नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना
ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270
गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi
ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.
हा छान उपक्रम आहे. पण एक
हा छान उपक्रम आहे.
पण एक आठवण झाली. सात वर्षापूर्वी जर्मनीत European Energy Stock Exchange च्या प्रोजेक्टमध्ये काम केले होते. तिथे जी माहिती मिळाली ती खूप धक्कादायक होती.
आता जेवढं आठ्वतं तेवढं सांगतो. Energy Stock Exchange मध्ये वीजनिर्मिती, वीजप्रसारित आणि
वीजवाटप करणार्या वेगवेगळ्या कंपन्या असतात आणि त्यांच्यात वीज खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सर्व
साधारणपणे कोणत्याही वस्तु विकत घेताना पैसे द्यावे लागतात आणि विकल्यावर पैसे मिळतात.
पण विजेच्या व्यवहारात कधी कधी अतिरिक्त वीज विकताना वीजनिर्मिती कंपन्या वीजप्रसारित कंपन्याना पैसे द्यावे लागायचे कारण इतर पर्याय जास्त महाग असायचे.
त्यामुळे ढोबळमानाने ज्या वस्तूची जिकडे तूट आहे, तिकडे ती वस्तू मोजून मापून वापरा.
सिंडरेला, एफिशियंट ऑटो फ्लशची
सिंडरेला, एफिशियंट ऑटो फ्लशची संकल्पना पटली.
पर्सनल लेव्हलचा चेंज म्हणून
पर्सनल लेव्हलचा चेंज म्हणून नाही, पण माझ्या मते ठिकठिकाणचे ऑटो फ्लश भरपूर पाणी वाया घालवतात. मॅन्युअल फ्लश असेल तर पाणी बरंच वाचेल असं वाटतं.>>
माझ्या ह्या नवीन ऑफीसमधे ऑटो फ्लश आहे आणि केवढे तरी पाणी वाया जाते. शिवाय टॉईलेट वापरणार्या व्यक्तिला त्रास. काही नळ अगदी शॉवर सारखे सुईच्या धारेइतपत पाणी देतात. त्यात चार बोटे पण भिजत नाही. तोही पाणी देण्याचा प्रकार बंडल वाटतो.
जेफ लर्च चे पोस्ट शेअर
जेफ लर्च चे पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद बी. इथे टीव्हीवर फूड चॅलेंज म्हणून एक जाडा अमेरिकन खूप
खाउन दाखवतो व अगदी त्याला जात नसताना ही जबरदस्ती गिळत असतो. बीफ बार्बे क्यू चे अजस्त्र बीफचे तुकडे वूल्फ डाउन करताना अतिशय जाडे लोक दिसतात. काय खावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे हे माहीत आहे परंतू जगातील फूड ह्या रिसोर्स ला वाया घालवताना बघून अतिशय वाइट वाटते. ते देखील रिअॅलिटी टीव्ही सारख्या उथळ प्रकारा साठी हे कसले चॅलें ज त्यापेक्षा दोन दिवस उपास कर असे नेहमी म्ह्णावे वाटते. . हे काही कमी करता आले तर पर्यावर्णावरील ताण कमी व्हायला मदत होईल. उसगावातीलच होमलेस व रिसोर्स लेस व्यक्तींना हे अन्न देता येइल. तुम्ही तुमच्या गावातील चॅरीटीत/ चर्च मध्ये हा प्रश्न विचारू शकता व अन्न दान करू शकता. सुपरमार्केट मधले सेल बाय डेट झालेले अन्न असेच फेकून देण्यात येते. व रेस्टॉरंट मधेही. मँक डी मधील फ्राइज सात मिनिटानंतर फेकून दिल्या जातात. हे सर्व अवॉइड करण्या सारखे आहे.
ह्या साठी लोकली पेटिशन करू शकता.
भारतात व्हेज पेट फूड ब्रांडेड व पॅक्ड तसेच फ्रेशली मेड व होम डिलिव्हरड उपलब्ध आहे.
धन्यवाद अमा. ह्या साठी लोकली
धन्यवाद अमा.
ह्या साठी लोकली पेटिशन करू शकता.>> नक्की प्रयत्न करेन. लोकांना शाकाहारी करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो पण अजून तरी यश आलेले नाही. उलट शाकाहारी लोक मासाहारी होत चाललेले आहे हीच उदाहरणे जास्त दिसत आहेत.
