अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी

Submitted by हायझेनबर्ग on 3 April, 2015 - 10:55

अमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -

जुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्‍यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -

401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स
ब्रेक्स/ रिबेट्स, भारतातली गुंतवणूक, लाईफ/ हेल्थ ईंश्यूरन्स, सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स ई. ई.

ह्या विषयांवरती अनुभव, सल्ले, मत मतांतरे ऐकायला आणि त्याबद्दल साधक बाधक चर्चा करायला आवडेल. ऊद्देश हाच की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असणार्‍यां मायबोलीकरांना ह्या सगळ्या किंवा ह्यातल्या काही संधींबद्दल माहिती होऊन त्या एक्सप्लोर करण्यासाठी पावले ऊचलण्यास मदत होईल.

अजेंडा असा काही नाही, माहितगार व तज्ञांनी एकेक विषय घेवून त्या विषयावर सविस्तर लिहावे अशी अपेक्षा.

मुलांच्या कॉलेज शिक्षणावरील खर्चाच्या नियोजनासाठी आधी झालेली चर्चा. ईथे बरीच माहिती डिटेल मध्ये ऊपलब्ध आहे
http://www.maayboli.com/node/34069

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिका व सेव्हिंग हे ऐकल्यावर पाताळविजयमसारखे हसू आले! इथल्या बँकांतून सीडीज केल्यावर ०.०३ वगैरे इंटरेस्ट रेट मिळतो हे ७ वर्षापूर्वी कळल्यावरचे फ्रस्ट्रेशन अजुन गेले नाहीये. Angry रिअल इस्टेट ही पूर्वी चांगली इन्व्हेस्टमेंट होती, किंवा लोकेशन चांगली असेल तर अजुनही चांगली इन्व्हेस्टमेंट आहे.
४०१के मात्र असलाच पाहीजे - एम्प्लॉयरने त्यात भर टाको न टाको. त्याचबरोबर टॅक्स कन्सल्टंटशी बोलून IRA करणे हे ही आम्ही करतो. मला बहुतेक ५२९ माहित नाहीये? बघावे लागेल.

देशात NRE अकाउंट काढणे हा ही पर्याय आहे.

५२९ आणि मुलांच्या शिक्षणविषयक तरतुदींची चर्चा इथे आधी झाली आहे. या धाग्यावर ते सोडून इतर गुंतवणुकींची चर्चा करता येईल.

http://www.maayboli.com/node/34069

खूप माहिती मिळते आहे. मी सध्या अमेरिकेत नाही पण..ज्यांचं भारतात परतायचं पक्कं ठरलं असेल ते लोक जसा रुपयाचा भाव पडेल तसे भारतात पैसे ट्रान्सफर करुन तिथे जास्त व्याजाने गुंतवू शकतात ना...भारतात एफडी केलं तरी बरे रेट्स मिळतात की. या स्ट्रॅटेजीबद्दल मतं जाणून घ्यायला आवडतील..

बस्के Lol खरय! इथे आपल्या करियर मध्ये जे काही प्रिन्सिपल जमा होईल ते टिकून त्यावर डिसेंट रिटर्न्स मिळाले तरी खुप आहे असं वाटतं.
भारतात एफ डि, रियल इस्टेट मध्ये मिळतात जास्त रिटर्न्स पण इम्फ्लेशन मुळे ते रिटर्न्स पण खोटे असल्या सारखं वाटतं. Happy

देशात NRE अकाउंट काढणे हा ही पर्याय आहे..
पण त्यावर जे व्याज मिळेल त्यावर अमेरिकेत कर आहे. तो दिल्यावर खुप कमी हातात राहतात. जे राहातात ते भरतातले इम्फ्लेशन असते. त्यामुळी फार फायदा होत नाही. आखाती देशात किंवा सिंगापुर मध्ये NRE अकाउंट चा बराच फायदा असतो.

धन्यवाद वेका.
खूप चांगली चर्चा झाली आहे आधी. मी तुम्ही दिलेली लिंक वरती अ‍ॅड केली आहे.

