कंबोडियातील एक छत
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
13
कंबोडियामधे जिथे बान्ते सराई आहे तिथे मी हे एक छत पाहिले आणि मला ते फार आवडले. कुठल्या तरी पानांपासून हे छत तयार केलेले आहे. ह्या छताचे एक वैशिष्ट हे की रणरणत्या उन्हात ह्या छताखाली बसलो की ह्या छताची गार गार सावली हवीहवीशी वाटते. इथे मग एसीसी गरज नाही.
ह्या छताची काही छायाचित्रे:
हा छताचा वरचा भागः
आपल्याकडे पत्रावळी वा द्रोण तयार करताना बारीक काडीने जसे पानांना एकमेकांशी जोडतात तशी ही पाने एकमेकांना नीट जोडली आहेत.. शिवली आहेत.
छत उंच आहे अगदी आपल्याकडील माजघरासारखे:
इथे सिंगापुरमधे, मलेशियामधे, कंबोडियामधे पाण्यात अडकलेल्या वस्तू अशा बाहेर काढल्या जातात आणि पाण्यासाठी वाट मोकळी केली जाते:
हे दोन फोटो कंबोडियासारख्या भारतापेक्षाही गरीब देशातील आहे. आपल्याकडे हा प्रकार अजून आलेला नाही/नसावा:
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
बी किती मेहनतीचं काम आहे.
बी किती मेहनतीचं काम आहे. माझ्या गावी माडाच्या झावळ्यांची छते बनवतात.
किती सुबक बनवली आहेत ही छतं!
किती सुबक बनवली आहेत ही छतं!
अरे किती सुबक आणि मस्त आहे हे
अरे किती सुबक आणि मस्त आहे हे काम.
ह्याचे बनवतानाचे काही व्हिडियोस आहेत का कुठे लिंक दे ना जरा
मस्त आहे, पण उन्हाळ्यात गार
मस्त आहे, पण उन्हाळ्यात गार राहतं हे छत पण आगीचा खुप जास्त धोका नाही का ह्या छतांना.
मस्तच
मस्तच
धन्यवाद. हर्पेन, हे छत आधीच
धन्यवाद.
हर्पेन, हे छत आधीच तयार उभ होत. त्यामुळे छत बनवन्याचे विडीयोज नाहीत.
अंग्निपंख, इतके घर्षन नाही होत पानांचे आणि बांबूचे इथे की आग लागेल. आग सहसा बांबूंमधे घर्षन निर्माण होऊन लागते.
छान आहे .. फोटोही नेमके
छान आहे .. फोटोही नेमके काढलेत.
आपल्याकडे हा प्रकार अजून आलेला नाही/नसावा
>>>
असता तर मुंबईत २६ जुलै झाले नसते.
आपल्याकडे गाळ उपसण्यापेक्षा त्यात भर टाकून ईमारत उभारणे सोयीचे पडते.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
बी, छत मस्तच आहे.
बी, छत मस्तच आहे.
अगदी नैसर्गिक बिल्डींग
अगदी नैसर्गिक बिल्डींग मटेरियल.. पाने कुठली आहेत ते कळले का ? लवकर न सडणारी, उन्हा पावसात तगणारी दिसताहेत !
नाही दिनेश पाने कुठली होती हे
नाही दिनेश पाने कुठली होती हे कळले नाही. पण हळदीच्या पानासारखी होती आकाराला.
हर्पेन, हे छत आधीच तयार उभ
हर्पेन, हे छत आधीच तयार उभ होत. त्यामुळे छत बनवन्याचे विडीयोज नाहीत.
ओके
बालीमधे, गवत वापरलेले बघितले.
बालीमधे, गवत वापरलेले बघितले. ते पण काही खास रचना करून बांधलेले असते. अर्थात आगीचा धोका तिथेही असणारच !