व्हॅलेंटाइन्स डे बुकमार्क्स
एक चूक ही चूक आणि दुसरी चूक सुद्धा चूकच. ही दुसर्या चुकीची अपत्ये-
...आणि ही अपत्यजन्माची कहाणी:
इथल्या शाळांमध्ये सारख्याच 'क्लासरूम पार्ट्या' असतात. प्रत्येक वेळी १८-२० लहान मुलांसाठी भेटवस्तू काय पाठवाव्या हा प्रश्नच असतो. वर्गशिक्षिकांनी पाठवलेली फार मोठं नको, फार महाग नको, धारदार नको, टोकदार नको, नटी नको, शुगरी नको अशी बरीच मोठी यादी असते. त्यात आमची भर म्हणजे त्यातल्या त्यात उपयोगी हवं. मग सारखीच अनुभवी आयांना साकडी घालावी लागतात. हा असाच एका मैत्रिणीने सुचवलेला लेमन्या आणि लेमनांना सहज करता येईल असा एक प्रकार- बुकमार्क्स!
०. तुमची चित्रकला चांगली असल्यास हँडमेड किंवा साध्या कागदांवर स्वत: चित्र काढू शकता. स्वत: काढण शक्य नसल्यास क्लिपआर्ट, आपल्याकडे असलेले फोटो इ. वापरावे.
१. लेकाने शाळेत किंवा घरी केलेल्या हस्तकलेची प्रकाशचित्र होती. मी त्याचेच काही भाग बुकमार्क्स बनवण्यासाठी वापरले. जो भाग वापरायचा तो पेंटमध्ये (MS Paint) एका कोर्या पानावर कट-पेस्ट केला.
२. त्या कोर्या चित्राला साधारण बुकमार्कची लांबी-रुंदी दिली. हे पेंटमधून कॉपी केलेले चित्र वर्ड (MS Word) डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केले असता खूपच मोठे दिसत होते म्हणून पेंटमध्ये लांबी-रुंदी आणखी कमी करून घेतली.
३. वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र चिकटवल्यावर इन्सर्ट शेप, फॉर्मॅट शेप हे पर्याय वापरून त्यात रेघा, हार्ट शेप्स, स्मायली टाकले. रंग भरले, किनारी काढल्या.
४. एका 'पोट्रेट' पानावर साधारण तीन बुकमार्क्स बसतात.
५. वर्ड डॉक्युमेंट घरातल्या प्रिंटरवर छापले आणि ती पानं लॅमिनेट करून आणली.
६. बुकमार्कचे आकार कापून घेतले. वरच्या बाजूला दोरा अडकवण्यासाठी पंचिंगने छोटे छेद दिले. बुकमार्कवरच्या रंगसंगतीला साजेसा दोरा बांधला आणि बुकमार्क तयार झाले.
अधिक टिपा:
१. पेंट, वर्ड ऐवजी पावरपॉइंट किंवा पब्लिशर वापरून अधिक चांगले 'प्रोफेशनल' बुकमार्क बनवता येतील.
२. कुठलेही टूल वापरले तरी पानाचे सेटिंग 'लॅंडस्केप' ठेवल्यास एका पानावर जास्त चित्र मावतील.
३. बुकमार्क्स लॅमिनेट करायच्या आधीच कापले तर एका लॅमिनेशन पाउचमध्ये जास्त बुकमार्क्स मावतील. नंतर लॅमिनेट केलेला कोरा भाग वाया जाणार नाही.
४. साध्या प्रिंटर पेपरवर पानभरून बबल्स, हार्ट्स टाकले आणि दोन्ही बाजूंनी प्रिंट केले तर मागचा भाग कोरा राहणार नाही.
छान आहे! 'टाकाउ पासुन टीकाउ'
छान आहे!
'टाकाउ पासुन टीकाउ' ह्या प्रकाराणे पण करुन बघायला हवं हे बुक मार्क प्रकरण..
छान वाटले. मस्त आयडीया आहेत.
छान वाटले. मस्त आयडीया आहेत.
खूपच छान झालेत. टाकाऊतून
खूपच छान झालेत. टाकाऊतून टिकाऊ!
मस्तं !
मस्तं !
अय्या किती पर्यावरण स्नेही
अय्या किती पर्यावरण स्नेही उपक्रम. मस्तच.
सुपर्र लाईक... :::
सुपर्र लाईक... :::
झकास !
झकास !
मस्त झालेत बूकमार्क्स! पण हँड
मस्त झालेत बूकमार्क्स!
पण हँड नसेल तर हँडमेड पेपर कसा करावा?
पहिली चूक काय ती कळली नाही
very nice.
very nice.
खूप छान. आवडल.
खूप छान. आवडल.
धन्यवाद प्रतिसादांसाठी. एक
धन्यवाद प्रतिसादांसाठी. एक वर्षापुर्वी काढलेल्या या धाग्याला पॉल बसींमुळे संजिवनी मिळालेली दिसतेय
मंजू, पहिली चूक पणत्या हँडचा रेफरन्स मी ब्लॉगवर लिहिलेल्या एका पोस्टीत आहे. हा धागा पण ब्लॉग पोस्ट म्हणून लिहिला आणि मायबोलीवर टाकताना एडिट करायचा राहिला. आता बदल केला आहे.