अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी

Submitted by हायझेनबर्ग on 3 April, 2015 - 10:55

अमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -

जुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्‍यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -

401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स
ब्रेक्स/ रिबेट्स, भारतातली गुंतवणूक, लाईफ/ हेल्थ ईंश्यूरन्स, सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स ई. ई.

ह्या विषयांवरती अनुभव, सल्ले, मत मतांतरे ऐकायला आणि त्याबद्दल साधक बाधक चर्चा करायला आवडेल. ऊद्देश हाच की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असणार्‍यां मायबोलीकरांना ह्या सगळ्या किंवा ह्यातल्या काही संधींबद्दल माहिती होऊन त्या एक्सप्लोर करण्यासाठी पावले ऊचलण्यास मदत होईल.

अजेंडा असा काही नाही, माहितगार व तज्ञांनी एकेक विषय घेवून त्या विषयावर सविस्तर लिहावे अशी अपेक्षा.

मुलांच्या कॉलेज शिक्षणावरील खर्चाच्या नियोजनासाठी आधी झालेली चर्चा. ईथे बरीच माहिती डिटेल मध्ये ऊपलब्ध आहे
http://www.maayboli.com/node/34069

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितगार व तज्ञांनी एकेक विषय घेवून त्या विषयावर सविस्तर लिहावे अशी अपेक्षा.>>>>> आयला वेंट्रीतच मुडदा पाडला!
हे असं लिहिल्यावर आता कसं काय यावं इथे लिहायला? Lol

४०१के, आयआरए इ. फिनान्शिअल कन्सल्टन्टला विचारून 'कस्टमाइज्ड' प्लॅन केलेला चांगला. एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूट करत असेल तर मॅच्युरिटी, लोन्स इ.ची माहिती घेऊन ठेवावी.

मॉर्टगेजबद्दल सायो सांगू शकेल. हाउसिंग मार्केट इज पिकिंग अप असं ऐकते आहे.

मेडिकल इन्शुरन्स हा एक मोठा स्कॅम आहे असं माझंतरी वैयक्तिक मत आहे.

माझ्या माहितीत बरेचसे देशी असे आहेत जे फुल्टाइम नोकरीत पण ४०१ के घेत नाहीत. लोक्स असं करू नका. एम्प्लॉयर पण टाकतोय नं त्याच्या खिशातले तर ते उचला.

माझं मोस्टली एवढंच कंट्रिब्युशन. इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.

एम्प्लॉयर पण टाकतोय नं त्याच्या खिशातले तर ते उचला. >>>> एम्प्लॉयर टाकत नसेल तर? शिवाय ४०१ मधून पैसे काढायचे असतील तर टॅक्सेबल असतात असं ऐकलय. तर मग आपले पैसे त्यात अडकवावे का ?

>> मेडिकल इन्शुरन्स हा एक मोठा स्कॅम आहे

अवांतरः

कदाचित खरंही असेल पण it's not going anywhere and we have to live with it ..

दुसरं असं मला दिसत असलेला एक मोठ्ठा अ‍ॅड्व्हान्टेज् (आणि त्याचा ह्या बीबी च्या विषयाशी काही संबंधही नाही) तो म्हणजे इन्श्युरन्स् असल्यामुळे खूप डेटा अव्हेलेबल आहे रिसर्च करता (सगळ्याचंच नेचर प्रचंड कमर्शियल असल्याने) जो इतर देशात अशा सिस्टीमॅटिक स्वरूपात नाही .. रिअल वर्ल्ड डेटा अ‍ॅनालिसिस आणि डिसीजन मेकींग करता हा एक मोठा प्लस आहे अमेरिकेत ..

आपला एम्प्लॉयर पैसे घालत नसेल तरीही ४०१ मध्ये पैसे ठेवणे योग्य आहे असे माझे मत आहे. विशेषतः पराग सारख्या लेट ट्वेंटीज मधल्या लोकांनी तर अगदी जरूर. कारण ते पैसे काढले तरच दंड होतो आणी ते आपणच इन्वेस्ट करून फायदा झाला असता तरी कर द्यावाच लागला असता. शिवाय ४०१ मधले पैसे टॅक्स फ्री वाढतात. आपल्याला पेन्शन नाही हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला आणी ४०१ इंडेक्स फंड पुरतेच मर्यादीत ठेवले तर रिटायर होईपर्यंत गंगाजळी जमते. आपला एम्प्लॉयर पैसे घालत असेल मात्र अगदी अवश्य करावे. अर्थात केदारजी जास्त लिहितीलच.

