फणसाचे उंबर

Submitted by देवीका on 28 May, 2015 - 15:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

२ वाटी बरका फणसाचा गर,
दिड वाटी तांदूळाची पीठी,
फणसाचा गर गोड नसेल तर आवडीप्रमाणे गूळ किसून,
१ चमचा साजूक तूप,
मूठभर ओले खोवलेलं खोबरं जरा आणखी वाटून घेवून,
पाव वाटी अति बारीक वाटलेली चाळून घेतलेली काजू पूड,
आवडीप्रमाणे केसर पूड,
आवडीप्रमाणणे वेलची पूड.
चवीला मीठ,
तळायला आवडीप्रमाणे साजूक तूप नाहीतर तेल.

क्रमवार पाककृती: 

१. जुना तांदूळ धूवून सावलीत वाळवून त्याची पीठी करावी.
२. चवीला मीठ घालून त्यात काजू पूड एकत्र करून घ्यावे. हातानेच चांगले एकत्र करावे.
३. गूळ हि घालून तसेच एकत्र करावे. नाहितर एकत्र फूड प्रोसेसर मध्ये घालावे व ब्लेंड करावे.
४. आता गर, वेलची पूड, केसर पूड, जायफळ पूड वगैरे घालून घुसळावे. त्याचा एकत्रित गोळा होइल. पाणी घालू नये.
५. हा गोळा रात्रभर झाकून आंबून ठेवावा. कमीत कमी १०-१२ तास आंबले पाहिजे. तसे आंबले तरच वडे करावे.
६. सकाळी एक चमचा शुद्ध तूपात पीठ जरासे मळून अनारसे करतो तसे वडे करावे पण खाली तीळ लावावे. म्हणजे तीळावर थापावे व तळावे. नाही तीळ लावले तर चालतील. पण ती चव येणार नाही.( भोक न पाडता)
७. बटाटयाच्या सुकी तिखट भाजीबर्बर खावे नाश्त्याला.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

फणस जर नाहीच मिळाला(आता मौसमात मिळेलच) तर केळं, भोपळे आहेतच नेहमीच बंदे. पण ह्याची जी चव आहे ती काही अनुभवता येणार नाही.
अनारसा सुद्धा कमी पडेल ह्याच्या चवीपुढे.
काजू पूड व ओलं खोबरं सुद्धा नाही घातली तरी होइल पण मग पीठीचे प्रमाण जरा वाढवावे.

काजूची वस्त्रगाळ पूडच हवी. जरा जरी दाणे असतील तर पातळ थापले जाणार नाहीत.

माहितीचा स्रोत: 
काही निवडक कोंकणी घरातला पारंपारीक नाश्ता. बटाटयाची भाजी हि अलीकडची आवड
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे , पाचकळश्यांकडे , उम्बर भज्यांसारखे करतात .
मालपोआ सारखी चव लागते पण आकार भजीचा .
श्रावणात जिवतीच्या पूजेला दर शुक्रवारी हा प्रकार असतो .
खरतर केळं घालून करतात पण मला चव आवडत नाही म्हणून साबा माझ्यासाठी वेगळे करतात.

मस्त आमच्याकडे करतात .. पण फक्त फणसाचा रस घालुन ( गावी जास्त बरका फणस असेल तेव्हा हे केल जायचे ) आता जास्त कोण करत नाही..

नविन प्रकार .. साहित्य बघून वाटल होत की फणस आणि तांदुळाची पिठी घेऊन बोंड बनवत आहात कि काय ..
इथ कुणालाच कोहळ्याचे ( भोपळा ) बोंड हा प्रकार माहिती नै वाटत ..

रेसिपी टाकावी म्हणते, कसे ? Wink

सर्वांना धन्यवाद.
सृष्टी आणि स्वस्ति, तुमचे प्रतिसाद वाचून आनंद वाटला. कारण हा पदार्थ जवळपास विस्मरणात गेला आहे. जवळ जवळ नाहीच करत कोणी.
सृष्टी, तुम्ही कोकणात कुठून?( सहज विचारतेय .. कारण हा पदार्थ तुम्हाला माहीत आहे म्हणून.)

काजू पूड वगैरे आजीचे लाड होते कारण फणसाबरोबर काजूचे उत्पादन होत असे.

गावाहून फणस आला की बनवेन व टाकेन.

टीना, तुम्ही घारगे म्हणता आहात का? भोपळ्याचे ना? कोहळ्याचे माहीत नाही.
बोंड हा फणस वापरून सुद्धा केला जातो काय? आणि काय प्रकार असतो? तुम्ही कोकणातला सांगताहात का हा बोंड पदार्थ?

देवीका तुम्ही नको प्लीज ..
फणसाचे बनतात अस वाटत तर नै ..
बोंड हा एक गोड पदार्थ आहे विदर्भात बनतो .. गावाकडे भोपळे असतात घरी वेलीला लागलेले टणक आवरण असणारे त्यापासुन बनतो .. मला नै ऐकीवात घारगे हा शब्द .. झाल तर पाकृ टाकेल मी पण .. पण प्रचि असल्याशिवाय मज्जा नै येत म्हणून थांबलेली आहे.. तुमच्या पन पाकृ चा प्रचि टाका लवकर Happy

कोकणात, केळ्याचे उंबर करतात. ते केळे आणि तांदळाचे पिठ यांच्यापासून करतात आणि त्याचा आकारही उंबरासारखाच असतो.

देविका, तुम्हाला फणसाचे कित्ती प्रकार येतात. सॉलिड.

आमच्याकडे कोकणात विविध प्रकारची फणसाची भाजी, सांदणे, साठ, तळलेले गरे, आठळ्यान्चे पीठ एवढेच प्रकार केले जातात.

देविका भोपळ्याचे घारगे म्हणजे पुरी आणि बोंडं म्हणजे भजीसारखे गोळे (गुलगुले) कृती एकच फक्त आकार वेगळा.
फणसाच नाही खाल्ले कधी ट्राय करायला हवे. Happy

आमच्याकडे आई श्रावणात जिवतीसाठी दर शुक्रवारी उंबर करायची. पण ते केळ्याचे. आरत्याही म्हणतो आम्ही त्याला.

साठ>>>> अन्जू,मस्त वाटलं हा शब्द वाचून.खरे तर साटं म्हणून असावा कदाचित.ते चामट हळूहळू फणसाची चव जिभेवर ठेवत खाताना मस्त लागते.फणसपोळी म्हटली की मजाच जाते.त्यात परत तुकडा पडण्यासाठी टाकलेली
भरमसाठ साखर.

आता काय फणसाचे प्रकार टाकायची लाट आली आहे. Happy
फणसाची पोळी वगैरे विशिष्ट लोकं म्हणतात.. उगीच आपलं ते 'हे' दाखवायला की आमची भाषा...

पोळी म्हणजे पुरणाचीच हेच फक्त आम्ही मानतो. Proud

ह. घ्या.