पॅरिस--जगातले सर्वात देखणे शहर.... रंगबीरंगी, नखरेल मायनगरी!!
जगभरातील कलाकार, कवी, साहित्यिकांचं माहेरघर, आश्रयस्थान. नित्य नवीन फॅशन ट्रेंड्स, असंख्य टॉप ब्रॅंड्स ची गंगोत्री. जगातील सर्वोत्तम संग्रहालये, भव्य दिव्य राजवाडे आणि उद्याने. फ्रेंच परफ्यूम्स, फ्रेंच वाइन, कॅफेस, शॉपिंग आणि नाइटक्लब्स- सारं काही इथे आहे.
अशा या नगरीला काही कारणाने धावती भेट देण्याचा योग आला, त्यातही फिरण्यासाठी अगदी एक संध्याकाळ आणि दुसरा दिवस होता.
पॅरिस एक-दीड दिवसात बघणं म्हणजे महाभारत चार बुलेट-पॉइण्ट्स मधे समजावून घेण्यासारखं आहे.
असो..पण माझ्याकडे जो काही वेळ होता तो सार्थकी लावायचा होता...म्हणतात ना की something is better than nothing.
अगदी ढोबळपणे पॅरिस बघायचे म्हणजे दोन गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या- पहिला आयफेल टॉवर आणि दुसरी मोनालिसा!! ह्या दोनच गोष्टी आणि मग ठरविले की बाकीचा वेळ आहे तितका ह्या शहरात भटकंती करायची- कधी चालत, कधी बस ने तर कधी बोटीने. काहीही वेळापत्रक न बनवता इथे मस्तं वेळ घालवायचा, खायचं, प्यायचं आणि पॅरिस एन्जॉय करायचे.
फिरतांना काढलेले काही फोटो...
Notre Dame
Eiffel Tower --१८८९ च्या जागतिक प्रदर्शनात मुख्य द्वाराशी ठेवण्याकरिता आयफेल टॉवर ची निर्मिती झाली. याच्या निर्मात्याचे नाव होते Alexandre Eiffel. एकेकाळी पॅरिस ला लागलेलं गालबोट म्हणून ओळखला जाणारा हा टॉवर आता पॅरिस ची ओळख बनला आहे.
आमच्या हॉटेलवरून बस घेतली आणि आयफेल टॉवर ला येऊन पोहोचलो. वर्षानुवर्षे चित्रांमधून दिसलेला, फोटोतून भेटलेला हा मनोरा आपल्या समोर आला की एकदम ओळखीचा वाटतो. सौंदर्याच्या दृष्टीने हा तसा म्हणजे काहीतरीच आहे, त्याला ना रंग ना रूप...आकार मात्र आहे आणि तोही भव्य तरीही प्रमाणबद्ध...याचं ग्लॅमर काही औरच आहे.
टॉवर च्या अगदी वरच्या टोकापर्यंत लिफ्ट जाते तिथून पॅरिसचा नजारा खूप छान दिसतो. पण याची तिकिटं मात्र आधीपासून ऑनलाइन काढावी. तिथे जाऊन तिकिटे काढणे अशक्यं! आम्ही तिकीट काढायला म्हणून गेलो तर ही भलीमोठी रांग होती, इतकी की उभे राहून तिकीट हाती यायला दोन तास तरी सहज लागले असते. पण आम्हाला अजुन एक तिकिटांची रांग दिसली. तिथे अगदीच मोजके लोक होते. गेलो तर समजलं की इथून जिन्याने दुसर्या मजल्यावर का होईना पण जाता येतं. मग काय, लगेच तिकीट काढून आत. जीना काही फार उंच नव्हता, पण वळणावळणाचा आणि अरुंद होता. त्यामुळे दमछाक होतच होती.
वरती पोहोचल्यावर मात्र खाली दिसणार्या पॅरिस चं दृष्य बघून मात्र सारा थकवा निघून गेला.
आयफेल टॉवरबघून खाली आलो. समोरचा रस्ता ओलांडून गेलो आणि जरा पायर्या उतरून खाली आलो तर समोर वाहणारी पॅरिस ची गंगा- Seine. असंख्य कवी, चित्रकार, साहित्यिकांना मोहून टाकणारी सरिता. इथे बोट राइड घेणे अगदी मस्ट आहे....
