दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा एपिसोड फार फार फार आवडला....
सगळ्यांच्या कविता मस्त....प्रत्येकाच्या स्वभावाला साजेशा होत्या....मिनल आणि आशु ची कविता सर्वात आवडली Happy
आशु दिवसेंदिवस फारच आवडायला लागलाय...आणि कविता म्हणताचाचा त्याचा अभिनय लाजवाब....खुप रडवलं त्याच्या कवितेने आज...
आणि सगळं काम सोडुन पावसात जावुन भिजावसं वाटलं आजचा एपि बघुन...खरच "भाकरीचा चंद्र" मिळवण्यात आयुष्य वाया तर जात नाईये ना असं आलं मनात...

पावसाचा एपिसोड आवडला. कविताही छान होत्या. विनोद स्वाभाविक होते - आशूचा "याचा त्यावर विश्वास आहे" शेरा सुजय हवामानखात्याच्या अंदाजाबद्दल बोलताना ई. मस्त.

कालचा तो आडकर घरी येतो तो सुरूवात व शेवट चांगला. मधे फिलर्स भरले होते.

आशू ने काय मस्त काम केलं काल.. मान गये बॉस! खरंच रडत होता की काय असं वाटलं. कैवल्यचा शहाणपणा मात्र डोक्यात जातोय. ज्यु. शुगो दातावर दात दाबून बोलायचे कधी सोडणार?

तुम्हाला काय झालंय सर्वांना?या अश्या कविता माबोकराने टाकली असती,तर फैलावर घेतलं असतत त्याला!

d३ मध्ये त्यांनी केल्या, त्यात फक्त आशूची मुक्तछंद कविता बरी होती. म्हणजे छान होती. पण कैवल्यची कविता डोक्यावरून गेली. सुजयच्या कवितेत एक कुठ्लीतरी उपमा चुकली होती. मीनलची पहिली अर्धी कविता छान होती.पण मी ती आधी कधीतरी ऐकलीये दुसरीकडे. Ana ची कविता नव्हतीच. आणि तिचं रोजचंच रडगाण आहे ते 'घरातील भांडण' वगैरे.... रेशमाची बरी होती.

आशून मात्र रडवलं. काय अभिनय करतो पठ्ठ्या !! एक लक्षात आलंय का कोणाच्या, कैवल्यची भूमिका आता तेव्हडी चांगली होत नाहीये. आज्जीबाई आणि नागावकरचा एपि कंटाळवाणा आणि घिसापीटा होता. आशुचा चष्मा हरवतो तो एपि आशु आणि सुजयच्या अभिनयामुळे आवडला. बाकी कैवल्य मात्र सो-सो! आजकाल नाही आवडत तो मला!

आशूचा चष्मेवाला एपिसोड बघवला नाही. किती ती कार्टूनगिरी करत ओढून तानून विनोद. वास्तविक चष्माहरवल्यावर माणूस जसा बघतो तो प्रकारच विनोदी असतो (स्वानुभव) चस्।मा काढला की कंप्लीट आंधळा होत नाही. गरम गुलाबजामुनचं पातेलं पायावर पाडून घेत नाही.

तो आज्जींचा भाग पण असाच बोअर झाला!!! वैताग

मला कैवल्य आवडत नाही, रेश्माही नाही. मला आशु, मीनल, सुजय जास्त आवडतात. Ana पण काही जागा चांगल्या घेते.

आज्जीबाई आणि नागावकरचा एपि कंटाळवाणा आणि घिसापीटा होता. >>>>+१००
तरीही आशु, सुजय, मीनल, रॉक्स , Ana खूपच गोडूस वाटते.

मला तर तो नागावकरला बोलावतात तो एपिसोड इ. पाचवीत आपण उत्स्फूर्तपणे वर्गापुढे नाटुकले सादर करायचो ना, (गावातली म्हातारी शहरात गेली.. वगैरे) तसा वाटला. काहीतरी हुशार वळण असेल पुढे म्हणता म्हणता एपिसोड संपला.
पण ते नागावकर नागावकर आले घरा,, स्वागतगीत भारी होतं.

मला आजचा भाग नाही आवडला आणि पटलाही नाही. ती बनियन शर्टाच्या आत घातली तरीही वास येणारना, न धुतलेली मग आजच कसा वास आला आणि इतके दिवस नाही.

+१

मला उगाच यक्क वातला आजचा भाग

पण कलाकार नेहमी प्रमाणे उत्क्रूष्ट (हे मला लिहिता येईना Uhoh )

सोनं करतात हे लोकं सगळ्याचं....
मस्त आहेत

बनियन मिळाल्यावर सुजय चा डान्स मस्त.. Happy
आज्जींच्या स्वागताचे आणि नागावकरांच्या स्वागताचे गाणे.. मस्त..
रिफ्रेशिन्ग आहे.. काही गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत..

पण प्रत्येक एपिसोड मधे एक न एक तरी मस्त पंच असतोच..

त्या पंचेससाठीच बघते मी. नाहीतर हल्ली बोअर होतेय. कालचा पण नाही एवढा आवडला. Ana आणि मिनलने सहज काम केलं.

Pages