मँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह

Submitted by भरत. on 8 June, 2015 - 07:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप रवा, ३ टेबलस्पून तूप, १/४ कप दही, ३/४ कप आमरस,साखर २-३ टेबलस्पून, ओले खोबरे १/४ कप, काजू, पाणी १/२ कप , खायचा सोडा चिमूटभर

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्हमध्ये तुपावर काजूचे तुकडे २-३ मिनिटे भाजा.
काजू बाहेर काढून त्याच तुपावर रवा फुल पॉवरवर मिनिटभर किंवा मिडियम पॉवरवर २-३ मिनिटे भाजा. (तुमच्या मायक्रोवेव्हच्या कलाने घ्या) पाच मिनिटे स्टँडिंग टाइम द्या म्हणजे रवा मायक्रोवेव्हमध्ये तसाच राहू द्या.
रवा थोडा गार झाला की त्यात दही, आमरस, साखर, खोबरे, पाणी घालून नीट ढवळून दहा मिनिटे मिश्रण मुरू द्या. मग त्यात चिमूटभर खायचा सोडा घालून नीट ढवळा.
कप मोल्डला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण भरून चार कपांना दोन ते अडीच मिनिटे (पुन्हा तुमच्या मायक्रोवेव्हला पटेल, रुचेल, लागेल तितका वेळ) या प्रमाणे फुल पॉवरवर मायक्रोवेव्ह करा.
२ मिनिटे स्टँडिंग टाइम द्या.

mango cup cake.jpg

वाढणी/प्रमाण: 
१०-१२ कप केक्स
अधिक टिपा: 

साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीवर.

माहितीचा स्रोत: 
मसाला रवा इडलीच्या कृतीत दह्याऐवजी पाऊण भाग आमरस आणि इडली पात्राऐवजी केक मोल्ड
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपांजली , तुमची आंब्याच्या शिर्‍याची कृती माझी अत्यंत फेव्हरिट आहे. दर मोसमात एकदा तरी करतोच.

हो ओल्या नारळामुळे वेगळी चव येते, तसंच शिर्‍याइतकी गोड नाही.

मोठ्या बाउलमध्ये मायक्रोवेव्ह केलेले पदार्थ सगळीकडे एकसारखे शिजत नाहीत असा माझा अनुभव आहे. कप केक्स झटपट होतात..

वा!!

खूपच मस्त.लौकरच असे स्ट्राबेरी केक करुन पहाण्यात येतील.फक्त खा.सोडा ऐवजी काय घालावे .बे.पा कि इनो ? भरत सांगणार का आपले मत.

मी अन्न पुनर्गरमीकरण (!! Proud ) याव्यतिरिक्त मावेरेस्पी चॅलेंज्ड अहे. पण कपकेक्स कमाल तोंपासू आहेत... धाडस करू काय अशा विचारात आहे!

मस्त आहेत Happy सुलटे ठेवून कसे दिसत होते. म्हणजे साध्या कप केकसारखे खरपूस व फुगीर दिसत होते का?

सुलेखाताई, परीक्षा घेताय का माझी? मी तुम्हाला काय सांगणार. पण आता विचारलंच आहेत तर गुस्ताखी करून टाकतो...
मी मायक्रोवेव्ह केलंय त्यामुळे ढोकळ्यात घालतो तसा चिमूटभर सोडाच घालावा लागेल. बेक करणार असाल तर कदाचित बेकिंग पावडर लागेल. मिश्रण इतकंही पाणीदार नसतं त्यामुळे इनो चालेल का याबद्दल शंका आहे.
---
प्राची एस : बारीक रवा, शिर्‍याचा.
---
अश्विनी, तुम्ही अगदी चाणाक्ष वाचक आहात. केक जसे अनमोल्ड केले तसाच फोटो काढलाय हे बरोबर पकडलेत. केक खरपूस केलेले नाहीत. केक झाल्यावर ग्रिल ऑप्शन वापरून करता येतील कदाचित, पण गरज वाटली नाही.
---------
मामी, लिंक भारी आहे