जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई, नताशा, रीया, शुभांगी मग काय मॅडच आहे ती सध्याची मेघना Wink

तो आदित्य म्हणजे (लव्हगुरु) बाबा आदित्य देसाई (BAD) ....:फिदी:

त्या देसायांनी वाडीबाहेर खाली दिलेला बोर्ड लावायला हवा Wink

आमच्या गोठ्यात सर्व म्हशीं रेड्यांचे प्रेममिलाप, जतन, संवर्धन तसेच विस्थापीत गुरांचे संगोपन केले जाईल

टीपः तसेच रद्दीपासून रोजगार शिकवला जाईल ( सोबत पकाऊ घाणामृत मोफत)

पत्ता: डि गुराखी गँग @ डि वेडी

आमच्या गोठ्यात सर्व म्हशीं रेड्यांचे प्रेममिलाप, जतन, संवर्धन विस्थापीत गुरांचे संगोपन केले जाईल

पत्ता: डि गुराखी गँग @ डि वेडी>> Rofl

आयटी गर्ल.... Biggrin

आयटीगर्ल, मस्त लिहितेयस. शब्दाशब्दातून राग ओकल्या जातोय. तुझा सध्या "आता माझि सटकली "मोड ऑन आहे. लय म्हन्जी लयच आवड्ल बुआ!

निधी , धानी१ धन्यवाद Happy

rmd, मला तर ते बाबाजीच चारचौघांसारखे माणूस वाटतात त्या मूर्ख महान अतीशहाण्या देसायांपेक्षा Wink
बाबाजी चूका करतात, चूक उमगल्या वर माफी मागून नव्या चूका करायला मोकळे होतात Lol

आयटीगर्ल, ते बरोबर आहे. पण त्यांचा आत्ता जो काही उद्योग चाललाय त्यामुळे ते देसायांच्या, चित्राला मदत करण्याच्या, प्लॅन्सना सुरूंग लावण्याची चिन्हं जास्त दिसतायत. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर Happy

अरे ही अर्चू ढमा स्वतः काही हात चालवणार आहे की नाही त्या ट्रे बनवण्यासाठी? दिलंय बाकीच्यांना काम लावून नुसते. ऑर्डरचे पैसे आल्यावर यांना देणारे का काही शेअर? ती चित्रा बरी म्हणायची काहितरी गिफ्ट आणल्या, घरकामात मदत करते.
हा कसला आळशी धेंडा नुसता? :रागः

आणि अर्चू सारखी महा ढालगज नणंद असेल तर कोणत्या भावजया इतकं गोड वागणार. मला जाम डोक्यात गेला तो ट्रे एपिसोड. "ए भवाने.. होत अस्तील तर कर ट्रे स्व्तः नायतर गेलीस उडत. फार पुळका असेल तर तू अन माई आन विचित्रा काय काशी करायची आहे ती करा " असे वास्तववादी एकदा तरी मेदे किंवा विजयाने म्हणावे असं सतत वाटत होतं.

अरे ही अर्चू ढमा स्वतः काही हात चालवणार आहे की नाही त्या ट्रे बनवण्यासाठी? दिलंय बाकीच्यांना काम लावून नुसते. ऑर्डरचे पैसे आल्यावर यांना देणारे का काही शेअर? ती चित्रा बरी म्हणायची काहितरी गिफ्ट आणल्या, घरकामात मदत करते.
हा कसला आळशी धेंडा नुसता? :रागः >> अगदी अगदी!
मला सतीशचं कौतुक वाटतं. आपल्या उद्धट आणि इम्मॅच्युअर बायकोला खूप समंजसपणे हँडल करतो.

जुळून आलेल्या रेशीमगाठींचं गुंतवळ करून दाखवला ठेंगा

आणून ठेवला प्रेक्षकांच्या माथी पोखरणारा विचित्रा भुंगा

आवरा आता हा मालिकेचा पसारा नका घेऊ प्रेक्षकांशी पंगा

सुटू देत प्रेक्षक एकदाचे पाहून आदिघनाच्या बाळाचा भोंगा

घसरलेली गाडी घाला आता यार्डात नाहितर फलाटावर होईल दंगा

~~ITG

आयटीगर्ल.... Rofl AIB वाल्यांसारखे व्हिडीओज/ब्लॉग काढ आता झी मराठी सिरीयलींची पिसं काढणारा... तुफान चालेल!!

