Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
आदित्य नगरकरचं लग्न का होऊ
आदित्य नगरकरचं लग्न का होऊ नये या नव्या मैत्रीणीशी? म्हणजे मेघनाला पण आदुचं आयुष्य सावरल्याचं पुण्य मिळेल
त्याच्याशी लग्न न करून बरंच
त्याच्याशी लग्न न करून बरंच सावरलंय की तिने त्याचं आयुष्य! बघितलं नाहीस, कसा शहाण्यासारखा परीक्षा देऊन निघून गेला त्यांच्या आयुष्यातून.
हो ते ही खरंच!
हो ते ही खरंच!
विजया येवुन जाऊन असते सिरियल
विजया येवुन जाऊन असते सिरियल मधे. तिच्या पिक्चरचे प्रमोशन्स्/अॅवार्डस/इव्हेंटस असले की सिरियल मधुन गायब असते ती.
'मोहे पिया मिलेंगे' पाहिली का
'मोहे पिया मिलेंगे' पाहिली का कोणी ?
आशुडीच्या वॉर्निंग नंतरही
आशुडीच्या वॉर्निंग नंतरही काही एपिसोड्स पाहिले !
बाप रे , काय बंडल ती चित्रा , भयंकर अॅक्टींग तिचं आणि तो कथेचा ट्रॅक !
चित्राच्या एग्झिट्ची तारीख सांगा, त्या नंतरचे एपिसोड्स बगह्ते !
Btw, आदित्यं नगरकर मेघना जिथे लेक्चरर होणार तिथे असणार का अता एचओडी वगैरे तिच्या डिपार्टमेन्ट चा :)?
अता मेघनाची टर्न कलिग बरोबर देसाईवाडीत बाइक वरून दररोज घरी यायची !
त्या विचीत्राच्या गच्छंतीनंतर
त्या विचीत्राच्या गच्छंतीनंतर या मालिकेची गाडी मुख्य हिरोईन हिरो रीलेटेड दाखवून जरा रुळावर आली म्हणेपर्यंत परत भरकटायला लागली..
या मालिकेच स्वरुप लव्ह स्टोरी/ कौटुंबिक मालिका असं न रहाता आता "डि हेल्पलाईन" असं झालं आहे.
महान डि (देसाई) कुटुंबाने २४ बाय ७ - ३६५ दिवस हेल्प लाईन सुरु केली आहे कोणासाठीही (जे कोणी मदत मागत नाहीयेत त्यांच्यासाठी सुध्दा)
डि मिशनः
रेशीमगाठी जुळवून आता सतत फक्त महानतेचा झेंडा कोणि निंदा कोणि वंदा
ऊठसुठ कोणालाही पकडून आणून दांभिक गळे काढणं एवढाच आमचा धंदा
देसायांच्या या भयाण किर्तीमुळे, थोडेच दिवसात लोकं जसं भुतबंगल्याच्या आसपास फिरकत नाहीत तसच, डि वेडी च्या आसपास सुध्दा फिरकायचे नाहीत.
कोणी डि मंडळी दिसली कि सैरावैरा पळतील लोक लांब.
जरा कोणाचं काही दुखरा किस्सा समजला कि आण त्याला ओढून पकडून मदतीसाठी डि वेडीत..
सगळ डि मंडळ आपली कामधामं बाजूला ठेवुन, आणि एकत्र हॉल मधे बसून, मग आपापल्या बेडरुम मध्ये जाऊन फक्त त्या एका गोष्टीवर गळे काढून बेजार करणार..
हे म्हणजे रोगापेक्षा ईलाज भयंकर
त्या मदत मागत नसताना खेचल्या गेलेल्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी पण!
.
आयटीगर्ल चित्रा
आयटीगर्ल
चित्रा प्रकरणापासूनच वाट लागायला लागली वाटतं !
नाहीतर आधी बर्यापैकी रिलेट करता येइल अशी कॅरॅक्टर्स, घरातलं नॉर्मल अॅटमॉस्फिअर, बर्यापैकी लॉजिकल कथा हीच युएस्पी होती सिरियलची !