पॅरिस मधील जवळपास सगळी प्रमुख पर्यटनस्थळे या नदीच्या किनार्याला लागूनच आहेत. तिकिटं काढल्यावर बोटीत वरच्या डेक वर जागा पकडली की पुढचा एक दीड तास हवेच्या शांत झुळुका अंगावर घेत, नदीवर तरंगत अतिशय छान वेळ जातो. रात्रीची क्रूज़ घेतली तर मग सोने पे सुहागा.. कारण रात्रीच्यावेळी संपूर्ण पॅरिस नगरी दिव्यांनी झगमगलेली असते. बोटीमधून आपल्या भवतालची ही चमचमती मायनगरी बघत विहार करणे म्हणजे केवळ अवर्णनीय!!
जालावरून साभार
रात्रीचे ८ वाजत होते म्हटलं आता बस पकडावी म्हणून नदी वरुन जीना चढून वरती आलो. समोर रात्रीची रोषणाई केलेला Eiffel Tower होताच.
बस पकडायची होती पण याच्या वरुन आमची नजरच हलत नव्हती. आठ वाजायला काही सेकंद उरले होते...आम्ही सगळेच टॉवर कडे डोळे लावून बसलो होतो. बरोब्बर आठ वाजले आणि...समोरचा शांत उजळलेला Eiffel Tower अचानक दिवाळीच्या फूलझडी सारखा चमचम करायला लागला. टॉवर वर बसविलेले हजारो दिवे एकसारखे लखलख करू लागले. त्या नाचणार्या दिव्यांबरोबर रंगबिरंगी प्रकाशझोत सुद्धा टॉवरला उजाळा देत होते. पुढचे जवळजवळ पाच मिनिटे रंग आणि प्रकाशाचा तो नेत्रदीपक सोहळा चालू होता. तो संपला आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दुसरा दिवस--- सकाळी उठून ब्रेकफास्ट केला आणि हॉटेल समोरून बस पकडली ती Louvre ला जाण्यासाठी. हे संग्रहालय जगातलं सर्वोत्तम समजल्या जातं. हे तिथे गेल्यावर खरोखर पटतं.
Louvre Palace मधे हे म्यूज़ीयम आहे थोड्यक्यात पॅलेस आणि म्यूज़ीयम हे एकच आहे. आतिभव्य अशा या पॅलेस मधे आठ वेगवेगळे कक्ष आहेत. इजीप्त, ग्रीस, रोम, ईराण या देशांमधील संस्कृतिक ठेवी, मूर्ती, उत्खाननात मिळालेले प्राचीन अवशेष अशा अनेक गोष्टी इथे आहेत.
इजीप्शियन ममिस आहेत, दक्षिण स्पेन मधील हस्तिदंती संदुक आहे, जगप्रसिद्ध ग्रीक Venus de Milo आहे, Michelangeloचा ते रेबेलियस स्लेव आहे, आणि हो मोनालिसा तर आहेच अशा हजारो कलाकृती इथे बघायला मिळतात.
इतकेच नाही तर अजूनही अनेक गोष्टी- रत्नजडीत दागिने आहेत. गळ्यातले हिर्याचे आणि पाचूचे हार, मोत्याचे, माणिकाचे कंगण, पाचू, हिरे जडवीलेले मुकुट। उत्तम प्रतिचे आलिशान गालीचे आणि राजेशाही खानदानी फर्निचर. सोन्याची बारीक कलाकुसर केलेली भांडी, चांदीचे टी सेट्स, रत्नखचित तलवार, खंजीर,एक एक गोष्ट बघा, डोळे दिपून जातील. जगातलं सगळं ऐश्वर्य, सौंदर्य आणि कला जणू या एकाच ठिकाणी एकत्रित आले आहे असे वाटेल. इथून एका एका दालनातून आपणच आपल्याला ओढून बाहेर काढायचं कारण नाहीतर इथून काही पाय निघायचा नाही.
या म्यूज़ीयम चं खास आकर्षण म्हणजे Leonardo da Vinci ची Monalisa. या बाईंनी मात्र माझी फार निराशा केली. अगदी साधारण आकारचं चित्र फ्रेम मधे लावून ठेवले आहे. या चित्रामधे मला तरी काही खास वाटलं नाही. पण ते शांत, गूढ हास्य आणि ती स्थिर नजर मात्र लगेच ध्यानात येते.
त्या चित्राबरोबर फोटो काढायला काय गर्दी होती..मग काय, आम्ही पण मारामारी करत घुसलोच आत...कसबसा फोटो काढला आणि बाहेर येऊन हुश्श केलं....
