बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.
माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.
लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.
विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.
मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता.
तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.
ऊरक्षण, डास, बाळाचे बाबा,
ऊरक्षण, डास, बाळाचे बाबा, नारळ >>> प्रचंड हसते आहे वाचून. मजा आली!
जिज्ञासा
मस्त किस्से आहेत. माझा एक
मस्त किस्से आहेत.
माझा एक किस्सा मी आधीही लिहिला आहे.
एकदा मुंबई एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकच्या रांगेत उभी असताना, माझ्यापुढे उभ्या असलेल्या स्त्रीनं हसतमुखानं मला विचारलं की सेक्युरीटीच्या वेळी बेल्ट काढावा लागेल का? मी तिला उत्तरही दिलं.
खरंतर तिला पाहून एकदा मनात आलं होतं की ही किती मार्टिना नवरातिलोवासारखी दिसते वगैरे. पण ती खरंच मार्टिना नवरातिलोवा असेल हे टकुर्यात आलंच नाही. पुढे सिक्युरिटीतून बाहेर आल्यावर एक्सलेटरवरून खाली उतरल्या उतरल्या दोन माणसं तिच्याकडे धावत जाताना दिसले आणि जेव्हा त्यांनी तिच्याबरोबर उभं राहून सेल्फी काढायला सुरूवात केली तेव्हा डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.
मामी!!! तू चक्क टेनिसच्या
मामी!!! तू चक्क टेनिसच्या लिजंडशी बोललीस!!!
मार्टिना नवरातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड ह्या टेनिसच्या सम्राज्ञीच.
मी एकदा (च) रितसर तिकीट
मी एकदा (च) रितसर तिकीट काढून बिझिनेस क्लासमधून प्रवास केलाय. ते ही हनीमूनला जात होतो म्हणून. ते ही नवर्याचं तिकीट ऑफिसतर्फे बिझिनेस क्लासचं होतं म्हणून. पण दोनदा की तीनदा अपग्रेड होऊन प्रवास केलाय.
एकदा मुंबई-दिल्लीच्या फ्लाईटवर दिवाळीच्या दिवशी पहाटे. त्यावेळी आम्हाला छानपैकी दिवाळी गिफ्टही दिली होती - अरोमा लँप.
एकदा असंच दिल्ल्लीच्य फ्लाईटवर अपग्रेड मिळाली तर आयलच्या दुसर्या बाजूला फारूख शेख बसले होते. पण त्यावेळी लेकीनं ( अगदी लहान होती) पूर्णवेळ सनईवादनाचं मनावर घेतलं होतं. त्यामुळे त्यांना मधून मधून सॉरी सॉरी बोलत होते. ते बिचारे खरंच जंटलमन! वैतागणं दूरच उलट आम्हाला काही मदत करता येईल का असाच भाव त्यांच्या चेहेर्यावर होता.
एकदा आम्ही मैट्रिणींनी दुबई ट्रिप केली होती त्यावेळी आमच्या फ्लाईटमध्ये सगळे हज यात्री होते. त्यावेळी आम्हाला फर्स्टक्लासमध्ये अपग्रेड केलं गेलं होतं. मस्त मज्जा!
मामी!!! तू चक्क टेनिसच्या
मामी!!! तू चक्क टेनिसच्या लिजंडशी बोललीस!!!
मार्टिना नवरातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड ह्या टेनिसच्या सम्राज्ञीच.
>>>> आय नो. मी तर त्या दोघींचीही (आणि स्टेफी ग्राफची) फॅन पण समोरासमोर चेहेरा ओळखीत मार खाल्ल्ला!
एकसे एक किस्से सगळ्यांचे....
