विमानप्रवासातल्या गमतीजमती

Submitted by साधना on 30 April, 2015 - 11:46

बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.

माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.

लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.

विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.

मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता. Happy

तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लीलावती!!!!!!!!! Uhoh Lol

आईची काय रिऎक्शन होती तुमच्या? ते डास खरंच डेन्ग्यूचे होते? तुम्हाला रोज ३०-४० डास चावत होते??????????? खरं तर मला कोणती प्रतिक्रिया द्यायची आहे हे माझं मलाच समजतच नाहीये Lol

हे डास lab मध्ये जन्माला आलेले ( मीच अंडी पाण्यात ठेवून वाढवली होती ) आणि मला अजूनपर्यंत डेंग्यू झालेला नाहीये त्यामुळे माझे डास चावून काही लगेच डेंग्यू होणार नव्हता पण तशी रिस्क होतीच !
मला डेंग्यूच्या भीतीपेक्षाही हातावर चावून चावून त्वचा हुळहुळीत झाली त्याचा प्रचंड त्रास व्हायचा !

आई आधी आश्चर्यचकित झाली मग घाबरली नंतर मी त्या डासांना मारून तिच्या हातावर ठेवले मग मात्र चिडली Lol

लिलावती कहर आहात.:फिदी: काय सोसल तुम्ही. इथे एका डासाला मारताना दमछाक होते तिथे ३०-४० डास सहन करणे चेष्टा आहे का?:अरेरे:

लीलावती, धन्य आहेस _/\_. पण रिसर्चवाल्यांना असलं काहीतरी करावंच लागत असेल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती Wink

पण ते डास जिवंत पकडले कसे? त्यांना अमिष दाखवून डबीत बसवता तर येणार नाही उंदरांना भजं घालून फसवून पकडतात तसं. की ते उडत असताना तू त्यांच्या मागे डबी घेऊन धावत होतीस? तरी पण कसं काय ते? Uhoh
इथे इथे बस रे डासा.. Biggrin

त्यांना अमिष दाखवून डबीत बसवता तर येणार नाही उंदरांना भजं घालून फसवून पकडतात तसं. <<
अगं डबीच्या आत माणसाचे चित्र नाहीतर माणूस असं लिहिलं असेल. मग चावायला येत असतील तर गप्पकन डबीचे झाकण बंद.. हाकानाका.. Wink

अक्षरश: एका मोठ्या पेटीतून त्यांना scoop करावं लागे छोट्या डबीत Lol
इथे अगदीच अवांतर होतंय आता !
खरंतर ते प्रयोग लोकोपयोगीच होते. लेख लिहायला हवा सविस्तर ! ( mosquito repellents चा डासांवर (त्यांच्या उडण्याच्या क्षमतेवर ) होणारा परिणाम ! ) Happy

खरंतर ते प्रयोग लोकोपयोगीच होते. लेख लिहायला हवा सविस्तर ! ( mosquito repellents चा डासांवर (त्यांच्या उडण्याच्या क्षमतेवर ) होणारा परिणाम ! ) स्मित>>> लवकर लिही!

चला!! उवा झाल्या, डास झाले. आता बाकीही किटक/ प्राणी/ पक्षी येऊद्यात - माझ्याकडे माझा भाचा ( वय ८ ) दुबई वरून सुट्टीसाठी आला होता. अगदी ४ वर्षाचा असल्यापासून तो एकटा travel करतो. . त्याची आई मारे कौतुकाने शूज ,फ्लोटर , क्रोक्स पाठवत असते. पण हे बाळ अख्खी सुट्टी स्लीपर वर फिरते. त्यांची सुट्टी म्हणजे आपला पावसाळा. आमच्या बागेत बेडूक वैगरे भरपूर. पार्किंग मधले शूज २ महिन्यांनी परत दुबईला गेले तेंव्हा एक मस्त जाडजूड बेडूक बाहेर पडला.

डासांवरचा लेख हवाच आता...

लुआंडाला कधी कधी डास चढतात विमानात ( इथे एअरोब्रिज नाही. लांब ऊभी असतात विमाने, शिवाय आजूबाजूला झाडी आहेतच ) पण स्प्रे केल्यावर मरतात बहुतेक !

