करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 19 July, 2012 - 03:49

या अधी १/२ ठिकाणी हाच लेख लिहिलेला असल्यानी,अता बरेच जण आमच्या या करंट मिसळचे चहाते/भक्त झालेले आहेत,इथेही लिहायच होतच,आज मुहुर्त लागला...तर ठिकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी

गाडि ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री Wink

आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल

हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा

तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र Wink घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात Wink ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं

२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते

३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं

४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट

५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला

६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...

७) ही...लागली बघा तर्री.....

८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड

९)उसळ फरसाण पोहे

१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव

११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा

१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी Wink )

१३) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संध्याकाळी खाऊ पण नये, आम्लपित्त वाढेल. मामांनी ठरविलेली सकाळची वेळच योग्य आहे.

@संध्याकाळी खाऊ पण नये, आम्लपित्त वाढेल. >>> खरं आहे... पण कुणाचे? Wink
.
.
.
.
..
.
.
.
पळा आता... http://www.freesmileys.org/smileys/smiley-scared005.gifलै दिसांनी चे.सु.गुं.ची खोडी काहाढली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

<< पळा आता.लै दिसांनी चे.सु.गुं.ची खोडी काहाढली! >>

ती तर तुम्ही नेहमीच काढता. मी मिसळपाववर लिहीत नसलो तरी वाचत असतो. तिथे तुम्ही माझ्या अपरोक्ष माझ्याबद्दल काय उल्लेख करता त्याचा विस्तृत अहवाल माझ्यापाशी आहे. ब्रह्महत्येचं पातक नको म्हणून मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतो इतकंच.

हा धागाही मिसळीचाच असल्याने तुम्हाला खोडी काढण्याची हुक्की येणे साहजिकच आहे. तुमच्यासारखेच अजुनही काही आयडी आहेत जे मिसळपाववर, फेसबुकवर आणि इतरत्रही माझ्या सिंहीण धाग्याची आठवण काढतात. गोल्डन पाल्म हॉटेलातला माझ्या भेटीचा उल्लेख करतात. सांकेतिक शब्दात माझा उल्लेख सिंह म्हणून करतात. तुम्ही त्यांना सिंहाच्या सत्काराचे वर्णन सांगता. गंमत म्हणजे या सार्‍याचा वृत्तांत माझ्यापाशी न चूकता पोचवणारेही बरेच हिंतचिंतक देखील आहेत. आता बोला...

आताच करंट मिसळ खाऊन आलो.
बरेच दिवस जायचे होते पण आज योग आला .
आधी एक मिसळ घेतली ती आवडली , मग त्याना तुमची खास तिखट करायला सांगितल्यावर मिळाली खरी मिसळ ...
अहा हा ... काय चव ... आग ... नाकातून पाण्याच्या धारा लागल्या तरी खायच थांबवत नव्हत Happy

तिसरी खायची हाव कशीबशी आवरून उठलो .

धन्यवाद या मिसळीची ओळख करून दिल्याबद्दल Happy

अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच>>

अस लिहिलय रे. त्यावरुन हे कोर्पोरेशन अर्थात पुणे महानगरपालिका भवन येथे जो पीएमटी बसेसचा स्टॉप आहे त्याच्या अगदीच जवळ. मन्गला थियेटरच्या जवळ.
तु कधी जाणारेस?

आज मी आणि माझी बायको पहिल गिर्हाईक Happy
६ ला दगडूशेठच दर्शन घ्यायला गेलो , साधारण अर्ध्या तासात आवरल . मग चांगला १५ मिनिट टाईमपास केला अन मामांची मिसळ . कवितालाही फार आवडली , तिखट खाण्यात ती दादा (की ताई ?) आहे पण तिचाही चांगलाच घाम काढला मिसळने Happy

कुठे फेडाल हे पाप? का असे जीवघेणे फोटो टाकताय?>>>+११११ कातिल फोटो... आता पुण्यात आल्यावर पहिली व्हिसीट इकडेच... Smiley Smiley

जगात भारी कोल्हापुरी... सातारा रोड वर सिटी प्राईड जवळ... ही मिसळ कशी आहे? ट्राय केलीय का कोणी?

Pages