एकसे एक किस्से सगळ्यांचे.... इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
(मी आपला बापडा जास्तीतजास्त एस्टीच्या प्रवासाचे किस्से देऊ शकेन... ते ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील - आताशा तर मला पुण्याहून मुम्बैला जाणेहि नको नको होते. त्यामुळेच देशविदेशात भरपूर प्रवास करणार्यांचा मी नितांत आदर करतो नेहेमीच! )
विमान प्रवासातले एकेक किस्से
विमान प्रवासातले एकेक किस्से मस्तच. रोज इथे येऊन नवीन नवीन मस्त किस्से वाचतेय.
भारी आहे हा धागा! आज वाचून
भारी आहे हा धागा! आज वाचून काढले सगळे किस्से.
जवळजवळ २५ वर्षांपुर्वी माझ्या
जवळजवळ २५ वर्षांपुर्वी माझ्या भावनगरला खुप फेर्या व्हायच्या. तिथला एअरपोर्ट अगदीच लहान व दिवसाचे एकच फ्लाइट असायचे. त्यामुळे विमानतळावर निघायच्या आधी विमान येणार आहे का, असे विचारून निघत असू.
तिथे सिक्यूरिटी चेकच्या वेळी एक मजाच झाली होती. त्या काळी मेट्ल डीटेक्टर वापरात नव्हते. पोलिस हातानेच सर्व अंग चाचपडत असत. तर एका म्हातार्या बाईने सिक्यूरिटीला अजिबात नकारच दिला.. का तर म्हणे ती पोलिस अधिकारी एका विशिष्ठ समाजाची होती आणि तिच्याकडून अंगाला हात लावून घ्यायला ती बाई तयार नव्हती.
सिक्यूरिटी चेक झाल्यावर सगळे मोकळ्या जागेत येऊन आकाशाकडे बघत बसत असत.. कारण संपर्काची यंत्रणाही खुपदा काम करत नसे.
पुर्वी वायूदूत नावाची विमान कंपनी होती... तिने मी मुंबई कोल्हापूर असा प्रवास केला होता. त्या कंपनीचा एक किस्सा सांगतात. एकदा ते विमान उडाले आणि पायलटच्या लक्षात आले त्याने नकाशाच घेतलेला नाही ( अगदी बेसिक विमान असायचे ते ) तर त्याने प्रवाश्यांना विचारले. त्यापैकी एकाने सांगितले पुण्यापर्यंत न्या अंदाजाने. मग हायवे दिसेल, त्यावरून न्या हळू हळू... ( हा किस्सा चित्रलेखात आला होता. नाहीच सापडले कोल्हापूर तर कुठेतरी थांबून विचारू, असे पण म्हणाला असेल बहुतेक )
हाही ऐकिव किस्सा... पण खरा
हाही ऐकिव किस्सा... पण खरा असावा याबद्दल शंका येत नाही.
गल्फ मधून भारतात यायला बर्याच विमान सेवा पुर्वीही होत्या आणि ता उत्तम सेवा देत असत. एअर इंडीयाच्या हवाई सुंदर्या मात्र तुसडेपणानेच वागत असत. त्यामूळे त्यांना प्रवासी मिळत नसत. त्यासाठी मग ते केविलवाणे प्रयत्न करत. अश्याच प्रयत्नात दुबई दिल्ली विमान आधी मस्कतला उतरले. मग ते मुंबईला उतरले मग अहमदाबादला उतरले... एका सरदारजीचा संयम संपला.. त्याने पायलटला सांगितले, " यार लगता है तूझे उपरका रास्ता मालूम नही है. यहाँ वहाँ उतर रहा है. अभी ऐसा कर, बाय रोड ही चल... रास्ता मुझे मालूम है. "
नाहीच सापडले कोल्हापूर तर
नाहीच सापडले कोल्हापूर तर कुठेतरी थांबून विचारू, असे पण म्हणाला असेल बहुतेक
त्यापैकी एकाने सांगितले पुण्यापर्यंत न्या अंदाजाने. मग हायवे दिसेल, त्यावरून न्या हळू हळू...
