Submitted by क्ष... on 12 August, 2009 - 12:07
इथे बाजारात विकत मिळणार्या वेगवेगळ्या कंपन्यांची तयार लोणची याविषयावरील चर्चा, आलेले अनुभव लिहीणे अपेक्षित आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
maitreyee | 12 August, 2009 -
maitreyee | 12 August, 2009 - 09:02 नवीन
लोणची हा विषय आहे आज? मला पटक्सची आवडतात, इतक्यात अशोकाचं ऑऑ मधलं मिक्स लोणचं पण आवडलं.
Mrinmayee | 12 August, 2009 - 09:08 नवीन
खाना खजान्याचं हिरव्या मिरचीचं (लाल मसाला भरलेलं) लोणचं पण छान आहे चवीला.
slarti | 12 August, 2009 - 09:12 नवीन
प्रियाचे गोंगुरा आणि कोथिंबीर लोणचे झिंदाबाद. कैरीचे हैदराबादी लोणचे स्वर्गीय.
lalu | 12 August, 2009 - 09:13 नवीन
मदर्स रेसिपीचे महाराष्ट्रियन कैरी, माइल्ड लिंबू, मिक्स इत्यादी लोणची छान आहेत. घरगुती लोणच्यासारखी चव आहे. त्यांचे मसालेही मिळायचे पूर्वी. हल्ली पाहिले नाहीत.
cinderella | 12 August, 2009 - 10:18
मदर्स रेसिपीचं स्टफ्ड चिली छान आहे. अर्ध्या मिरच्यांचे तुकडे असतात त्यामुळे ताटात घेतलेलं टाकुन द्यावं लागत नाही.
http://www.ravimasale.com/pic
http://www.ravimasale.com/pickles.html इथे माइनमुळा, आलं, ओली हळद ह्यांची लोणची पण आहेत विकायला.
माईनमुळा म्हणजे काय या
माईनमुळा म्हणजे काय या प्रश्नाला मिनोतीनी दिलेलं उत्तर
karadkar | 12 August, 2009 - 11:50
अग मला पूर्वी वाटायचे की माईनमुळा म्हणजेच हॉर्सरॅडिश पण तसे नसावे. मुळ्यासारखे दिसणारे कंद असतात पण इतके पांढरे नसतात थोडे मातकट रंगाचे. चव थोडी मुळ्यासारखीच असते म्हणुनही कदाचीत माईनमुळा म्हणत असावेत. मिरची लिंबु आणि माईनमुळा याचे एकत्रित लोणचे कोल्हापुर सांगली भागात घालतात. पुढच्यावेळेस गेले की फोटो काढुन आणता येतो का पाहेन.
आबईच्या शेंगांची भाजी कारळ्याचे कुट घालुन तेलावर लसणीची फोडणी घालून परतली.
PRAJA | 12 August, 2009 -
PRAJA | 12 August, 2009 - 12:12
आबई च्या शेंगा हिरव्या, रुन्द, आणि चपट्या असतात. त्यातल्या त्यात गुलमोहोराच्या शेंगेसारख्या, पण आकारानी मोठ्या. फोटो बघते सापडतोय का ते.
लोणची हा प्रकार तसा माझ्या
लोणची हा प्रकार तसा माझ्या नावडीचा... त्याचं मूळ अंबट पदार्थांविषयीच्या नावडीत असावं...
नेहमीच्या लोणच्यांमधे लिंबाचं लोणचं त्यातल्या त्यात आवडायचं...
पण आईनी केलेलं आंबेहळदीचं लोणचं आणि काकूकडे खाल्लेलं लसूण-लाल मिर्ची लोणचं ही मात्र अत्यंत आवडलेली लोणची...
लसूण-मिर्ची लोणचं कुणाचं चांगलं आहे...?
काकू ला कुणीतरी पंजाबी बाईनी दिलं होतं...
रुनी, तुझी वि. पू. बघ.
रुनी, तुझी वि. पू. बघ.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Sword_bean
हा फोटो मिळाला विकीवर. मला ९५% खात्री आहे की याच आबईच्या शेंगा. पण तरी कोणीतरी confirm करा.
प्राजा तूच दिलेली अजून एक
प्राजा तूच दिलेली अजून एक लिंक - आबईच्या शेंगा
होहो त्याच शेंगा आबईच्या.
