जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ति विचित्राचा रोल करणारी कुठून धरून आणली आहे? काय बेक्कार अभिनय (?) करते.

>> या धाग्याची लींक तिला व्हॉ.अ‍ॅप केली आहे. Happy

मला आवडतो चित्राचा अभिनय. उलट तिची व्यक्तिरेखाही मला नॉर्मल माणसांसारखी वाटते. एकाच वेळी चांगुलपणा, असूया, उतावीळ स्वभाव, समजूतदारपणा, पोरकटपणा, भाबडेपणा, किंचित लबाडी ह्या सर्वांचे बेमालूम मिश्रण आहे तिच्या स्वभावात.
मेघना आणि आदित्यचे कामही मला आवडते पण त्यांच्या व्यक्तिरेखा फारच जास्त गुडी गुडी आहेत. चित्राचे जे काही झालेय त्याचा दोष स्वतःवर ओढवून घेणे हा तर मूर्खपणाचा कहर आहे !

पियू, ह्या प्रतिसादाचा व्हॉ लिं पाठवण्याशी काही संबंध नाही बरं का Happy

अगो, तुमच्या मताचा आदर आहे पण तरिही.. Happy
त्या चित्राच्या चेह र्‍यावर कारल्या सारखे कडू भाव असतात कोण्त्याही प्रसंगात. अजिबातच ईतर भाव दाखवता येत नाहीत तिला.. या सिरीयल मधल्या बाकी सर्व मंडळीची जशी अभिनयाची बर्यापैकी नॅचरल आहे, केमीस्ट्री आहे त्यात ति अजिबातच जेल ईन होत नाही अस वाटतं.
तिची अभिनयातली (?) मर्यादा फारच जाणवते, खटकते..

त्या रीयलायझेशन च्या प्रसंगात पण आदे च्या चेहर्‍यावरुन समजलं, पण त्या विचित्रा ला पण हे जाणवलयं हे आपल्याला समजायला मोनोलॉग ची वाट बघावी लागली Sad

जर बरी अभिनेत्री असती तर तो विचीत्रा ट्रॅक बघायला जरा तरी सुसह्य झाला असता Happy

पियू, ह्या ही प्रतिसादाचा व्हॉ लिं पाठवण्याशी काही संबंध नाही बरं का Wink

बाकी मेदे म्हणते तसं चित्रा म्हणजे खरचं फुलपाखरु असावं, आधी मनोज च्या मागे, मग आदित्यच्या, आता त्याने जमीनीवर आणल्यावर त्या आदित्य नगरकर मागे जाणार काय Proud

आज विचीत्राबाई फिरुन्रफारुन परत घरी आल्या, ते ही एका बाईने ( कोण होती ती?) धरुन आणल्यावर अगदी ढेपाळल्यागत. आत्ता उडते की मग पडते असा अविर्भाव होता. कुठे गेली होती ते ती आणी निर्माता जाणे. खूप उपासमार झाली एका दिवसात.

हो का?
झालं म्हणजे आता ते येडे देसाई सगळे परत चित्रा च्या चिंतेत आणि सेवेत .. तिकडे तिच्या आई वडिलांना पत्ता पण नाही काय चालल आहे मुलीचं ईथे.. पण महान देसाई आहेत ना, सगळ्या जगाचा मक्ता घेणारे..
कोणाची म्हैस कोणाला उठबैस!

या सगळ्यात ती गायब झाली तेव्हा त्यांनी एकदा पण मनोजला का नाही सांगितलं? अजूनही नवरा आहेच ना तो तिचा?

त्या विचित्राचे उच्चार पण खटकतात. ठ, ड, छ ही व्यन्जने नाही तीला. बर मग दिग्दर्शकाने तरी लक्ष द्याव.़कानाला जाम खटकत बुआ

मनोज ला फोन केले पण त्याने घेतले नाहीत. आदे, मेदे त्याच्या घरी गेले सांगायला तर तो घरी नव्हता मग आदे ने चिठ्ठी लिहुन ठेवली आहे त्याला.
आदे उगाच महान (बावळट) आहे. आधी त्या चित्राच्या प्रेमाचा, लग्नाचा पुळका, घरच्यांपासून लपून मदत केली.
ति मेदे १० मूर्ख, तिला पण त्या चित्राचा अजून खूप कैवार आहे तिच आदेवर एकतर्फी डोरे टाकणं वगैरे सगळं समजून..
चित्रा चं कॅरेक्टर तर पहिल्यापासून फक्त आप्पलपोटं, आणि स्वकेंद्रीत आहेच..
आर्चू आणि सतिशला पण चित्राच्या जबाबदारीची आता जाणिव झाली आहे ..ट्रे बनवायला मदत लागल्यावर..