या वायुदूतला खूप अपघात झाले
या वायुदूतला खूप अपघात झाले मग त्याला 'यमदूत 'सेवा म्हनत
पुर्वी विमानात सिगारेट
पुर्वी विमानात सिगारेट प्यायला मनाई नव्हती. सीट मागताना स्मोकिंग / नॉन स्मोकिंग सांगावे लागे. स्मोकिंग करणार्यांना मागे बसवत असत. काही जुन्या विमानांच्या हँडरेस्ट वर सिगारेटची थोटके टाकायचे कप्पे दिसत असत बरीच वर्षे.. आता मात्र बहुतेक विमान कंपन्या मनाई करतात.
पुर्वी भारतात विमानतळावर फोटोग्राफीला बंदी होती. नोज आणि बेली कॅमेराचा अनुभव पहिल्यांदा मी कॅथे पॅसिफीक वर घेतला होता, पण त्यांना मुंबई जवळ आल्यावर दोन्ही कॅमेरे बंद करावे लागले होते.
पुर्वी विमानात प्रोजेक्टर असत व त्यावरून फिल्म्स दाखवत असत. प्रचंड अस्पष्ट दिसायचे ते, तरीही लोक भक्तीभावाने बघत असत ते.
कानात दडे बसू नयेत म्हणून चघळायला चॉकलेट्स आणि कानात घालायला कापूस देत असत. आता मात्र ते बंद झालेय.
९/११ नंतर काही काळ विमानात धातूची कटलरी देत नसत आता देतात.
बहुतेक देशांत उतरताना किंवा उतरल्यावर अरायव्हल कार्ड भरावे लागते. न्यू झीलंड मधे ते चार पानी आहे. अंगोलात उतरताना कसलेच कार्ड भरावे लागत नाही. इंडोनेशियामधेही बहुतेक नाहीच. भारतात आता भारतीय नागरिकांना भरावे लागत नाही.
जगात कुठेही तापाबिपाची साथ
जगात कुठेही तापाबिपाची साथ आली कि विमानतळावर ज्यादा काळजी घेतात. सोलला ( कोरिया ) एक खास कॅमेरा होता. त्यातली प्रतिमा बघून माणसाला ताप आलाय की नाही ते कळत असे. मॉरिशियसला एक फॉर्म भरून घेतात.
अंगोलात गळ्याजवळ एक डिजीटल थर्मामीटर लावून बघतात.. त्याचे थर्मामीटरचे रुप बघून अनेक जण त्याला घाबरतात. ( गळ्यात काही टोचतील का असे वाटते. )
भारतात एक फॉर्म भरून घेतात, पण गर्दी एवढी असते कि त्या मेडीकल ऑफिसरला वर बघायलाही वेळ नसतो. ते बिचारे पटापट स्टँप मारून देतात.
विमानात हवेचे प्रेशर मेन्टेन
विमानात हवेचे प्रेशर मेन्टेन केलेले असूनही कानात दडे बसणे अथवा ठणकणे असे का होते. शास्त्रीय कारण काय?
