१ कप रवा, ३ टेबलस्पून तूप, १/४ कप दही, ३/४ कप आमरस,साखर २-३ टेबलस्पून, ओले खोबरे १/४ कप, काजू, पाणी १/२ कप , खायचा सोडा चिमूटभर
मायक्रोवेव्हमध्ये तुपावर काजूचे तुकडे २-३ मिनिटे भाजा.
काजू बाहेर काढून त्याच तुपावर रवा फुल पॉवरवर मिनिटभर किंवा मिडियम पॉवरवर २-३ मिनिटे भाजा. (तुमच्या मायक्रोवेव्हच्या कलाने घ्या) पाच मिनिटे स्टँडिंग टाइम द्या म्हणजे रवा मायक्रोवेव्हमध्ये तसाच राहू द्या.
रवा थोडा गार झाला की त्यात दही, आमरस, साखर, खोबरे, पाणी घालून नीट ढवळून दहा मिनिटे मिश्रण मुरू द्या. मग त्यात चिमूटभर खायचा सोडा घालून नीट ढवळा.
कप मोल्डला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण भरून चार कपांना दोन ते अडीच मिनिटे (पुन्हा तुमच्या मायक्रोवेव्हला पटेल, रुचेल, लागेल तितका वेळ) या प्रमाणे फुल पॉवरवर मायक्रोवेव्ह करा.
२ मिनिटे स्टँडिंग टाइम द्या.
साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीवर.
वाह! वाह! तोंपासु प्रकार. पण
वाह! वाह! तोंपासु प्रकार.
पण सध्या फक्त बघणारच. करायला पण सोपा वाटतोय प्रकार.
मस्त दिसतयं..
मस्त दिसतयं..
फारच मस्तं पाककृती! नक्की
फारच मस्तं पाककृती! नक्की करणार.
मस्त..उचलून खावं असं वाटतंय.
मस्त..उचलून खावं असं वाटतंय. जर कप केक्स मोल्ड नसले तर मोठया बाऊलमध्ये सगळं बॅटर टाकलं तर चालेल का?
खोबरे नाही घातले तर चालेल का?
खोबरे नाही घातले तर चालेल का?
Paneer chalel ka? looks
Paneer chalel ka?
looks yummy!
बघताना अंब्याच्या शिर्याची
बघताना अंब्याच्या शिर्याची मुद वाटली :), पण चव वेगळी लागत असावी खोबर्यामुळे !
दीपांजली , तुमची आंब्याच्या
दीपांजली , तुमची आंब्याच्या शिर्याची कृती माझी अत्यंत फेव्हरिट आहे. दर मोसमात एकदा तरी करतोच.
हो ओल्या नारळामुळे वेगळी चव येते, तसंच शिर्याइतकी गोड नाही.
मोठ्या बाउलमध्ये मायक्रोवेव्ह केलेले पदार्थ सगळीकडे एकसारखे शिजत नाहीत असा माझा अनुभव आहे. कप केक्स झटपट होतात..
लाळेरं लावलेली स्मायली पाहिजे
लाळेरं लावलेली स्मायली पाहिजे भावना व्यक्त करायला.
मला कधी मिळणार खायला ..
मला कधी मिळणार खायला .. मायक्रोवेव्ह घरी आहे न
मस्तच...
मस्तच...
कप केक्स अशक्य देखणे
कप केक्स अशक्य देखणे दिसताहेत. लवकरच करून बघेन हा प्रकार.
वा.... मस्त... आज करणार
वा.... मस्त...
आज करणार
कपकेक लगेच उचलून मटकावा असे
कपकेक लगेच उचलून मटकावा असे वाटले! छान पाकृ!
वा!!
वा!!
मस्तय रेसिपी. हे मायक्रोवेव
मस्तय रेसिपी.
हे मायक्रोवेव कप केक्स इतके पटकन होतात. इथे अशाच काही क्यूट क्यूट रेसिपीज आहेत.
https://m.youtube.com/watch?v=8MscAxRx6Zo
खूपच मस्त.लौकरच असे
खूपच मस्त.लौकरच असे स्ट्राबेरी केक करुन पहाण्यात येतील.फक्त खा.सोडा ऐवजी काय घालावे .बे.पा कि इनो ? भरत सांगणार का आपले मत.
मी अन्न पुनर्गरमीकरण (!! )
मी अन्न पुनर्गरमीकरण (!! ) याव्यतिरिक्त मावेरेस्पी चॅलेंज्ड अहे. पण कपकेक्स कमाल तोंपासू आहेत... धाडस करू काय अशा विचारात आहे!
छान दिसताहेत मॅंगोकेक्स!
छान दिसताहेत मॅंगोकेक्स!
मस्त आहेत सुलटे ठेवून कसे
मस्त आहेत सुलटे ठेवून कसे दिसत होते. म्हणजे साध्या कप केकसारखे खरपूस व फुगीर दिसत होते का?
मस्त. बघते करून.
मस्त. बघते करून.
खूपच चविष्ट दिसताहेत कपकेक्स!
खूपच चविष्ट दिसताहेत कपकेक्स!
मस्त !!! आणि रंग फार सुंदर
मस्त !!! आणि रंग फार सुंदर आला आहे.
बारीक रवा की जाड रवा वापरला
बारीक रवा की जाड रवा वापरला आहे ?
छान पाककृती आणि फोटो एकदम
छान पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु........................
सुलेखाताई, परीक्षा घेताय का
सुलेखाताई, परीक्षा घेताय का माझी? मी तुम्हाला काय सांगणार. पण आता विचारलंच आहेत तर गुस्ताखी करून टाकतो...
मी मायक्रोवेव्ह केलंय त्यामुळे ढोकळ्यात घालतो तसा चिमूटभर सोडाच घालावा लागेल. बेक करणार असाल तर कदाचित बेकिंग पावडर लागेल. मिश्रण इतकंही पाणीदार नसतं त्यामुळे इनो चालेल का याबद्दल शंका आहे.
---
प्राची एस : बारीक रवा, शिर्याचा.
---
अश्विनी, तुम्ही अगदी चाणाक्ष वाचक आहात. केक जसे अनमोल्ड केले तसाच फोटो काढलाय हे बरोबर पकडलेत. केक खरपूस केलेले नाहीत. केक झाल्यावर ग्रिल ऑप्शन वापरून करता येतील कदाचित, पण गरज वाटली नाही.
---------
मामी, लिंक भारी आहे