कुणी किती व काय खावे याबद्दल
कुणी किती व काय खावे याबद्दल बोलणे असंस्कृतपणाचे असते ना?
लोकांना शाकाहारी करण्याचा
लोकांना शाकाहारी करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो
<<
बी,
तुम्हाला मांसाहारी बनवण्याचा प्रयत्न मी सुरू करू का? रोज तुम्हाला मांसाहारी पदार्थाच्या पाककृती व मांसाहाराचे फायदे समजवून सांगत जाईन.
पर्यावरण रक्षणाचा अन तुमचं शाकाहारी घोडं दामटण्याचा काय संबंध?
पर्यावरण रक्षणाचा अन तुमचं
पर्यावरण रक्षणाचा अन तुमचं शाकाहारी घोडं दामटण्याचा काय संबंध?>>इब्लिश खूप मोठा संबंध आहे पण आता इतक बेसिक पासून समजवून सांगण्याचा माझ्याकडे पेशन्स नाही.
पाणी, वीज, अन्न, जंगल ह्याचे तुम्हाला पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व वाटते पण प्राण्यांवर होणार्या अमानुष अन्यायाबद्दल तुम्हाला काही वाटत नाही ह्याचा अर्थ स्वतःच्या स्वार्थापुढे पर्यावरण गेले खड्ड्यात. आधी माझी गरज.
) प्राण्यांवर "अमानुष"
:))
प्राण्यांवर "अमानुष" अन्याय? प्राण्यांना मानुषाचा नव्हे तर प्राण्यांचा न्याय लागतो. बेसिकमधे भरपूर लोचा दिसतोय.
पेशन्स नसेल, तर लोकांना शाकाहारी कसं काय बनवता म्हणे तुम्ही?
अमा, फूड शोजमधे होणारी किंवा
अमा, फूड शोजमधे होणारी किंवा एकुणातच होणारी अन्नाची नासाडी थांबली पाहिजे हे नक्की. पण सेल बाय डेट संपून गेलेले अन्न फेकून न देता कुणाला द्यावे असं म्हणणं आहे? त्याने पर्यावरणाचे संवर्धन कसे होईल? बाकी तुम्ही प्रो शाकाहार कधीपासून?
हे जेफ लर्च चिकन, मासे वगैरे काही खात नाहीत का? की फक्त अॅन्टी बीफच?
हा पर्यावरण संवर्धनाचा बाफ आहे की स्वतःची विचारसरणी काहीही करून लोकांच्या गळी उतरवण्याचा?
मांसाहारामुळे पर्यावरणाची हानी होत असेल तर वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, तरस वगैरे सर्व वन्य प्राण्यांना थांबवले पाहिजे.
रोज फरशी पुसायची गरज नसते वगैरे म्हणताना तुम्ही घराच्या खिडक्या दारे उघडतच नाही का? देशात घरे तशी बंद नसतात. सध्या तर इतकी धूळ येते की आज पुसले तर उद्या फर्निचर धूळपाटी म्हणून वापरता येईल. ते तसेच ठेवायचे? मग डस्ट अॅलर्जीजचे काय?
पण सेल बाय डेट संपून गेलेले
पण सेल बाय डेट संपून गेलेले अन्न फेकून न देता कुणाला द्यावे असं म्हणणं आहे? त्याने पर्यावरणाचे संवर्धन कसे होईल? >> उसगावातील पर्यावरण संरक्षण केंद्राच्या निरीक्षणा नुसार एकूण उत्पादित अन्नापैकी ४०% चांगल्या
प्रतीचे अन्न वाया जाते. कोणाच्याही पोटात पडत नाही. हे ३६ मिलिअन टन प्रति वर्श इतके आहे किंवा १६५ बिलियन $ इतक्या मूल्याचे आहे. ह्या मध्ये हे अन्न उत्पादन करताना वापरलेली ऊर्जा, कार्बन एमिशन्स, आणि पर्यावरणाचे नुकसान धरलेले नाही. ( शेतीसाठी जंगले कापणे , पाण्याचा वापर इत्यादि ) हे अन्न जन्माला येते पॅक होते दोन दिवस डिस्प्ले कि लगेच लँडफिल मध्ये जाते. सहा पैकी एक अमेरिकन नागरिक
भुकेच्या प्रश्नाशी झगडत असताना हे वाया जाणे थांबवता आले तर निदान नुकसान तरी होणार नाही.