आतल्या गोटातली बातमी -

पुढच्या काही एपिसोडमध्ये विचित्रा बाबाजींच्या प्रेमात पडणार आहे.

आयटीगर्ल,

नाना राहिले हो!
मग विचित्रा आदे ची आई आणि मेदेची सासू!
मग सासू-सून असा नवा ट्रॅक सुरू!

देशमुख ,लोल Happy

बायदवे,
त्या भोचक राणेकाकू अगदी शेरलॉक होम्स निघाल्या की बाकी देसाई मंडळी आणि पोलीसांपेक्षा Proud
बहुतेक त्या कचराकुंडीत कचरा टाकायला गेल्या असाव्यात तेव्हा त्यांना हा ट्रॅश तिथे मिळाला असावा.
त्या विचित्राच्या एकंदर अवतारावरुन तरी तसच दिसत आहे..

भंकस मोड ऑन..
होणार नवी सून मी जुळून येती रेशीमगाठीची....

समस्त देसाईज विचित्राच्या सध्याच्या बबड्या प्रेमाबद्दल ऐकुन गहिवरुन वगैरे वगैरे...

माई (अश्रुंचा महापुर पदराने पुसत):
काय हे आदित्य, "अतिथी देवो भव" हे तुला शिकवलच नाही का रे आम्ही?
आपल्या आश्रयाला आलेल्या विचित्राचं तू मन मोडलस आदित्य?
फार मोठा विश्वासघात केलास तू, तिचा आणि आमचा..
तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती रे..
जा, तिला आता बाईक वरुन बाहेर घेऊन जा, तिचा मन रमेल
तिला आपणच जपायला हवं, हो ना?

नाना (नंदीबैलासारखी मान डोलवत, माईंच्या स्टाईल ने):
होsssss

मेघना ( भाराउन, आनंदाने):
हो आदित्य, नाना माई म्हणतात ते बरोबरे, पटतय मला...
आपणच त्या दुखावलेल्या फुलपाखराला सावरायला हवं ना रे?
मी तुझी बाईक साफ करुन देते थांब..

आदित्य ( कोणाचा तरी खून करुन पश्यात्ताप झाल्यासारख्या अपराधी स्वरात):
तुम्ही म्हणताय ते पटलं मला..
आजपासून विचित्रा हि माझीच जबाबदारी आहे..
वचन दिलय तस मी तिला आधीच

हे ऐकून सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे..

नाना:
चssला, तुझी चूक तुला आपणहून समजली हे एक छान झालं. पण माझी घाणामृत पाजायची संधी हुकली..
असो, आता एक काम कर.. आपल्या देसाईवाडीतच मेहेतांच्या बाजूच्या २ खोल्या रिकाम्या आहेत
तिथे तुझा नवीन संसार थाट, विचित्राला सुखी ठेव..

माई (नवर्‍याकडे अतीव कौतुकाने बघत):
तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.

मेघना (लगबगीने):
थांब आदित्य, मी त्या खोल्या स्वच्छ साफ करून देते तुम्हाला
सगळं सामान लावुन देते नवीन संसाराला

हे ऐकून सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे..

आदित्य(मेघनाकडे अतीव कौतुकाने, आनंदाने वगैरे बघत, डोळ्यावर आलेली झुल्फे बाजूला सारत,डोळे मिचकावत):
चालेल, तोवर मी विचित्राला बाईकवर बाहेर चक्कर मारून आणतो.

