मागचा रवीवार निसर्गाच्या सान्निध्यात अगदी सार्थकी लागला. आणि वाटायला लागलं की शहरी दिनक्रमात आपण जीवनातल्या अगदी सहज साध्या छोट्या छोट्या आनंदाला मुकतो.
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कान्होबाची वाडी व सातवड या दोन्ही खेड्यात असलेल्या पॉलीहाऊसला भेट देण्याचा योग आला.
ही गावं नगरपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहेत.
निसर्गाचा लहरीपणा किंवा अनियमितता कधीकधी पिकांसाठी फारच मारक किंवा हानिकारक ठरते. पण पॉलीहाऊसच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकरी अश्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी सक्षमपणे लढा देऊ लागलाय.
पॉलीहाउसमधे बाहेरच्या निसर्गाच्या लहरींचा आतल्या पिकांवर जवळजवळ शून्य परिणाम होतो.
कारण आतले तापमानही नियंत्रित करण्याची उत्तम सोय असते. त्याचबरोबर पॉलिथिनच्या शेडमुळे बाहेरच्या उनपाऊसवार्यापासूनही आतलं पीक सुरक्षित रहातं.
शिवाय याचमुळे पिकांवर कीड, रोग पडण्याची शक्यताही खूप कमी रहाते.
बाकी पिकाला पाणी देण्याची सोय ड्रिप इरिगेशनने केलेली असते. विहीरीला पंप बसवून ही पाण्याची सोय केलेली असते. विहिरीतून येणार्या पाण्याच्या पाईपला एक "वॉटर सॉफ्टनर"ही बसवलेला असतो. त्यामुळे पाण्यातले क्षार नष्ट होऊन क्षारविरहित हलकं पाणी शेतीला मिळतं.
आम्ही ज्या पॉलीहाऊसमधे उभे होतो तिथे अचानकच एसीचा गारवा जाणवायला लागला आणि अगदी प्रसन्न वाटायला लागलं. त्याचं कारण म्हणजे या पॉलीहाउसच्या छताला जोडलेले "फॉगर्स".
या फॉगरवर असलेल्या असंख्य अतिसूक्ष्म छिद्रांमधून बाहेर येणार्या पाण्याचं "फॉग" मधे रूपांतर होऊन हवा वरच्यावर थंड होते. आणि हे फॉगर्स आपण आपल्याला पाहिजे तेव्हा चालू करू शकतो.
कान्होबाची वाडी इथे फक्त जरबेराचं आणि सातवड इथल्या पॉलीहाऊसमधे फक्त सिमला मिरचीचं अशी पिकं घेतात. या सिमला मिरच्या हिरव्या, पिवळ्या आणि लाल अश्या तीन्ही रंगातल्या होत्या.
दोन्हा ठिकाणी प्रोजेक्टची मुख्य देखरेख घरातल्या स्त्रिया करताना दिसल्या. आणि पुरूष त्यांना लागेल तशी मदत करत होते. कारण पुरूष प्राथमिक शिक्षक, सरपंच अशी वेगववेगळी कामे प्रामुख्याने करीत असल्याने ते फक्त वीकेन्डसनाच उपलब्ध असतात.
याच शेतकर्याची संत्रा बाग सुद्धा होती. पण अवकाळी पावसाने यांचं बरंच नुकसान झालेलं दिसत होतं. पण जी काही संत्री झाडावर होती ती सुद्धा आपल्याला खूपच वाटतील इतकी लगडलेली होती.
संत्रा इतकी लगडली होती की प्रत्येक झाडाला सेपरेट मांडवच घालायला लागत होता.
हा झाडा खालचा संत्र्यांचा सडा
यांनी एक शेततळं सुद्धा बांधून घेतलेलं होतं.
जवळच्याच दुसर्या एका शेतकर्याने आपल्या शेततळ्यात मत्स्यशेतीचाही( फिश फार्मिन्ग) यशस्वी प्रयोग केला होता. बहुतेक शेततळी ३७/३८ फूट खोल होती.
सिमला मिरची पॉलीहाऊस
ही रोपं वरच्या दिशेने दोराने बांधलेली होती.
एकेक मिरची २०० ग्रॅमच्या आसपास/पुढे वजनाची होती.
