प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( http://www.maayboli.com/node/52091 ) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोन्ट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली.. हे जरी खरं असलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किकता, जिज्ञासू वृत्ती व कारणमीमांसा असे मूळ व मुख्य घटक असले तर प्राथमिक विज्ञान कोणालाही शिकवता येऊ शकतं, हे आज आत्मविश्वासाने सांगू शकते. ह्या मूळ घटकांवरची धूळ झटकण्याचं काम केलं ग्यानसेतूचे प्रशिक्षक सुजयसर, चैतन्य अन प्रवीण ह्यांनी व त्याला चमकवण्याचं काम केलं निकीता, अर्पिता, अनन्या व रुक्मिणी ह्या तरुणींनी! ह्या सगळ्या चमूला त्रिवार धन्यवाद!
ज्ञानप्रबोधिनीत पंचवीस-सव्वीस मार्चला प्रशिक्षण कार्यशाळेत प्रवेश केला दबकत दबकतच! शाळा म्हणजे वयस्कर (वयाने मोठे) मास्तर अन लहान विद्यार्थी असं सर्वसाधारण समीकरण नव्हतं पण अर्थात ज्ञानाने मास्तर निर्विवाद ज्येष्ठ होते. अरविंद गुप्तांच्या छोट्या छोट्या प्रयोगातून, खेळण्यांमधून संकल्पना स्पष्ट करणं, जिज्ञासू व निरीक्षण वृत्ती जागृत करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू. उल्हसित वातावरणात गाणी, गोष्टी, खेळ, ओरिगामी, प्रात्यक्षिकं करण्यात दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. अशीच आमुची शाळा असती, असेच आमुचे शिक्षक असते... 'आम्ही' कसे घडलो असतो विचार करू लागले... असो! आज स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली पण भारताच्या काही दुर्गम भागात ना अश्या शाळा आहेत ना असे शिक्षक. पण 'ग्यानसेतू'च्या ह्या उपक्रमाद्वारे काही प्रमाणात ती उणीव भरून काढायला मदत तर करू शकतो ना!
चौदा मेला आम्ही पाचजणी विमानाने गवाहाट्टीला संध्याकाळी पोचलो व तिथून रात्री आठ वाजताच्या भारतीय रेलने तिनसुखियाला निघालो. चार वाजता लख्ख उजाडलेलं होतं ... पाऊस पडत होता.. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळेच मळे... नुकतीच न्हाऊन निघालेली ओलेती हिरवीकंच धरती... नयनरम्य मन प्रसन्न करणारी पहाट! तिनसुखियाला यजमान 'लोमी' घ्यायला आली होती. आसामामध्ये बंद पुकारल्या कारणाने पुढे रोईंगला जाणे धोक्याचे होते. एक दिवस हॉटेलात मुक्काम करावा लागला. दुसर्या दिवशी पहाटे साडेपाचच्या बसने रोईंगला निघालो. तिनसुखिया ते रोईंग साधारण १०० किमी पण प्रवास ५ -६ तासाचा. उबडखाबड रस्त्यावरून काही अंतर गेलो की उतरायचं, नावेत बसून ब्रम्होपुत्रो पार करायची व पलिकडल्या तीरावर बस पकडायची व रोईंग गाठायचे. आपल्या संथ वाहणार्याा कृष्णामाई सारखीच ही संथ ब्रह्मपुत्रा.
लोअर दिबांग व्हॅलीचं जिल्ह्याचं ठिकाण 'रोईंग'. छोटंसं गांव! आमची व्यवस्था 'इनतया' शाळेच्या वसतिगृहात करण्यात आली होती. मुलांना सुट्या असल्यामुळे आपआपल्या घरी गेली होती. हसमुख ज्योतीदिदी (शाळेच्या संचालिका) स्वागताला हजर होत्या. ज्योती, लोमी भगिनी पूर्वपरिचीत असल्यासारख्या वागत, वाटत होत्या. दोघींचाही सेन्स ऑफ ह्यूमर जबरदस्त त्यामुळे संकोचाला थाराच नव्हता. चहा नाश्ता करे पर्यंत पावसाने विश्रांती घ्यायचं ठरवलं व आम्ही संधीचा फायदा! शाळेत ऐकू येणारा नदीचा खळखळाट प्रत्यक्ष बघायला बाहेर पडलो. देवपानी (इजे) व इमेचा संगम ! पाऊस पडल्यामुळे दोन्ही नद्या खळाळून वाहत होत्या. बम्हपुत्रा व तिच्या उपनद्या पात्र बदलतात, हे ऐकून होतो. तिथल्या दीड दोन तासाच्या वास्तव्यात प्रत्यक्ष ते दृश्य बघून चकित झालो. साहसी व उत्साही चारचौघी वीरबालांनी झुलत्या पुलावर चालण्याचा रोमांचकारी अनुभव घेण्याची संधी सोडली नाही. कुठेही नजर टाका 'इतना बडा पहाड, पहाड पर पेड और.. और हरियाली इधर उधर, हरियाली इधर उधर' ज्ञान प्रबोधिनीत शिकवलेलं गाणं ... प्रत्यक्ष अनुभवत होतो. अरुणोदयाचा प्रदेश म्हणून अरुणाचल प्रदेश. सूर्योदय पहाटे चारला व संध्याकाळी पाच वाजता अंधारायला सुरुवात व्हायची. दुसर्याप दिवशीच्या कार्यशाळेची तयारी करायची होती. काही अतिउत्साही मुली आदल्या दिवशीच मुक्कामाला आल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारत, सहभागी करून घेत कार्यशाळेची तयारी करू लागलो.