चित्रा प्रकरणात मात्रं सगळ्याच कॅरॅक्टर्स ची वाट लावली , कोण कुठली ती जावयाची मानलेली खेमडी बहिण , कोण अशा मुलीसाठी आयुष्यातला एवढा वेळ घालवत बसेल ?
खुद्द चित्राच्या बापाने पोरीच्या लग्नानंतर लग्गेच गावी पलायन केले , सतीशही फार इंटरेस्ट घेत नाही पण देसाई मंडळी माय्रं बसलीयेत आपली हिचे पोस्ट वेडींग रिच्युअल्स करत !
चित्रा प्रकरणात आदित्यं मेघना कॅरॅक्टर्स ची पण वाट लावली पार , मेघना तर उदार कर्णासारखी चित्राला आदित्य बरोबर बाइक राइड्स मिळत रहातील याची खात्री करते फोन करून आणि नंतर गधडी प्रेमात पडलीये तरी काही नाही, बिचारी एकटी पडलीये समजून माफी चित्राला, काही नाही फरक पडला !
आदित्यं सुध्दा इतका हातलावेगिरी करतोय त्या चित्राबरोबर , इतके चूकीचे सिग्नल फेकतोय चित्राकडे तरी मेघना म्हणे तुझं काहीच चुकलं नाही आदित्यं
एकटा बाबाजी बरोब्बर वागला त्या चित्रा आणि दाढीवला ट्रॅक मधे
आधी हाय एक्स्पेक्टेशन्स सेट करून अशी वाट लावल्याचं आश्चर्य वाटलं , केकताबाइंची सिरियल असती तर काही वाटल नसतं !
असो, आदित्यं च स्क्रीन प्रेझेन्स आणि बाबाजीच्या धमाल कॅरॅक्टर साठी बघतेय तरीही , प्लिज अजुन वाट लाउ नये सिरियलची ..त्या पेक्षा आदित्यं मेघनाच्या डेस्टिनेशन ट्रिप्स आणि रोमान्स दाखवत बसा, कंटाळा येणार नाही
दीपांजली, वर लिहिल आहेस ते
दीपांजली,
वर लिहिल आहेस ते अगदी पटलेलं आहे
जरा त्या हिरो, हिरोईन ला मध्यवर्ती ठेवून नवीन ट्रॅक दाखवायचा तर दाखवा नाहीतर सरळ उगाच न ताणता दुकान बंद करा.
त्या विचीत्राने ७ महिने तळ ठोकून उच्छाद मांडला सिरियलीत..
बाबाजी आणि प्रेक्षक यांनी लाखोली वाहून तिची गच्छंती झाली एकदाची.
मेघनाची नोकरी, ति मिळवताना, करताना कराव्या लागणार्या कसरती, प्रयत्न, अडचणी त्यातून काढलेले मार्ग, आदित्यची मदत किंवा बाकी देसाई कुटुंबाचा काही ट्रॅक दाखवायचा तर परत कोणाला अंजलीला तरी आणलं धरून.. आता देसाईच एकमेव तारणहार सगळ्यांच्या समस्यांचे..
आदित्य मेघना रोमान्स वगैरे दाखवलेला अर्थात धावेलच
आता काय ती अंजली मुंबईत येणार
आता काय ती अंजली मुंबईत येणार म्हणजे बाय डिफॉल्ट डी धर्मशाळेत राहणार.
त्या पेक्षा आदित्यं मेघनाच्या
त्या पेक्षा आदित्यं मेघनाच्या डेस्टिनेशन ट्रिप्स आणि रोमान्स दाखवत बसा, कंटाळा येणार नाही >>>
काल अदित्य हापीसात जाता जाता मेघनाच्या मैत्रीणीला काही प्रॉब्लेम आहे असे म्हणाला. तर माईंना दिवसभर चैन पडू नये कोण कुठची ती मैत्रीण तिच्यासाठी अख्खा दिवस बेचैन
जरा अतिच .. जसं काही सगळ्या
जरा अतिच .. जसं काही सगळ्या जगाचं कल्याण करण्याचा मक्ता देसायांनीच घेतलाय.
