घाबरताय कशाला हो डुक्करतापाला ?

Submitted by Kiran.. on 11 August, 2009 - 03:22

जो तो आपले मास्क लावून फिरतोय. हे पुणे शहरच आहे कि इराकमधले युद्धग्रस्त शहर हेच समजेनासे झालेय. तिथे म्हणे जैविक / रासायनिक अस्त्रे होती. इथे चार महिन्यांपूर्वी जन्माला आलेले H1N1 हे इटुकले बाळ आले काय आणि सर्वांनी त्याचे कौतुक करायचे सोडून त्याचा धसका घेतला काय.. सगळेच अगम्य.

पुणेकराना झालेय तरी काय ?
अहो हे बाळ तरी किती इटुकले ?

०.१ मायक्रॉन इतक्या आकाराचे. जगातली सर्वात गाळणी ( आण्विक, रासायनिक, जैविक युद्धात वापरली जाणारी ) ०.३ मायक्रॉन क्षमतेची असते. किंमत फक्त २५००० रूपये. इथे १० मायक्रऑन सुद्धा ज्याची क्षमता नाही असे मास्क लावून पुणेकर फिरताहेत....काय होणारेय ??
दॄश्य मात्र मस्त दिसतेय.

बागेमध्ये एक कोप-यात दोन प्रेमी जीव बसलेत.
दोघांनीही मास्क लावलेत. तो तिला मास्क काढायची विनंती करतो. ती त्याला स्पष्ट नकार देतेय...!!!

बाकि हा विषाणू जन्माला येण्ञाच्या आधीच त्यावरची औषधे तयार होती आणि ती ही फक्त दोनच कंपन्यांची !! आमच्या संशयी मनात लगेच कल्लोळ सुरू झाला. शरद पवारांनी सोनियांच्या उपस्थितीत राजीव गांधी हे भूमिपुत्र होते ही सुचना केली तेव्हाही असाच संशयकल्लोळ झाला होता.

बारामतीकरांना स्वाईन फ्ल्यू (डुक्कर ताप) होणार नाही असे कालच एकाने मला छातीठोकपणे सांगितले.
अल्कोहोल घेणा-यांनाही डुक्कर ताप येत नाही ही महत्त्वाची माहिती त्याने दिली.
या दोन गोष्टींचा संबंध काय असे विचाराल ना तुम्ही आता ?

बारामतीकरांचे अल्कोहोलचे कारखाने आहेत. साखर कारखान्यात देखील अल्कोहोलचे उत्पादन सुरू झालेय. त्याशिवाय वाईन ची फॅक्टरी, विदेशी मद्याचे उत्पादन हे आहेच. एव्हढी जय्यत तयारी असताना स्वाईन फ्ल्लू होईलच कसा असा त्याचा बिनतोड सवाल होता.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बारामतीकरांना स्वाईन फ्ल्यू नाही तर वाईन फ्ल्यू च्या पेशंटची गरज आहे.

विषयांतर झाले कि बरेच..

सांगायचे इतकेच.. पुणेकरांनो घाबरताय कशाला ?

तक्षक

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाबरायच नाही मग काय मरायच.!!!!!!!!!
अस्मादिक कुठे राहतात याची खरी माहिती मिळु शकेल का?

ए मित्रांनो,
www.pudhari.com या साईटवर जा. तेथे एडिटोरियल पेजवर डॉ. नटराज द्रविड यांचा लेख आहे. तो वाचा. अत्यंत सुंदर आहे.

बाळूनाना

अस्मादिक इथेच तर राहतात हो... पुण्यातच. वाईनफ्ल्ल्यू च्या देशात ..!!

घाबरून मरण्यापेक्षा चार पळ हसत जगावे..

तक्षक, अरे कुठला फोटो आहे हा. तोंडाला मुस्के लावेल दिसत्यात सगळ्यांच्या.
आणि त्या वरच्या लिंक दिल्या होत्या त्या बददल काय अभिप्राय.....

वराह्ज्वर हा शब्द जड आणि गंभीर खराच, पण आता गांभीर्य खूपच झाले नाही का? त्या पार्श्वभूमीवर तक्षक आणि बाळूनानांनी थोडा हास्यरस निर्माण केला तर बिघडले कुठे?