ज्ञानयत्रा भाग २: http://www.maayboli.com/node/54363
ज्ञानयात्रा भाग ३: http://www.maayboli.com/node/54390
ज्ञानयात्रा भाग ४ : http://www.maayboli.com/node/54409
क्रमशः
छान. पुढील भाग येउ द्या!
छान. पुढील भाग येउ द्या!
वा, खूपच सुरेख लिहिलंय
वा, खूपच सुरेख लिहिलंय मंजूताई - पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
खूप छान वाटतंय वाचायला..
खूप छान वाटतंय वाचायला.. आपल्याच देशांतील ही राज्ये किती किती अनोळखी आणी उपेक्षित राहिलीयेत..
फोटो अजून मोठे आणी क्लिअर टाकता येतील का??
मला वाचतानाच इतकं हरखून जायला
मला वाचतानाच इतकं हरखून जायला होतंय कि तर प्र्त्यक्ष तिथे जाता आलं तर काय होईल असे वाटतेय. पुढच्या भागाची वाट बघतोय.
सगळ्यांना धन्यवाद! दोन दिवस
सगळ्यांना धन्यवाद! दोन दिवस झाले फोटोशी खटपट चाललीये काय होतंय कळत नाहीये ... परत एकदा प्रयत्न करुन पाहते... काय चुकतंय कोणी सांगू शकेल का?
खुप खुप सुरेख प्रवास व र्ण
खुप खुप सुरेख प्रवास व र्ण न.....
अगदी प्रत्य क्ष अनुभ व ल्या सारखे वा ट ते आहे...
दु. भागाच्या प्र ति क्षे त. ......
काय भारी! आत्ता उठून जावसं
काय भारी! आत्ता उठून जावसं वाटतंय! पुभाप्र!
वा!पाउस असताना किती छान वाटल
वा!पाउस असताना किती छान वाटल असेल! मस्त लेख!
आहा मस्त मस्त.. मंजूताई, खरचं
आहा मस्त मस्त..
मंजूताई, खरचं खुप खुप मस्त लिहिलयं. असले छोटे छोटे अॅडव्हेंचर अजुनही चालु असतात याच जामच कौतुक वाटलं मला.. माझा बाहेर फिरायचा योग कधी येणारे कुणास ठाउक.. पण इथ लिहिलेली प्रवासवर्णन आणि प्रचि बघुन बहोतच हेवा वाटतो सर्वांचा ..
मला नद्या, समुद्र, धबधबे वगैरे सगळ काही आवडत पण एवढ्या प्रचंड प्रमाणात समोर आल कि धडकी बसते.. त्यावर त्याची ओढ मात करते आणि सगळ सुरळीत होउन जात हे पन तेवढच खरय म्हणा ..
मुळात पोहता येत नसल्यामुळे हि भिती आहे बाकी काही नाही ..
लिहित राहा.. पुढील लेखाची वाट पाहतेय .. आणि हो, मला वाटल कि मलाच प्रचि धड दिसत नाही आहे कि काय पण सर्वांचाच प्रॉब्लेम दिसतोय हा.. प्रचि थोडे क्लिअर टाक म्हणजे आणखी मजा येईल
अहाहा, सुरेख, मस्तच. काय काय
अहाहा, सुरेख, मस्तच. काय काय आणि किती उपक्रमात भाग घेतेस मंजुताई. ग्रेट.
अवांतर थोडंसं, ब्रह्मपुत्रला नद समजतातना, विशाल पात्र आहेना त्याचं. मला 'लोहित किनारे' ही मालिका आठवली, मी शाळेत असताना दूरदर्शनवर लागायची. त्यात सांगितलं होतं की ब्रह्मपुत्रा नदीला त्या भागात नद समजतात, दुसरे नांव लोहित.
सलग सगळे भाग वाचले. खूप छान
सलग सगळे भाग वाचले. खूप छान लिहीलय.
अप्रतीम लेख, लेखनशैली खुपच
अप्रतीम लेख, लेखनशैली खुपच सुंदर वाचतांना असं वाटल मी तिथेच आहे.