ट्यूलिप फेस्टीव्हल... (नवीन फोटोंसहित)

Submitted by rar on 21 April, 2015 - 11:47

अमेरिकेतील पॅसीफीक नॉर्थवेस्ट (म्हणजे कॅलिफोर्नियाच्या उत्तरेचा भाग) ट्युलिप्सच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारच्या ट्युलिप्सच्या जाती इथे तयार केल्या जातात . विविध रंगछटांच्या या जाती तयार करण्यासाठी बरेच प्रयोगही केले जातात.
नुसताच वुडबर्न, ऑरेगन इथल्या ट्युलिप फेस्टीव्हलमधे काढलेले काही फोटो.
मागे बर्फाच्छादित माऊंट हूड, ट्यूलिप्स आणि मस्त सूर्यप्रकाश असलेला दिवस...
(कॅमेरा : Nikon coolpix)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोकहो. हे सगळे फोटोज साध्या कॅमेर्‍यावर काढले आहेत. डीसेंबर मधे माझा nikon DSLR + lenses सगळं चोरीला गेलं.. आता canon घ्यावा की nikon ह्या निर्णयावर अजून न पोचल्याने कॅमेराच नाही माझ्याकडे सध्या ! मिसींग माय ओल्डी नायकॉन !!!
अजून फोटो आहेत, त्यातले १-२ अपलोड का होत नाहीत ते बघायला हवंय !

छान आहेत फोटो. तू माझे चेरी ब्लॉसमचे फोटो पाहिलेत का? नसेल पाहिलेत तर एकदा तरी बघ. अशा स्थळी जाऊन कुठल्याही कॅमेरानी चांगलेच फोटो निघतात.

जबरी फोटोज. पहीला व तो गुलाबी फुलाचा अतिप्रचंड आवडला. Happy सगळ्या फोटोत त्या फ्रेम मात्र खटकत आहेत. (पिकासा वापरतेस का. मलाही दुसरा पर्याय (फोटोशॉप वगैरे) येत नसल्याने याच फ्रेम वापराव्या लागतात.) थोडा लाईट हार्श आला आहे तो कमी करता आला तर भन्नाट दिसतील फोटो.

कसले सुंदर फोटोज आहेत.. एकाच रंगातले ट्युलिप्स पाहिले होते (फोटोतच Happy ) पण असे वेरिगेटेड ट्य्लिप्स पहिल्यांदाच पाहिले.

बी, तू काढलेले चेरी ब्लॉसम्सचे फोटोज नक्की पाहीन.
मी शिक्षणासाठी इस्ट कोस्टला होते, त्यामुळे वॉशींग्टन डीसीचा चेरी ब्लॉसम २-३ वर्षे पाहिला/अनुभवला आहे…. निसर्गाची बदलती रूपं पाहणं मस्तच अनुभव असतो.
आणि फोटो -कॅमेराबद्दल म्हणशील तर फोटो हे एक साधन आहे, साध्य नव्हे. अनुभव सगळ्यात महत्त्वाचा. ( या अशा ठिकाणी गेलं की एका लिमीटनंतर मी कॅमेरा देखील बाजूला ठेवते…. 'शीप ऑफ थिसीयस' मधल्या त्या फोटोग्राफरच्या स्टोरीतला शेवटचा शॉट अगदी जवळचा वाटतो मला म्हण)

केपी, मी पिकासा फक्त फ्रेम्स आणि वॉटरमार्क घालायला वापरते… पटकन होतं म्हणून.
फोटो फेसबुकसाठी केले होते, तिथे काळ्या बॉर्डर्स मर्ज होतात बॅकग्राऊंड मधे. पण मायबोलीवर पोस्ट करताना, पांढर्‍या बॅकग्राऊडचा विचार करून फ्रेम्स ट्राय करायला हव्या… करून पाहिन नक्की Happy

बाकी. परत एकदा धन्यवाद सगळ्यांना.

सुरेख... सुंदर ....
क्लोजअप आणि macro वर जास्त भर दिलाय. लाँग-शॉट असतील तर टाका.. पहिल्या फोटोत मागील माऊंट तर खासच...
DSLR + lenses सगळं चोरीला गेलं.... Sad Sad :

Pages