![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/29/kolambeecha-barata-maayboli.jpg)
वाटीभर स्वच्छ केलेल्या कोलंब्या
७-८ लसूण पाकळ्या. (भदाड्या लसणाच्या २-३)
भरपूर कोथिंबीर आणि झेपेल तितक्या हिरव्या मिर्च्यांचं वाटण- अर्धी वाटी
२ मोठे टोमॅटो (किंवा ३ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट)
२ मोठे कांदे. (कॉस्टको कांदा -१)
हळद
तिखट
मीठ
पाव वाटी तेल (हिंम्मत असेल तर जास्त)
-कोलंब्यांना हिरवं वाटण, हळद आणि मीठ लावून तासभर मुरत ठेवायचं.
-तेल कडकडीत गरम करून त्यात लसूण ठेचून घालायचा. लाल होऊ द्यायचा.
-यावर बारीक चिरलेला कांदा गळून जाईपर्यंत परतायचा. (गळणारा घटक- कांदा)
-आता बारिक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅटो पेस्ट घालून तेल सोडेपर्यंत परतायचं.
-तिखटपूड घालून थोडं परतून घ्यायचं.
-कांदा-टोमॅटो भरपूर शिजून एकजीव झाल्यावर, तिखट घालून परतल्यावर, कोलंबी घालून २-३ मिनिटं परतायचं.
-बरटं तयार आहे.
-बरट्याला कुठलाही मसाला घालायचा नाही.
-आलं घालण्याचा विचारही मनात आणायचा नाही.
-कोलंबीच्या आकारानुसार शिजायला कमी अधीक वेळ लागेल. जास्तं शिजून चिवट व्हायला नको.
-पाणी घालून पातळ रस्सा करायचा नाही. पण अगदीच कोरडं वाटलं तर कोलंब्या परतून झाल्यावर, आच बंद करून, पाव कप कढत पाणी घालून मिसळायचं.
आल्याचं आणि मृ तै चं इतकं
आल्याचं आणि मृ तै चं इतकं सख्य आहे हे माहित नव्हतं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"...चं बरटं" एकदम चपखल आयडीया सरजी.
मी आजच केलं आणि खाल्लं हे
मी आजच केलं आणि खाल्लं हे बरटं. अतिशय मस्त चव. फार मजा आली. धन्यवाद.
हिरवी मिर्ची जास्त झाल्याने मी लाल तिखट कमी घातले आणि त्यामुळे रंग थोडा हिरवट आला.
माझी पाककृतीच्या पूर्वतयारीची क्रमवारी थोडी वेगळी आणि सोपी होती.
१) मृण्मयीच कोलंबीचं बरट भन्नाट दिसतय, एकदा खाल्लं पाहिजे असे आठवडाभर म्हणत रहावे.
२) एक दिवस घरी कोलंबी घेऊन यावे आणि मग अरे याला बरीच पूर्वतयारी लागेल असे म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यावी.
३) दुसर्या दिवशी घरी आल्यावर वाटण, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, ठेचलेला लसूण वगैरे सर्व तयारी ओट्यावर मांडून ठेवलेली आढळते.
४) आता पाककृतीप्रमाणे बरटे करावे. 'मृण्मयीने लिहिले आहे तसेच्या तसे कर, तरच ते चांगले होईल, स्वतःचे प्रयोग नको.' अशा टीव्ही बघता बघता दिल्या गेलेल्या सल्ल्यांचा मान राखावा.
जीएस __/\__
जीएस
__/\__
जीएस मी रविवारी केलेलं बरटं.
जीएस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी रविवारी केलेलं बरटं. मस्तचं! असं म्हणत ते फस्त केलं सगळ्यांनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साॅरी, फोटो टाकता येत नाही.
'मृण्मयीने लिहिले आहे तसेच्या
'मृण्मयीने लिहिले आहे तसेच्या तसे कर, तरच ते चांगले होईल, स्वतःचे प्रयोग नको.>>>>> +१ मागच्या रविवारी, कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात मीठ टाकले होते.तिखट विसरले होते.त्यामुळे हिरवट-पिवळा रंग + थोडासा बुळबुळीतपणा ( कांदात मीठ घातल्यामुळे) आला होता.
अरे वा!! गोगांच्या गाजाभमुळे
अरे वा!! गोगांच्या गाजाभमुळे चांगलीच सोय झाली. मी त्यात सोयाचंक्स भरीन असं म्हणते.
दुसर्या दिवशी घरी आल्यावर
दुसर्या दिवशी घरी आल्यावर वाटण, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, ठेचलेला लसूण वगैरे सर्व तयारी ओट्यावर मांडून ठेवलेली आढळते.
हे आपोआप कसे काय मांडून ठेवले जाते ब्वा??????????? कुठली हुर वा परी वश झालीय हे आपोआप करायला??
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इकडेही त्या हुरला पाठवुन दे. माझ्याही फ्रिजमध्ये काल घेतलेली कोलंबी आराम करतेय.
जीएस साधना, त्यासाठी तुला
जीएस
साधना, त्यासाठी तुला बायकोशी लग्न करावे लागेल ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कसलं तोंपासु आहे हे बिरटं..
कसलं तोंपासु आहे हे बिरटं.. लवकरच करेन
चिमुरी : आता त्याचं 'बिरटं'
चिमुरी : आता त्याचं 'बिरटं' झालं ? की बरटं - बिरटं पैकी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जीएस फोटो मस्तं आलाय. तुमचं
जीएस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फोटो मस्तं आलाय. तुमचं हायकमांड प्रेमळ आहे. हुकूम करतं, पण मदतही करतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु म्हणणार्या, तसंच करून बघणार्या किंवा खाऊ घालणार्या समस्तं बरटंमेकर्सना धन्यवाद!
हम्म्म्म.. गोविंद 'सोवळे'
हम्म्म्म.. गोविंद 'सोवळे' नाहित तर!
गोगा बरटं बिरटं नाही हो..
गोगा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बरटं बिरटं नाही हो.. वाचुन होइतोवर कसं कोण जाने बरट्याचं बिरटं झालं मनात.. मे बी वालाचं बिरडं ऐकायची सवय असल्याने असेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे या प्रक्रणाला
आमच्याकडे या प्रक्रणाला कोलंबीचं लिप्तं म्हणतात... तेल, कांदा, लसूण सढळ हस्ते!! कांदा टोमॅटोची थबथबीत ग्रेव्ही झाली पाहीजे.
Pages