाणतेपणे रंगवले आहे.
त्याला म्हटले काही नाही झमन्या, अर्ध्या गावाची तुला माहीती नसते आणि सगळीकडे पुढे पुढे करण्याची घाई असते.
माहिती देताच त्याने घाईघाईत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.

हाच प्रयोग आणखी दोघाचौघांवर केल्यावर एक जण असा निघाला ज्याला यामागचे कारण माहीत होते. तसेच आपण अश्या संबंधांना आणि त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला सपोर्ट करतो असेही तो म्हणाला.
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.
थोडक्यात त्याचा सपोर्ट किती पोकळ होता ते मला समजून चुकले. जे स्वत:ला कोणी समजले तर त्याला ती एक शिवी वाटते अश्यांना तो कसा मनापासून सपोर्ट करणार होता.

पुढे दोनेक दिवसातच हळूहळू काही प्रोफाईल पिक्चर बदलताना दिसले. बहुतेक खरे कारण समजल्याने काही जणांनी ओशाळून बदलले असावेत, वा काही जणांनी दाखवला तेवढा सपोर्ट पुरेसा म्हणत बदलले असावेत. तर काही जणांचे प्रोफाईल पिक्चर आजही रंगीत पट्ट्यात दिसत आहेत. खंबीर पाठिंबा!

अर्थात, मला स्वत:ला देखील अजून ठामपणे मत बनवता येत नाहीये की या प्रकारचे संबंध योग्य की अयोग्य? नैसर्गिक की अनैसर्गिक? आजार, विकृती की फक्त एक प्रकारचे सेक्शुअल ओरिएंटेशन..

पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्‍यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या परिचयातल्या दोघांचे दोन घटस्फोट झाले आहेत, आणि दोघंही तिसर्‍या लग्नाच्या तयारीत आहेत. घरचे समजावूनही ऐकत नाहीत.>> मी तर उलट वाचले आहे की घरचेच लग्न करायला एकतर प्रवृत्त करतात किंवा दडपण आणतात. जर मुलगा वा मुलगी शिकलेले आणि गुड थिंकर नसतील तर ते ह्या प्रवाहात वाहून जातात.

घरचे समजावूनही ऐकत नाहीत = घरच्यांना मुलांनी / नातेवाइकांनी समजावलं तरी ते ऐकत नाहीत आणि आपल्या मुलावर लग्नासाठी दडपण आणतात.

>>>तुम्हाला काहीही करुन एक दोन तीन परिच्छेद लिहायचे असतात. <<<

Happy

अनकंट्रोलेबल हसायला आलं!
भारी रिमार्क आहे.

घरचे हे मी सुद्धा चुकीच्या अर्थानेच वाचले, बी म्हणतात तसे घरच्यांना जास्त क्लीअर होते.
असो,

पण येस्स, हा प्रॉब्लेम तर असतोच आणि होणेही साहजिकच आहे. बरेचदा समलिंगी व्यक्ती स्वतः सुद्धा आपले भांडे फुटू नये म्हणून मुकाटपणे पुढे होईल ते बघून घेऊ म्हणून लग्नाला तयार होते.

माझ्या फार जवळच्या ओळखीतील एक मुलगा समलिंगी होता. त्याचे लग्न होतेय हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का नव्हता, कारण ते त्याला करावेच लागणार हे आम्हाला माहीत होते. पण लग्नानंतर मात्र जेव्हा मी त्याच्या पत्नीकडे बघायचो तेव्हा मला वाईट वाटायचे की काय घुसमट होत असेल बिचारीची. तसेच माझ्या पाहण्यात काही असेही होते की जे तिच्याकडे एक संधी म्हणून बघायचे. कारण त्यांना ठामपणे ठाऊक होते की हीला आपल्या पतीकडून शरीरसुख मिळत नसणार..

असो, पण पुढे मग अपेक्षित ड्रामा सुरू झाला, ती त्याला सोडून माहेरच्या गावाला गेली. जाताजाता चारचौघांसमोर एक डायलॉग मारून गेली की याने मला आजपर्यंत शिवले सुद्धा नाही. नंतर घरच्यांनी मध्यस्थी करून त्यांचा संसार पुन्हा सुरू करून दिला. पण ती याच्याबरोबर कमी आणि माहेरीच जास्त असायची. यातच तिला दिवस गेले आणि एक छानसा मुलगाही झाला. हे प्रकरण माहेरचेच आहे असे सारेच ठामपणे बोलू लागले. अर्थात टेक्निकली विचार करताही तीच शक्यता होती. आणि यात काही गैरही नव्हते, उलट तेव्हाही तिच्याबद्दलच वाईट वाटत होते. आता ते दोघे कुठे आहेत, काय चालूय, कल्पना नाही. पण आता असे वाटते की त्याच्याबद्दलही खरे तर वाईट वाटायला हवे होते. फरक ईतकाच त्याने आपल्या आयुष्याची परवड स्वत: निवडली आणि त्या मुलीवर देखील स्वत:च लादली, तिची काहीही चूक नसताना..