स्वाती२, स्वाती दांडेकर, विनय वगैरे लोकांनी ईतरही विषयांवर ईथे लिहिल्यास अजून नवी महिती मिळेल व ईथली माहितीही नवीन कायद्यांनुसार पडताळून पहाता येईल/ दुरूस्त करता येईल.

वेका
कोणीतरी म्हणाले आहे ना Anyone who think of only one way to spell a word obviously lacks creativity Wink

सशल,
आधी लिहिलेल्या ५२९ के च्या माहितीमध्ये थोडं करेक्शन... मी जो अकाऊंट ओनरशिपअचा प्रॉब्लेम सांगितला तो बहूतेक फक्त UTMA/UGMA ५२९ शी रिलेटेड आहे रेग्युलर Parent controled ५२९ शी नाही.

https://investor.vanguard.com/home/

Vanguard Mutual Funds हा एक चांगला मार्ग आहे. त्यांची website जरूर पहा.
गुंतवणुकीचे अनेक पर्याय तेथे उपलब्ध आहेत. शिवाय त्यांची फी सगळ्यात कमी असते.

Few suggestions:

1. If your company offers 401K (roth or traditional) and "matches" $1 to $1 contribution (upto 5-6% of your salary) then without thinking go for it upto that 5-6%
This is free money and one should not leave it on the table, in case you decide to go back to India and as a result take out all the money from 401K and even if you have to pay penalty of 10%, it will be profitable transaction.

2. If you are eligible to open Roth IRA then go ahead and contribute to it (depends on your income level)
Please check rules around this one before investing BUT if you can keep the money in this account for at least 5 years then you can remove the original deposited amount anytime without penalty which can be used as emergency funds.

3. Use ONLINE SAVINGS Accounts which tends to pay better interest rates

4. DO NOT get lazy and greedy, avoid putting BIG Amount in single account.
Spread out amounts in multiple accounts and avoid having more than 100K in single account. FDIC insurance covers upto 250K so technically you can have upto 250K insured in any FDIC insured account.

5. Check out Monthly income stocks or ETFs which can produce good income on monthly basis, however you need to do some research before investing

6. OUT of box ideas - below ideas will have currency risk but can pay off big
Ever thought of opening FCNR?
How about Rupee Forward account?
What you think of opening Currency CDs? Everbank offers couple

7. As a rule of thumb 5%-10% of total asset should be in precious metals

Hope this provides some beneficial information for now... Happy

माझा एक जनरल अनुभव (हा कंपनी सापेक्षही असू शकेल) हा कि कंपनी ज्या financial institute बरोबर 401k offer करते त्याच ठिकाणी बाहेरून IRA/रॉथ उघडल्यास गुंतवणुकीचे अधिक options मिळतात. expense ratio कमी ठेवण्यासाठी त्यामूळे अधिक मदत होते. अर्थात योगीचा पहिला मुद्दा लक्षात घेऊनच हे करावे.

सशल, मला असा जनरल सल्ला (मित्र नि financial consultatnts) मिळाला होता कि 529 पेक्षाही स्वत:च्या retirement मधे आधी पैसे घालावे, त्यानंतर general investment मधे नि मग 529 मधे. फायदा हाच कि ते फक्त education शी bind होत नाहीत.

HSA option असेल तर जरुरु वापरा. हवे तर पैसे वापरू नका, बहुतेक HSA providers investment options देतात ज्यात बरेच index funds असतात त्यामूळे तीही नंतरच्या medical expense साठी चांगली गुंतवणूक होईल.

फायदा हाच कि ते फक्त education शी bind होत नाहीत. >> Let me use Suze Orman's words - there is no loan for retirement!

Historically, due to the exchange rates, investments in rupees, inspite of 8% pa interest rate, do not have same value as investment in dollars. (I will write down the math here later).

चांगली माहिती yogibear

तुमच्या out of box idea (खास करुन क्र. १ & २ ) वापरुन, मी काही वेळा सिंगापुर वापरुन पैसे गुंतवले होते.आणि US$ वर risk free ५ ते १०% मिळवले होते त्या अमेरिकेतुन कश्या करायच्या ते माहित नाही. मी जिथे राहतो तिथुन ५०० मैला पर्यन्त एकही भारतिय किंवा आंतर्राष्ट्रीय बॅक नाही.

