Submitted by पियू on 12 June, 2015 - 15:47
नुकतेच युनाईट २ (मायक्रोमॅक्स १०६) वर अँड्रॉईड लॉलीपॉप अव्हेलेबल झाले आणि मोठ्या उत्सुकतेने मी ते डाऊनलोड केले. माझा युनाईट २ किटकॅट चा लॉलीपॉप केला नी पस्तावले.
काही फिचर्स वगळता लॉलीपॉप व्हर्जन ने मोबाईलमधली इतकी जागा खाल्लीये कि बस.
याव्यतिरीक्त बटणे विचित्र जागी असल्याने फोनवर बोलता बोलता फोन म्युट होणे, स्पीकर ऑन होणे असले भयाण प्रकार होत आहेत.
तरी आता लॉलीपॉप डाऊनग्रेड करुन किटकॅट करणेचे आहे. तूनळीवर सर्च केले असता फास्टबूट नी लॅपटॉपला अॅटॅच करून रुट करणे इत्यादी मार्ग दिसताहेत. तर हे न करता डाऊनग्रेड करणे शक्य आहे का? कारण अपग्रेड करतांना मला असं काहीच करावं लागलं नव्ह्तं.
प्लीज हेल्प !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदा अपग्रेड केल्यावर इतक्या
एकदा अपग्रेड केल्यावर इतक्या सहजासहजी डाऊनग्रेड नाही होत.
एकदा संपूर्ण फोन, त्याची मेमरी, मेमरी कार्ड असं सगळं वाईप करून, फोन फॅक्टरी रीसेट करून पाहा. थोडाफार तरी फरक पडेलच. (असं करण्यानी ओएस डाऊनग्रेड होत नाही)
डाउनग्रेड करायला रुट करणे
डाउनग्रेड करायला रुट करणे गरजेचं आहे. म्हणजे ते फास्टबुट वगैरे सगळं.
जर बटन्स ची नविन जागा हा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यावर उपाय काढू. मुळात फोन वर बोलत असताना स्क्रीन बंद झाला पाहिजे म्हणजे कुठलीच बटणे दाबली जाणार नाहीत.
योकु रिकवरी मोडमधून जरी
योकु
रिकवरी मोडमधून जरी फॅक्टरी रिसेट केलं तरीही डाऊनग्रेड होणार नाही.
रूट करून जुनी स्टॉक रॉम फ्लॅश करावी लागेल.
पियुतै, आपण आपला फोन
पियुतै,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण आपला फोन मायक्रोमॅक्स कंपनीच्या सर्विस सेंटरमधे नेऊन पाहिलात काय? तेथिल कर्मचार्याशी थोडे मृदू भाषण केल्यास तो आपले काम करून देण्याची शक्यता आहे. ओव्हर द एअर अपग्रेड केलेले करप्ट आहे, फोन त्रास देत आहे या सबबीखाली हे काम करून मिळेल
आपण आपला फोन मायक्रोमॅक्स
आपण आपला फोन मायक्रोमॅक्स कंपनीच्या सर्विस सेंटरमधे नेऊन पाहिलात काय? तेथिल कर्मचार्याशी थोडे मृदू भाषण केल्यास तो आपले काम करून देण्याची शक्यता आहे.
>>>
काहीही हं ई- ब्लिस्स्स. अहो असल्या सर्विस सेन्तर मध्ये कोबी, विटा, दगड विकणारे सेल्समन कमी पगारात आणून बसवलेले असतात हे तुम्हाले माहीत नाही का बापा? त्याहिले मोबाईलातले कायपण समजत नसते. त्याहिले मोबाईल आणि कोबी विटा एकच...
आदरणीय रॉबीनहूडा, आमच्या
आदरणीय रॉबीनहूडा,
आमच्या गावातील मामॅससेंचा अनुभव वेगळा आहे. तेथील तरूण कार्यकर्ते उत्साही व ज्ञानी आहेत. आपल्या पुण्यपत्तनातली परिस्थिती वेगळी असावी कदाचित.
आमच्या गावातील एका मोठ्या
आमच्या गावातील एका मोठ्या भारतीय दुरध्वनी कंपनीच्या सेवा केंद्रातील महिला कर्मचा-याने, एका ग्राहकास "आपले चरित्र आहे का आमच्या सेवा केंद्रात येण्याचे" असे अति नम्र भाषेत विचारले होते. त्या ग्राहकाने, २ महिने झाले तरी फोन दुरुस्त करुन मिळत नाही तर कमित कमी जसा आहे तसा परत तरी द्या असे म्हणुन त्या कर्मचा-याशी आवाज चढवुन बोलण्याचा गंभीर गुन्हा केला होता.
नमस्कार!! फोन रुट झाला की
नमस्कार!!
फोन रुट झाला की नाही, हे चेक करायला कोणती अॅप आहे??
जर बटन्स ची नविन जागा हा
जर बटन्स ची नविन जागा हा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यावर उपाय काढू.
>> हा वन ऑफ द प्रॉब्लेम आहे. जनरली फोन चालु असतांना कानाला लावल्यावर स्क्रीन बंद व्हायला पाहिजे तरी होत नाही.
मुख्य प्रॉब्लेम जागेचा आहे. या ओएस ने खुप जागा खाल्ल्याने मला पुर्वीचे अॅप्स घेताच येत नाहीयेत. थोडीशीच जागा उरलीये. व्हॉट्सअॅप तर ठेवलेच आहे. ते सोडून फारतर १-२ अॅप्स.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सर्विस सेंटरला जाऊन बघते.