सकल जनान्ची आधारु,
सकल जनान्ची आधारु, प्रेमळपणाची महामेरु अशी माईन्ची प्रतिमा आहे. माई म्हणजे साक्षात वात्सल्यमुर्ती! माईन्चे दिसणे, वागणे, बोलणे, हसणे, रडणे कसे एकदम हृदयाला हात घालणारे आहे. माईना खरे तर महान समाजसेविका ही पदवी द्यायला हरकत नाही.
आय टी गर्ल पर्फेक्ट लिहीलस.:फिदी:
देसाईवाडीचा नक्की एरिआ किती
देसाईवाडीचा नक्की एरिआ किती आहे असं प्रश्न पडला आहे आता ते एखादं छोटंसं टुमदार गाव तर नव्हे?
त्या अंजलीचा नवरा दिसायला
त्या अंजलीचा नवरा दिसायला आदित्यसारखा असणे, मग तिच्या मुलाने आदित्यलाच बाबा म्हणणे वगैरे घोळ असावा असा मला संशय येतोय.
काल माझ्यासाठी टडोपा मोमेंट
काल माझ्यासाठी टडोपा मोमेंट होती. आईने चक्क चिडून टीव्हीच बंद केला! मला आत्ता घरात ते टिंग टिणींगटिणींग टिंग वाले सगळीकडे आनंदीआनंद झाला, दु:खाचे काळे ढग जाऊन सुखाचे ऊन पडलेवाले सुखाचे म्युझिक का वाजत नाहीये असा प्रश्न पडला.
त्या अंजलीचा नवरा दिसायला
त्या अंजलीचा नवरा दिसायला आदित्यसारखा असणे, मग तिच्या मुलाने आदित्यलाच बाबा म्हणणे >>> मग मेघना म्हणेल "आदित्य, आपणच समजून घ्यायला हवं ना रे! त्यांच्या मनावर आत्ताच एक आघात झालाय. आता अजून एक आघात नको करायला इतक्यात. त्यांना जरा सावरू दे. तू खेळ त्या मुलाशी. अंजलीसोबत थोडा जास्त वेळ राहात जा. तिला आधार दे पण तिचा आधार होऊ नकोस. या दु:खातून आपणच त्या दोघांना अलगद बाहेर काढायला हवं ना?"
अगदी अगदी rmd
अगदी अगदी rmd
अरे काय हे, असली उपकथानकं
अरे काय हे, असली उपकथानकं नकोत
rmd>> +१.
rmd>> +१.
अगदीच अचाट आणि अतर्क्य करायचय
अगदीच अचाट आणि अतर्क्य करायचय तर आदित्यचा हमशकल आणा , डबल ट्रिट
डीजे, भन्नाट आयडिया!
डीजे, भन्नाट आयडिया!
rmd, मग बरोब्बर सत्तावीस
rmd, मग बरोब्बर सत्तावीस एपिसोडचं दळण झालं की २८ वा एपिसोड :
समस्त देसाई परिवाराची हॉलमध्ये गोलमेज परिषद भरलेली आहे. मेज चौकोनी पण गोलू देसाई गोल करून बसलेले.
[मेघना =काल रात्री एक जगबुडी होऊन गेलीये. आता दुसरी होईल की काय असे भाव.
आदित्य=जगबुडीत वाट्टेल ते झालं तरी माझ्या मेघनाचं हसू विरता कामा नये.
अमित = कधी एकदा हे शूट संपतंय आणि घरी जाऊन तंगड्या पसरून झोपतोय!
अर्चू = मेकप तर नेहमीसारखाच आहे पण आज जरा दात कमी दाखवायचेत, गंभीर प्रसंग आहे.
सतिश=माझी उपस्थिती हाच माझा आहेर.
माई =आज काही फार विशेष नाही, मनमोकळं हसायचा सीन म्हणजे फार कष्ट पडतात बाई.
नाना = सांगतं कोण यांना विकतची लफडी घ्यायला?
