मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे हो का??
>>>
+१

पण आता दाभोळकर कासाविस होणार Wink
जय मनोभावे तिची सेवा करणार आणि कदाचित मग त्यांना जयचं प्रेम कळणार

मेमरी लॉस नाही, नॅचरली दाभोळकर मुलीला अपघात झाला म्हंटल्यावर पुढे येणार, जय-आदितीचं नातं उघड होणार.......

जय-आदितीचं नातं उघड होणार.....
>>
इतक्या लवकर सिरिअल थोडीच संपेल Uhoh

अजुन सुभोध भावे (पात्राचं नाव आठवेना) तिच्या प्रेमात पागल दिवाना होणं मग त्याने ऑफिसातली लग्नाची अट काढून टाकणं मग काका काकूंचं लग्न मग जुई आणि रजनीची जयला पटवण्याची चढाओढ इतकं सगळं बाकी आहे

आणि सुबोध भावे? Wink >> त्याला विसरलेच की...... Lol

तो जयला महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवेल आणि आपली अडचण दूर करेल... Happy

कंटाळा आला आता या मालिकेचे प्रोमो पाहून... मालिकेला नवीन वळण आवश्यक आहेच नाहीतरी. जय-अदितीचं भांडंच फोडून टाका एकदाचं, या लपवाछपवीचा वैत्ताग येतोय आता.

>>>>> हिचा पण मेमरी लाॅस नाही ना दाखवायचे <<<<<
अरे बापरे.... म्हणजे पुढचे चारपाच आठवडे कपाळावर बाम लावुन डोके बडवायला आपण मोकळे... कस?

कदाचित कोणी लिहिलं का माहीत नाही, कारण आधीच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. पण कालच आठव्ण झाली होती. पूर्वी 'यस बॉस' नावाची एक भारी विनोदी सीरियल आली होती. राकेश बेदी आणि कविता कपूरचं लग्न झालेलं असतं हे ऑफिसात लपवून ठेवलेलं असतं. कविता कपूर राकेश ची बॉस असते आणि त्यांचा मोठा बॉस कवितावर लाईन मारत असतो. तीच थीम "का रे दुरावा" साठी वापरली आहे ना!

अवांतर - जय आणि आदितीचे ऑफीस दाखवतात तेव्हा सुरवातीला एक उंच इमारत दाखवतात. डावीकडून दोन कावळे उडताना दाखवतात. दर वेळी मला ९/११ ची आठवण येते. Sad TV वर ते असेच काहीसे दाखवले होते.

कालचा अख्खा भाग निव्वळ ते चिडणं आणि राग काढणं यावरच Uhoh
या देव टुर्स वाल्यांना इतर क्लायंट्स आहेत की नाही? का नुसतं दाभोळकरांचं उष्टशेण काढत बसलेत.

हो की. एकच क्लायन्ट जाम ताण ताण ताणलाय. बाकी लोक कसल काम करतात देव जाणे. आणी ती भोचक नन्दिनी कुठे गेली?

तिचा वर्ण आणि त्वचा खरंच खूप सुंदर आहे.
>>>>>

मंजूडी त्यासाठीच मी म्हणतोय की पेशवीण किंवा त्या काळातल्या गोष्टीत शोभून दिसेल ती.....
तिला ह्यावेळचा फेस ऑफ द यिअर द्यायला हवा झी ने......
बाकी तेच तेच चेहरे बघून तोंडाला फेस येतो ("कुहू" सोडून बरं का :डोमा:)

मेमरी लॉस होणार नाही....
मुळात आदितीचा अ‍ॅक्सिडेंट झालाय हे दाभोळकरांना आणि रजनीला कळणारच नाहिये...

ते जयची वाट बघत बसणार.... जय दोघांचेही फोन उचलणार नाही.... तो आदितीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल....

दाभोळकर पुन्हा जयवर तोंडसुख घेतील.... रजनी स्पीचलेस धिस टाईम.

आणि फायनली दाभोळकरांना आदितीचा अपघात झाल्याचं त्यांच्या बायकोकडून कळेल.... बायको पण त्यांच्यावर तुम्ही ईतके निष्ठूर होऊ शकता म्हणून तोंड सोडेल Proud

सध्यातरी ईतकेच Wink

आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं की अदिती कॉन्फरन्स रूम मध्ये बसून कर्नाळ्याचा ईमेल सुभा ला पाठवत होती. (असं ती नवरे काकांना सांगते) मी नीट निरखून पाहिलं. मेल पाठवताना लॅपटॉपला लॅन केबल्/चर्जिंग केबल नव्हतीच. बर अगदीच सुट दिली तर गेला बाजार एखादं वायरलेस नेटाचं बोंडुक तरी हवं का नाही? Uhoh ते पण नव्हतं. मग हे लोक ईमेल कसा पाठवतात?

