पण जर ते एकत्र आले तर खूप पुढं निघुन जातील .
' एकत्र ' हा..हा..हा... कस शक्य आहे ते आणि आपण आणि आपल्यासारखे आहेतच की जे अस होऊ देणार नाहीत. फक्त एक काडी टाका आणि आग भडकेल . एक काडी धर्मा-धर्मामधे ,एक काडी जाती जाती मधे आणि आहेच भाषा , प्रदेश , वर्ण , वेश आणि बरच काही . फक्त ही आग भडकवत ठेवायची . आणि आपण एकटे थोडेच आहोत त्यांच्यातीलच लोक आहेतच की जे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांमधील ही दरी अशीच वाढवत नेतील मग फायदा आपलाच आहे . कधी यांच्या बाजूने कधी त्यांच्याबाजूने काय फरक पडतो , काम तर आपलच होत आणि फार भावनीक लोक आहेत . त्यांच्या नेत्यांबद्दल काही बोलल किंवा काही वाईट चित्र प्रसारित केली कि बस, मग ते स्वतःच स्वतःच्या देशाची संपत्ती बरबाद करतात, कारण त्यांच्या भावनांना वाट हवी ना . आणि हो पण त्याच नेत्यांचे विचार कधी आचरणात आणत नाहीत . इतर काही विचार करत नाहीत , या गोष्टी कोणत्या देशांनी केल्या आहेत . ते स्वतःतच लढत बसतील आणि आपलच काम करतील . आणि जोपर्यंत त्यांना हे कळत की हे परकिय देशांच काम आहे तोपर्यंत एकतर त्यांच्या भावना व्यक्त होऊन झालेल्या असतात . आणि ते आपल्या बाबतीत काही करुही शकत नाहीत . अरे करु तर शकतात ,आपल्या देशातील वस्तू जर त्यांनी वापरायच बंद केल तर आपली हालत खराब होईल . पण मला माहीत आहे ते अस नाही करणार उलट आपल्या देशातील वस्तू खरेदी करुन त्यांच्या देशाचा पैसा आपल्या खिशात ओतत राहतील .स्वातंत्र्याच्या आधीही याच policy ने हरले होते . इथं परकिय थोडीच जिंकले , इथं स्वकियांनीच स्वकियांचा नाश केला so lets divide and rule India ..
Divide and Rule
Submitted by अँन्ड्रोमेडा on 9 April, 2015 - 11:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण मला माहीत आहे .........
पण मला माहीत आहे ......... divide and rule India .
मग काय झाले?
हजारेक वर्षे मुसलमानांचे वर्चस्व होते नंतर दीड्शेहून आधिक, ब्रिटिश, पोर्तुगीज वगैरे. पण फरक पडत नाही हो. जसे ब्रिटिश कंटाळून, वैतागून पळून गेले, तसे इतरहि येतील नि जातील.
आपण आपली संस्कृती सोडायची नाही!
आता आज कुणाला गंध पण नाही की आजकाल जे चालते ते कदाचित आपल्या संस्कृतीच्या अगदी विरुद्ध आहे, पण तरी चलता है यार, टेंशन नहि लेनेका, क्या!!
कुणिहि आले तरी आता बॉलिवूड, क्रिकेटला मरण नाही! तेव्हढे समाधान माना.
झक्की, शिक्का मारलात का ?
झक्की, शिक्का मारलात का ?
काही प्रमाणात बरोबर वाटले पण
काही प्रमाणात बरोबर वाटले पण मला वाटत आपल्या देशाच्या काही positive गोष्टी आहेत ज्या परकीय गोष्टींना रोख लावतात ..
म्हणजे उदा.,
मग ते स्वतःच स्वतःच्या देशाची संपत्ती बरबाद करतात >>>>> हे संपत्ती बरबाद करणारे लोक आपल्याकडची सामान्न्य जनता कधीच नसते , हे लोक राजकीय पक्ष , अथवा काही धार्मिक अजेंडा घेऊन काम करणारे लोक यांचे कार्यकर्ते असतात..
पाकिस्तानने छुप्या पद्धतीने दहशदवादी दहशतवाद्यांना जोपासण्याचा मुख्य हेतू असा होता कि धार्मिक असहीष्णुता निर्माण करून (हिंदू मुस्लीम divide करून) भारतात अराजक माजवायचे, मग या यादवीजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता म्हणून अमेरिका पाकिस्तानने मदत करावी असे सुचवेल, मग पाकिस्तान भारतामध्ये सैन्य घुसवून (काही प्रमाणात का होईना) ताबा मिळवू शकेल..
परंतु भारतीय जनता कधी अराजक माजेल इतक्या प्रमाणात रस्त्यावर येईच ना, याला संयम म्हणा अथवा सहनशीलता म्हणा अजून काही म्हणा, पण यामुळे दहशदवाद्यांना/पाकिस्तानला frustration आले आणि divide and rule असफल झाला असे मी वाचून आहे.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
याबद्दल सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करतेय . हि त्याचीच पुर्वपाठिका...
अगदी खर आहे .
अगदी खर आहे .
छान कविता
छान कविता
कविता
कविता
डिव्हाईड एण्ड रूल हा
डिव्हाईड एण्ड रूल हा कायमस्वरूपी उपाय नाही होऊ शकत.
फक्त काय घडत आहे हे माझ्या
फक्त काय घडत आहे हे माझ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न आहे . बाकी उपाय करू तेव्हडे थोडेच .
.
.
ही कविता आहे:?????
ही कविता आहे:?????
fact
fact
खरच विचार करायला लावणारी
खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.