Submitted by क्ष... on 12 August, 2009 - 12:07
इथे बाजारात विकत मिळणार्या वेगवेगळ्या कंपन्यांची तयार लोणची याविषयावरील चर्चा, आलेले अनुभव लिहीणे अपेक्षित आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईट्ट बीबी आहे हा. तो.पा.सु.
वाईट्ट बीबी आहे हा. तो.पा.सु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला गोंगुरा लोणच बाहेरच फारसं आवडत नाही, पण उडुपीचं गोंगुरा-ओनीयन चांगलं वाटलं. उडुपीच आणि मदर्सच कट मँगो चांगलयं.
कोलीम म्हणजे काय आता ?
कोलीम म्हणजे काय आता ? फ्लेक्स सीड्सचे एक नाव का ?>> छया अजिबात नाही. कोलीम म्हणजे छोटी कोलंबी सारखा काहीतरी एक प्रकार आहे. अगदी एखाद सेंटीमीटर वाढतो. खाडीच्या पाण्यात वाढतो. मला वाटत नाही कि बाजारात कुठे मिळते हे. लोणचे फार दिवस टिकत नाही. पुढच्या वेळी देशात गेलो कि घेऊन येईन तेंव्हा पाठवून देईन.
...........................
...........................
पुढच्या वेळी देशात गेलो कि
पुढच्या वेळी देशात गेलो कि घेऊन येईन तेंव्हा पाठवून देईन. >>> नको नको![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सर्वांचा हेतु चांगला आहे पण पाककृती माहिती आहे का अथवा खुद्द पाककृती हा ह्या बाफचा विषय नाही. कृपया इथे फक्त विकतची लोणची कुठली चांगली नी वाईट तेव्हढेच लिहा.
प्रियाचे मँगो जिंजर सही होते.
प्रियाचे मँगो जिंजर सही होते. उडुपीचे पण चांगले आहे.
हा बीबी मी भारतात होते तेव्हा
हा बीबी मी भारतात होते तेव्हा सुरु केला असतात तर काय बिघडलं असतं? आता कुठे मिळणार ही खास देशी लोणची?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे छन्ने म्हणजे बिमली का ?
हे छन्ने म्हणजे बिमली का ? वर्णन त्याचेच वाटतेय पण त्याचे आवळ्यासारखे झाड असते.
माईनमुळ्याचे लोणचे हा खास कोल्हापुर बेळगावचा प्रकार.
कोकणातले खास प्रकार
करवंदाचे लोणचे, बिमली, करमळे, कच्चा फणस, कोवळे आंबाडे ( पालेभाजी नाही ), जायफळाची फळे, निवं ( कदंबाची फळे ). हि लोणची अर्थातच बाजारात मिळत नाहीत.
कर्नाटकाच्या कुर्ग प्रांतात, बांबूच्या कोवळ्या कोंबाचे लोणचे घालतात. आसाम भागातही ते घालतात. तसेच आसाम भागात मश्रुमचे लोणचे घालतात. हे प्रकार बाजारात मिळू शकतील.
कोवळ्या बांबुचे लोणचे
कोवळ्या बांबुचे लोणचे पंजाबातपण घालतात.. हिमाचलच्या प्रदेशाच्या आसपास. पण हे लोणचे बाजारात मिळण्याची शक्यता खुपच कमी. बांबु संरक्षित वनस्पतींमध्ये येतं बहुदा, कारण कोवळे बांबुचे कोंब तोडण्यावर बंदी आहे.
हिमाचल प्रदेशात छोट्या
हिमाचल प्रदेशात छोट्या सफरचंदांचं अफलातून लोणचं मिळतं. बान्द्र्याला आरोही म्हणून एक दुकान आहे अरोमा प्रॉडक्ट्स वगैरे मिळतात त्यांच्याकडे कधी कधी हे लोणचं मिळतं.
बांबूचे कोवळे कोंब खुडायला व
बांबूचे कोवळे कोंब खुडायला व विकायला बंदी आहे हे खरे, पण गोव्यात ते सर्रास विकायला असतात. वासोते म्हणतात त्याला तिथे.
कारली, तोंडली, काकडी ( मोहरी फेसून), गाजर, शलजम, कॉलीफ्लॉवर, हि सगळी, ताजी करुन खायची लोणची.
छुंद्यासाठी कैरीचा किस मिठ
छुंद्यासाठी कैरीचा किस मिठ हळद लावून ठेवला आणि पिळला कि त्याला पाणी सुटते. त्या पाण्यात ओली बडिशेप, ओली मिरी, कोवळी गवार वगैरे घालून, ठेवतात. मस्त चव येते त्याला.
नुकतेच एका ठिकाणी आंबोशीचे
नुकतेच एका ठिकाणी आंबोशीचे लोणचे बघितले. कोणाला माहिती आहे का कसे लागते ते?
प्रियाचे आख्ख्या छोट्या
प्रियाचे आख्ख्या छोट्या कैर्यांचे लोणचे मस्त असते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅपल-लोणचे दिल्लीत कुठे मिळेल? ब्रँड आहे का?
महाराष्ट्रात जसे अंब्याचे
महाराष्ट्रात जसे अंब्याचे तिखट लोणचे करतात तसे बेडेकरांव्यतिरिक्त अजुन कोण करते का? इथे मिळु शकेल का? १०० प्रकारची लोणची आणुन टेस्ट करायचा कंटाळा आलाय.