<< एकदा ते विमान उडाले आणि
<< एकदा ते विमान उडाले आणि पायलटच्या लक्षात आले त्याने नकाशाच घेतलेला नाही ( अगदी बेसिक विमान असायचे ते ) तर त्याने प्रवाश्यांना विचारले. त्यापैकी एकाने सांगितले पुण्यापर्यंत न्या अंदाजाने. मग हायवे दिसेल, त्यावरून न्या हळू हळू... >>
हे तर अगदी एसटी (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) बससारखे झाले. मी २००३ मध्ये सातार्याहून थेट निगडीला येण्याकरिता गारगोटी-मु़ंबई बसमध्ये बसलो. मी शक्यतो (स्वतःव्यतिरिक्त इतर कुणाच्या वाहन चालविण्याच्या कौशल्याबद्दल शंकित असल्याने) चालकाशेजारीच बसतो. त्यादिवशीही असाच बसलो होतो. चालक आणि वाहक दोघे खेडेगावातले होते. पहिल्यांदाच पुण्याला येत होते. त्यांना रस्तेच माहित नव्हते. त्यावेळी सर्व वाहने शिंदेवाडीहून थेट बाह्यवळण मार्ग नसल्याने जुन्या कात्रज घाटातूनच येत असत. त्यामुळे स्वारगेट निदान महामार्ग क्रमांक ४ वरच असल्याने लगेच सापडले. पण पुढे स्वारगेटहून बस शहरांतर्गत कशी फिरवून मुंबई रस्त्यावर काढावी याचे अमूल्य मार्गदर्शन मीच त्यांना केले. आधी घाईघाईने मी त्यांना स्वारगेट चौकातून बाजीराव रस्त्यानेच आणणार होतो (जसा मी एरवी दुचाकी घेऊन जात असे) पण नंतर आठवले की, एसटी बस सारसबाग वगैरे मार्गाने जाते म्हणून मग मी स्वारगेट चौकातून एकदम डावीकडे वळविण्यास सांगितली आणि मग पुढे अलका टॉकिज चौक - जंगली महाराज मार्ग (तेव्हा तो एकेरी नव्हता) - संचेती हॉस्पिटल - इंजिनिअरिंग कॉलेज करीत मुंबई रस्त्याला आणली. मग निगडीला मी उतरलो आणि उतरतानाच आता या रस्त्याने सरळ न्या पुढे पनवेल - नवी मुंबई नंतर मुंबईतले जाणकार प्रवासी मार्गदर्शन करतील असा आशावादही दाखविला.
वायूदूतच्या किश्श्यावर
वायूदूतच्या किश्श्यावर विश्वास बसण्यासारखाच आहे. कारण वडिलांच्या परिचयाचे एकजण औरंगाबाद ते मुंबई व्हाया पुणे येत होते. त्यांचं तिकिट पुण्याचं होतं. तर एकदम मुंबईला उतरायची घोषणा झाली.. त्यांनी आश्चर्याने चौकशी केली की पुण्याला का थांबलं नाही म्हणून तर वैमानिक आणि क्रू म्हणले 'अरेच्च्या विसरलोच,, सांगायचं होतंत की तुम्ही, थांबवलं असतं पुण्याला...' आणि एवढं करून मुंबईला काहीतरी लोचे होऊन उतरायची परवानगी मिळाली नाही तेव्हा घूमजाव करून समस्त उतारूंना पुण्याला नेऊन सोडलं.
एकेकाचे भारी किस्से आहेत.
एकेकाचे भारी किस्से आहेत. दिनेशजी तुम्ही मात्र जाम लकी आहात. काय प्रवास झालाय तुमचा, जबरी!
कानात दडे बसू नयेत म्हणून चघळायला चॉकलेट्स आणि कानात घालायला कापूस देत असत. आता मात्र ते बंद झालेय>>>>>>>यामुळेच माझी वाट लागली होती विमान प्रवासात.:अरेरे:
कानात दडे बसू नयेत म्हणून
कानात दडे बसू नयेत म्हणून चघळायला चॉकलेट्स आणि कानात घालायला कापूस देत असत. आता मात्र ते बंद झालेय>>>>>>>यामुळेच माझी वाट लागली होती विमान प्रवासात.अरेरे
<<
यू मीन, तुम्ही कापूस चघळून चॉकलेट्स कानात घातली होती की काय?
अहो नाही हो इब्लिस. माझा कान
अहो नाही हो इब्लिस. माझा कान दडे बसल्याने ठणकायला लागला. आम्हाला तर न कापूस मिळाला होता न चॉकोलेट. ३ वेळा हादडायला आणी ज्युस प्यायला मात्र मिळाले होते. कान जाम ठणकला. हवाई बाईजवळ काहीच नव्हते द्यायला. मग विमान उतरल्यावर ( माझे नाही, खरे विमान) दडा आपोआप सुटला.:फिदी:
दडा बसला की व्यवस्थित जांभई
दडा बसला की व्यवस्थित जांभई द्यायची. दडा सुटतो. आमचं दडा-जांभई, दडा-जांभई असे चाललेलेच असते.