हे ते शेततळं ज्याच्यात मत्स्यशेती केली जाते. हे आकाराने बरंच मोठं आहे.
मानुषीकाकू, मस्त माहिती.
मानुषीकाकू, मस्त माहिती. फुलांचे फोटो खूप छान आहेत. खूप खूप धन्यवाद.
फुलांचे फोटो खूप छान आहेत
फुलांचे फोटो खूप छान आहेत
वॉव मस्त भेट झाली असेल ना..
वॉव मस्त भेट झाली असेल ना.. फोटो पाहूनच रंगीबेरंगी, फ्रेश वाटलं..
तळं, विहीर, संत्र्या ची बाग सर्वच सुंदर सुंदर आहे..
ते शेवटले फोटो राहत्या घरांचे आहेत?? किती क्यूट आहेत..
बेल पेप्पर्स कसले टवटवीत आहेत,... त्यांच्यापुढे इथले हिरमुसलेले, कोमेजलेले वाटतात
मस्त फोटो. असे नीट मॅनेज
मस्त फोटो. असे नीट मॅनेज केले तर कुठल्याही हवामानातले पिक आपल्याकडे घेता येईल असे वाटते.
यावर लोकसत्तानेही खुप पुर्वी एक फोटोफिचर केले होते. अजूनही ते व्यवस्थित आहेत बघून खुप छान वाटले. दर्जेदार उत्पन्न असेल तर भावही योग्य मिळतोच.
केनयात असे गुलाबाचे पिक घेतात आणि तो त्यांचा महत्वाचा निर्यात उद्योग आहे.
खूप सुरेख! सगळे फोटो आवडले
खूप सुरेख! सगळे फोटो आवडले
मस्त फोटो नि माहिती
मस्त फोटो नि माहिती
फोटो पाहूनच रंगीबेरंगी, फ्रेश
फोटो पाहूनच रंगीबेरंगी, फ्रेश वाटलं..>>++११
किती सुदंर फुले आहेत ..
मेहनतीला सलाम त्यांच्या
वाह मानुषी - खूप सुंदर माहिती
वाह मानुषी - खूप सुंदर माहिती मिळाली आणि फोटोमुळे तर एकदम फ्रेश वाटायला लागलं ...
नगरसारख्या अतिशय कोरड्या भागात विहीरीला एवढे पाणी, इतके गच्च भरलेले शेततळे (ते देखील मार्च-एप्रिलमधे) हे पाहून खूपच आश्चर्य वाटले - इतके पाणी तिथे आले कुठून ???
मस्त!
मस्त!
सर्वांना धन्यवाद! वर्षू
सर्वांना धन्यवाद!
वर्षू ...... हे शेवटचे फोटो रहात्या घराचेच आहेत. पण आता फक्त एकच व्यक्ति या घरात रहाते. आणि आता तेही हे घर विकणार आहेत. आणि नगरला मुव्ह होणार आहेत.
दिनेश>>>असे नीट मॅनेज केले तर कुठल्याही हवामानातले पिक आपल्याकडे घेता येईल असे वाटते.>>>अगदी बरोबर. या भागातल्या खूप शेतकर्यांनी आता पॉलीहाउससाठी सुरवात केली आहे.
याला बरीचसबसिडी मिळते.
शशांक शेततळ्याचे पाणी मागील पावसाळ्याचेच असावे. आणि विहीरींना त्या भागात एवढे पाणी असते. पण मीही नीट चौकशी करीन.
फुलं सुंदर आहेतच पण एकुणात
फुलं सुंदर आहेतच पण एकुणात एकदम हेल्दी पीक आहे.
गुलमोहोर-प्रकाशचित्रण ग्रुपात धागा काढल्यावर शीर्षकात 'फोटोसहीत' नाही लिहिलं तरी चालेल
खूप सुंदर माहिती आणी फोटो
खूप सुंदर माहिती आणी फोटो
जितकी माहिती सविस्तर आणि
जितकी माहिती सविस्तर आणि उपयुक्त तितकेच फोटोनीही सारे वातावरण प्रसन्न करून टाकले. सुरुवातीच्या फुलांच्या रांगा पाहून मला येथील एक सदस्य कुलु यानी चालू केलेल्या स्वीस जादू लेख मालिकेतील फोटो आठवले.