आणि म्हणून यासाठी तरी ते समलिंगी विवाह प्रकरणाला मी समर्थन देऊ इच्छितो, भले समलैंगिक असणे हे नैसर्गिक की अनैसर्गिक याबाबत मी अजूनही ठाम नसलो तरीही..

आता चर्चा भरकटलीच आहे म्हणुन विचारून टाकतो:
पेंडश्यांच्या ऑक्टोपस कादंबरीत लाला(?)चे समलैंगिक संबंध असतात याचा उल्लेख येतो. जितके मला आठवते त्यानुसार लेखकाने त्या संबंधांना किळसवाणे, अनैतिक वगैरे संबोधने न लावता 'जसे आहे तसे' अश्या नजरेने चितारले आहे. त्याआधी कधी मराठी साहित्यात समलैंगिक संबंध असलेला नायक वा नायिका वा एखादे पात्र किंवा अशी चर्चा झाली आहे का?

पेंडश्यांच्या ऑक्टोपस कादंबरीत लाला(?)चे समलैंगिक संबंध असतात याचा उल्लेख येतो. जितके मला आठवते त्यानुसार लेखकाने त्या संबंधांना किळसवाणे, अनैतिक वगैरे संबोधने न लावता 'जसे आहे तसे' अश्या नजरेने चितारले आहे. त्याआधी कधी मराठी साहित्यात समलैंगिक संबंध असलेला नायक वा नायिका वा एखादे पात्र किंवा अशी चर्चा झाली आहे का?>> चर्चा खरे तर आत्ता भरकटते आहे. काय संबंध आहे साहित्याचा आणि ह्या धाग्याचा. उगीच आपण किती मोठे व्यसंगी आहोत हे दाखवतो आहेस तू.

टायटल बदला की आता लेखाचे!

१, समलिंगियांची उगाच झालेली उत्क्रांती

२. पेंडसे, ऑक्टोपस आणि नसलेला व्यासंग

३. मुद्देसूद असंबद्धपणा

४. दोन तीन परिच्छेद आणि गुर्‍हाळ

ह्यापैकी काहीतरी ठेवा की शीर्षक!

फक्त गुर्‍हाळ हे नाव चालेल कारण जिथे तिथे बेफिकिर जे लिहितात ते एक गुर्‍हाळच असते. अगदी परफेक्ट शब्द.

अच्छा अच्छा श्री ना का? तरी म्हणलं मराठी आक्टोपस तर वाचली पण आजकाल काही सांगता येत नाही. असतील कोणी पेंड्से अन त्यांची इंग्रजी कांदबरी.

तर बेफीकिर गाडी जलपायगुडीला जात नाहीये आता. इतकावेळ चढू की नको म्हणणारा प्यासिंजर (मीच ) पेंडश्यांचे नाव वाचून चढलाच. तर आता नवीन गाडीची घोषणा करायची वेळ झाली आहे.

नवीन गाडी कुठे जाणार ऋन्मेश?

ती आधी डेहराडूनला पाठवा, मग पुढचे बघू!>>>> नको, झुमरीतल्लैय्यालाच पाठवा. तिथले प्यॅशिन्जर चेन खेचुन मध्येच चढतात नेहेमी, त्यापेक्षा गाडी तिथेच न्या आधी. मग सुरळीत चढतील रेटारेटी न करता.:फिदी:

वरदा, लिहाफ म्हणजे ती रजई/गोधडीची गोष्टं का , एका लहान मुलीच्या नजरेतून लिहिलेली?

मराठीत 'बेबी' सोडून आत्ता पटकन आठवत नाहीये>>> मित्राची गोष्ट बाय तेंडुल्कर हे मला आठवलंय. पण ते पेंडसेंच्या नंतर असावे बहुतेक.

जिथेतिथे स्वतःचा व्यासंग दाखवत फिरतात ही मंडळी! धागा काय, चर्चा काय! हे सगळे टण्यांमुळे सुरू झाले.

Pages