सॉरी लिलावती, पण डासांसारखा छोट्यातला छोटा कीटक असला तरी मला हे वागणं योग्य वाटलं नाहीये. अर्थात बीत गयी सो बात गयी. जास्त खोलात शिरणार नाहीये मी, जाऊ दे.

तुमच्या कामाचा उद्देश वरच्या एका पोस्टमध्ये कळला. म्हणून ही एक लाईन अ‍ॅड केली.

संपदाला अनुमोदन. रिसर्चच्या कामासाठी जे लागतं ते केलं तर ठिक. पण खास आईला भेट द्यायचे (??) (असली भेट??) म्हणून ते डास पकडायचे आणि त्यासाठी इतका अटापिटा? Uhoh
बिचार्‍या डासांचा जीव हकनाक गेला ते निराळंच.

संपदाची पोस्ट मलाही कळली नाहीये.. म्हणजे तिचा रोख मला कळत नाहीये.

अगं दक्षिणा, अशी गंमत आईबरोबर नाही तर कोणाबरोबर करणार?

माझा आक्षेप डास विमानातून लपवून नेण्याच्या विचाराला आणि कृतीला होता. तिने आत्ता प्रामाणिकपणे लिहिले हे मान्य, पण मला ती वृत्ती पटली नाही, फनी वाटलं नाही, इतकंच.

संपदा, ते डेंग्युचे डास होते आणि ते डबीतून सुटून बाकी प्रवाश्यांना चावण्याच्या आणि त्यामुळे ते डेंग्यूने आजारी पडण्याच्या शक्यतेपायी तू असं म्हणत असशील तर तुझं बोलणं पूर्ण मान्य आहे. पण लीलावती त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत/ होत्या, आणि त्यांना परीणामांची पूर्ण कल्पना होती, आणि त्यामुळे त्यांनी त्याबाबतीत पूर्ण खबरदारी आणि जबाबदारी घेतली असेल असं आपण गृहीत धरून त्यातल्या मजेचा आनंद घ्यायला हरकत नाही असं आपलं माझं मत.

आणि तसंही ही घटना घडून पुष्कळ काळ लोटलेला आहे, त्यामुळे त्याचा कीस (या बाफवर) न पाडणे योग्य. इथे विमानप्रवासातल्या गंमतीजंमती आपण लिहूया आणि वाचूया.

की ते उडत असताना तू त्यांच्या मागे डबी घेऊन धावत होतीस? तरी पण कसं काय ते?
इथे इथे बस रे डासा.. >> Rofl

डास हकनाक मरावेतच.. मी खास तेवढ्यासाठी रॅकेट आणून ठेवलीये. रोज मारते.>> मी पण..

थोडे अवांतर - सुरुवातीला रॅकेट प्रकार नवीन होता तेव्हा शेजारी बघायला आले होते... दिवाळी नाही आणि मी फटाके का वाजवतेय ते. Proud

जपान एयर लाइन ची दिल्ली तोक्यो डायरेक्ट फ्लाईट होती. आणि तोक्यो ला उतरण्याच्या आधी अर्धातासभर प्रचंड टर्ब्युलन्स सुरु झाला. हवाइसंदर्‍या लगबगी नी ़खाण्याचे ट्रे उचलून घेउन गेल्या. सीट बेल्ट लावा ची साईन झळाकली. पायलट नी अनाउंन्स केल की टायफून च्या टेल मधे अडकलोय , टर्ब्युलन्स जाणवेल पण काळजी न करता बसा . रोलर कोस्टर्च्या वरताण अनुभव , तसेच चित्कार , रडारडी, आणि खिडकी बाहेर पाहिल तर विमानाच हेलकावण , अजूनच भितीदायक वाटत होत. ढग अन धुक्या शिवाय काही दिसत नव्हत. प्रत्येक गचक्या गणिक माझा पण धीर सुटत चालला होता. शेजारचा बाबा डोळे गच्च मिटून दोन्ही आर्म्रेस्ट्वर हात रोवून बसला होता , शिवाय चँटींग चालू होत आणि मोठा ड्रॉप झाला की ते मनातल्या मनात पुटपुटण्यापासून चित्कारण्यात रुपांतरीत होत होतं.
एकदाच तोक्यो दिसायला लागल, हेलकावत हेलकावत खाली आल विमान, अन दाण्कन आदळून लॅन्डिंग होइल ह्या विचारानी बसलेल्या सगळ्या प्रवाश्याना एकदम पिसासारख अलगद उतरवल पायलट काकांनी. टाळ्यांचा कडकडाट झाला अगदी.
आता कोणत्याच टर्ब्युलन्स च काही वाटत नाही. सिट बॅक रिलॅक्स अ‍ॅन्ड एन्जॉय युअर फ्लाईट !!