सर्विस सेंटरला जाऊन
सर्विस सेंटरला जाऊन बघते.
<<
फोन विकत घेतल्याची मूळ पावती सोबत नेण्यास विसरू नयेत. त्याची एक सत्य छायाप्रत सोबत ठेविलीत तर अधिक बरे. ती छायाप्रत ते लोक जमा करून घेतात.
मी पण विचारले होते
मी पण विचारले होते सोनीवाल्यांना पण त्यांनी खालील उत्तर दिले....
Greetings from Sony Xperia support.
We value the importance of your concern.
As per your query, we would like to inform you that It is not possible to downgrade a device to a previous Android version, neither by yourself nor by a service center.
Also, we would request you to repair the software of your device using the below mentioned steps in order to resolve the issue which you are facing with your handset.
फोन अपग्रेड करता येतो हे खूळ
फोन अपग्रेड करता येतो हे खूळ ग्राहकांच्या डोक्यात भरवून फोन खपवणे हे सर्वात प्रथम थांबवायला हवे.
आवं पाटील, मंग काय पर्तेक
आवं पाटील, मंग काय पर्तेक व्हर्शनचा फोन शेप्रेट घ्यायचा म्हंता का काय? समद्या जिमिनी इकाया लागतीन मंग...
असं काय मोठं उद्धारीकरण करतात
असं काय मोठं उद्धारीकरण करतात प्रत्येक नवीन व्हर्शनमध्ये?
ह्येच आपलं , हिकाडची बटनं
ह्येच आपलं , हिकाडची बटनं तकडं आन तकडची बटनं हकडं, हाकानाका....
आदरणीय एसार्डी महोदय, विंडोज
आदरणीय एसार्डी महोदय,
विंडोज किंवा आयफोनांची पुढील आज्ञाप्रणाली बदल येत नाहीत काय? काही नवे असल्याची लालूच दाखविल्याशिवाय विनातक्रार नीट चालणारा जुना फोन फेकून लोक नवा फोन घेतील काय? न घेतला तर फोन बनविणार्या कंपन्यांनी, त्यांची आज्ञाप्रणाली लिहिणार्या अभियंत्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहावे? त्यांच्या रोजीरोटीचे काय? त्यांचे शेयर्स खरीदून आयते पैसे कमवायचा प्रयत्न करणार्या तुमच्या माझ्यासारख्या अतीसामान्यांचे काय?
तेव्हा
>>
फोन अपग्रेड करता येतो हे खूळ ग्राहकांच्या डोक्यात भरवून फोन खपवणे हे सर्वात प्रथम थांबवायला हवे.
<<
असे निष्ठूर शब्द वापरू नका ही विनंती.
हे बघा आपल्या जबब्दरिवर
हे बघा
आपल्या जबब्दरिवर बघा
http://www.micromaxunite2.net/2014/09/how-to-downgrade-to-jellybean-rom....
https://unite2world.wordpress
https://unite2world.wordpress.com/2014/11/27/downgrade-how-to-flash-stoc...
श्री इ-ब्लिस (अति-आनंद)
श्री इ-ब्लिस (अति-आनंद) निष्ठूर शब्द मागे घेत आहे.काही मित्र मैत्रिणी "अग/अरे कालच मी फोन अपग्रेड केला अन काय भन्नाssट चालतोय सांगू " असे बोलून इतरांना जळवतात ते व्रत त्यांनी श्रावण महिन्यापर्यंत तरी सुरू ठेवून आदन्याप्रणालीलेखकांची पावभाजीत खंड पाडू देऊ नये.
पियु यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता केवळ फालतू संदेश लिहून वेळ घालवल्याबद्दल क्षमस्व.
कॉल सुरू असताना स्क्रीन लॉक
कॉल सुरू असताना स्क्रीन लॉक हा बेसिक फंक्शन मधील एक फंक्शन आहे. जर हे होत नसेल तर सर्विस सेंटर वाले नक्कीच मदत करतील. नहीं तर कॉल स्क्रीन लॉक असा एक aap आहे. तो कॉल आला अणि अटेंड केला की स्क्रीन लॉक करतो आटोमेटिक.
os downgrade करने इतके सोपे नहीं. अणि आपला डेटा पन डिलीट होतो. काहीही ट्राय करायच्या आधी फ़ोन चा पूर्ण backup घ्या
नवीन अँड्रॉईड लॉलीपॉपला मी
नवीन अँड्रॉईड लॉलीपॉपला मी पण वैतागलो आहे. भिक्कार आहे हे लॉलीपॉप!
सोनीच्या ग्राहक कक्षाने सांगितले की त्यांनाही जुनी प्रणाली परत स्थापित करता येणार नाही.
यापुढे कोणतेही अँड्रॉईड अपग्रेड करण्यासाठी भरपुर वेळ थांबून नेटवर चौकशी करून मगच करणार असे ठरवले आहे.
@निनाद - आपन कोणता सोनी चा
@निनाद - आपन कोणता सोनी चा फोन वापरता
ओह.. इथे अपडेट करायचे राहीले
ओह.. इथे अपडेट करायचे राहीले कि मी शेवटी मायक्रोमॅक्स च्या गॅलरीत जाऊन ३०० रुपये भरून डाऊनग्रेड करुन घेतला मोबाईल.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
उत्तम , थोड़े पैसे गेले पण
उत्तम , थोड़े पैसे गेले पण मनाची शांति परत मिळवली ।