जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना. आधी आयडिया आली असती तर तुलाच सांगितलं असतं येताना त्याला घेऊन यायला Proud

शेअरींग ईज केअरींग >>> शेअरिंग आहेच पण जत्रेबरोबर शेअरिंग नको Proud

कार मधुन हनीमुन ला ट्रॅव्हल मधे मुद्दम वळणावर ब्रेक मारतो तिचं टाळकं त्याच्या खान्द्यावर झुकावं
म्हणून and he winks when that happens , ufff , those killer looks !!

ओय होय! डीज्जे, फुल्ल ऑन फिदा का? Happy माझे आणि मीपुचे तासन्तास गेले आहेत असल्या डिस्कशन्स मधे. तिने तर मला सुरूवातीपासून आत्तापर्यंतचे सगळे एपिज पण दिले आहेत कॉपी करून.

आदित्य त्या टेरेस डेट च्या एपि मधे आणि अ‍ॅनिव्हर्सरीच्या एपिमधे सगळ्यात जास्त आवडला. माय माय! इतकं रोमँटिक कोणी कसं असू शकतं? आणि त्या व्हाईट कुर्ता मधे टोटल कातिल दिसलाय.

अगं ए! Lol नका त्या जुन्या आठवणी काढूत.. त्रास होतो Proud पुढे जाऊन आदे मेदेने जी काय काशी केलीये ती पाहाताना त्यानंतर आदे एक क्रश न वाटता कधी काळी टॉडाहँ असलेला आणि आता मंडईत भाजीच्या पिशव्या घेऊन भेटलेला जुना मित्र वाटतो. आता एपिसोड्स बघू नका, पुढे धोका आहे! Proud

हो, नंतर रोमान्स नाही, गिटार नाही, बायसेप्स वगैरे काही नाही.. उरते ते फक्त वैवाहिक आयुष्य आणि कौटुंबिक कलहांचा ट्रे! Proud

डीजे, इतकी घाबरू नकोस. आदित्य अजूनही छानच दिसतो. स्पेशली त्याच्या डार्क निळ्या शर्ट मधे तर माशाअल्लाह! बाकी त्याचे विभ्रम अजूनतरी तसेच आहेत. Happy उगाच नाही चित्रा प्रेमात पडली Wink

कोण चित्रा माहित नाही अजुन, तिथप्र्यंत पोचले नाही अजुन पण मेघना इतक्या उशीरा प्रेमात पडली हा कहर होता !
तो नग्रकरांचा आदुही त्यातून वाचला नाही, तोही ऑलमोस्ट प्रेमातच पडला आदि देसाईच्या Proud
आणि देसायांचा आदित्यही नगरकरला पाहून मेघनाला म्हणे " याच्या प्रेमात न पडणे फारच अवघड गोष्ट असणर" !
दोन आदित्यांचे डॉयलॉग्ज , केमिस्ट्री पाहून दोस्तानाच्या ट्रॅक वर जाताना दिसली २ भाग सिरियल .. म्हणून पेटीही परत घेउन आला तो Biggrin

आशुडी!
तू धोक्याची वॉर्निंग द्यायला आणि एका एपिसोड सुकन्या कुलकर्णी आमच्या लव्हर बॉय कडून कपडे वाळत टाकायच्या दोर्या बांधून घेत होती , भाऊ रद्दी बांधून घेत होता Sad

विडंबन

मूळ गाणे: कधी तू, रिमझिम झरणारी बरसात.....

हे विडंबन जुळून येती मधल्या विचीत्राला समर्पित Wink

कधी तू, डसणारी नागीण डि-घरात
कधी तू, ढोंगी रडवेली बहाण्यात

कधी तू, आंधळ्या प्रेमात, डोळस लफड्यात
शिव्यांची लाखोली हजारात, करपलेला चेहरा, जळलेल्या नजरा
मगरीच्या खोट्या आसवात...

कधी तू, फुले पेन चोरणारी, लाज शरम सोडणारी, हीन बाई वेड्या डि-घरात
कधी तू, बेडकी डोळ्यांच्या झापडात

जरी तू, खुपले तरी न संपणारे, जपले तरी फुत्करणारे, असह्य भोग नशीबात
तरी तू, गरीब भोळी वेड्या डि-जगात

~~ITG

Kally, निधी धन्यवाद Happy

सिरीयल मधून एकदाची ति विचीत्रा बाहेर गेली. Happy

हेच सगळे आधीच दाखवाय्चे ना? कशाला विचीत्रा चे आदित्यच्या मागे लागणे वगैरे दाखवायचे उगाच पाणी घालून ताणायला

आता नवीन कोणी विचीत्र आणायच्या ऐवजी सिरीयल ट्रॅकवर आणून अणि संपवायला हवी Wink

सध्याच्या झी मराठी सिरीयल्स ची नावं खरतर अशी असायला हवीत Wink

१> असे हे वेडेध्यान

२>होणार पेशंट मी या मेंटलहॉस्पीटलची

३>जळून करपती रेशीमगाठी

४> का रडूरावा

एक अजुन बातमी ताजी ताजी:

जुळुन येती रेशिमगाठी अआणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिका हिंदी झी वर येतायत प्राईमटाईम संध्याकाळी ५.३० आणि ६.०० वाजता डब होऊन. मिले सुर मेरा तुम्हारा अस त्या जुयेरेगा च नाव आहे.

मला उत्सुकता आहे की हिंदीत मेघना कसे उसासे टाकेल आणि आदित्य हैना, चलता है, बस क्या कस म्हणेल??? Happy

Pages