त्यातही जे अन्न पदार्थ नजरेला सुंदर दिसत नाहीत ते ही कमी भावाने विकले जातात. नॉट सो पर्फेक्ट फळे, टामाटू भाज्या वगिअरे. ते घेणारे ही लोक आहेत.
इथे जास्त माहिती मिळेल. http://nationswell.com/salvage-grocery-stores-next-food-trend/
http://www.forbes.com/sites/nadiaarumugam/2012/01/06/what-happens-to-old...
बाकी तुम्ही प्रो शाकाहार कधीपासून?>> न्युट्रिशनिस्टने सांगितल्यापासून. तसेच प्रो अॅनिमल राइट्स तर
पहिल्या पासूनच आहे. व त्याच अनुषंगाने त्या बीफ फॅक्टरी च्या वर्णना बद्दल प्रतिसाद् दिला आहे. कॅलिफोर्नियातील दुष्काळ बाफवर पण तसाच प्रतिसाद दिला आहे.
हे ही बघा:
उसगावा ची लोक संख्या जगाच्या ५% तर त्यांचे एनर्जी कंझंप्श न एकून २४% आहे ( जगाच्या एनर्जी पैकी)
एक उसगावीचे एनर्जी कंझंप्शन ३१ भारतीय, किंवा १२५ बांगला देशी किंवा ३७० इथिओपिअन्स इतके आहे.
उसगावा तील अॅव्हरेज नागरिक
उसगावा तील अॅव्हरेज नागरिक रोज ८१५ बिलियन कॅलरीज खातात. हे जरूरीपेक्षा २०० बिलिअन ने जास्त आहे. ह्यात ८० मिलि अन लोकांना अन्न मिळू शकेल.
उसगावातील नागरिक २००००० टन खाण्याजोगे अन्न रोज फेकून देतात.
सर्व साधा र ण उसगावी ७५ वयाचे होईपरेन्त प्रत्येकी ५२ टन इतका कचरा निर्माण करतात. नागरिकांचे प्रत्येकी अॅवरेज डेली पाणी वापर १५ ९ गॅलन इतका आहे जगात अर्ध्याहून जास्त जनता २५ गॅलन पाण्यवर रोज जगते.
· Fifty percent of the wetlands, 90% of the northwestern old-growth forests, and 99% of the tall-grass prairie have been destroyed in the last 200 years.
· Eighty percent of the corn grown and 95% of the oats are fed to livestock. हाच लाइव्ह स्टॉक सरळ बीफ फॅक्टरी व पोर्क फॅक्टरीत जातो. Fifty-six percent of available farmland is used for beef production. काय बोलावे. One-third of the world's fish catch and more than one-third of the world's total grain output is fed to livestock.
· It takes an average of 25 gallons of water to produce a pound of wheat in modern Western farming systems. It takes 5,214 gallons of water to produce a pound of beef.
· Each person in the industrialized world uses as much commercial energy as 10 people in the developing world.
source: Paul Ehrlich and the Population Bomb
http://public.wsu.edu/~mreed/380American%20Consumption.htm
ह्या लिंक वर एक ग्राफ देखील आहे. तो ही माहिती प्रद आहे. तसेच बहुराष्ट्रिय कंपन्यांद्वारे विकले गेलेले
हॅझार्डस केमिकल्स व गॅसेस, शस्त्रास्त्रे, जेनेटिकली मॉडिफाइड फूड ह्य मुळे ग्रहाचे होणारे अपरिमित नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामाची गरज आहे. भारतातच कोकाकोला च्या साठी पाणी वापरल्याने शेतीसाठी ग्राउं ड वॉटर संपल्याच्या डॉक्युमेंटेड केसेस आहेत. केरळात शे तकर्यांनी आंदोलनही केले होते. हा बाफाचा विषय नाही अवांतर लिहीले आहे.
वैयक्तिक पातळीवर केलेले उपाय चांगलेच आहेत पण त्याने कर्त्याला मानसिक समाधाना शिवाय फार काही साध्य होईल असे वाटत नाही.
