कोलंबीचं बरटं

Submitted by मृण्मयी on 5 March, 2015 - 15:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटीभर स्वच्छ केलेल्या कोलंब्या
७-८ लसूण पाकळ्या. (भदाड्या लसणाच्या २-३)
भरपूर कोथिंबीर आणि झेपेल तितक्या हिरव्या मिर्च्यांचं वाटण- अर्धी वाटी
२ मोठे टोमॅटो (किंवा ३ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट)
२ मोठे कांदे. (कॉस्टको कांदा -१)
हळद
तिखट
मीठ
पाव वाटी तेल (हिंम्मत असेल तर जास्त)

kolambeecha-barata-maayboli.jpg

क्रमवार पाककृती: 

-कोलंब्यांना हिरवं वाटण, हळद आणि मीठ लावून तासभर मुरत ठेवायचं.
-तेल कडकडीत गरम करून त्यात लसूण ठेचून घालायचा. लाल होऊ द्यायचा.
-यावर बारीक चिरलेला कांदा गळून जाईपर्यंत परतायचा. (गळणारा घटक- कांदा)
-आता बारिक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅटो पेस्ट घालून तेल सोडेपर्यंत परतायचं.
-तिखटपूड घालून थोडं परतून घ्यायचं.
-कांदा-टोमॅटो भरपूर शिजून एकजीव झाल्यावर, तिखट घालून परतल्यावर, कोलंबी घालून २-३ मिनिटं परतायचं.
-बरटं तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
१ माणूस
अधिक टिपा: 

-बरट्याला कुठलाही मसाला घालायचा नाही.
-आलं घालण्याचा विचारही मनात आणायचा नाही.
-कोलंबीच्या आकारानुसार शिजायला कमी अधीक वेळ लागेल. जास्तं शिजून चिवट व्हायला नको.
-पाणी घालून पातळ रस्सा करायचा नाही. पण अगदीच कोरडं वाटलं तर कोलंब्या परतून झाल्यावर, आच बंद करून, पाव कप कढत पाणी घालून मिसळायचं.

माहितीचा स्रोत: 
..पुन्हा एकदा मोनाडार्लिंग. (बहीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी आहे (म्हणजे खरोखरची सोपी, कमी कटकटीची ;))

मसला नाही का कुठलाच? काळपट रंग कशामुळे येतो? बटाटा, पनीर बरोबर चिकन? तेही चालेलेच ना? इतर कुठल्याही फळभाज्या? Wink

मस्त आहे बरटं. कोलंबीचं लिप्तं हा एक प्रकार ऐकला आणी खाल्ला होता. तो कसा करतात?
मी करणार हे पुढच्या वेळी कोलंबी आणली की

म्हणजे अगदी कूष्णकरी तल्या सारखा काळपट नाही पण थोडा डार्क, चिंच असावी असा संशय येण्यापुरता किंवा मग कुठला तरी काळा मसाला घातल्यासारखा दिसत आहे रंग ..

(म्हणजे तक्रार काहीच नाही .. उगीचंच आपलं .. ;))

गळणारा घटक >> फोटो पाहून ला़ळ ...

घरात नाहीये कोळंबी पण नेक्स्ट टाइम याच रेस्पीने करणार

तिखट कधि घालायचं ?

मस्त दिसतंय. बरट्यापुढे पोळ्या किती सात्विक दिसतायत. निळू फुले शेजारी जयश्री गडकरच. Lol
२ मोठ्या टोमाटोंची तीनच चमचे पेस्ट होते? Proud

ह्याला बरटं म्हणतात हे माहीत नव्हते पण हा प्रकार घरी केला जातो. कोलाम्बिची अफलातून चव लागते . हिरवी मिरची वापरून कधी केले नाही. करुन पाहते.

आशुडी, टोमटो पेस्ट म्हणजे टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवुन होणारा रस नव्हे तर तो रस आटवुन त्यातले पाणी पुर्ण उडाले की उरणारा लगदा. दोन मोठ्या टोमेटोचा दोन चमचे म्हणजे खुप झाला. मी नुक्तीच अर्धा किलो टोमेटोची करायला ठेवलीय ती जेमतेम वाटी सुद्धा भरणार नाही इतकी झालीय.

Pages