Submitted by संपदा on 1 April, 2015 - 12:55
वाईन फूड पेअरिंग, वाईन चीज पेअरिंग, कॉकटेल्स, अल्कोहोलयुक्त डेझर्टस यासंबंधी चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा. आपल्या आवडत्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, इकडे दर्दी दोस्त मंडळीपण
हो, इकडे दर्दी दोस्त मंडळीपण नाहीत आणि एकट्यासाठी पटकन काही जाऊन आणावं तरी इथं मिळत नाही. टास्मॅक नावाचे गव्हर्नमेंटचे बार आणि लिकर शॉप्स आहेत तिथे ठराविक ब्रॅण्ड मिळतात.
तरी बरं नवरा बर्याचदा कामानिमित्त कोराईकलला जात असतो. आमचा स्टॉक तिकडूनच येतो.
गार शॅम्पेन किंवा गार व्हाइट
गार शॅम्पेन किंवा गार व्हाइट वाइनमधे गार ऑरेंज ज्यूस समप्रमाणात, एखादाच बर्फाचा खडा आणि वरून पुदिना गार्निश = मिमोसा
हे एक सोप्पे, पहिलटकरांसाठी(बनवणार्या आणि पिणार्या) उत्तम असे कॉकटेल.
आज हे सर्व वाचून एक आवडते
आज हे सर्व वाचून एक आवडते कॉकटेल करायची इच्छा झाली.
Orange County
ऑरेंज व्होडका : ९० मिली, ऑरेंज ज्यूस :१८० मिली, ट्रिपल सेक : ४५ मिली, ताज्या लिंबाचा रस : ३० मिली
ग्रेनेडिन : चार पाच थेंब , आले : साल काढून आणि ठेचून घेतलेले साधारण अर्धा इंच
(मार्टिनी ग्लास मध्ये दोन कॉकटेल्स होतील)
ग्रेनेडिन वगळता बाकी सर्व घटक बर्फासोबत शेक करून घेऊन चिल्ड ग्लास मध्ये बर्फाच्या खड्यांवर ओता. वरून दोन थेंब ग्रेनेडिन घाला. लिंबू किंवा संत्र्याची चकती लावून पेश करा. (होत्या म्हणून मी दोन तुतीपण ढकलल्या)
मस्त. पण जिं ऑ व्हो असं नाव न
मस्त. पण जिं ऑ व्हो असं नाव न ठेवता काहीतरी वेगळं नाव द्या की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओक्के Orange County (In
ओक्के
Orange County
)
(In memory of fantastic time spent at that place few years back
मिपावर एक सो त्रि म्हणून आयडी
मिपावर एक सो त्रि म्हणून आयडी आहे. ते भारीभारी कॉकटेल रेसिपीज देत असतात.
मस्त कॉकटेल रेसिपिज. करुन
मस्त कॉकटेल रेसिपिज. करुन बघण्यात येतील एकेक.
माझं एक आवडतं सोपं रम कॉकटेल.
स्पाइस्ड रम्+ब्लॅकबेरी लिक्युर +संत्र्याचा रस+ ग्रेनेडिन + क्रश्ड आईस. ब्लेन्डरमधून काढणे.
माझं आवडतं पेय व्होडका. ते कशातही मस्त ब्लेन्ड होतं. शहाळ्याच्या पाण्यापासून आइस्ड टीपर्यंत कशातही.
खास समर स्पेशल व्होडका कॉकटेल रेसिपी. पार्टी करता बेस्ट
पाइनॅपल मिन्ट व्होडका
काचेच्या जारमधे 750 ml व्होडका त्यात थोडी पुदिना पाने चुरमडून घालून आणि अननसाचे मोठे तुकडे घालून ८ तास ठेवून देणे. मस्त मुरते त्या चवीत व्होडका. मग सोबत भरपूर क्रश्ड आईस घेऊन प्यायला देणे आणि पिणे.
मिमोसा मला आवडते. ब्लडी मेरी
मिमोसा मला आवडते. ब्लडी मेरी चे फॅन आहेत का कोणी? आणि चांगल्या व्हिस्कीचे?
पायनापल मिंट करून बघते.
अजून एक बिगिनर्स कॉकटेल
अजून एक बिगिनर्स कॉकटेल :
थंडगार लिंबू आले मिश्रित उसाचा रस प्लस रम.
भारी बाफ आणि रेस्प्या. एकेक
भारी बाफ आणि रेस्प्या. एकेक करून बघण्यात येतील.
आमच्या वाईन व पिझा, ब्रुशेटा
आमच्या वाईन व पिझा, ब्रुशेटा बेताचा पंचरंगी पोपट झाला. महावीर जयंती निमित्त रेस्टॉरंट मध्ये ड्रायडे घोषित झाला. ( त्यांच्याकडे लिकर लायसन नव्हते का काय तरी फंडा) फिर कभी.
पण त्या निमित्ताने धागा तर
पण त्या निमित्ताने धागा तर निघाला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपदा, शब्दखुणांमधे दारू,
संपदा, शब्दखुणांमधे दारू, अल्कोहोल, अल्कोहोलिक पेये हे शब्द अॅड कर की.
नवीन शब्दखुणा अॅड केल्या
नवीन शब्दखुणा अॅड केल्या आहेत :).
