हा धागा काढण्याचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'संदूक' (सुमित राघवन - भार्गवी चिरमुले) हा सिनेमा.
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने मला हा सिनेमा पाहातांना नुकत्याच पाहिलेल्या 'विटी-दांडू' (अजय देवगण प्रॉडक्शन) या सिनेमाची आठवण येत होती. आणि लक्षात आलं कि या सिनेमात इंग्रजांची चौकी/ जेल/ स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यासाठी जो तुरुंग 'विटी-दांडू' या सिनेमात दाखवलेला आहे तेच लोकेशन नी तोच तुरुंग 'संदूक' मध्येही वापरला आहे.
थोडा अजुन विचार केल्यावर असे एक लोकेशन/ सेट आठवला तो म्हणजे खुप गाजलेल्या 'हम-पाच' या मालिकेतील घर. हे घर कित्येक मराठी सिनेमांमध्ये जसेच्या तसे वापरल्याचे आठवते. 'अश्विनी ये ना' हे सुप्रसिद्ध गाणे असलेला 'गंमत-जंमत' या मराठी चित्रपट याच लोकेशनवर शूट झाला आहे. (यातच वर्षा उसगावपण आहे ना?). याखेरीज 'सुहास जोशी' यांनी ज्या चित्रपटात दारू प्यायलेल्या बाईचा उत्तम अभिनय केला आहे त्या 'तू तिथं मी' या चित्रपटातही हाच बंगला वापरला आहे.
फार पुर्वी जेव्हा 'झी मराठी' हि 'अल्फा मराठी' होती तेव्हा त्यावर 'प्रपंच' नावाची एक मालिका लागायची. बहुतेक त्याच मालिकेतले घर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मध्ये वापरले गेले होते. सीआयडी या मालिकेतही हे घर एक-दोन वेळा वापरले होते.
तुम्हालाही असेच मराठी/हिंदी सिनेमात/ सिरियलमध्ये पुन्हा पुन्हा वापरले गेलेले सेट्स किंवा लोकेशन्स आठवत असतील तर इथे जरूर लिहा.
*असा धागा आधीपासून कोणी काढलेला असेल तर हा धागा डिलीट करण्यात यावा हि विनंती.
अश्विनी ये ना - सिनेमा - गंमत
अश्विनी ये ना - सिनेमा - गंमत जंमत
सुहास जोशी दारू दृश्य - तू तिथे मी
बाकी मलाही असंच वाटतं लोकेशन्स बद्दल.
एकताच्या आधीच्या बर्याच
एकताच्या आधीच्या बर्याच सीरेलीत एक मंदीर असायच. जसे की कसोटी, कही किसी रोज, कहानी घर घर के वैगेरे
मला वाटतं ते घर शुभंकरोती मधे
मला वाटतं ते घर शुभंकरोती मधे होतं.
एकच production house असेल तर
एकच production house असेल तर लोकेशन तेच तेच वापरतात.
परवा दशमीने त्यांच्या दोन शिरेलीसाठी सेम वडाचे झाड वापरलं. गंमत म्हणजे एक शिरेलीत वसईला राहतात हा उल्लेख आणि एकात मुंबईत राहतात.
'मला सासू हवी' मधला बंगला
'मला सासू हवी' मधला बंगला 'आभाळमाया' नावाचा आता 'कमला' मध्ये आहे अक्षर या नावाने.
आता वसई मुम्बैत येणार आहे.
आता वसई मुम्बैत येणार आहे. लोकल व फेरी सुरु होणार आहे
दोन्ही सिरियलमध्ये उल्लेख
दोन्ही सिरियलमध्ये उल्लेख आपल्या घराजवळचे वडाचे झाड असाच होता.
आणि काही जणांनी 'कलर्स मराठी' च्या फेसबुक पेजला विचारलंही की दोन्हीकडे एकच झाड वापरलंत. त्यांनी उत्तर नाही दिलं.