<<पर्यावरण रक्षणाचा अन तुमचं
<<पर्यावरण रक्षणाचा अन तुमचं शाकाहारी घोडं दामटण्याचा काय संबंध?>>
----- एकाच प्राण्याची (कोम्बड्या, उन्दीर, साप... बकरी, शेळी, गाई, म्हशी, डुक्कर, हत्ती, घोडे) सन्ख्या अमाप वाढल्यास किव्वा सर्व लोक शाकाहारी झाल्यास पर्यावरणाचा तोल ढळेल... शाकाहारीन्ची सन्ख्या वाढल्यास, अन्नाचा तुटवडा (आहे त्यापेक्षा) प्रकर्षाने जाणवेल, आणि शाकाहार (हिरव्या भाजी, डाळी) आहे त्या पेक्षा अजुन महाग होतील.
अमा - अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
अमा - अभ्यासपूर्ण प्रतिसाद. या विषयावर अशा प्रतिसादाची अपेक्षा होतीच.
हे असले उतमात काही
हे असले उतमात काही इंडस्ट्रिअयलाईज्ड देश करतात, म्हणून सरसकट मांसाहार वाईट? कैच्याकै.
न्यूट्रीशनिस्ट बदला.
>>>----- एकाच प्राण्याची
>>>----- एकाच प्राण्याची (कोम्बड्या, उन्दीर, साप... बकरी, शेळी, गाई, म्हशी, डुक्कर, हत्ती, घोडे) सन्ख्या अमाप वाढल्यास किव्वा सर्व लोक शाकाहारी झाल्यास पर्यावरणाचा तोल ढळेल... शाकाहारीन्ची सन्ख्या वाढल्यास, अन्नाचा तुटवडा (आहे त्यापेक्षा) प्रकर्षाने जाणवेल, आणि शाकाहार (हिरव्या भाजी, डाळी) आहे त्या पेक्षा अजुन महाग होतील.<<<
उदय,
हे विधान माझ्यामते गफलतयुक्त आहे. एखाद्याच प्राण्याची संख्या वाढू नये ह्याची काळजी निसर्ग स्वतःच घेतो. जसे काही प्राण्यांनी काही प्राण्यांची शिकार केल्यामुळे शिकार झालेल्या प्राण्यांची संख्या मर्यादीत राहणे वगैरे! हे निसर्ग स्वतःच करतो. पण शाकाहारी लोकांची संख्या वाढणे हा मानवाने स्वेच्छेने केलेला बदल असेल. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की अन्नाचा तुटवडा होऊ नये किंवा भाज्या महाग होऊ नयेत म्हणून आम्ही शाकाहारी होणार नाही अशी भूमिका माणूस घेणार नाही. (तसेच, काही प्राणी कमी व्हावेत म्हणून आम्ही शाकाहाराऐवजी मांसाहार करण्याचे ठरवत आहोत, अशी भूमिकाही माणूस घेणार नाही. तो प्रत्येकाचा 'माय चॉईस' होता, आहे व असेलही.)
फर्निचर बद्दल एक वेगळा विचार
फर्निचर बद्दल एक वेगळा विचार आसमंत २ या पुस्तकात वाचला.
पूर्ण वाढलेले झाड आपल्या लाकडात बराच कार्बन धरुन ठेवते. त्याचा वापर बांधकामात वा फर्निचरमधे केला तर चांगलेच. जर ते झाड निसर्गातच ठेवले तर कालांतराने मरून सडते व त्यातला कार्बन मुक्त होऊन परत वातावरणात जातो. अर्थात हे आहे लाकूड आहे त्या रुपातच टिकवण्यासंबंधात, ते सरपण म्हणून जाळण्याबाबत नाही.
अमेरिकन लोकांचं पर्यावरण
अमेरिकन लोकांचं पर्यावरण प्रेम, कार्बन पॉईंट्स साठी त्या देशाने घेतलेला पुढाकार हे सगळं आदरास पात्र आहेच. पण पर्यावरण विषयक परीषदांमधे अमेरीकेचं वागणं अत्यंत दुटप्पी असतं. अमेरिकेच्या रेडीओ अॅक्टीव्ह कच-याची विल्हेवाट कशी लावली जाते याबद्दलचे अनेक व्हिडीओज पाहण्यात आलेले आहेत.