मधे मराठी सिनेमा पहायची लहर आली आणि फार काही नवे नसल्याने यु ट्युब वर एपिसोड्स पळवत मॅरेथॉन केलं या सिरियल चं !
सुकन्या कुलकर्णी, गिरीश ओक, उदय टिकेकर पब्लिक अ‍ॅज ऑलवेज चांगलच काम करतात, सगळी कॅरॅक्टर्स बर्या पैकी बिलिव्हेबल वाटली पण ती बच्चे कंपनी जुनाट ़काळातली वाटतात, थेट हरिश्चंद्राची फॅक्टरी काळात शोभतील असे !
हिरो हिरॉइन अभिनयात तसे लिंबुटिंबुच वाटले.
प्राजक्ता माळी सुद्रुढ बालिका कॅटॅगरी आहे , चेहरा क्युट आहे पण तसा ! मात्रं बरेच एपिसोड रडकी भकास !
तशी ती टिपिकल मराठी साड्या, चन्द्रकोर वगैरे गेटप मधे सुंदर दिसते पण मोस्ट्ली तिच्या कॅरॅक्टरला मैने प्यार कियाच्या भागाबईं सारखे भयंकर कपडे दिलेत, रोमान्स लेव्हलही तितपतच !
असो, तर तरीही डोळ्यात बदाम आणून बरेच भाग पाहिले कारण हिरो कातिल आहे यार मराठी सिरियल असूनही Happy
देसायांच्या पोरगा फारच प्रेमाळु, खरच कलेजा खल्लास होईल असा आरपार बघतो डोळ्यात.. गिटार वाजव्॑तो, बायसेप्स वगैरे अगदी झकास, आपुन टोटल फिदा !
पण त्या भागाबाई आय मीन मेघनानी कित्ती तो वेळ लावला , आदि एवढा सेकंड हनीमुनला घेउन गेला पण तिथे ४ नाइट ५ डे पॅकेज घालवलं ना वाया, तिथे शर्टलेस आदिला व्यायाम करताना पाहून ती लाजली, गिटार शिकवायचं निमित्त करून त्याने जमेल तितका रोमान्स केला, एवढच काय पण मराठी कॉकटेल ड्रेसही गिफ्ट दिला तिला ( मैने प्यार किया आठवला का कोणाला ? सलमान तिला ड्रेसेस गिफ्ट देतो आणि गच्चीत फॅशनशो नंतर, ' मेरे सवालोंका जवाब दो ),तर हे सगळं होउन ती वटपौर्णिमेच्या मुहुर्ताची वाट पहात बसली Sad , मग नंतर जेजुरी दर्शनानंतर मात्रं किती दिवस किती रात्री वाया चाललेत त्याचे हिशोब !
असो, बाकी एपिसोड्स मी पाहिले नाहीयेत, मराठी सिरियल्स ला झेपेल इतपत रोमान्स दाखवून एकदाची सुहागरात झाली तिथपर्यन्त पाहिलं , आदित्यला बघत एपिसोड फॉरवर्‍ड करावे अशी स्लो झालीच आहे ऑलरेडी सिरियल .. पण बघावेच अधुन मधुन त्याच्या साठी आणि अता बीएमेम ला देखील जावच लागेल, येणार आहे तो :).
बाकी त्याने तोंड जरा बन्दच ठेवावं , दात दिसल्यावर चार्म जातो जरा त्याचा आणि हसु नये फार डोळे बारीक करत !

डिजे, पूर्ण पोस्टला +१. मी पण नुक्तीच ही सिरिअल याच पद्धतीने पळवत पाहीली. आदित्य चे सगळे शॉट्स असेच डोळ्यात बदाम आणत पाहीले (बाकीची पकाऊगिरी मात्र स्ट्रिक्टली फॉर्वर्ड) आणि आता रोजचे रोज एपि बघते आहे. आणि मी सुद्धा त्याच एका कारणाकरता बीएमेम ला जाते आहे Proud
त्याच्या झुल्पांवर टोटल फिदा.

तरीही डोळ्यात बदाम आणून बरेच भाग पाहिले कारण हिरो कातिल आहे यार मराठी सिरियल असूनही स्मित
देसायांच्या पोरगा फारच प्रेमाळु, खरच कलेजा खल्लास होईल असा आरपार बघतो डोळ्यात.. गिटार वाजव्॑तो, बायसेप्स वगैरे अगदी झकास, आपुन टोटल
फिदा ! --

डीजे +१००

रम्ड देख ये डीजे भी शामील Wink

ए हसताना पण कातील दिसतो तो, फार भसाडा हसतो तेव्हा मात्र चायनीज दिसतो Wink

समीरला मी म्हणाले होते कि तो येतो आहे बीएमेम ला हे भरपूर अ‍ॅडवर्टाईझ करा म्हणजे मुलींची जत्रा जमेल Proud

No no , please don't do advertisements , I don't want to share my time with others,:D

Pages