म्यूज़ीयम च्या बाहेर पडलो. समोरच Tuileries Garden आहे. अतिशय सुरेख बाग आहे ही. चालायला रस्ते, मुलांसाठी खेळायला पार्क, सुंदर पुतळे आणि बागेच्या मधोमध एक मोठा अष्टकोनी तलाव आहे. लोकं त्या तळ्याच्या काठी मस्तं खुर्च्या टाकून बसले होते. लहान मुलं साइकल चालवत होती. इथे बसलं की मागे Louvre आहे आणि पार्काच्या शेवट होतो तिथे दिसतो Place de la Concorde.
फ्रेंच राज्यक्रांती च्या वेळी राजा लुई पंधरावा आणि राणी मारी आनटोनियेट यांचा इथे या जागेवर शिरच्छेद करण्यात आला होता.
इथे दोन अतिशय सुंदर असे कारंजे देखील आहेत. हा चौक बराच मोठा आहे. इथे उभं राहून आजूबाजूचा ट्रॅफिक बघत राहायलाही गंमत येत होती.
पुढे नजर टाकली की दिसतो Arc de Triomphe. फ्रेंच देशभक्त आणि हुतात्म्यांच्या सन्मानार्थ दिलेली ही मानवंदना!
ही आर्क आणि प्लेस दे ला कॉँकॉर्ड च्या मधे पसरलेला आहे - Champs-Elysees. पॅरिस चा हा राजमार्ग !! शहराचा सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा भाग.
अतिशय प्रशस्त रस्ता. रस्त्याच्या कडेने रान्गेने असलेली झाडे. चालण्यासाठी रुंद पायवाट. या भागात अगणित रेस्टोरेंट्स आहेत, जगातल्या उत्तमोत्तम ब्रॅण्ड्स ची दुकाने आहेत. इथल्या इमारती तर एक से एक. राजेशाही आणि सुरेख बांधणी च्या. रस्त्यांनी चालतांना वेळेचा अगदी विसर पडतो. रस्त्यानी गाड्यांचा तुफान ट्रॅफिक असतो. पण आपल्याला पायवाटेने चालतांना त्याचा काहीच त्रास नाही.
दूरवर दिसतोय तो Arc de Triomphe.
आता रात्र व्हायला लागली होती. सगळीकडे दिव्यांच्या प्रकाशात Champs-Elysees उजळून निघाला होता. रस्त्याच्या एका टोकाला Arc de Triomphe चमकत होता.
जालावरून साभार
अशा वातावरणामधून कोणाला निघायला आवडेल? पण दुसर्या दिवशीची फ्लाइट होती. जाणं भाग होतं.
पॅरिस मधून निघतांना या शहराला Good bye कधीच म्हणू नये.....म्हणावं.......Au Revoir...!!!!
प्रचि व वर्णन सुरेख!
प्रचि व वर्णन सुरेख!
वाह!!! मस्तच ..एक दीड दिवसात
वाह!!! मस्तच ..एक दीड दिवसात पॅरिस ची सफर.. मस्ट बी हेक्टिक..पण सफल झालीये.. फोटोज छान आलेत
Nice travelogue.
Nice travelogue.
पॅरिस एक-दीड दिवसात बघणं
पॅरिस एक-दीड दिवसात बघणं म्हणजे महाभारत चार बुलेट-पॉइण्ट्स मधे समजावून घेण्यासारखं आहे.>>
मी पॅरीस तीन वेळा तीन तीन दिवसात पाहिले आहे.
ब्रसेल्स तर मी फक्त १२ तासात पाहिले.
असे अनेक देश आहेत जे मी तुझ्यासारखे धावत पळत मोजक्या ठिकाणी जाऊन पाहिले आहे.
ब्रसेल्सला तर ती गाडी फक्त माझ्यासाठी थांबायची. मी सर्वत आधी उतरून सर्वात शेवटी चढायचो.
मस्त फोटो... जायचे आहे मलाही
मस्त फोटो... जायचे आहे मलाही एकदा !
दीड दिवसातही छान भटकंती
दीड दिवसातही छान भटकंती केलेली दिसतेय. फोटो छानच आलेत.
झकास! चार बुलेटसमधे महाभारत
झकास!
चार बुलेटसमधे महाभारत >>>
उपमा आवडली.
मस्त
मस्त
मंजुताई, वर्षूनील, राजसी, बी,
मंजुताई, वर्षूनील, राजसी, बी, दिनेश, मानुषि, ललिता-प्रीती, मी नताशा-------- तुमच्या प्रतिसादांबद्दल अगदी मनापासून आभार.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.