फणसाची कोवळी भाजी (पाकीट).
अर्धा वाटी भिजवलेले काळे वाटाणे (चवळी).
खोबरे: २ टेबल. चमचे.
हिरव्या मिरच्या २/३
मिरी दाणे ५/६
धणे १ चमचा.
हळद, मीठ
फोडणी: हिंग, मोहरी, तेल.
हल्ली अमेरिकेत Daily Delight ची फणसाची कोवळी भाजी मिळते (Young JackFruit)
एक पाकीट घ्या. त्यात असलेला फणस आणि अर्धी वाटी भिजवलेले काळे वाटाणे (चवळी) थोड्या पाण्यात टाकून कुकरला लावा. फार शिजवायची नाहीय, एक दोन शिट्ट्या काढा..
थंड झाल्यावर हाताने/चमच्याने त्यातल्या फणसाच्या फोडी कुस्करा.. (जास्त पाणी झाल्यास पाणी काढून टाका. भाजी ओलसर हवी पण अगदीच गिच्चा नको).
मसाल्यासाठी: ओलं खोबरं २ टे.चमचे, २/३ हिरव्या मिरच्या, ५/६ मिरी दाणे आणि १ चमचा भर धणे वाटून घ्या.
मसाला, चवीला मीठ, आणि थोडी हळद भाजीला फासून ठेवा.
फोडणी: हिंग, मोहरीची फोडणी करा. त्यात ही भाजी टाका. आणि एक चांगली वाफ काढा..
(या भाजीला आलं, लसूण वगैरे नसतं)
पारंपारीक...
परदेसाई, मी लसूणचेचून व मोहरी
परदेसाई,
मी लसूणचेचून व मोहरी फोडणीला घालून नंतर कुकरमध्ये वाफवलेले फणसाचे तुकडे आणि काळे वाटाणे त्यात घालून मीठ आणि चवीपुरती साखर घालून, झाकण ठेऊन चांगली वाफ़ काढते. मग ओले खोबरं, थोडासा कांदा हिरव्या मिरच्या आणि मिरी यांचे वाटण त्यात घालते.
अरर्र, मी कोवळा फणस घेतला.
अरर्र, मी कोवळा फणस घेतला. तो जळगावचे भरीत करतात तितका स्लीम होता. मग बाहेरच्या बाजूने त्याचे चारखंड काढून टाकले व मग फोडी केल्या. ( बटाट्याची साले काढून फोडी करतो तसे) ह्या प्रोसेस मधे दांडा काढलाच नाहीये व फोडी कुकरला शिजवून ठेवल्या आहेत. आता त्याची भाजी होउ शकेल का? की प्रत्येक फोड घेवून तो आतील थोडा थोडा भाग काढून टाकावा लागेल?
फणसाची छोटी कुयरी असेल तर
फणसाची छोटी कुयरी असेल तर अख्खीच्या अख्खी कूकर मधे उकडून घ्यावी आणि मग चिरावी. नो झिकझिक.
आणि एक चांगली वाफ
आणि एक चांगली वाफ काढा..>>>
१, २, ३ अश्या वाफा कश्या मोजायच्या ?
विनय , आता " गरे -
विनय , आता " गरे - घोट्याची " भाजी कशी करायची तीहि सांग सगळ्याना . गोव्या कडील " अननस -फणसाची पण .
लवकरच गरे-घोट्याची भाजी.. वाट
लवकरच गरे-घोट्याची भाजी.. वाट पहा..
फणसाचा मधला दांडा करकरीत असतो.. आणि त्याला चव नसते म्हणतात (मी खाल्लेला नाही). तेव्हा शक्य असल्यास काढून टाका.. .
गोव्या कडील " अननस -फणसाची
गोव्या कडील " अननस -फणसाची पण>>>>> श्या! अननस + फणस दोघांची वाट.अर्थात ही भाजी ओरपून खाणारे आहेतही.BTW ही अनसाफणसाची भाजी.
गोयकर , कारवारी लोकात "
गोयकर , कारवारी लोकात " अन्साफणसा " ची भाजी पुणेकरांच्या " अळु फतफते " इतकिच प्रिय .
माझी सर्वांत आवडती भाजी...
माझी सर्वांत आवडती भाजी... आम्ही त्याला 'शाक' बोलतो...
माझी सर्वांत आवडती भाजी...
माझी सर्वांत आवडती भाजी... आम्ही त्याला 'शाक' बोलतो...
Pages