अमेरिकेत रियल एस्टेट ट्र्स्ट स्टॉक ट्रेड होतात का? त्यात risk किति आहे आणि in general dividend yield किति असते.?

US$ वर risk free ५ ते १०% मिळवले होते >>> एवढे Uhoh
ओपन मार्केट मध्ये एवढ्या मार्जिनची आर्बिट्राज अपॉर्ट्युनिटी? कधीची गोष्टं आहे?
डीटेल मध्ये लिहाल का नक्की कसा ट्रेड केला?

माझे २ सेंट्सः

>>1. If your company offers 401K (roth or traditional) and "matches" $1 to $1 contribution (upto 5-6% of your salary) then without thinking go for it upto that 5-6%
This is free money and one should not leave it on the table, in case you decide to go back to India and as a result take out all the money from 401K and even if you have to pay penalty of 10%, it will be profitable transaction.<<

माझ्या माहितीनुसार, कंपनी ४०१(के) अकाउंट, रॉथ्/ट्रडिशिनल आयआरए हे वेगळे आहेत.

४०१(के) अकाउंट्स आर कंपनी स्पाँसर्ड डिफर्ड इन्कम प्लॅन. प्लॅन नुसार कंपनी $ मॅच करते. रॉथ्/ट्रडिशिनल आयआरए मध्ये तुम्ही डायरेक्ट काँट्रिब्युशन करु शकता किंवा ४०१(के) अकाउंटमधुन फंड्स रोलओवर करु शकता. बोथ आर ग्रेट वेहिकल्स फॉर द रिटायरमँट प्लॅनिंग.

रिगार्डलेस ऑफ योर सिचुएशन, अर्ली विथड्रॉल इज नॉट अ वाइज फिनांशियल डिसिजन; अन्लेस यो आर प्रिपेर्ड टु बुक लॉसेस...

>>4. DO NOT get lazy and greedy, avoid putting BIG Amount in single account.
Spread out amounts in multiple accounts and avoid having more than 100K in single account. FDIC insurance covers upto 250K so technically you can have upto 250K insured in any FDIC insured account.<<

इफ यु आर किपिंग $१००के+ फंडस इन बँक अकाउंट (चेकिंग, सेविंग, मनीमार्केट, सीडी) देन यु आर इदर स्टुपीड ऑर मल्टी-मिल्यनेर. हायर ए गुड सीएफपी टु मॅनेज योर मनी... Happy

अमेरिकेत रियल एस्टेट ट्र्स्ट स्टॉक ट्रेड होतात का? त्यात risk किति आहे आणि in general dividend yield किति असते.?

If you are talking about REITs, the risk is very high.
Better option is to invest in a mutual fund or ETF like VGSIX or VNQ.

https://personal.vanguard.com/us/funds/snapshot?FundId=0123&FundIntExt=INT
https://personal.vanguard.com/us/funds/snapshot?FundId=0986&FundIntExt=INT

US$ मधिल risk free गेन १९९९ ते २००० मध्ये ५ ते ८%, (FCNR) २००३ ते २००७ मध्ये ८ ते १०% ( rupees-, dollar आर्बिट्राज भारतिय बॅकेतुन) त्यानंतर परत तसा योग नाही आला.
आताच्या condition मध्ये जर रुपया वधारयला लागला तर तसा योग येउ शकतो, कसे ते वेळ मिळाल्यावर लिहिन, पण तो व्यवहार अमेरिकेतुन कसा करायचा ते माहित नाही. (सिंगापुर , हॉगकॉग वरुन कसे invest करायचे ते माहित आहे)

let me know if this calculation is right -

let's say CD rates in US banks is 2% ( thinking optimistically)
so for 100K you will get 2000 dollars per yr. after taxes (rounding to 30% tax) it will be 1400.

Assuming Dollar - rupee exchange rate of 60 , you would make Rs 84000 per yr.

If you put the same money in India FD at say 8%
so 100K = Rs. 60,00,000
Interest = Rs 4,80,000

After India and US taxes ( 30+30) = you would make Rs 1,92,000

So as long as you don't need the money back ( you can make it repatriable as well) saving money in india will expense your india travels Happy

Anything wrong with this calculation?

