Submitted by _हर्षा_ on 17 June, 2015 - 03:54
धुंद पाऊस रम्य गारवा
झरझर झरतो तनुवर मारवा
त्याच्या मिठीतही तुझेच भास
नजरेत इंद्रधनु ओलेते श्वास
श्वासांची लय गंधित स्वर
लाडिक मिठी तरीही कातर
गंधाळल्या तनुस शब्दांचाही भार
श्वासांच्या लयीत जणू मेघमल्हार
आठवांचा वळीव बरसतो जरी
मन धुंद हळवे तरी
प्रेमाची सय घेऊन वारा
वेचित जाई आसमंत सारा
मधाळ स्पर्श अल्लड मिठी
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता. आदे, तू पण?
सुंदर कविता.
आदे, तू पण? शाब्बास!
छान आहे कविता!!!
छान आहे कविता!!!
मस्त !
मस्त !
जमलिये छान!
जमलिये
छान!
अप्रतीम! नेहमी लिहीत रहा.
अप्रतीम! नेहमी लिहीत रहा.
धन्यवाद मंडळी __/\__!!!
धन्यवाद मंडळी __/\__!!! (शोतै, नरेश, मंजूषा, रीये, अप्प्या)
मस्त आहे कविता !
मस्त आहे कविता !
<<गंधाळल्या तनुस शब्दांचाही
<<गंधाळल्या तनुस शब्दांचाही भार
श्वासांच्या लयीत जणू मेघमल्हार<<
अहाहा... किती गोड!
आदे, लिहित रहा ग! तुझ्या प्रतिभेला धुमारे फुटलेत की !
छान ..........मस्त ..
छान ..........मस्त ..
धन्यवाद प्रकु,
धन्यवाद प्रकु, विश्या!
आर्यातै धन्स गं!
सुंदर. छान
सुंदर.
छान
धन्यवाद संजीव!
धन्यवाद संजीव!