पराग
४०१ के चा एक फायदा (जो खूप्प्प्पच मोठा आहे) तो म्हणजे
४०१के मध्ये प्रीटॅक्स आणि आफ्टर टॅक्स (रॉथ) असे दोन प्रकारचे काँट्रिब्यूशन तू करू शकतोस.
रिटायर्ड झाल्यानंतर आयुष्यभर साठवलेल्या ४०१ के च्या पैशांवर तू जसे प्लॅन/ईनेव्स्ट केले आहेस तसे तुला मंथली किंवा अ‍ॅन्युअली कॅश फ्लो जनरेट होतील. समजा आज जर तुझा पगार ५ हजार $ महिना असेल तर तू वेगळ्या टॅक्स ब्रॅकेटने टॅक्स भरशील समजा ३०% . पण ५००० पैकी १००० ४०१के मध्ये टाकल्यास तुझी सध्याची ३०% ची ब्रॅकेट २८% वर येईल आणि रिटायरमेंटला जेव्हा तुझा मंठली ईनक्म फक्त २००० (आज ईन्वेस्ट केलेले १००० ची टाईम वॅल्यू वाढून २००० झाले असे समजू आणि त्या वरच्या १००० वर टॅक्स नाही) असेल तेव्हा तू कदाचित २०% नेच टॅक्स भरशील. पुन्हा ४०१के वर लोन्स वगैरे पण घेता येईल ज्याचा व्याजदर बर्‍यापैकी कमी असतो.

हे खरे की तुम्ही कमावलेल्या प्रत्येक डॉलरवर (अपवाद मेथ लॅब टाकून कमावलेले पैसे Wink ) टॅक्समास्टर अंकल सॅम 'खानदानी चोर हूं आया हूं तो कुछ ना कुछ लेके ही जाऊंगा - क्राईममास्टर गोगो' च्या चालीवर टॅक्स घेणारच. पण तो किती द्यायचा हे आपण नियंत्रित करू शकतो.

वरच्या टॅक्स फिगर्स फक्त ऊदाहरणादाखल दिल्या आहेत.

विकु, बरोबर आहे. ४०१ के मध्ये इन्वेस्ट केलेच पाहिजे फक्त भारतात परत जायचा प्लॅन असला तर ते १० टक्के गृहित धरावे लागतात. अर्थात एंप्लोयर मॅच असेल तर हँड्स डाऊन त्याचा फायदा घ्यायलाच हवा! That's like throwing away free money!

तसंच ४०१के मधून घराकरता, हार्डशिप करता (खात्री नाही) आणि शिक्षणाकरता (परत एकदा खात्री नाही) लोन्स् घेता येतात .. ह्याचाच अर्थ गरज असेल तेव्हा ते पैसे वापरता येऊ शकतात ..

बुवा ४०१के मधले पैसे मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेतच रहावे लागेल असा काही नियम नाही, आणि आज जर तुम्ही ३०% टॅक्स भरणार असाल तर तुम्ही भारतात गेल्यानंतर ज्यावेळी तुमचे अमेरिकेतले ऊत्पन्न ० असेल त्यावेळी मिनिमम टॅक्स आणि १०% पेनल्टी हे बरेच आहे ना.

सशल माझ्यामते IRA चा पर्याय ऊपलब्ध असतांना शिक्षणासाठी ४०१ के चे पैसे वापरले हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि ८० % ४०१ के वापरणारे लोक तो करतातच.

हायझेनबर्ग, मी शिक्षणाकरता वापराच असं नाही म्हणत आहे .. ४०१के ची भलावण करतेय फक्त .. आणि तू IRA म्हणतो आहेस की 529 plan?

पराग थोडक्यात पेंशनचाच फंडा आहे.
पेंशन म्हणजे कंपनी तुम्हाला पोस्ट रिटायर्मेंट डिफाईन्ड बेनिफिट देणार. ऊदा, महिना २००० पेंशन.
तू आज कंपनीचा ३० वर्षांचा एम्प्लॉयी आहेस आणि तू समजा ६० व्या वर्षी रिटायर होणार आणि त्यानंतर २० वर्षे जगणार (तू सेंचुरी मारावीस अशी देवाचरणी प्रार्थना Happy ). तर कंपनीला तुला २० वर्षांसाठी २००० महिना पेंशन द्यावी लागणार. त्यासाठी तुझी कंपनी आजच कमीतकमी पैसे (समजा १०,०००) ईनवेस्ट करून त्यावर त्यांना ३० वर्षानंतर २० वर्षे दर महिन्याला २००० मिळतील अशी तजवीज वेगवगळे पेंशन फंड्स वापरून, करून ठेवते. (चक्रवाढ व्याज, मार्केट गेन्स, फंड्सचे रिटर्न्स ईनी आजच्या १०,००० चे तीस वर्षांनी समजा १५०००० होतील, आणि ते १५०००० ची तू २० वर्षे महिन्याला अ‍ॅन्युईटी येईल अशी तजवीज करू शकतोस)

पण ४०१ के सारख्या स्कीम्स मध्ये थोडक्यात असे की, कंपनी म्हणते हे १००० आजच तुम्ही डिफाईन्ड कॉट्रिब्युशन घ्या आणि तुम्हीच तुमची काय ती ईन्वेस्टमेंट करा आणि तुमच्या रिटायर्मेंटची पेंशन सारखी अमाऊंट प्लॅन करा.

मला मुलांसाठी काही सेविंग पर्याय हवे आहेत. H१ वर मुलांच्या कॉलेज सेविन्ग्साठी काही पर्याय आहेत का?
भारतासारखे recurring deposits इथे असते का? किंवा रेगुलर बचतीसाठी काही पर्याय?

धन्यवाद

जर भारतात परत जायचे असेल तर ४०१ के मधले पैसे काढून जाता येते. फक्त त्यावर दंड भरायला लागतो १०% बरोबर ना?

अजून एक वाइट्ट रूल म्हणजे तुमची भारतात जर मुच्युअल फंडमध्ये गुंतवणुक असेल तर नोशनल गेन्सवर इथे टॅक्स भरायला लागतो. रिअली रिअली बॅड.

कुणाला चांगल कन्सल्टंट माहिती असेल तर विपू त लिवा.

हो बुवा करतात बहुतेक लोक तसे पण तसे करण्याची गरज नाहीये, किंबहुना माझ्यामते तसे करणे फायद्याचे नाही.

सशल ५२९ के प्लॅन ही आहेच पण तो IRA पेक्षा बराच रिस्ट्रिक्टिव आहे. भविष्यातल्या शैक्षणिक खर्चासाठी तुम्ही ५२९के ही वापरू शकताच पण माझ्या माहिती प्रमाणे त्यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे पाल्य काही कारणामुळे कॉलेज ला न जाऊ शकल्यास ईट डिफिट्स द एंटायर परपज. आणि सज्ञान झाल्यानंतर ते पैसे पाल्याच्या मालकीचे होतात, जर त्या पैशातून त्याने कॉलेजची फी न भरता गर्लफ्रेंड ला खूष करण्यासाठी यलो कलरची हमर घ्यायची ठरवली तर तुम्ही ते त्याला आडकाठी करू शकत नाहीत. Wink

हायझेनबर्ग, हा महत्वाचा मुद्दा हायलाईट करण्याबद्दल धन्यवाद .. Happy

टण्या, मला नुकतंच असंही कळलं की भारतात जागा घेऊन ती भाड्यावर वगैरे दिली नाही (थोडक्यात जागा घेऊन नुसतीच ठेवून दिली) तरी नोशनल गेन्स् वर तुमची टॅक्स् लावबिलिटी असते .. Uhoh

मी ३ वर्षाकरिता अमेरिकेत असुन त्यानंतर कायमचा अमेरिका सोडायचा विचार आहे. कंपनी मॅच करत असल्याने ४०१K प्री टॅक्स गुंतवायला सुरवात केली. असे ऐकले आहे की हे पैसे उच्च शिक्षणाला वापरले तर १०% पेनल्टी लागत नाही, जर मुलगा अमेरिकेत शिकत असेल तर मी अमेरिका सोडल्यावर ४०१ K चे पैसे मुलाच्या उच्च शिक्षणाला १०% पेनल्टी न देता वापरु शकतो का?

कुणाला चांगल कन्सल्टंट माहिती असेल तर विपू त लिवा. >> +१

बर्‍याच गोष्टी अजून माहितीच नाहीयेत असं लक्षात आलंय. चांगला धागा!

साहिल,
माझ्या मते ५९.५ वर्षांआधी तुम्ही ४०१के च्या कुठल्याही विड्रॉवलर १०% पेनल्टी वाचवू शकत नाहीत.