व्हेज जेवणाबाबत मी आग्रही असतो, आणि खुप आधी बूक करुन ठेवतो म्हणून मला दूर देशांत कधी प्रॉब्लेम येत नाही. पण भारतात येणारे जे विमान असते, खास करून दुबई-मुंबईच्या एमिरेट्स फ्लाईट मधे कधी कधी व्हेज जेवण कमी पडते. बाकीच्या विमानात माझा सीट नंबर शोधत येतात आणि मला देतात. ९९ % वेळा माझी सीट म्हणजे शेवटची विंडो सीट असते ( या सीटचे फायदे.. बाजूला एकच जण असतो आणि बर्‍याचवेळा ती सीट रीकामी असते. खिडकीतून क्लीयर व्ह्यू दिसतो, पंख मधे येत नाही. खिडकी ते खांदा यात जरा गॅप मिळते. बूट काढून ठेवायला जागा मिळते. )

दुबई मुंबई सेक्टरमधे भरपूर व्हेज ठेवतात. क्वचित कधी ( माझी सीट शेवटची असल्याने ) ते संपलेले असते. पण आजवर कधीही एमिरेटसने उपाशी ठेवले नाही. बिझिनेस क्लासमधून जेवण आणून देतात. श्रीलंकन आणि स्विसच्या एअर होस्टेसेस नी मला व्हेज सँडविचेस तिथल्या तिथे बनवून दिली होती. चीज चालते ना, हे पण विचारूनच घातले होते.

एकदा अडीच महिन्यात १७ डोमेस्टिक फ्लाइट घेण्याचा पराक्रम केलाय मी उसगावात. दर वीकेंडला किंवा मिडविक कुठेतरी जायचे. आणि परत एल ए मधे यायचे. थंडीचे दिवस होते. एल ए मधे वादळी पाऊस बिऊस झाला होता जोरदार. त्याच दरम्यान पाम स्प्रिंग्जहून शिकागोला जाणे होते. ते एक दिवस उशीराने झाले आणि मग येताना पाम स्प्रिंग्जलाच यायचे होते ते आधी ठरल्याप्रमाणे टेक्सास आणि मग पाम स्प्रिंग्ज असे न येता तीन चारा स्टेटस फिरत फिरत आले. शेवटी एक फ्लाइट होती जी पाम स्प्रिंगला उतरणार होती ती तर अक्षरश: ५० एक माणसांचीच असेल. एकदम छोटे प्लेन. पण पाम स्प्रिंग एअरपोर्ट बंद पडला होता मग आम्ही अजून तिसरीचकडे कुठेतरी उतरलो. सॆन डिएगो बहुतेक. तिथून आम्हाला बसने पाम स्प्रिंगला नेण्यात आले.
सिक्युरिटी चेक या गोष्टीचा इतका कंटाळा आला होता तेव्हा. दर वेळेला सगळीकडे जॆकेट, बूट, पर्स, फोन, लॆपी सगळं काढा.. घाला वगैरे वगैरे... आणि त्या पायी लाइन्स असायच्या हे मोठ्ठाल्या. मग बोर्डींगची वेळ संपत आली की त्या लोकांना लायनीत पुढे काढून आधी चेकींगला न्यायचा ग्राऊंड स्टाफ.
भयानक ऎब्सर्ड सगळे.
अजूनही तसेच असते का उसगावात?

मी काही ना काही कारणाने लोकांना क्लास अपडेट करून मिळतो याच्या खूप स्टोरीज ऐकल्या आहेत.
दरवेळेला जे स्वत मिळेल ते तिकीट घ्यायचे असे झाल्याने माझी माइल्स कधीच कलेक्ट होत नाहीत. त्यामुळे माइल्सवर क्लास अपडेट करून घेणे पॊसिबल नाही पण इतर कारणांमुळे क्लास अपडेट च्या स्टोरीज आहेत.
अपना नसीब इतना खराब है की एकदाही मिळालेले नाही असे क्लास अपडेट करून.
बिझनेस क्लास वगैरे परवडायची औकात येईल तेव्हाच खरं.. Happy

Pages