कडक उन्हाळ्याने समस्त मनुष्यप्राणी हैराण आहे, उकाड्याने त्रस्त, घामाने बेजार, तहानेने कासावीस झालेल्या या मानवास सुटकेचा मार्ग तरी कोणता?? हा उन्हाळा सहनीय कसा करायचा असा प्रश्न पडायचा, सुट्ट्यांचा मौसम पण सुरु झालेला, पाहुण्यांच्या टोळधाडीची धास्तीने घराघरात बेचैनी. घराघरातून टाहो फुटत होता की ''वाचव आम्हाला, हे भगवंता"!! तेव्हा दरवर्षी अशा समस्त त्रस्त भक्तांना त्रासातून सुटका अथवा अल्पकालीन आराम देण्याकरता भगवंत फळांच्या राजाच्या रुपात, अर्थातच आंब्याच्या रुपात पृथ्वीतलावर अवतारीत होतात.
अशा या माझ्या अत्यंत आवडत्या फळाला माझ्यातर्फे हा नमस्कार.
१) उनाची काहीली वाढत जाते तशातच वसंत ॠतूचे आगमन होते, कोकीळच्या कूजनाबरोबरच आपल्याला राजाचे पहिले दर्शन घडते.
२) प्रत्यक्षात मूर्त स्वरुपात अवतरताना हा राजा येणार्या सुखद दिवसांची हमी देतो.
३) सगुण सुंदर असे रुपडे सर्वत्र दिसू लागते
४) एकदा का नैवेद्य दाखवला की आपल्या प्रकट दर्शनाने, चवीने, रंग रुपाने बेभान करतो.
५) जेवताना जोडीने गोडी बरोबरच कैरीच्या चटणीच्या रुपात तिखट-आंबट चवीने तृप्त करतो
६) उन्हाळ्यातील सण असोत, घरगुती फक्कड जेवण असो, लग्नातील पंगती असोत, आमरसा शिवाय उन्हाळा सार्थकी लागत नाही.
७) थकून आलेल्यांना उर्जा देताना राजा, पन्हं रुपात येऊन ऊनाचा दाह कमी करतो.
८) बाहेर जेवायला गेलो की फर्माइश होते ती आइस्क्रीम /मिल्कशेकची. तिथेही साहेब आहेतच.
आणि या अवतारात हल्ली बाराही महिने असतात.
आंबा-खोबरं वडी
मिल्कशेक / मस्तानी आणि वर आंब्याच्या रसाळ फोडी...
आइस्क्रीम तर आहेच
९) बरं दरवेळी ताज्या रसरशीत स्वरुपातच यायला हवं असं नाही.
बच्चे कंपनीची आवड
बाराही महिने आंब्याचा सीझन
१०) बरं मंगल कार्यात, सणवारीत यांची उपस्थिती आहेच, डहाळ्यांच्या रुपात.
त.टी. -: मला आंबा अतिशय आवडतो. बरेच दिवस एखादी थीम घेऊन फोटोग्राफी करण्याची इच्छा होती. तेव्हा हा आंब्याचा योग जुळून आला. लिखाणात काही उणिवा वाटल्यास गोड मानून घ्या, आंब्यासारखं , ही विनंती.
यात आम्रखंड / आंबावडी / सुजाता मस्तानी / रसना / गोडांबा / क्रीम बिस्कीट्स/ मँगो केक या मान्यवरांचा समावेश करता आला नाही झब्बू भरभरुन टाकावेत
कालच आंबा खाल्ला! बरं वाटलं.
कालच आंबा खाल्ला! बरं वाटलं. पण यंदा फारसे आंबे अजून आले नाहीत. या काळात लेकीच्या शाळेत फंड रेझिंगसाठी मँगो ड्राईव्ह असतो. तो पण यंदा आंब्याचे पिक पुरेसे न आल्याने रद्द करावा लागला.
वा! काय मस्त फो टो
वा! काय मस्त फो टो आहेत...एकदम तो. पा. सु.
रिक्शा
रिक्शा
छाण
छाण
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/53186
हा मी केले ला आंब्याचा नावीन्यपूर्ण पदार्थ. __ रसाची पोळी.
हा फोटो
From mayboliअणि हा फोटो
आंबा पोळी आणि कैरीचे लोणचे
आंबा पोळी आणि कैरीचे लोणचे राहुन गेले. लोणचे तयर करतांना, फोडलेल्या कैरीच्या आतील बिया काढुन, मिठाच्या पाण्यात शिजवून , उन्हात वाळवून , सुपारी प्रमाणे चघळण्याची मजा आम्हाला फार येत असे. कदाचित हा प्रकार किती जणांना ठावूक असेल , माहीत नाही.
आंब्याचे लाडू (मा.बो.कर
आंब्याचे लाडू (मा.बो.कर सुलेखा ताईंची पा. कॄ.)
आंब्याचा कलाकंद
मस्त, उन्हाळ्यात गारेगार
मस्त, उन्हाळ्यात गारेगार वाटले फोटो पाहून.>>>>>>+++++++++११११
खुप च मस्त
खुप च मस्त
मस्त रसरशीत आंबे बघुन तोंडून
मस्त रसरशीत आंबे बघुन तोंडून पाणी सुटल......:D
तोंडाक पाणी सुटला ….
तोंडाक पाणी सुटला ….
क्या बात है !! मजा आली !!!
क्या बात है !! मजा आली !!!
Pages