हो. 'patak' चं 'hot mango
हो. 'patak' चं 'hot mango relish' खूप चवदार आहे. बरंच तिखट आहे.
आंब्याचे तिखट लोणचे - संजीव
आंब्याचे तिखट लोणचे - संजीव कपूर आणि मदर्सचे चांगले वाटले. २ दिवसांपूर्वी गुंदाचे लोणचे आणले आहे. फार काही वेगळे लागले नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाठक असेल तो. लखुभाई पाठक .
पाठक असेल तो. लखुभाई पाठक . नरसिंहरावावर आरोप करणारा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते इंग्लंडचे पाठकच आहेत पण
ते इंग्लंडचे पाठकच आहेत पण त्यांनी इंग्रजीत patak's केलय.
आंब्याचे तिखट लोणचे : संजीव
आंब्याचे तिखट लोणचे : संजीव कपूर , बेडेकर , प्रविण - मस्त वाट्ले .
संजीव कपूर /उडुपी :जीन्जर -गार्लीक टेस्टी
लिंबाचे लोणचे फक्त प्रविण all time fav.
उडुपी बरेच प्रकार जे माझ्यासाठी नवीन होते ते आणुन पाहीले (टोमटो, गार्लीक ,गोन्गुरा ,जिन्जर etc.) ठीक वाट्ले पण २-३ वेळा खाल्यानन्तर तसा कंटाळा आला मग कंपल्सरी संप्वावे लागले
आंबोशीचे लोणचे अगदी लहानपणी खाल्याचे आठवतेय तेही होममेड. जराचे काळपट रंगाला पण मस्त लागते. सुकवलेल्या आंब्याच्या/ कैरीच्या फोडीचे गोड्सर असते जरा ,बहुतेक मोहरी फेसूनही करतात , त्या फोडी जरा वातड /खुट्खुटीत असायच्या जेवणानंतर बरेच्दा त्या चघळत बसायचो आम्ही. सध्या आमच्याकडे लिंबु सोड्ल्यास कोण्तेच टिकाऊ लोणचे बनत नाही पुर्वीसारखे ... आता नक्किच शोध घ्याय्ला हवा हे कुठे मिळेल याचा.
बर्याचदा विकतच्या लोणच्यात
बर्याचदा विकतच्या लोणच्यात जास्त प्रमाणात व्हिनेगर घातलेले असते, त्यामुळे ते चवीला घरच्या सारखे लागत नाही. त्यातल्यात्यात प्रवीण आणि बेडेकरांचे आंबा, लिंबू, मिरची व मिश्र हे प्रकार चांगले आहेत.
सा.बां. नी तेलविरहीत लिंबाचे लोणचे शिकवलेय. त्याप्रमाणे करून ठेवलय. झकास लागतय.
रच्याकने, बेडेकरांनी रसलिंबू म्हणुन एक उत्पादन आणलय, ते कोणी ट्राय केलय का?
दीप चे गोंगुरा(आंबाडी) लोणचे
दीप चे गोंगुरा(आंबाडी) लोणचे पण मस्त आहे.. साधारण आंबाडीच्या चटणीसारखे लागते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भातात कालव्उन मस्त लागते... भाकरी असेल तर उत्तम..
MTR चे लिंबुमिर्ची, आंब्याचे मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला कुणी तरि लिंबाच्या गोड
मला कुणी तरि लिंबाच्या गोड लोणच्या चि सोप्पि रेसिपि सांगा ना प्लीज!
थन्ड, इथे
थन्ड, इथे पहा!
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post.html
अजुन एक लिहिते थोड्या वेळात.
निरव (NIRAV) brand चौकोनी
निरव (NIRAV) brand चौकोनी बुटकी बरणी : गुज्जु स्टाईल गोड्केरी / छुंदा तसेच लिंबु लोणचे पण मस्त असाय्चे. ५-६ वर्षापुर्वी २-३ जणी शेअर कराय्चो .. खपायचे नाही इतके
कच्च्या करवंदांचे लोणचे आम्ही
कच्च्या करवंदांचे लोणचे आम्ही कोकणातून आणतो. मस्तच लागते.
चकुतर्याच लोणचं खाल्लय का
चकुतर्याच लोणचं खाल्लय का कुणी? चांगलं लागतं ते पण..
अरे! बरं झालं ह्या बीबी वर आले.. मी ओली हळद आणलेली लोणच्यासाठी गेल्या रवीवारी!
विसरून गेलेले पार! आत्ता टंकलेखन करता करता आठवलं!
अमिता,तेलविरहित लोणच्याची
अमिता,तेलविरहित लोणच्याची रेसिपी देणार का प्लीज?
स्नेहा, तुमची विपु चेक
स्नेहा, तुमची विपु चेक करा.
नानबा, चकुतरा काय आहे?
बेडेकर रसलिंबू खाऊन
बेडेकर रसलिंबू खाऊन पाहिले.ठिक आहे.पूर्वी आई लिंबाचा जॅम करायची थोडे तसे लागले.चेंज म्हणून छन आहे.
मदर्स चे गोडकैरी खाल्ले परवा.मस्त आहे. नक्की ट्राय करून पहा.
केप्र कंपनीची सगळी लोणची
केप्र कंपनीची सगळी लोणची उत्तम आहेत. लिंबू, गोड आणि तिखट असे दोन प्रकार मिळतात. लिम्बूमिरची असे एक आहे. पुण्यात मिळते बाहेर कुठे मिळते का नाही कल्पना नाही.
Pages