काय ठार वेडी आहे ही अदिती. हिच्या पपांची इमेज देव टुर्स मध्ये वाईट आहे याचं ह्या बयेला वाईट वाटतंय. कारण इथे रजनी, नंदिनी इ. सगळे त्यांच्याबद्दल बोलतायत. मग पपांच्या इमेजला पप्पा जबाबदार नाहीतच का? Uhoh हे म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी... Uhoh

काहीही हां, फेस अॉफ द इयर - वन अँड ओन्ली, म्हाळसा!
आदितीच्या अपघाताची बातमी समजल्यावर सुभाची उलघाल बघण्यालायक असेल! नंदिनीबाई अॉलरेडी देवळात देवाकडे एप्लिकेशन द्यायला गेल्याच असतील आदितीला लवकर बरं वाटू दे म्हणून. पँटवाले काका तेल आणून देतील मसाजसाठी आणि जयकरता नवरत्न तेल. रजनी आदिती येत नाही असं बघून तिच्या डेस्कवर उचकापाचक करेल. जुई व तिलोत्तमा आदितीचं राहिलेलं काम विनामोबदला ओव्हरटाईम करून पुरं करतील. आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील. शिपाई जयकडे उसने घेतलेले पैसे परत करेल आदितीताईंचे. नवरे आदितीची रजा विदाऊट पे कशी होईल याकडे डोळा ठेवून असतील. केतकर काका काकू जगातला पहिला अपघात आपल्या घरी झाल्याच्या उत्साहात शुश्रूषेची आतषबाजी करतील. हे पाहून आण्णांचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावतील व ते डबल ड्रूपी दिसतील. शोभा कामाच्या भीतीने आईकडे पळेल व आण्णांना धाकट्याच सुनेची चिंता अहोरात्र खातेय म्हणून तिच्याचकडे पाठवून देईल. आदिती आणि जय " एक मै और एक तू दोनो मिले इस तरह (तो)ये तो हो ना ही था!" म्हणत सगळं काही हसत हसत झेलतील.

दक्षिणा, हाय फाय अॉफिसमध्ये वाय फाय असतं गं. ते देवासारखं असतं पण दिसत नाही. Wink
वाईट वाटून घेतलं नाही तर आदर्श मुलीचे मार्कं जातील ना तिचे.

गेले २ एपिसोड फक्त तो दाभोळकर, त्याचा विक्षिप्तपणा, जय चा राग.... बास यातच खर्ची पडलाय.

आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील.>>
शुश्रूषेची आतषबाजी>>
ते डबल ड्रूपी दिसतील>>

Rofl Rofl

आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील.>>
शुश्रूषेची आतषबाजी>>
ते डबल ड्रूपी दिसतील>>

माझी पण Rofl

कालचा भाग कोणी नीट पाहीला नाही का? अदितीची चप्पल तुटते, जय ती हातात घेऊन दुरुस्त करु पहातो, पण अदिती त्याला ती देत नाही. तशीच ती चप्पल व दुसरी चप्पल पण हातात घेऊन चालू पडते. मग आजच्या भागात दाखवले आहे की अदितीची तुटलेली चप्पल ती परत दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात तो अ‍ॅक्सीडेन्ट होतो.

अरे पण ही पोरगी साधी चप्पल दुरुस्त करु शकत नाही की बाकीचे जोड पण शोभडीला दिलेत्?:अओ:

रश्मी.. दिले असतील गं शोभीला.. तू कशाला जास्तीचे जोड आणून तिचा अ‍ॅक्सिडेंट टाळत्येस? Proud
मालिकेला जरा नवं वळण मिळतंय तर मिळू दे की.. जयादितीचा सोशिकपणा पाहून कंट्टाळा आलाय.
ना ती नंदिनी पँटवाल्यांशी लग्न करत आहे. ती अदिती ना शोभीच्या, ना रजनीच्या कानफडात वाजवतेय.. ना तो जय केतकरांना खरं काय ते सांगतोय. सुभा पण अदितीच्या प्रेमात लवकर पडत नाहीये... फुकट घालवताहेत त्याला.

Pages