Submitted by वैवकु रीटर्न्स on 9 April, 2015 - 12:11
वागणे शहाणे केले वाटणे दिवाणे केले
एकेका शेरासाठी मी लाख कुटाणे केले
मी आलो होतो तेंव्हा जिंकेन वाटले होते
मी हरलोसुद्धा नाही बस् येणे-जाणे केले
माझ्या चालीवर माझ्या देहाचा नाच बसवला
श्वासात भिनवली लय अन् जन्माचे गाणे केले
खोट्याच प्रतिष्ठेमध्ये ही हयात गेली माझी
मी खरेपणा शिकल्यावर वेगळे घराणे केले
कानांनी त्या गाजेचा मग रवंथ केला नुसता
मी लोकांच्या टाळ्यांचे बस् चणे-फुटाणे केले
इतकीच चूक केली की मी नाव घेतले नाही
ज्या कुण्या एकट्यावरती एवढे उखाणे केले
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे गझल. बरेच उपद्व्याप
छान आहे गझल.
बरेच उपद्व्याप केल पण विट्ठलाचा शेर राहीलाच की !
मी खरेपणा शिकल्यावर वेगळे
मी खरेपणा शिकल्यावर वेगळे घराणे केले <<<
ही ओळ आणि
इतकीच चूक केली की मी नाव घेतले नाही
ज्या कुण्या एकट्यावरती एवढे उखाणे केले<<<
हा शेर आवडले.
सहसा तुमच्या गझलेतील इतका कमी भाग आवडला असे होत नाही.
माझ्या चालीवर माझ्या देहाचा
माझ्या चालीवर माझ्या देहाचा नाच बसवला
श्वासात भिनवली लय अन् जन्माचे गाणे केले
व्वा व्वा खतरनाक
गझल आवडली
खरेच, विठ्ठलाविना गझल !!
खरेच,
विठ्ठलाविना गझल !!
शेवटचा शेर विठ्ठलावरचाच आहे.
शेवटचा शेर विठ्ठलावरचाच आहे.
शेवटचा शेर विठ्ठलावरचाच
शेवटचा शेर विठ्ठलावरचाच आहे.
>>
+१
खुप दिवसांनी गझल वाचली.
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
बेफी +१
बेफी +१
गझल आवडली दुसरा शेर खूप खूप
गझल आवडली
दुसरा शेर खूप खूप आवडला
कवी नएकु, ह्या शेरातील
कवी नएकु,
ह्या शेरातील पहिल्या सुंदर ओळीचेही दुसर्या ओळीत चणे-फुटाणे झाले आहेत. (रवंथ - स्त्रीलिंगी)
कानांनी त्या गाजेचा मग रवंथ केला नुसता
मी लोकांच्या टाळ्यांचे बस् चणे-फुटाणे केले
कळावे
गं स
अरेछ्या लिंग बदलले गेले तर
अरेछ्या लिंग बदलले गेले तर !
धन्स गं स जी
ओके सॉरी सॉरी ...बघू अजून काही सुचते का ते
_______________
असो
सर्वांचे आभार .इतक्याही प्रतिक्रिया मिळतील असे वाटले नव्हते
बेफीजी विशेष धन्स ह्या गझलबाबत एकुणात माझेही मत आपल्यासारखेच आहे पण मला एक दोन ओळी अजून आवडल्यात काही शब्द देखिल आणि जमीन शब्दकळा भाषाशैली इत्यादी इत्यादी बाबीही बर्यापैकी जमून आल्यात असे वाटते
बाकी खयाल काही दिवसात प्रत्यक्ष झालेल्या घटनांमागूनन निर्माण झालेल्या विचारमंथनातून मला प्राप्त झाले ते मी माझ्यापुरते समाधानकारकपणे उतरवू शकलो असा फीलही मला या गझलेने दिला
असो पुढच्या गझलेत वेगळे प्रयत्न करीन आशिर्वाद असूद्यात
आणि हो ! शेवटचाच शेर विठ्ठलाचा आहे हे ओळखल्याबद्दलही स्पेशल धन्स
पुन्हा आभार सर्वांचे
गझल खुप आवडली....
गझल खुप आवडली....
धन्यवाद भु़ईकमळ
धन्यवाद भु़ईकमळ