होहो त्याच शेंगा आबईच्या. फ्रिमाँट्च्या फर्मर्स मार्केटमधे मिळाल्या.
ते कॅनमधे पचरंगा लोणची मिळतात
ते कॅनमधे पचरंगा लोणची मिळतात ते कोणी खाल्लेय का? कोणते चांगले असते? त्यात ते बिहारी स्टाईलचे मोहरी, बडीशेप भरलेल्या मिरच्यांचे लोणचे पण मिळते.
लोणचं हे तसे नावडता प्रकार
लोणचं हे तसे नावडता प्रकार आहे. त्यात ते ऑइल व मसाले बघून खतरनाक वाटते खाणे बाहेरची लोणची. फक्त काही घरगूती लोणची क्वचित खाते. पण हल्लीच खाना खजाना नी खालील लोणची खल्ली,
चुन्दा का चुन्दो(नाव लक्षात नाही, घरी जावून बघायला पायजेल):)
बिटरूट नी गाजर.
हे दोन्ही मला खूप आवडले , माईल्ड वाटले. तिखट ज्यास्त नाहीत पण पराठ्याबरोबर मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोठ्या बहिणीने खाना खजानाचे तिच्या घरी मिरचीचे आणले होते मी पाहिले आहे, ती एकदा ताटलीभर लोणचे व जराशीच भाजी खाताना दिसली मग बहुधा चांगले असावे.
अशोकाचे गोड लिंबाचे लोणचे दुसरी बहिण खाते, ती सांगते सारखी चांगलेय चांगलेय.
माईनमुळा ही मुळेच असतात ना,
माईनमुळा ही मुळेच असतात ना, कंद नव्हे. अरुंद आणि लांब असतात. फाटे फुटलेली. आल्यासारखी साल असते पातळ, ती काढतात लोणचं घालण्याआधी. लोणच्यात बारीक तुकडे नसतात, दोन पेर लांबीचे उभट काप असतात. विहीरीत उगवतात असे ऐकले आहे. लोणचे फार छान लागते. विकतचे कधी खाल्लेले नाही. कोणाला माहीत असल्यास सांगा.
पाटणकरांचे एक ड्रायफ्रूटसचे लोणचे चांगले आहे.
कोल्हापूरला लक्ष्मीपुरीत 'श्रीकांत मसाले' मध्ये मोड आलेल्या मेथीचे लोणचे मिळते. छान आहे.
मुंबईजवळ कुठे 'सावे फार्म' आहे तिकडचे कच्च्या चिक्कूचे लोणचे छान आहे.
मनु! ते 'छुंदा' आहे..चांगला
मनु! ते 'छुंदा' आहे..चांगला लागतो पराठयाबरोबर्..खजानाचे गोड लिंबाचे लोणचे सुद्धा छान आहे.
माईनमुळाचे लोणचे मस्त लागते.
..................
..................
माईनमुळा चं लोणचं, नाही
माईनमुळा चं लोणचं, नाही खाल्लं कधी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
उडुपीचं हरी मिर्ची लोणचं आणलं आहे, ते खारातल्या मिरच्या असतात , बर्यापैकी त्या चविचं आहे.
मदर्स रेसीपीची पण बहुतेक सगळी लोणची (लिंबु, कैरी,चिली) मस्त आहेत चवीला .
सीमा, छन्न्याच्या
सीमा, छन्न्याच्या लोणच्याबद्दल पण लिही ग. तुला नक्की माहिती असेल मी काय म्हणतेय ते.
भोकराचे, करवंदाचे लोणाचे विकत मिळते का?
मुंबईत, माईनमूळे ग्रँट
मुंबईत, माईनमूळे ग्रँट रोडच्या भाजी गल्लीत मिळतात. ( अर्थातच सिझनमधे ). गुजराथी लोक त्याला गरमर म्हणतात. आणि लोणच्याला गरमरनु अथाणू.
बाजारातल्या बहुतेक लोणच्यात मिठाचे प्रमाण भयानक असते. खुपदा टिकण्यासाठी त्यात व्हीनिगर व मोहरीचे तेल वापरलेले असते. हे सगळे लक्षात ठेवूनच, ती खायची. बाजारातील लोणच्याची बाटली, रिकामी झाल्यावर धुतली तरी त्याचा उग्र वास जात नाही.
तेल नसलेली ( गुळातली वा साखरेतली ) लोणची त्यातल्या त्यात बरी.