सशल, मला असा जनरल सल्ला (मित्र नि financial consultatnts) मिळाला होता कि 529 पेक्षाही स्वत:च्या retirement मधे आधी पैसे घालावे, त्यानंतर general investment मधे नि मग 529 मधे. फायदा हाच कि ते फक्त education शी bind होत नाहीत.>>>>>> +१

२००३-०७ च्या काळात रुपया continuous वधारत होता. त्या काळात exporters ना बराच त्रास होत होता. खास करुन long term contract घेताना. समजा एखाद्या प्रोजेक्ट्चा खर्च आणि नफा मिळुन ४.५ कोटी असेल तर त्यावेळीच्या दराप्रमाणे १ मिलियन डॉलर मध्ये प्रोजेक्ट घेउ शकतो. पण हे पैसे एक ते दोन वर्षानी मिळतात आणि त्यावेळी जर रुपया वधारला तर exporters ला नुकसान होउ शकते. exporters मार्केट मध्ये हेज करु शकतात पण RBI limitation आणि हाय हेज प्रिमियम मुळे त्याला मर्यादा आहेत. This gives business opportunity to Indian private banks & people who wants to keep money in US$. Banks like ICICI gets money from us (min $10,000) converts it in rupees & use it for business. Once they get money from exporter in US$, they divert that US$ to us & Indian rupees to exporter. Since they get hedge commission from exporters as well as this money is used in India for lending it at higher interest rate, so banks offer high yield. I got 8-10% between 2003-2007. Once rupee starts depreciating then there is no high yield contract notes available.
In Singapore/Hongkong, banks likes ICICI starts calling their clients with yield & duration, If you agree with them then we can go to bank, hand over money & sign the contract. They will send cheque at due date.

Never rollover your old company 401k to new company
Instead rollover your 401k (Roth or Traditional) into a Roth or Traditional IRA at a discount brokerage firm as applicable. This provides more options to invest in stocks/bonds/ETFs/Funds/etc.

DO NOT CONFUSE:
Now a days many companies offer 401k in two forms know as Traditional 401k and Roth 401k, when you rollover these accounts (usually after leaving the job), they get converted into Traditional IRA and Roth IRA.

Be cautious before opening UGMA/UTMA accounts as that money "legally" belonds to the minor and you are simply a custodian. Please do your research before allocating money to this account.

Hope this helps.... Happy

सुलु.. मी सांगतो तुझ्या कॅल्क्युलेशन मधे काय चुकत आहे ते..:)

उदाहरणः समज १९८५ मधे तु अमेरिकेत १ लाख डॉलर २ टक्क्याने गुंतवले असतेस.
दर वर्षी १५ टक्के कॅपिटल गेन्स टॅक्स देउन तुला १८५० डॉलर्स मिळाले.
समजायला सोप्पे म्हणुन कंपाउंड व्याजा ऐवजी सिंपल व्याज दर धरु.
२०१५ मधे १८५० गुणीले ३०(वर्षे)= ५५,५०० डॉलर्स तुझ्याकडे असले असते.
आज डॉलरचा भाव ६२ रुपये म्हणजे आज तुझ्याकडे ५५,५०० गुणीले ६२=३४,४१,००० रुपये असले असते.

समज तेच १ लाख डॉलर तु १९८५ मधे भारतात ८ टक्क्याने गुंतवले असतेस.
१९८५ मधे डॉलरचा भाव १२.५० रुपये एका डॉलरला.
१२,५०,००० रुपयावर ८ टक्याप्रमाणे दर वर्षी १ लाख रुपये व्याज.
१ लाखातले ३० टक्के(भारतिय टॅक्स) + १५ टक्के (कॅपिटल गेन्स अमेरिकन टॅक्स) जाउन ५५००० रुपये तुझ्या हातात.
५५००० गुणीले ३०=१६,५०,००० रुपये आज तुझ्या हातात असले असते.
१६,५०,००० भागीले ६२(आजचा डॉलरचा भाव)=२६,६१२ डॉलर्स तुझ्या हातात असले असते.