हटके धागा आहे. बरेच
हटके धागा आहे.
बरेच चित्रपटांमध्ये बंद पडलेली गिरणी की फॅक्टरी असते ती एकच एक वाटते.
कुठेय ती?
परवा दशमीने त्यांच्या दोन
परवा दशमीने त्यांच्या दोन शिरेलीसाठी सेम वडाचे झाड वापरलं.
>> कोणत्या दोन मालिका?
मला वाटतं ते घर शुभंकरोती मधे होतं.
>> असेल. ते मी म्हणतेय ते घर मी खुप मराठी चित्रपटांमध्ये पाहिलंय.
एकच production house असेल तर लोकेशन तेच तेच वापरतात.
>> पण अशी लोकेशन्स डोक्यात राहिली कि नवी मालिका बघतांनाही जुनीच आठवत राहाते त्याचं काय?
अप्पाकाका धन्यवाद. बदल करते.
पियु 'कमला' आणि 'माझे मन तुझे
पियु 'कमला' आणि 'माझे मन तुझे झाले' ह्या दोन्हीमध्ये वटवृक्ष सेम होता.
कुतुहल म्हणून विचारतेय.. अशी
कुतुहल म्हणून विचारतेय.. अशी माहिती गोळा करुन त्या माहितीचं काय करायचंय तुम्हला?
दशमीवाले साड्यापण त्याच त्याच
दशमीवाले साड्यापण त्याच त्याच त्यांच्या तीन शिरेलीत आलटून पालटून वापरतात. कमला, mmtz आणि दुर्वा. मी त्यातली फक्त mmtz बघते पण कधी फोटोवरून, सर्फिंग करताना लक्षात येतो तोच तोचपणा.
दशमी म्हणजे काय
दशमी म्हणजे काय
मेदेचा बंगलाही (बाहेरून)
मेदेचा बंगलाही (बाहेरून) बर्याच वेळेला दाखवतात.
क्राईम पेट्रोलमधे बरीच लोकशन्स सेम असतात.
ओ sorry. दशमी क्रिएशन ही
ओ sorry. दशमी क्रिएशन ही संस्था आहे जी सिरीयल निर्मिती करते. नितीन वैद्य (आधी बरीच वर्षे झी मराठीशी संलग्न होते), आणि निनाद वैद्य ह्यांची संस्था आहे ती.
ओके अन्जू. अग आणि sorry काय
ओके अन्जू. अग आणि sorry काय त्यात
लक्ष्य सिरियल मध्ये आणि सि
लक्ष्य सिरियल मध्ये आणि सि आयडी मध्ये घेतलेली घरं सेम वाटतात. सगळे बंगलेच. अगदी गुन्हेगाराचं घर असलं तरी तो बैठा बंगला, हॉल मध्ये एसी वगैरे असतोच. आणि घराच्या आजुबाजुचे रस्ते खड मोकळे.
बरेच चित्रपटांमध्ये बंद
बरेच चित्रपटांमध्ये बंद पडलेली गिरणी की फॅक्टरी असते ती एकच एक वाटते.
कुठेय ती? ---
मुकेश मिल कुलाबा ..
हे देऊळ आतापर्यंत असंख्य
हे देऊळ आतापर्यंत असंख्य मालिका सिनेमांमधे पाहिलंय
ह्य देवळातले देव पण येऊन जाऊन
ह्य देवळातले देव पण येऊन जाऊन असतात,
नागाचा सिनेमा - शंकर भगवान
लव स्टोरी - श्रीक्रुष्ण
असो,
'अंदाज अपना अपना' मधला राम
'अंदाज अपना अपना' मधला राम गोपाल बजाजचा बंगला अनेSSSक हिंदी आणि मराठी सिनेमांमधे वापरला आहे (आठवा 'उनका एक एक सवाल हमारे दो दो जवाब, सवाल एक जवाब दो, सवाल एक जवाब दो' वाला सीन).
