लग्नाला यायचं हं!!!!!
खाली लिहिलेला मजकूर कुठल्या कॅटॅगरीत घालावा हा प्रश्ण मला आधी पडला होता. (जुन्या मायबोलीत हे पत्रिका प्रकरण मी आधीच लिहून चुकलेय. तीथे हा ताप नव्हता!) पण नव्या मायबोलीनं खास सोय केलीय. ह्या खर्याखुर्या लग्नपत्रिकांनी आमची बरीच 'करमणुक' केली म्हणून विषय : करमणुक! ह्या आमंत्रणपत्रिकांचा आम्ही घेतला तसाच आपण देखिल 'आस्वाद' घ्यावा ही विनंती!!
नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १
'हिरवाकंच शालु लेवून...
गंधधुंद करणार्या निशिगंधाचा हार घेऊन...
अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! !
तीचे थरथरणारे ओठ.. अबोल!
फडफडणार्या पापण्या...
वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर!
नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता.
"पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!"
"छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.)
बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती!
"ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" वगैरे वगैरे...! कसली अबोल डोंबलाची!
पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या.
निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!
***
लग्नाला याय्चं हं-भाग २
आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना!
"बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव).
"तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात!
असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.
'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं!
लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का?
***
लग्नाला याय्चं हं-भाग ३
ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे..
सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
यायलाच हवं तुम्हाला
मंदार-अपर्णा साठी...
अपर्णा कन्या दातारांची
तीन भावंडात मोठी...
मंदारही घरात मोठा
आमची म्हातारपणची काठी...
असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते!
***
लग्नाला याय्चं हं-भाग ४
दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. ..
"भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..
हे मानसके राजहंस
तुम भूल न जाना आनेको!"
नो कमेंट्स!
हाइट आहे हे सगळ्या
हाइट आहे हे
सगळ्या प्रतिक्रिया पण फारच मजेशीर आहेत
मस्तच लिवलय !
मस्तच लिवलय !
धमाल लिहीलंय! प्रतिक्रिया पण
धमाल लिहीलंय!
प्रतिक्रिया पण एक से एक आहेत.
अरे हे कुठे होतं इतके
अरे हे कुठे होतं इतके दिवस!!!!
जबराट..
जबराट..
भन्नाट !
भन्नाट !
सहीये हे
सहीये हे
सुपर्ब
सुपर्ब
अरे, हे जवळपास दीड वर्षांनी
अरे, हे जवळपास दीड वर्षांनी पुन्हा वर आलं!
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता धन्यवाद!
शाहीद कपूरची पत्रिका
शाहीद कपूरची पत्रिका !
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/shahid-kapoors-...
मस्तम मस्त .. एकटीच हसतेय मी
मस्तम मस्त ..
एकटीच हसतेय मी पागलासारखी
(No subject)
(No subject)
एका आत्तेचुलत बहिणीची
एका आत्तेचुलत बहिणीची पत्रिका..साधारण पत्रिके सारखीच होती पण मधला मॅटर काहीसा असा होता....
'आई-बाबा-भाउ-बहिण-प्रेमळ या घरट्यातुन...
चिमणी उडाली.. आकाशी... नवी क्षितिजे उराशी.. नव्या घरट्यात रुजण्यासाठी'.. आणि काय काय...
तर जीला चिमणी म्हणले होते ती बहिण खुपच जाड होती...टुनटुन सारखी.
हा विरोधभास बघुन मस्करी ला उधाण आले.
एक भाउ म्हणाला अरे घार तरी म्हणायचे...
मागच्या व्हिजिटला वाचलेल्या
मागच्या व्हिजिटला वाचलेल्या एका पत्रिकेत सुरवात अशी होती
आमची दैवगुणि कन्या चि.सौ.xxx हिचा शुभविवाह xxx यान्चे राजसपुत्र xxx यान्च्याशी होत आहे
मग काहितरी
सोनेरी क्षणाना सोन्याचि झालर
मोत्याच्या अक्षता मोत्याची पा़खर वैगरे ओळि होत्या. ..
एका पत्रिकेतला एक विद्वान
एका पत्रिकेतला एक विद्वान प्रकार पाहिला तो असा -
चि. सौ. कां. ऐवजी नुसतंच चि. सौ. !!!!
अरे लग्न झालेल्या मुलीचं परत लग्नं लावता की काय ?