मृण्मयीने लिहिलेला तो बाळाचा प्रसंग कहर आहे.
आमचे विमान प्रवास नेहमीच निरस. कधी विशेष काही मजा आल्याचे आठवतच नाही. ८-१० तास सलग विमानप्रवास म्हणजे जाम कंटाळवाणा प्रकार.
एकदम भारी किस्से आहेत. मी
एकदम भारी किस्से आहेत. मी लहान असताना आम्हि सगळे साउथ इन्डीया ट्रीप ला गेलो होतो. मदुराईला मीनक्षी मन्दिराच्या बाहेर एका दुकानाच्या पायरीवर २ तास बसलो कारण बाबा आणि काका विमानाचि तिकीटे मिळतात का ते पहायला गेले होते. चुकामुक नको म्हणुन ते आल्यावर मीनक्षी मन्दीर बघायचे असे ठरले. शेवटी ते आल्यावर म्हणाले २ तासात विमान आहे. चला निघुया. मग मन्दीर न बघताच निघालो. पहिल्यान्दाच विमानात बसत असल्याने सगळ्यनी लग्नात घालतात तसे कपडे घातले होते. ज़ातना आजीची विटलेली छत्री, चेन तुटल्यामुळे नाडी बान्धलेली बEग हातात घेऊन आमची वरात निघाली.
विमानात खायला पण देतात हे पण त्याचवेळी कळाले. चॉकलेट घेताना आम्हिपण हावरटपणा नको म्हणुन एकच घेतले. नन्तर हवाइ सुन्दरीनेच विमानात बाकि कोणीच लहान मुले नसल्याने सगळी चॉकलेट्स आम्हा भावन्डात वाटुन टाकली. विमानात बाथरूम असते आणि ते प्रवाश्यांसाठी असते ही माहिती मला विमान लागल्यामुळे मिळाली. सगळेजण मला विमानाचे बाथरूम कसे होते ते विचारत होते कारण कोणाची आत जायची हिम्मतच झाली नाही. न जाणो आपल्याला आतले काही माहित नसेल तर फजिती व्हायची !!
असा सगळा सोहळा पार पडल्यावर आम्हि एकदाचे बंगलोर ला पोचलो. बंगलोर विमानतळाहून निघुन आम्हि रेल्वे स्टेशन ला पोचलो तर तिथे कळाले की पुढच्या प्रवासाची ट्रेनच नाहीये इतक्यात. शेवटी विमानातून उतरल्यावर थेट फलाटावर १० तास घालवल्यावर पैस संपल्याने २ बस बदलून सांगलीला पोचलो.
व्हल्साल्वा मॅन्युव्हर हा
व्हल्साल्वा मॅन्युव्हर हा यावरचा इलाज आहे. (प्रेशर बदलांमुळे कानाला बसलेले दडे. घाट चढता उतरतानाही कानाला दडे बसतात)
सर्व किस्से धमाल आहेत.. मस्त
सर्व किस्से धमाल आहेत.. मस्त मजा येतीये .. आज सर्व वाचून संपले..
मी एकदा जकार्ता- हवाई हा प्रवास अमेरिकन विमानातून करत होते. १७ तासांची नॉन स्टॉप फ्लाईट असल्याने
दर एखाद तासाने विमाना च्या आयल मधे वॉक घेत होते.. रात्री आधिकांश प्रवासी गाढ झोपेत होते तेव्हढ्यात एका सीट वरून म्हातार्या चायनीज आजी ने शुक शुक करून मी तिकडून पास होत असताना मलाच पाणी मागितले.. ते ही मँडरिन मधून.. माझं फॉर्मल जॅकेट बघून तिला अपुर्या उजेडात मी एअर होस्टेस वाटले होते..