आता तु मला सांग आज ५५,५०० डॉलर्स चांगले की २६,६१२ डॉलर्स?
किंवा रुपयात ३४ लाख ४१ हजार चांगले की १६ लाख ५० हजार?

कळला का रुपयाच्या डिव्हॅल्युएशनचा परिणाम व तुझ्या कॅल्क्युलेशनमधली चुक? Happy

(आणी तुझ्या माहीतीसाठी.. तुला जर रुपये डॉलरमधे नंतर कन्व्हर्ट करायचे असतील(म्हणजे एफ सी एन आर अकाउंट) तर भारतात ८ टक्के व्याज कोणीही देत नाही Happy )

पण राज म्हणतो त्या प्रमाणे जर तुमच्याकडे २ लाख डॉलर गुंतवणुकीसाठी असतील तर ते बँकेत गुंतवणे हा शुद्ध वेडेपणा आहे हे माझेही मत!

Mukund, thanks for all that math.

Additionally to consider: Comparing a CD (India bank) to CD (US bank) might seem a right comparison but most people in the US (from what financial advisors say), opt for Govt/Muni treasury notes/bondfunds etc instead of CDs. They are almost as secure as a CD.
These notes yield 1) a higher interest rate between 4% to 5.5% and 2) depending on what you choose may be are tax-free/ lower taxes.

Adding these two factors + power of compound interest, the difference that Mukund mentioned is much much higher. So investing in the US is beneficial.
(That is why Indian Govt and media keeps on talking about incentives for NRI investments.)

काय हे सिमंतीनी... माझ्या वरच्या कॅलक्युलेशनमधला एक मोट्ठा मिस्सिंग पॉइंट कसा काही नाही पकडलास? Happy

सुलु.. मी तर मुद्दलाला विसरुनच गेलो होतो वरच्या उदाहरणात.. मुद्दलाचे १ लाख डॉलर माझे अमेरिकेत डॉलरच राहीले असते..... म्हणजे २०१५ मधे माझ्याकडे एकुण १,५५,५०० डॉलर्स किंवा रुपयात ९६,४१,००० रुपये असले असते.

तेच जर तु भारतामधे गुंतवले असते तर मुद्दल १२,५०,००० + व्याज १६,५०,०००= २९,००,००० रुपयेच असले असते! ( व कोणी तुला ते डॉलरमधे कन्व्हर्ट करुन दिले असते तर तुझ्याकडे फक्त ४६,७७४ डॉलर्सच असले असते.

तर फरक बघ.. १,५५,००० डॉलर्स(९६,४१,००० रुपये) अमेरिकेत ठेवले असतेस तर.. व ४६,७७४ डॉलर्स(२९,०००,०० रुपये) भारतात ठेवले असतेस तर! Sad

सुलू
तुमच्या कॅलक्युलेशन मध्ये (३०+३०) टॅक्स रेट तुम्ही ६०% पकडला आहे, पण ईफेक्टिव टॅक्स रेट तसा कसा कॅलक्युलॅट होईल? ईफेक्टिव टॅक्स रेट ६०% नव्हे तर ५१%

4,80,000 (१-३०%) (१-३०%)= २,३५,२०० राहणार ना तुमच्या खिश्यात. Happy

मुकुंद सुलूच्या पॉईंट ऑफ व्यू ने एकदम ३० वर्षांचा एक्सचेंज रेट न पकडता, एकेक-दोन दोन वर्षाच्या शॉर्ट टर्म पिरियड साठी (ज्या विंडोमध्ये एक्स्चेंज रेट ची वोलॅटिलिटी ५-७ % च्या मध्ये असेल) वरचे गणित त्यांनी दिले आहे.

हायझेनबर्ग.. माझ्या लक्षात आल सुलुला काय म्हणायचे ते.. सुलुने १ वर्षाचे उदाहरण घेतले... मी ३०! पण मला व सिमंतीनीला जो मुद्दा मांडायचा आहे तो लक्षात घेतला तरी पुरेसे आहे..... आकडे थोडे इकडे तिकडे होतील पण बॉटम लाइन तीच राहील असे माझे म्हणणे आहे.