पंचरंगाच्या टिममधे राहिलेल्या स्टिलच्या चमच्यावर पण त्याची प्रतिक्रिया होते, इतके ते तीव्र असते ( आणि चमचा तकलादू )
शक्यतो आपल्याला रुचतील अशी लोणची ताजीच करुन खाल्लेली बरी. पुर्वी वर्षभराचे लोणचे टिकण्यासाठी खुप काळजी घेतलेली असे, कारण निदान कोकणात तरी, बाकिची तोंडीलावणी ( भाज्या, कडधान्ये वगैरे ) सहज मिळत नसत. आता तशी स्थिती नाही. ताजी लोणची फ्रीजमधे सहज टिकतात.
इथे मालदिव मध्ये माशांची
इथे मालदिव मध्ये माशांची लोणची मिळतात...पण मी खात नाही.. त्यामुळे बाटली बघितल्यावर आधी व्यवस्थीत सगळी वाचतो.. पाचपन्नास बाटल्या उलथापालथ केल्या की एक कुठले तरी वेज लोणचे मिळते....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नाही भोकराचं लोणचं विकत मिळत
नाही भोकराचं लोणचं विकत मिळत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आज्जीचं हुकुमी आणि जगातलं सर्वोत्कृष्ठ असायच भोकराचं लोणचं, ते तिच्याबरोबरच गेलं. अजून मला कधीकधी त्या चवीचा लख्ख भास होतो.
याबाजूला तर भोकरंही पाहिली नाही कधी.
पुण्यात खरेदी-महोत्सव(?) मधे
पुण्यात खरेदी-महोत्सव(?) मधे बर्याच प्रकारची लोणची मिळतात. जसे भोकरे, लसुण, मेथी, गाजर आणि बरीच पंजाबी चवीची.
आज्जीच्या हातचे माइनमुळा
आज्जीच्या हातचे माइनमुळा लोणचे.. भन्नाट एकदम.. पाणी सुटल तोंडाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला केप्र आणि प्रिया मसाले यांची लोणची आवडतात.. मिरचीचे लोणचे भारी एकदम..
पण कच्च्या कैरीच्या ताज्या लोणच्याला तोड नाही कशाचीच.
भोकरे म्हणजेच गुजराती लोकांचं
भोकरे म्हणजेच गुजराती लोकांचं गुंदा का ? फोटो टाका कोणीतरी
http://chachiskitchen.blogspo
http://chachiskitchen.blogspot.com/2007/03/gunda-ne-keri-jo-athanu-mango... इथे बघा. भोकराचं लोणचं. नागपुरला गेलात तर आईकडे मिळेल.! भोकरु, फणस, कैरी मिक्स.
भोकरे म्हणजेच गुजराती लोकांचं
भोकरे म्हणजेच गुजराती लोकांचं गुंदा का ? फोटो टाका कोणीतरी>>असे मलाहि कोणीतरी सांगितलेले खरे. पण मला चवीवरून तसे वाटले नाही.
सगळ्यात भारी लोणचे म्हणजे कोलीमचे .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोलीम म्हणजे काय आता ?
कोलीम म्हणजे काय आता ? फ्लेक्स सीड्सचे एक नाव का ?
जमल्यास फोटो टाका.
भोकराचं लोणचं अहाहा...पाणी
भोकराचं लोणचं अहाहा...पाणी सुटलं तोंडाला.
भोकराचं लोणचं...(लाळ गाळणारी
भोकराचं लोणचं...(लाळ गाळणारी बाहुली)
माझ्या मोठ्या जाऊबाई करतात. भोकरातली बी काढून त्याजागी एक लसणाची पाकळी भरतात नि मग त्या तशा भरलेल्या भोकरांचं लोणचं करतात. भाजीची गरजच नसते मला मग जेवणात. अहाहा...
आई कैरीचा कीस नि अर्धी अर्धी चिरलेली भोकरं एकत्र करून करते. दोन्ही लोणची लाजवाब..
इथे उल्लेख आलाय वरती ते
इथे उल्लेख आलाय वरती ते मोडाच्या मेथ्यांचे लोणचे कसे करायचे?
..
..
लोक आता इथेच रेसिपी विचारायला
लोक आता इथेच रेसिपी विचारायला लागले आणि इथेच लिहायलाही लागले! धन्य आहेत!
असामी, कुठे मिळते ते लोणचे?
Pages