http://www1.american.edu/ted/benin.htm
http://www.defencejournal.com/2001/july/disposal.htm
http://rt.com/news/e-waste-illegal-environment-uk-043/
आफ्रिकेतील काही देशांमधे लँडफिलींगचे काम लोकल एजन्सीजनदेनाण्यात आले.ना त्या एजन्सीजना यातलं काही कळत होतं, ना तिथल्या लोकल्सना. लँडफिलिंग द्वारे किरणोत्सारी कच-याची विल्हेवाट लावली गेली. आही वर्षातच या ठिकाणच्या मातीचे गुणधर्म बदलले. पीक, झाडं, जीव जंतू यांचे गुणधर्म बदलले. पाणी किरणोत्सारी बनलं. ज्याच्यामुळे इथल्या लोकांच्यात दिसून येण्यासारखे बदल झाले. पण त्याचा संबंध या कच- याशी असेल असं कुणाच्या डोक्यात आलं नाही. हे सर्व उघडकीला कसं आलं ते आता लक्षात नाही. बहुधा या आजाराची पाहनी करण्याकरता आलेल्या डॉक्तरांच्या टीमने तज्ञांना बोलावलं असं काहीतरी होतं. भारतात ई वेस्ट येते. जहाजबांधणी उद्योग भारतात आहे कारण अमेरिका आणि युरोपात या धंद्यावर बंदी आहे. कुणी न कुणी नक्कीच म्हणेल की तिस-या जगातले लोक स्वतःहून विकत घेत असतील तर अमेरीकेला दोष का द्यायचा ?
या प्रश्नाला उत्तर देण्यात वेळ का घालवावा हेच त्या प्रश्नाचे उत्तर आहे.एखाद्याचा दृष्टीकोण बदलवणे हे आपले काम नाही. तिस-या देशातल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घातक कचरा परस्पर त्या लोकांच्या आरोग्याशी खेळत पाठवून देणे आणि आपण पर्यावरणावर लेक्चर्स झोडणे म्हणजे माणिकचंद गुटखा वाल्याने कॅन्सरचं हॉस्पिटल काढून कॅन्सर विषयक कामांसाठी भारतरत्न वगैरे पुरस्कार मिळवण्यासारखं आहे.
अमेरीका काय किंवा युरोप काय मूठभर लोक सोडले तर इतरांना याबद्दल कल्पनाही नसते, असलीच तर फारसा उत्साह नसतो.
या देशांकडून नेवाडाच्या वाळवंटात ज्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत आणि आजही घेतल्या जातात त्याने पर्यावरनाचा -हासहोत नाही, कारण त्या देशाच्या सुरक्षिततेसाठी ते आवश्यक आहे असे म्हणतात.
अमा यांच्या प्रतिसादामुळे या विषयावर लिहीले.
( खिल्ली उडवली असे वाटल्यास नाईलाज आहे. पब्लीक फोरम मधे आपापल्या भावना सांभाळून ठेवाव्यात ही नम्र विनंती. हा विषय आपल्या क्लोज टू हार्ट आहे असं ज्यांना वाटतंय त्यांनी या विषयाचा आवाका ध्यानात घ्यावा. तो केवळ वैयक्तिक बचतीच्या सवयी इथपर्यंत मर्यादीत करून ठेवू नये. मथळ्याबद्दल शंका असल्याने दोन तीनदा शंका विचारली पण कुणाला त्याचं उत्तर द्यावंसं वाटू नये, पण एखादा प्रतिसाद आपल्या मनाविरुद्ध जातोय असं वाटताच नाटकी पद्धतीने उत्तर देणे याला काहीही अर्थ नाही. अमेरिकेत पर्यावरणस्नेही वातावरणात राहणे आणि वैयक्तिक सवयींचा संबंध काय हे अद्याप लक्षात आलेले नाही. त्या देशाने करण्यासारखं खूप काही आहे हे वसुंधरा दिनाच्या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. गुगळून पाहणे ).
अमा, भारतातील कॅटलफीड वा
अमा,
भारतातील कॅटलफीड वा चिकनफीड संदर्भात काही माहिती उपलब्ध आहे का ? ( म्हणजे त्यासाठी किती धान्य वापरले जाते वगैरे ) एकतर भारतात हा उद्योग संघटीत स्वरुपात फार कमी असावा, असा माझा अंदाज आहे.
मी टाटा ऑईल मिलमधे काम करत होतो त्यावेळी, तेल काढून घेतल्यावर उरलेली पेंड वगैरे वापरून पशुखाद्य तयार करत असत. चिकनफिडसाठी पण वेरावळ हून आलेले ड्राय फिश, देवनार हून आलेले बोनमील वगैरे वापरत असत.
थेट गहू वा सोयाबीन वापरल्याचे आठवत नाही. टाटा ऑइल मिल चे सोया मिल्क असे उत्पादन होते, त्यातली पेंड मग या उत्पादनासाठी वापरत असत.