करंसी मार्केट मधे कधी काय उलथापालथ होइल ते सांगता येत नाही.. तिच बाब इन्व्हेस्ट्मेंट बाबतीतही खरी आहे.

इथे या बीबी वर येणार्यांची इन्व्हेस्ट्मेंट टाइमफ्रेम वेगवेगळी असु शकेल व त्यामुळे वन साइझ फिट्स ऑल टाइप इन्व्हेस्टमेंट सांगणे कठीण आहे.

ज्यांना इथे कायमचे राहायचे आहे त्यांना ४०१ के, आय आर ए व रॉथ आय आर मधे पैसे गुंतवणे हे फायद्याचे आहे. आपल्या भारतिय लोकांच्या जास्त इन्कममुळे रॉथ आय आर ए चे इन्कम लिमिट आड येउ शकते.

जास्त डोकेदुखी करुन घ्यायची नसेल तर इंडेक्स फंड घेउन दिर्घ कालावधीसाठी बाळगुन राहणे उत्तम. मार्केटच्या अप अँड डाउन टाइमिंगला कॅच करायचा मोह सोडलात व इन्व्हेस्ट्मेंट मधे सारखी काढ घाल.. काढ घाल केली नाही तर चांगल अस माझ मत.

कुठलाही फंड घेताना त्याचा एक्स्पेन्स रेशो बघा. एनिथिंग अबॉव्ह ०.७ इज टु मच इन माय ओपिनिअन! ०.५ चा फरक ३० वर्षात किती पडेल याचे कॅल्क्युलेशन तुम्ही केलेत तर गरगरायला होइल.. म्हणुन वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे व्हॅनगार्ड सारखे कमी एक्पेन्स रेशोचे फंड घेणे केव्हाही किफायतशीर पडेल. फिडॅलिटि चे सुद्धा बरेचसे फंड खुप चांगले आहेत. याच कारणासाठी मनी मॅनेजरची मदत घ्यायची की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.. बहुतेक मनी मॅनेजर्स १.५ ते २ टक्के चार्ज मारतात! इव्हन १.२५ टक्क्याच्या त्यांच्या फिने.. ओव्हर अ लाँग रन.. आपल्या टेक होम अ‍ॅसॅट अधे कितीने फरक पडु शकतो हे एकदा कॅल्क्युलेट करुन बघा.. मग ठरवा की इज इट वर्थ हिज्/हर हेल्प!

जे अमेरिकेत राहणार आहेत त्यांच्या मुलांसाठी ५२९ खुप उपयोगाचे आहे. त्याचा फायदा स्टेट टॅक्स कमी करायलाही होतो.. तुम्ही किती डॉलर्स डिडक्ट करु शकता याचे लिमीट प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे असु शकते.

बाकी केदार सारखे फायनांसमधले एक्स्पर्ट जास्त सांगु शकतील.

आणी हो... सुलु.. जर डॉलरमधे पैसे ठेवुन परत मला डॉलरच मिळणार असतील व कोणती नॅशनल बँक मला भारतात ८ टक्के व्याज देत असेल तर माझी सगळी पुंजी मी त्या बँकेत ठेवायला तयार आहे.. गॅरंटेड ८ टक्के! यु कँट बिट दॅट... इव्हन अमेरिकन स्टॉक मार्केट हिस्टॉरिकली हॅव्हंट गिव्हन दॅट काइंड ऑफ रिटर्न्स!:)

>>तुमच्या कॅलक्युलेशन मध्ये (३०+३०) टॅक्स रेट तुम्ही ६०% पकडला आहे, पण ईफेक्टिव टॅक्स रेट तसा कसा कॅलक्युलॅट होईल? ईफेक्टिव टॅक्स रेट ६०% नव्हे तर ५१%<<

अरे बाबांनो, भारत-अमेरीका यांच्यात टॅक्स ट्रिटी आहे ना? मग डबल टॅक्सेशन कसं होइल? अमेरीकेतल्या टॅक्स रेसिडेंट्सना भारतात टॅक्स एक्झेंम्शन मिळणार नाहि का?

मुकुंद, हा मुद्दा तुझ्या उदाहरणात घेतलेलास का? Happy

Pages