खात्तरनाक कलेक्शन आहे हे!
खात्तरनाक कलेक्शन आहे हे!
अरे वारलो रे वारलो! हसुन हसुन वारलो!
Nira @ तर जीला चिमणी म्हणले
Nira
@ तर जीला चिमणी म्हणले होते ती बहिण खुपच जाड होती...टुनटुन सारखी >>> त्यांना कोंबडि म्हणायच असेल, पण आयत्यावेळि शब्द सुचला नसेल.
लेख आणि प्रतिक्रिया भारी
लेख आणि प्रतिक्रिया भारी
मागे कुणीतरी म्हणल्याप्रमाणे लग्नात मिळालेला आहेर माईकवर ओरडुन सांगतात त्याप्रमाणे खुप वर्षांपुर्वी आम्ही अमरावतीला पहिल्यांदाच एका लग्नाला गेलो होतो. बाबांनी नवरीसाठी हंडा आहेर घेतला होता. तिला तो हंडा देऊन आम्ही सगळे स्टेजवरुन खाली उतरतच होतो तर माईकवरुन अनाउंसमेंट झाली बाबांच्या नावाने ' बाळाराम पाटील गुंडा' ' बाळाराम पाटील गुंडा' ' बाळाराम पाटील गुंडा' (हो तीन वेळा)
आम्ही क्षणभर शॉक आणि नंतर हसुन लोटपोट कारण तिकडे हंड्याला गुंडा बोलतात.
निल्सन मे महिन्यात अशीच एक
निल्सन
मे महिन्यात अशीच एक लग्नपत्रिका स्वीकारावी लागली. साधारण दीड पानी ऐवज. पत्रिकेचा कानाकोपरा मजकुराने ठासून भरलेला. झाडून सर्व नातेवाईक व पाहुण्यांची नावे पत्रिकेत येण्याची तजवीज केली होती. पार निमंत्रक, शुभेच्छुक, हितचिंतक, कार्यवाहक, आणि लहान (!) मुलांची नावे 'आमचीही लुडबूड' अशा प्रेमळ शीर्षकाखाली देऊन पुरती डिरेक्टरी केली होती पत्रिकेची! बरं, लग्न जिथे होते तिथे वाहनतळापासून लग्नाच्या हॉलपर्यंत जायला साधारण दीड दोन किलोमीटर चढाचा पायी रस्ता होता. त्याबद्दल पत्रिकेत अळीमळीगुपचिळी होती. भर दुपारी बाराचा मुहूर्त! मे महिन्यातले लग्न. जे जे कोणी लग्नाला गेले ते खरपूस शेकले जाऊन परत आले!!
निल्सन ते गुंडा नाही गुंड
निल्सन ते गुंडा नाही गुंड आहे..
बाकी मी पक्की वैदर्भीय असुनसुद्धा कधीच अस अनाउंसमेंट वाल लग्न अटेंड नाही केल.. अगदी ऐकिवात सुद्धा नाही..
टिना, हि साधारण १५
टिना,
हि साधारण १५ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे त्यावेळी त्यांनी 'गुंडा' असाच उच्चार केला होता. पण इतक्या वर्षांनीही त्याची गंमत काही कमी झाली नाही आम्ही एकत्र भेटलो का हमखास हा विषय निघतोच
यंदाच्या एप्रिलमधे मामेबहिणीच्या लग्नाच्या पत्रिकेवर लहान मुलांची नावे 'बिनकामाची मंडळी' या शिर्षकाखाली लिहली होती त्यावरुन बर्याच जणांना रागही आला होता की 'आमच्या मुले कामाची नाहीत तर कशाला आणायचं त्यांना लग्नाला'
जबरी
जबरी
(No subject)
अरे काय?! अशी काव्यमय?
अरे काय?! अशी काव्यमय? लग्नपत्रिका आयुष्यात पहिलीच वाचलीये!
माझ्या एका मित्राने
माझ्या एका मित्राने लग्नपत्रिका छापली होती चक्क विझीटिंग कार्डवर ...☺️
मला वाटतं जुन्या माबोवर वाचलं
मला वाटतं जुन्या माबोवर वाचलं होतं, पण इथेही भारी संग्रह झालाय!
हे कसं मिसलं होतं? खतरनाक…
हे कसं मिसलं होतं? खतरनाक…
धमाल
धमाल
जबरी!
जबरी!
Pages