सग्ळा चिव्डा होउन बसेल. >>>>>
सग्ळा चिव्डा होउन बसेल. >>>>> चांगलय ना.. चकण्याची सोय होईल..
चांगलं लिहित आहे सगळे.. आरभाटाचा माहेरच्या अन्नपुर्णा विशेषांकाताला कॉकटेलवरचा लेख मायबोलीवर आणायचं बघा. लय भारी लेख आहे तो !
हार्ड ड्रिंक्स बद्दल
हार्ड ड्रिंक्स बद्दल लिहिल्यास चालेल काय?
हार्ड ड्रिंक्स बद्दल
हार्ड ड्रिंक्स बद्दल लिहिल्यास चालेल काय?>>> लिहा की.
सगळ्या पोस्टी वाचूनही हा
सगळ्या पोस्टी वाचूनही हा प्रश्न पडतो म्हणजे एक पेग मारायची गरज दिसते..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सगळे प्रतिसाद वाचले नव्हते
सगळे प्रतिसाद वाचले नव्हते म्हणुन विचारले,
माझी चॉइस , रिजर्व्ड डार्क रम एंड कोला सोबत टंगड़ी किंवा मटन चाप
बाकी सिंगल मॉल्ट बद्दल सावकाश लिहितो
रिजर्व्ड डार्क रम ? ही
रिजर्व्ड डार्क रम ? ही कॅन्टीन स्पेशल का?
>>>> वाइन पित, म्यूझिक ऐकत
>>>> वाइन पित, म्यूझिक ऐकत केलेला स्वैपाक जास्त चविष्ट होतो. <<<<<<
पण...
मी या वाक्याला "अन्निसवाल्यांच्या" हवाली करणार होतो...
>>>> (किंवा जेवताना आपल्याला चव कळत नाही आणि टीका ऐकू येत नाही असंही असेल. ) <<<<
पण हे पुढचे वाक्य वाचले, अन बेत रहित केला.... (कारण अन्निसवाले त्या वाईनचाही तुकडा पाडतील किन्वा वाईनच्या बाटलीचे बुच न उघडताही तिला फेसही आणवतील!
अर्थात धुंदीकरता त्यांना वाईन वगैरे कशाचीच गरज पडत नसावी म्हणा..... तसेही विज्ञानावरील (अति)अंधश्रद्धेच्या मस्तीतच ते जगत असतातच. असो. बिचारी वाईन वाचली त्यांच्यापासून असे म्हणायचे अन सोडून द्यायचे!)
यातलं काही माहीत नाही. रोज
यातलं काही माहीत नाही.
रोज दुपारी घरी जाताना एक लिटर ताक नेतो. दूपारची व रात्रीची सोय होते.
>>>> हार्ड ड्रिंक्स बद्दल
>>>> हार्ड ड्रिंक्स बद्दल लिहिल्यास चालेल काय? <<<<<
नक्की कुणाला?
....
>>>> सगळ्या पोस्टी वाचूनही हा प्रश्न पडतो म्हणजे एक पेग मारायची गरज दिसते.. <<<<
पुण्यात उत्तम वाईन्स कुठे
पुण्यात उत्तम वाईन्स कुठे मिळतात ?
बऱ्याचदा कॉकटेल रेसिपीमध्ये
बऱ्याचदा कॉकटेल रेसिपीमध्ये Dry Vermouth नावाचा प्रकार असतो. तो नेमका काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे पुण्यात कुठे मिळतो?
Vermouth ही ही एक प्रकारची
Vermouth ही ही एक प्रकारची वाईनच आहे. तिचा फ्लेवर चांगला असल्याने जिन किंवा व्होडका सारख्या स्ट्रॉन्ग अल्कोहोलचा उग्रपणा कमी करायला कॉकटेल्समध्ये वापरतात.
शुगर कन्टेन्टवर स्वीट किंवा ड्राय असे वर्गीकरण करतात.
Vermouth असलेले सगळ्यात प्रसिद्ध कॉकटेल अर्थातच जेम्स बॉन्डची मार्टिनी..Shaken not stirred![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र माहीत नाही.
धन्यवाद अमेय! मार्टिनीसाठीच
धन्यवाद अमेय! मार्टिनीसाठीच ती हवीय …
नुसती वोडका आणि जीन मिक्स केलं तर फ्लेवर नाही येत ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
प्रॉव्हिडोर हे औन्ध मधे
प्रॉव्हिडोर हे औन्ध मधे असलेल दुकान आहे. - इथे साउथ आफ्रिकन वाइन्स काही युरोपियन वायनरीज मधल्या वाइन्स छान असतात.
ग्रेप्स इन अ ग्लास हे भोसले नगर मधे आहे. तिथे इंडियन वाइन्स आहेत बर्याच. पण ड्राय आणि स्वीट दोन्ही आहेत.
दोराबजी मधे ही असाव्यात . कोरेगाव पार्कात नकी असतील अजून ऑप्शन्स
धन्यवाद इन्ना, बघतो.
धन्यवाद इन्ना, बघतो.
मी एकदा बुचभर वाईन टेस्ट केली
मी एकदा बुचभर वाईन टेस्ट केली होती, नाव काय होते काय की, अगदी आयुर्वेद रसशाळेच्या "कुमारी आसव" सारखी लागली चवीला.. !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages