अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी

Submitted by हायझेनबर्ग on 3 April, 2015 - 10:55

अमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -

जुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्‍यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -

401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स
ब्रेक्स/ रिबेट्स, भारतातली गुंतवणूक, लाईफ/ हेल्थ ईंश्यूरन्स, सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स ई. ई.

ह्या विषयांवरती अनुभव, सल्ले, मत मतांतरे ऐकायला आणि त्याबद्दल साधक बाधक चर्चा करायला आवडेल. ऊद्देश हाच की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असणार्‍यां मायबोलीकरांना ह्या सगळ्या किंवा ह्यातल्या काही संधींबद्दल माहिती होऊन त्या एक्सप्लोर करण्यासाठी पावले ऊचलण्यास मदत होईल.

अजेंडा असा काही नाही, माहितगार व तज्ञांनी एकेक विषय घेवून त्या विषयावर सविस्तर लिहावे अशी अपेक्षा.

मुलांच्या कॉलेज शिक्षणावरील खर्चाच्या नियोजनासाठी आधी झालेली चर्चा. ईथे बरीच माहिती डिटेल मध्ये ऊपलब्ध आहे
http://www.maayboli.com/node/34069

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कंपाउंड इन्टरेस्टचा विचार केला तर वरील उदाहरणात कदाचीत एंड अमाउंट सारखीच असेल असे मला वाटते. जाणकार सांगतीलच.

राज... मी कधीच भारतात पैसे गुंतवले नाहीत म्हणुन मला तिथल्या टॅक्सचे नियम माहीत नाहीत.. मी सुलुचेच टॅक्स नंबर वापरले .

४०१ के आणि भारतात परतणे. >>

मी कायमचा (!) परतलो आहे. आणि माझे 401 के दोन्ही अकाउंट (दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे) मी इथून मॅनेज करतो. आता त्यात कुणी (मी आणि कंपनी) पैसे भरत नाही, पण तरीही त्या सेव्हिंग्स मार्केटबरोबर खालीवर होतात. आणि मी ते सर्व रिस्क इव्किटीमध्ये व ग्लोबल फंडस मध्ये ठेवतो. त्यावरचे रिटर्नस अमेझिंग आहेत.

२०१३ पर्यंत मी नियमीत टॅक्स भरत होतो. २०१४ ह्यावर्षी मात्र भरला नाही कारण आता तिकडे इनकम नाही. आता माझे २० टक्के वाचू शकतील. (मी जर काढायचा विचार केला तर) पण तरी १० टक्के पेनल्टी ही द्यावीच लागेल. विच इज वर्थ इट.

त्यामुळे भारतात परतायचे असले तरी ४०१ के काढाच. नथिंग टू लुज.

पण कंपाउंड इन्टरेस्टचा विचार केला तर वरील उदाहरणात कदाचीत एंड अमाउंट सारखीच असेल असे मला वाटते. जाणकार सांगतीलच.
८% चक्र्वाढ पध्धतिने ३० वर्षात १० पट होतात, पण २% ने १.८ पट होतात. तोच मोठा फरक आहे.

अनिवासि भारतिय लोकानी जर बाहेरुन पैसे गुंतवले तर त्याला कर नाही त्यामुळे फक्त अमेरिकेचा ३०% कर पडेल त्यामुळे जर ५.६% व्याज घेतले (कर कापुन) तर 30 वर्षात ५ पट होतिल. पण विनिमय दर लक्षात घेता US$ मध्येच ठेवणे फायद्यात पडते.

समजा ४०१के किंवा आय.आर.ए. मध्ये गुंतवले व भारतात परत गेलात. आणि अमेरिकेत इतर इन्कम शून्य आहे. दर वर्षी समजा ५ हजार डॉलर काढले. त्यावर ५००$ पेनल्टी द्यायला लागेल. मात्र टॅक्स ० कारण स्टँडर्ड डिडक्शन वगळल्यावर टॅक्सेबल इन्कम ० असेल. म्हणजे इफेक्टिवली टॅक्स १०% झाला. तसेच भारतातल्या इन्कमवर युएसमध्ये टॅक्स भरावा लागणार नाही कारण तुम्ही भारतात (धरुया की १ वर्षापेक्षा अधिक काळ गेला आहे) परतल्यावर अमेरिकन टॅक्स रेसिडेंट नाही.
हे कॅल्कुलेशन बरोबर आहे का?

ते बरोबर असेल तर ४०१के बरा की आय.आर.ए. बरा (जर कंपनी ४०१के मध्ये पैसे घालत नसेल तर)?

ते बरोबर असेल तर ४०१के बरा की आय.आर.ए. बरा (जर कंपनी ४०१के मध्ये पैसे घालत नसेल तर)? >> कंपनी पैसे घालत नसेल तर IRA बरा कारण त्यात गुंतवणूक करायला अधिक ऑप्शन्स मिळतात. मी इथे तू स्वतः बाहेरून तो काढतो आहेस असे ग्रुहित धरतो.

फारच उपयुक्त माहीती !!

माझ्यामते जर का भारतात FD ओपेन केल असेल NRE अकाउंट मधुन तर फक्त अमेरीकेत टॅक्स लागेल (फक्त प्रॉफिट्वरच) तूमच्या टॅक्स ब्रकेट नूसार, भारतात टॅक्स नाही लागणार.

लॉग टर्म साठी(३ वर्षा पेक्षा जास्त) MF, Stocks बेस्ट आहेत... ५+ वर्षासाठी काहि MF ने १२% रेट दिला आहे.
रिटायर फंड मधून जर का पैसे हाती असतील तर लॉग टर्म MF मला बरा पर्याय वाटतो. लॉग टर्म मध्ये Equity Products जास्त चांगला रिटर्न देतात Debt Products पेक्षा.

अमेरीकेत SIP प्रोड्क्टस आहेत का ? असल्यास कोणता चांगला ?

असामी +१
दोन्हींमध्ये दरवर्षी किती टाकता येतील त्याचे लिमिटेशन्स वेगळे आहेत, त्यामुळे तुमचा स्पेसिफिक रिटायरमेंट गोल असल्यास आणि त्याबरहुकूम तुम्हाला जास्त सेविंग करायची असल्यास ४०१के चा ऑप्शन घ्यावा लागेल.

401(k), 403(b), and most 457 plans

Age 49 and under $17,500 $18,000
Age 50 and older Additional $5,500 Additional $6,000

-----------------------------------
Roth and Traditional IRA contribution limits

Age 49 and under Up to $5,500 (must have employment compensation) Up to $5,500 (must have employment compensation)
Age 50 and older Additional $1,000 Additional $1,000

माझ्यामते जर का भारतात FD ओपेन केल असेल NRE अकाउंट मधुन तर फक्त अमेरीकेत टॅक्स लागेल (फक्त प्रॉफिट्वरच) तूमच्या टॅक्स ब्रकेट नूसार, भारतात टॅक्स नाही लागणार. >> हो हे बरोबर आहे.

$१०के पेक्षा जास्त बॅलन्स असलेले सगळे ओवरसीज अकाऊंट डिसक्लोज करावे लागतील हा नियम ह्या वर्षीपासून अजून जोरात अंमलात आणणार आहे असे म्हणत आहेत :अओ:. पण भारतातल्या बँकामधले बॅलन्स अंकल सॅम कसे वेरिफाय करणार? आयसीआयसीआय, एसबीआय वगैरे अमेरिकेत बिझनेस करणार्‍या बँका समजा एकवेळ अशी माहिती डिसक्लोज करण्यासाठी ऑब्लिगेटेड असतील पण वडगाव बु. सहकारी पतसंस्थेत ५०लाख रु. एखाद्याच्या अकाउंट मध्ये असतील तर कसे? किंवा कुण्या दुसर्‍याच्याच भारतातल्या अकाऊंट्मध्ये एखाद्या अमेरिकन रेसिडेंट ने पैसे ठेवले तर? एवढे ऑबविअस फ्लॉ असलेला नियम ईफेक्टिवली कसा अंमलात येवू शकतो?

I think the limitations that you state for 457(b) are for pre-tax contributions. Post-tax you can contribute more (I don't know the limit). The benefit of contributing additionally post-tax is that the interest accrued is tax-deferred/tax free.

पॅन कार्ड्वरुन सगळे डिटेल्स मिळू शकतात... आता वड्गाव च्या सहकारी पतसंस्थेत पॅन काडॅ लागत का ते माहिती नाही पण ईतर ठिकाणी लागतं..

दुसर्‍याच्याच भारतातल्या अकाऊंट्मध्ये एखाद्या अमेरिकन रेसिडेंट ने पैसे ठेवले तर? >>
समजा मी माझ्या बाबांना दहा लाख दिले आणि त्यांना FD अकाउंट ओपन केल ९% सिनियर सिटीझन दराने तर त्यांना भारतात टॅक्स लागेल.ऑडीट झाल तर त्यांना दहा लाख कसे आले हे सांगाव लागेल.

NRI Demat अकाउंट ओपन करायचं असल्यास SSN नंबर लागतो, पुर्वी NRIना ट्रेडींग वर बंदी होती पण आता नाही, अर्थात NRI कडे कंपनीचे कीती शेअर असू शकतात हे SEBIच ठरवते.

माझे दोन प्रश्न आहेत.
१. अमेरीकेत SIP प्रोड्क्टस आहेत का ? असल्यास कोणता चांगला ?
२. Life Insurance कोणाता आणि कसा घ्यावा ? घेण्यापुर्वी कोणती माहिती बघावी ?

आता वड्गाव च्या सहकारी पतसंस्थेत पॅन काडॅ लागत का ते माहिती नाही........
अत्तापर्यन्त लागत न्हवते, पण १ एप्रिल २०१५ पासुन १०००० रु च्या वर व्याज मिळणार असेल तर ते अनिवार्य आहे नाहितर नविन कायद्याप्रमाणे वड्गाव च्या सहकारी पतसंस्थेनी १०% कर कापुन ज्याचा कर कापला त्याची माहिती आयकर खात्याला कळवावी लागणार आहे.

समजा मी माझ्या बाबांना दहा लाख दिले आणि त्यांना FD अकाउंट ओपन केल ९% सिनियर सिटीझन दराने तर त्यांना भारतात टॅक्स लागेल.ऑडीट झाल तर त्यांना दहा लाख कसे आले हे सांगाव लागेल......
दानपत्र केले तर काही प्रोबलेम नाही. रक्ताच्या नात्याला दिलेले दान हे करमुक्त आहे. पण बाबाचे उत्त्पन्न करपात्र असेल तर त्यावर कर भरावा लागेल. समजा तुम्ही परत भारतात गेला तर बाबा पुन्हा तुम्हाला तुमचे पैसे दान करुन शकतात तेही करमुक्त आहे. पण ते पैसे कायद्याने भारताबाहेर नाही आणता येणार.

The benefit of contributing additionally post-tax is that the interest accrued is tax-deferred/tax free.
I guess that is only if you wait till 59.5 years. if you withdraw before that then you have to pay penalty + tax on interest accured/profit. Prinicpal is always tax free for post tax contribution.

हे एक चांगलं अ‍ॅप आहे https://www.futureadvisor.com/

ही फ्री ट्रेडिंग साइट- https://www.robinhood.com/

ही एक नवीन कन्सेप्ट आहे - https://www.motifinvesting.com/ इन्वेस्टमेंट मार्केटमध्ये नवीनच असाल तर सुरूवात करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही स्वतःचे मोटिफ्स बनवले पाहिजेत असं नाही. इतरांनी बनवलेले मोटिफ्स वापरून गुंतवणूक करू शकता.

sneha1: There are many viewpoints around this but I like to keep it simple as below.

Get the shortest FIXED RATE mortgage you can afford, BUT WHY?
1. You pay off your mortgage faster there by owning your home earlier.
2. Those monthly payments vanish after the term providing you much needed flexibility in later years as other family expenses might go up.
3. Most important is "Peace of mind"

NEVER go for ARM (adjusted rate mortgage) unless you understand the risk and willing to accept the consequences.

Some will argue with a term "opportunity cost of capital", simply BEWARE.

In short, if you can afford 15 yrs then go for it, but do enough analysis to understand your financial commitment every month for next 15 years and YES payments will be higher. BUT if you feel its kinda tight and does not leave you with any flexibility then go for 30 years as payments will be lower but you will end up paying more for the mortgage in interests.

Good Luck! Happy

स्नेहा१,
१५ वर्षाच्या कर्जाचा हप्ता सातत्याने भरणे कठीण वाटत असेल तर ३० वर्षाचे लोन घेणे आणि शक्य होइल तसे भांडवलापोटी जास्तीचे पैसे भरणे असेही करता येइल. नुसते एक्स्ट्रा पेमेंट केले तर त्याचा काही भाग व्याजापोटी आणि काही भाग भांडवलापोटी जातो. जास्तीचे पैसे भरताना ते भांडवलापोटी दिले की सगळे पैसे भांडवल कमी करायला वापरले जातात.

Pages