मी गपचूप पणे मान डोलावली आणी विमानाच्या मागील भागात जाऊन खर्या एअर होस्टेस ला सांगून आले .
(No subject)
(No subject)
(No subject)
टॅंकर भरून पाणी पाजलंत की काय
टॅंकर भरून पाणी पाजलंत की काय आजीबाईंना?
टॅंकर भरून पाणी पाजलंत की काय
टॅंकर भरून पाणी पाजलंत की काय आजीबाईंना?>>>>>> चेसुगु...........:खोखो:
विमान प्रवासात आपल्या विमानाचा समोरच्या स्क्रीनवर दिसणारा बदलता मार्ग पहायला मला खूप आवडतं.
प्रत्येक प्रवासात मी थोडा वेळ तरी ते बघतेच.
असंच एकदा अमेरिकेहून परतताना भारताच्या दिशेने विमान चाललंं होतं आपलं गपगुमान. प्रवास लांबचा असल्याने आणि तोही आता संपत आलेला असल्याने सगळे थकून कंटाळून गप्पगार गडुप्प झोपलेले.
मी समोर दिसणार्या स्क्रीनवरचा आपल्याच विमानाचा हळू हळू भारताच्या दिशेने चाललेला प्रवास निरखत होते.
बघता बघता विमानाने मार्ग बदलला आणि ते चक्क पाकिस्तानच्या दिशेने जाऊ लागलं. पोटात गोळाच!
नक्कीच विमान हायजॅक केलं तालिबान्यांनी(मेल्यांनी) !
म्हणजे आत्तापर्यंत विमानाचं तोंड भारताकडे होतं , इतक्यात भारताकडे शेपूट कसं काय दिसायला लागलं विमानाचं?
शेजारी घोरत असलेल्या नवरोबांना उठवलं, झाला प्रकार दाखवला. ते खूपच झोपेत असल्याने आणि नेहेमी च्या सवयीने मला म्हणाले, ...काही तरी बोलू नको , तू झोप आणि मला झोपू दे.
पण आत्तापर्यन्त आमचं "इमायन" पूर्णपणे उलटं वळून शत्रु देशाकडे चाललं होतं.
घाबरून विमानात सगळीकडे नजर टाकली, सगळेच ढाराढूर. आता प्राण कंठात गोळा झाले.
तेवढ्यात घोषणा झाली....खराब हवामानामुळे विमान दुबईला उतरवत आहेत.
एकीकडे हुश्श्य झालं !...........नवरोबा गालातल्या गालात हसत होतेसा भासही झाला.
वर्षूतै, तब्बल ९८ वेळा
वर्षूतै, तब्बल ९८ वेळा प्रतिसाद टाकलात! सेंच्युरीला दोन कमी. ती कसर मी भरून काढतो.
सर्व किस्से धमाल आहेत.. मस्त मजा येतीये .. आज सर्व वाचून संपले..
मी एकदा जकार्ता- हवाई हा प्रवास अमेरिकन विमानातून करत होते. १७ तासांची नॉन स्टॉप फ्लाईट असल्याने
दर एखाद तासाने विमाना च्या आयल मधे वॉक घेत होते.. रात्री आधिकांश प्रवासी गाढ झोपेत होते तेव्हढ्यात एका सीट वरून म्हातार्या चायनीज आजी ने शुक शुक करून मी तिकडून पास होत असताना मलाच पाणी मागितले.. ते ही मँडरिन मधून.. माझं फॉर्मल जॅकेट बघून तिला अपुर्या उजेडात मी एअर होस्टेस वाटले होते..
मी गपचूप पणे मान डोलावली आणी विमानाच्या मागील भागात जाऊन खर्या एअर होस्टेस ला सांगून आले .
त्यानंतर घरच्यांनी जे चिडवले ते वेगळच..
आ.न.,
-गा.पै.
Pages