बाळू, गुजराथमधील अलंग या गावी
बाळू,
गुजराथमधील अलंग या गावी कामातून गेलेली जहाजे आणली जातात. या उद्योगाशी काही काळ मी संबधित होतो.
या कामासाठी अलंग इथला उथळ समुद्र फार चांगला आहे, पण बाकी काहीच चांगले नाही.
जहाजावरील कर्मचारी त्यांच्या श्रद्धेखातर जहाजावरील कुठलीच वस्तू नेत नाहीत. या वस्तूंचा लिलाव अलंगला होतो. तिथे ऑक्सिजन आणि असिटीलीन या गॅसची मोठी गरज असल्याने भावनगरला तो मोठा उद्योग होता ( अजूनही असेल ) अलंगला पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे, ते बाहेरुन आणावे लागते.
जहाज बांधणीसाठी चांगले लोखंड वापरलेले असते, त्याचाही अलंगला मोठा बाजार होता.
पण या उद्योगात जे प्रदूषण होते त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. चित्रलेखाने खुप वर्षांपुर्वी यावर फीचर केले होते, नंतर काही वाचले नाही.
<<की अन्नाचा तुटवडा होऊ नये
<<की अन्नाचा तुटवडा होऊ नये किंवा भाज्या महाग होऊ नयेत म्हणून आम्ही शाकाहारी होणार नाही अशी भूमिका माणूस घेणार नाही>>
------ अशी भुमिका कुणीच घेत नाही हे मान्य... पण ज्यान्नी ज्यान्नी आपापले पर्याय (मान्साहार वा शाकाहार) त्यान्ची चॉईस) निवडले आहेत त्याबाबत इतरेजन्नाना आदर असायला हवा.
सर्व लोकान्नी एकाच प्रकारचा आहार घेतल्यास नैसर्गिक समतोल बिघडेल असे मला सुचवायचे आहे... आणि असा समतोल बिघडला तर निसर्ग तुमची असलेली माय चॉईस बदलेल... माय चॉईस काय असायला हवा यावर निसर्गाचे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष नियन्त्रण आहे. उत्तर धृवावर हिरवी कोथिम्बीर, पालक मिळणे खुप अवघड आहे त्यामुळे तेथे रहाणार्यान्च्या माय चॉईसमधे पालक, हिरव्या कोथिम्बीरीला जागा नसणार आहे. येथे निसर्गाची भुमिका महत्वाची आहे. वर्षातले ५ महिने तापमान -२० से. पेक्षा कमी रहात असेल तर आहारात मान्साहाराचे प्रमाण जास्त असणे हे अत्यन्त नैसर्गिक आहे.
मान्साहारीन्च्या मान्साहाराबाबत त्यान्ना पण माय चॉईस आहे, असो. बाफचा मुळ विषय भकटत असेल तर क्षमस्व.
उदय, तुमचा हा दुसरा प्रतिसाद
उदय,
तुमचा हा दुसरा प्रतिसाद मान्यच आहे. मी फक्त पहिल्या प्रतिसादातील मला जाणवलेल्या गफलतीकडे लक्ष वेधले होते.
न्युट्रिशनिस्टने
न्युट्रिशनिस्टने सांगितल्यापासून <<
मग तुमच्या न्यूट्रिशनिस्टने तुम्हाला सांगितलेय ना.
अचानक जगाला का शाकाहारी बनायला सांगताय?
पर्यावरण संवर्धनासाठी शाकाहाराचीच जरूरी आहे असं वरच्या कुठल्याही मुद्द्यांमधून मला तरी सापडलं नाही.
प्लीज नोटः मी पहिल्यापासून शाकाहारीच आहे. अजूनही आहे.
मानवाची पचनसंस्था केवळ शाकाहारासाठी बनलेली नाही. मानव हा कार्निव्होरस प्राणी आहे हे शास्त्रात शिकलेले होते आपण कधीकाळी. ते आता बदललंय का?
प्लीज नोटः मी पहिल्यापासून
प्लीज नोटः मी पहिल्यापासून शाकाहारीच आहे. अजूनही आहे.>> अभिनंदन. खूप छान वाटल. आय मीन इट.
शाकाहाराने पर्यावरणाचे रक्षण
शाकाहाराने पर्यावरणाचे रक्षण होते हे पटत नाही.