हं, नेपथ्य तयार आहे.]
अमित : माई, तो मुलगा आदित्यला आपला बाबा समजतोय, यात चूक काहीच नाही. त्याच्या मनाला जे योग्य वाटेल तेच तो करतोय.
माई : हो रे, काय कळतंय त्या बिचार्याला.
सतिश : हो ना, मी तर एवढा मोठा असून नानांनाच वडील मानतो. (अर्चू एकदा स कडे एकदा नानांकडे बघून विशाल हसते, तिला दातांचं आठवतं. ओठ आटोक्यात आणते.)
नाना: ते सगळं जरी खरं असलं तरी मुलाच्या भविष्यासाठी ते योग्य नव्हे. आणि मुलाच्या आईच्याही.
आदित्य: हो नाना, मी तर परवा वाचलं की मुलाच्या आरोग्यासाठी आईने योग्य आहार घ्यावाच पण वडीलांनीही स्मोकींग, ड्रिंक्स बंद करावेत.
मेघना : हो(फुंकरयुक्त)
अमित:(शक्य तेवढा ओठांचा उलटा U करून) पण यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. विजयाही नाहीय नेमकी.
माई: हो ना
मेघना : फुंकर कम उसासा
नाना: तरीही आदित्य, एक उत्तम नागरीक म्हणून तू त्याला वडीलांचं छत्र, पत्र, सत्र द्यावंस असं मला वाटतं.
सगळे एकसुरात: हो हो.
अर्चू : आणि मेघना तूही त्याला आईची माया दे. दोन आयांची माया मिळाली तर काही होत नाही.
नाना माई : वा वा, आमचं कोकरू शाणं झालं!
मेघना आदित्य एकमेकांकडे पाहात खुदूखुदू हसतात. गाली गुलाब फुलतात.
मेघना : हो(फुंकरयुक्त) मेघना
मेघना : हो(फुंकरयुक्त)
मेघना : फुंकर कम उसासा. >>
आशूडी आता आपणच एपि लिहायला
आशूडी आता आपणच एपि लिहायला लागूया या मालिकेचे!
२४ व्या एपि मधे -
नाना : "नाही गं, पण काहीतरी तोडगा काढायलाच पाहीजे. बघूया काय होतंय ते"
माई : "हो ना. बाबाविना त्या लेकराचे किती हाल! देवा पांडुरंगा, तूच मार्ग दाखव रे बाबा आता"
(अमित-विजयाची रूम)
विजया : काय रे! नेमकं मलाही आत्ताच पुण्याला जावं लागतंय. घरातले सगळेच इतक्या टेन्शनमधे असताना कसंतरी वाटतंय जाणं
अमित : हो, पण तुझा कोर्स पण महत्त्वाचा आहेच ना!
विजया : मला खात्री आहे पण की नाना यातून नक्की काहीतरी मार्ग काढतील
(आदित्य-मेघना)
आदित्य : ए यार, मला जाम ऑकवर्ड वाटतंय आता अंजलीच्या समोर जायलाही. आणि तिलाही वाटत असणारच ना!
मेघना : मला समजतंय... पण आदित्य, तुझ्यात तो त्याचा बाबा बघतोय. त्याला तू दूर कसं लोटणार?
(अर्चू-सतीश)
अर्चू : आता आली का पंचाईत! हे सगळं कसं निस्तरणारेत हे?
सतीश : हं खरंय! जाऊदे अर्चू, तू जास्त विचार नको करूस. सगळ्यांनी बोलून ठरवू काय ते.
सगळेच सुटलेत
सगळेच सुटलेत
निगेटिव रोल मधे आदित्यचा
निगेटिव रोल मधे आदित्यचा हमशकल बादल किंवा वरुण
धन्य!
धन्य!
निगेटिव रोल मधे आदित्यचा
निगेटिव रोल मधे आदित्यचा हमशकल बादल किंवा वरुण >> पण हा कोणाचा कोण म्हणून दाखवायचा?
अंजलीचा एक्स , पोराचा बाप
अंजलीचा एक्स , पोराचा बाप
Pages