राखी,
वरती ऊल्लेख झालेल्यांपैकी IRA, 529K हे दोन चांगले ऑप्शन्स आहेत मुलांच्या ऊच्च शिक्षणाचीतजवीज करण्यासाठी.

जर तुमचा पाल्य खूपच कंपिटिटिव आणि कमिटेड असेल आणि त्याच्यासाठी खूप पैसा खर्च करण्याची तुमची ईच्छा व तयारी असेल (ऊदा. भरमसाठ फिया असलेले हार्वर्ड, प्रिन्सटन, स्टॅनफर्ड कॉलेजेस किंवा महागडे मेडिकल वा टेक्नॉलॉजी कोर्सेस) तर IRA पेक्षा 529K फायद्याचा असेल (कारण त्यात कॉट्रिब्युशनवरचे लिमिट खूप मोठे आहे) पण मुलाच्या प्रगतीचे साईन्स योग्य वेळी रीड करणे फार जरूरी आहे. तो टीनेज झाल्यानंतर फार वेळ हाताशी रहात नाही हे करण्यासाठी.

माझ्या बघण्यात आलेले फिडेलीटीचे कन्सल्टंट्स लोक मला नॉलिजिबल आणि थॉट्फुल वाटले. फिडेलिटी तुमच्या कंपनीचा फायनँशिअल पार्टनर असेल तर त्यांना अप्रोच करणे सोपे आहे. अथवा सर्वच बॅकांचेही फायनँशिअल प्लॅनर असतात, पण ते त्यांचे प्रॉडक्टस गळी ऊतरवण्याचा प्रयत्न करतात. कन्स्ल्टंट्स ना अप्रोच होण्याआधी स्वतःची गरज आणि त्यानुसार रिसर्च करूनही तुम्ही चांगले निष्कर्ष काढू शकतातच.

आयला,
अहो अमेरिकेत नि सेव्हिंग?
तशाने जगाची अर्थव्यवस्था कोलमडेल. अमेरिकेतले लोक पैसे खर्च करणे थांबवतील, तर चीन, तैवान इ. देशांचे दिवाळे निघेल. आज १७ ट्रिलियन डॉ. चे कर्ज आहे अमेरिकेवर म्हणून जगातली अर्थव्यवस्था जिवंत आहे. पैसे साठवत बसले असते तर एव्हढे कर्ज करता आले असते का?

विचार करा - जगाच्या अर्थव्यवस्थेची काळजी करा!
Wink , Light 1

थॅक्स, मग कदाचीत ५९.५ वर्ष थांबीन . Happy

तसेच HSA पण मला खुप फायद्याचा वाटला. प्री टॅक्स $६५५० पर्यन्त पैसे बाजुला काधुन ठेवता येतात त्यावर मिळणारे व्याज, फायदा सगळे करमुक्त असते. हे पैसे मेडिकल साठी वापरु शकतो ( त्यात दात, नंबर्चे चश्मे ह्याचा पण स्मावेश आहे). हेल्थ चा विमा पण काढु शकतो पण जीवन विमा साठी ह्या account मधुन पैसे नाही वापरु शकत. any non medical withdrawal before 65 years is taxable with 20% penalty. After 65 it is taxable without penalty.

http://www.bogleheads.org/wiki/Main_Page

Getting started:
Overview • Bogleheads® investment philosophy • Investing • Personal finance • Planning for retirement

Financial planning:
Asset allocation ∙ Charitable giving ∙ Education savings ∙ Estate planning ∙ Health savings accounts ∙ International domiciles ∙ Personal finance ∙ Tax considerations

Investing:
Asset classes ∙ Alternate asset classes ∙ Bonds ∙ CDs ∙ Indexing ∙ International stocks ∙ Exchange-traded funds ∙ Money markets ∙ Mutual funds ∙ Portfolios ∙ Real estate ∙ Risk management (portfolio) ∙ Stocks (US) ∙ Vanguard

Retirement planning:
Annuities ∙ Employer provided retirement plans ∙ IRAs ∙ Portfolio withdrawals ∙ Retirement spending ∙ Social Security

Reference material:
Acronyms ∙ Blogs ∙ (The) Bogleheads® ∙ Books and authors ∙ Financial theory ∙ Financial websites ∙ FAQs ∙ Glossary ∙ Google Docs spreadsheets ∙ Resources and links

Pages