मेघना (स्वतःच्या गळ्यातले छोटे मंगळसुत्र काढून आदित्यला देत):
आदित्य, अरे एक मिनीट थांब, हे घाल आधी विचीत्राच्या गळ्यात
माझ्या गळ्यात तशीही दोन दोन मंगळसुत्री आहेत ना रे?
मग एक विचित्राला घालु देत आणि एक मी

आदित्य (भाराऊन, डबडबलेल्या डोळ्यांनी मेघनाकडे बघत):
मेघना, कित्ती दिलदार आहेस यार तू.. म्हणूनच मला ईतकी आवडतेस

हे ऐकून सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे..

(ईतका वेळ निश्प्राण गळून गेलेल्या फुलपाखरा सारखी निपचीत पडलेली विचित्रा अचानक ईलेक्टॉलची डझनभर पाकिटं फस्त केल्यासारखी, बारा रेड्याच( कि म्ह्शीच) बळं येऊन अत्यानंदाने सोफ्यावरुन उडी मारत, प्रेमाने आदित्यच्या डोळ्यात बघत):
आदित्य, तू म्हणालास ते अगदी पटलय मला, होतं असं कधी कधी

हे ऐकून सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे..
नाव घे ग विचित्रा आता...

विचित्रा ( आदित्यकडे आशाळभूतपणे बघून, हसत)

बावळट देसाईंना घाबरवून सोडून घर ,परत येऊन केला मग रडून कहर
त्या मनोजचे नाव नका घेउ, समजते स्वतःला मी चिकण्या आदित्यची लव्हर

होणार नवी सून मी जुळून येती रेशिमगाठीची.....

जय हो!
~~ITG

घाणामृत---------- :p :p

कून सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे----------------- :p :p

आय टी गर्ल लय भारी.:हहगलो: पर्फेक्ट सन्वाद आहेत. कोणी तरी त्यान्च्या फेसबुकावर टाका रे लय मज्जा येईल. निदान हे वाचुन तरी सुधरतील.

त्या राणेकाकु होत्या होय.

देशमुख, धानी१, रश्मी, अंजली_१२ धन्यवाद Happy

आधीचे उखाणे व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत आहेत? माझ्या पर्यंत नाही पोचले अजून..

आयटीगर्ल, मलाही तुमच्या मताचा आदरच आहे Happy

चित्राचं कॅरॅक्टर मालिकेत आणलं तेव्हा आता पाण्याचा लोट येणार असं वाटलं होतं पण आवडलं मला ते उपकथानक. खरंतर मी ज्या मोजक्या मराठी मालिका (अधूनमधून ) बघते त्यात सुयश टिळकचं काम बघणं मला सगळ्यात बोअर वाटतं पण त्यात त्याच्या अभिनयक्षमतेचा भाग किती आणि त्याला मिळालेल्या स्क्रिप्टचा किती हे ठरवणं अवघड आहे. तसंच तेजश्री प्रधान काही प्रसंगांत फारच कृत्रिम अभिनय करते, लाऊड बोलते असं वाटतं. काही प्रसंगांत चांगला करते आणि दिसते गोड.

बाकी कंटाळा आला की मधूनच मालिका बघणे सोडून देते. त्यात तसंही विशेष काहीही घडत नसल्याने सुसंगती लागायला काहीच प्रयास पडत नाहीत. ह्या सगळ्या मालिकांचे मी आठवड्याला सरासरी दोन-तीन भाग बघते. त्यातून फक्त जुयेरे सोडली तर बाकीच्या इंटरनेटवर फॉर्वर्ड करत बघते.

आयटे...... भन्नाट.... Lol
पण हे आता त्या निर्मात्यादिग्दर्शकलेखाकांपर्यंत पोहोचायला हवय... कुणी पाठवू शकेल का प्लिज? पाठवा बरे त्यान्ना, अन फेसबुक वरुनही फिरवा त्या मजकुराला...

आयटीगर्ल, संवाद आत्ता वाचले Lol

प्रेमाचा साक्षात्कार सीन टोटल गंडला ... अगदीच फुसका बार ! आदित्य इतर मुलींशी अतिच सौजन्याने वागताना दाखवतात. चित्रा प्रेमात पडली ह्यात नवल काय. उद्या त्या सैनिकाची बायकोही प्रेमात पडलेली दाखवली नाही म्हणजे मिळवली Wink

Pages