ते वरच्या फोटोतलं देऊळ
ते वरच्या फोटोतलं देऊळ फिल्म्ससिटीमधलं आहे. त्याच देवळांबद्दल एक क्लास सीन कमल हासनच्या चाची ४२० म्ध्ये आहे.
चार दिवस सासुचे मधला बन्गला
चार दिवस सासुचे मधला बन्गला पण काही सिरीयलमध्ये वापरला गेलाय. तसेच भरत जाधव च्या पछाडलेला मध्ये जो भूत बन्गला ( इनामदाराचा ) दाखवलाय तोच त्या सिनेमाच्या किमान २० ते २५ वर्षापूर्वीच्या एका भुताच्या सिनेमात दाखवला होता. तो सिनेमा भौतेक रन्गीत नव्हता.
असंभव मालिकेतलं घर शुभंकरोति
असंभव मालिकेतलं घर शुभंकरोति मधे होतं ना? का ते वेगळं?
ते वरच्या फोटोतलं देऊळ
ते वरच्या फोटोतलं देऊळ आमिर्-माधुरीच्या दिल मधे आणि विद्या बालनच्या भूलभुलैया मधेही आहे.
त्याच देवळांबद्दल एक क्लास
त्याच देवळांबद्दल एक क्लास सीन कमल हासनच्या चाची ४२० म्ध्ये आहे>> +१
तो सीनच काय चित्रपटच धमाल आहे.
पियु, तु उल्लेख केलेल घरच
पियु, तु उल्लेख केलेल घरच धाग्याच शिर्षक बघितल्या बघितल्या आठवल..
इन्दर कुमारच फेवरेट झाड
इन्दर कुमारच फेवरेट झाड आठवतय का?
हे फिल्मसिटीतलं देऊळ
हे फिल्मसिटीतलं देऊळ बिनादेवाचे बांधलेले आहे. आपापल्या गरजेनुसार मूर्ती आणि इतर जामानिमा चढवला जातो.
लाइफ ऑफ बुद्धा नावाची बीबीसीचा डॉक्यु-ड्रामा आहे. त्यासाठी याच ठिकाणी बुद्धाच्या आईचा महाल आणि तिला रात्री पडलेल्या स्वप्नाची सुरूवात वगैरे शूट केलंय. मस्त केलंय ते. (हे मला कसं माहिती तर त्याचे कपडे मी केले होते)
चौदहवी का चाँद चित्रपटातील
चौदहवी का चाँद चित्रपटातील शीर्षक गीताकरिता मुगल - ए - आझम चित्रपटाचाच सेट वापरला गेला होता असं वाचण्यात आलं आहे.
याशिवाय चित्रपटांत नष्ट झाल्याचे दाखविण्यात येणार्या वाहनांविषयी. २००२ च्या सुमारास देवू ही वाहनकंपनी बंद झाल्याने तिच्या त्या आधी मोठ्या प्रमाणात खपलेल्या सिएलो या वाहनाची पुनर्विक्री किंमत प्रचंड घसरली. त्यामुळे हे वाहन अतिशय स्वस्तात उपलब्ध होऊ लागलं. अनेक चित्रपटांत जिथे वाहने आगीत / दरीत नष्ट होतात असं दृश्य आहे तिथे सिएलो वाहन दिसू लागलं.
https://www.youtube.com/watch?v=ZU6DdhGs8DM
कित्येकदा तर संपूर्ण पाठलाग दृश्यात भलतंच वाहन दाखवायचं आणि ऐनवेळी नष्ट होताना सिएलो वाहन हा प्रघातही पडला.
पुढे संकट सिटी (https://www.youtube.com/watch?v=UyY_2mQYShM) या चित्रपटात ही नष्ट होणारी वाहने कुठून येतात त्याचं रहस्य उलगडण्यात आलं.
Pages