कॉमन पब्लिक ट्रान्सपोर्टला पाठिंबा देण्यासाठी हिंजवडीतल्या काही कंपन्यांनी मिळून बससेवा सुरू केली आहे. तरीही लोक स्वत:च्याच गाड्या पुढे दामटत असल्याने काही कंपन्यांनी लीजवर घेतलेली मोठी पार्किंग स्पेस रिलीज केली आहे. नाक दाबले की तोंड उघडते. आता तर पीएमपीएमएलही यात सहकार्य करत असल्याच्या बातम्या आहेत. कितीही रस्ते रूंद केले, उड्डाणपूल बांधले तरी जोवर अनावश्यक वाहतूक टाळता येत नाही तोवर समस्या राहणारच. बससेवा वापरण्यातली मुख्य अडचण वेळेची बांधिलकी व फ्रिक्वेन्सी आहे. जास्तीत जास्त लोकांनी वापरल्याशिवाय त्यात सुधारणा होऊ शकत नाही. हाच पर्याय पुण्यातल्या इतर ठिकाणीही वापरायला हवा.
काही कंपन्यांनी लीजवर घेतलेली
काही कंपन्यांनी लीजवर घेतलेली मोठी पार्किंग स्पेस रिलीज केली आहे. <<<
हे समजले नाही. म्हणजे काय केले आहे कंपन्यांनी?
मग तुमच्या न्यूट्रिशनिस्टने
मग तुमच्या न्यूट्रिशनिस्टने तुम्हाला सांगितलेय ना.
अचानक जगाला का शाकाहारी बनायला सांगताय? >> बीफ च्या कमर्शिअल प्रॉडक्षन मध्ये प्राण्यांवर अतिशय क्रूर पणे मरायची वेळ येते त्या पोस्टला तो प्रतिसाद होता. हे असे बीफ एकतर जास्तीचे किवा खराब झालेले फेकून दिले जाते. नाहीतर आधीच वजनाचा प्रश्न असलेले लोक हे रेड मीट खातात. एक्स्ट्रा कंझंप्शन ते अव्हॉइड करता आले तर बरे एव्ढेच लिहीले आहे.
शाकाहारी / मांसाहारी डिबेट हा वेगळा मुद्दा आहे तो मी इथे आणलेला नाही. जग व इतर मायबोलीकर ह्यांनी काय खावे हा माझा प्रश्न नव्हे. फक्त टीव्ही शोच्या संदर्भातच लिहीले आहे.
जेफ लर्च कोट मध्ये काफ्स चे डॉगफूड होणार असे वाक्य आहे त्या अनुषंगाने फक्त लिहीले आहे कि कुत्र्यांना व्हेज फूड द्यायचा पर्याय उपलब्ध आहे. ब्रांडेड मध्ये पेडिग्री व काही घरून फ्रेश प्रोवाइड करणारे आहेत. मुंबईचे डबे वाले देखील हे फ्रेश फूड डिलीव्हर करतात. हे जास्त इकोफ्रेंडली आहे कारण स्टीलचे डबे रिसायकल केले जातात.
बेफिकीर, भाडेतत्वावर जी जागा
बेफिकीर, भाडेतत्वावर जी जागा पार्किंगसाठी घेतली होती ती आता उपलब्ध नसणार. परत देऊन टाकली.
ओके, धन्यवाद! म्हणजे लोक आता
ओके, धन्यवाद! म्हणजे लोक आता गाड्या आणणार नाहीत.
अभिनंदन. खूप छान वाटल. आय मीन
अभिनंदन. खूप छान वाटल. आय मीन इट. <<<
नको. कारण यामधे अभिनंदनीय काही नाही.
ती माझी सवय आहे इतकेच. त्यात कौतुकास्पद वगैरे काहीही नाही.
मांसाहारामुळे पर्यावरणाची हानी होते या दाव्यामधे काहीही तथ्य नाही.
असो..
वरती बाळू यांनी जे मुद्दे लिहिले आहेत तिकडे लक्ष द्यायची जास्त गरज आहे. वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न हे स्वागतार्ह किंवा गरजेचे असले तरी पर्यावरण हानी थांबवायला अत्यंत तोकडे आहेत.
अर्थात त्या सगळ्या संदर्भात आपण काय करू शकतो या प्रश्नाचे उत्तर प्रचंड अवघड आहे हे ही खरेच.
Pages