Submitted by वैवकु रीटर्न्स on 11 April, 2015 - 13:06
वाटले नव्हते मला ते ते खरे झाले
त्यामुळे माझ्या मनावर हे चरे झाले
.
जन्म घेण्यानेच हा ओलेपणा आला
ठेच मोठी लागली डोळे झरे झाले
एवढ्या जवळून आजच भेटलो आपण
माफ कर जर दु:ख माझे साजरे झाले
सांग आकाशा कशी केलीस ही किमया
ऐन वैशाखात. ..काळे-पांढरे झाले
भक्त असण्यामागचा उजवेपणा नडला
आणि हे आस्तिक्य माझे डावरे झाले
तू तिथे दिसशील ह्यासाठीच केले पण
विठ्ठला ते शेर...माझे चेहरे झाले
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच---- विठ्ठलाशिवाय गझलेस
छानच----
विठ्ठलाशिवाय गझलेस वैभव प्राप्त होत नाही.
एवढ्या जवळून आजच भेटलो
एवढ्या जवळून आजच भेटलो आपण
माफ कर जर दु:ख माझे साजरे झाले << सर्वाधिक आवडला. कातिल.
भक्त असण्यामागचा उजवेपणा नडला
आणि हे आस्तिक्य माझे डावरे झाले
तू तिथे दिसशील ह्यासाठीच केले पण
विठ्ठला ते शेर...माझे चेहरे झाले
वाह वाह ! हे पण भन्नाट .
गझलेत विठ्ठ्ल आला म्हनजे
गझलेत विठ्ठ्ल आला म्हनजे वैवकू परत माय्बोलिवर सक्रीय झाले.स्वागत पुन्हा.मागच्या वेळेसारखा आचरट्पना पुन्हा करु नका.पुलेशु
सर्व प्रतिसाद देणर्यांचे
सर्व प्रतिसाद देणर्यांचे (आणि आवर्जून न देणार्यांचेही) आभार
एक आणखी शेर होता ह्या गझलेत
तू मला नक्कीच ओळखशील ..ही चर्चा !
मी तुझ्या लक्षात नाही हे बरे झाले
असो
धन्यवाद
मी तुझ्या लक्षात नाही हे बरे
मी तुझ्या लक्षात नाही हे बरे झाले <<< व्वा
आजकाल काय झाले आहे? अगदी वाचल्या वाचल्या भिडावेत असे शेर का दिसत नाहीत?
बहुधा हे सगळं मूडवर अवलंबून
बहुधा हे सगळं मूडवर अवलंबून असतं सर
अजून काही अपेक्षिणे गैर होत
अजून काही अपेक्षिणे गैर होत राहील ह्यापुढे
भले तुझा हुंदका जरा स्वैर होत राहील ह्यापुढे
नशीब ते !! योजना नव्या राबवेल तू उन्मळायच्या
धरून आशा उभा रहा ..'खैर होत राहील ह्यापुढे'
नकोच भांडूस वैभवा विठ्ठलासवे तू असाच.. की ..
तुझे तुझ्याशीच तेवढे वैर होत राहील ह्यापुढे
~वैवकु
वैवकु , गझल चांगलीच आहे,
वैवकु , गझल चांगलीच आहे, तरीही फॉर्मचाही शीण येऊ शकतो, येत असतो..
गझल आवडली
गझल आवडली
काही ओळी आवडल्या.
काही ओळी आवडल्या.