मानुषी यांच्या लेखातील "...प्रोजेक्टची मुख्य देखरेख घरातल्या स्त्रिया करताना दिसल्या. आणि पुरूष त्यांना लागेल तशी मदत करत होते...." हे वाक्य खूप काही सांगून जाते.
अगदी अगदी सुंदर आणि माहिती तर
अगदी अगदी सुंदर आणि माहिती तर उपयुक्त आहेच. जायला हवे एकदा! स्वित्झर्लंड फिरलोय आणि आपल्या जवळचंच केव्हढं बघायचं राहीलय!
मस्त. डोळे निवले पाहून.
मस्त. डोळे निवले पाहून.
मस्त आहे.
मस्त आहे.
खूप छान. मानुषी हे असे ग्रीन
खूप छान.
मानुषी हे असे ग्रीन हाउसेस सांगली जिल्ह्यात शासनाकडून सबसिडी घेवून खूप शेतकर्यांनी चालू केलेले. खूप नुकसान होवून आता रिकामी पडून आहेत. बरचसं पीक उचललं जात नाही. उत्पादनाचा खर्च भरपूर आहे. वाहन व्यवस्था चांगली नाही इत्यादी बरीच कारणं. एका वेळी मी हे करायच खूप डोक्यात घेतलेलं.
आता तुमचे फोटो बघून परत ते सगळ आठवलं.
गुलमोहोर-प्रकाशचित्रण ग्रुपात
गुलमोहोर-प्रकाशचित्रण ग्रुपात धागा काढल्यावर शीर्षकात 'फोटोसहीत' नाही लिहिलं तरी चालेल डोळा मारा>>>>>>>>
अग्गोबाई सिंडी .....खरंच की!
मी अनू, अशोक पाटील, कुलू, झेलम, बाळू आणि सीमा धन्यवाद.
सीमा सांगली जिल्ह्यातलं वाचून वाईट वाट्लं.
मानुषी, मस्त माहिती आणि
मानुषी, मस्त माहिती आणि अप्रतिम फोटो.
घराचे फोटो ही खूप आवडले. .
. पण आता फक्त एकच व्यक्ति या घरात रहाते. आणि आता तेही हे घर विकणार आहेत. आणि नगरला मुव्ह होणार आहेत. >>> वाचुन वाईट वाटले. एवढ्या सुंदर घरात कोणी नाही रहायला !!
वॉव. मस्तच आहे सर्व. खूप छान.
वॉव. मस्तच आहे सर्व. खूप छान.
ममो ...........वाचुन वाईट
ममो ...........वाचुन वाईट वाटले. एवढ्या सुंदर घरात कोणी नाही रहायला !!>>>>>>>>>> हं...:( :
ममो. अन्जू धन्यवाद
ही घरे फोटोत दिसायला कितीही
ही घरे फोटोत दिसायला कितीही बरवी असली तरी ती अत्यण्त कोंदट, अनारोग्यकारी आणि गैर्सोयीची असतात. नगर जिल्ह्यात असाच पॅटर्न ६०-७० वर्षापूर्वी होता . याला वाडा असे म्हणतात. अंतर्भागात दिवसाही काळोख असतो. त्याकाळचे बिल्डिंग मटेरियल माती, दगड , लाकूड एवढेच असे . विटाही फार थोड्या. ३-४फूट रुंदीच्या मातीच्या भिंती. लोखंड फक्त खिडक्यांच्या गजापुरते . त्या खिडक्या खूप छोट्या आणि कमीत कमी. त्यात चोरांपासून सुरक्षेचाही एक भाग होताच. रॉकेलच्या चिमण्या, धूर ओकणार्या चुली यामुळे स्त्रियांचे जीवन कष्टप्रद आणि अत्यंत अनारोग्यकारी असे. भिंतीना ओलावे हा आणखी एक प्रकार. आताचे बिल्डिंग मटेरियल सोपे सुटसुटीत , भरपूर प्रकाश देणारे , बांधकामास सोपे, स्वच्छतेस सोपे असल्याने ही अवजड स्ट्रक्चर्स बंद झाली जे आवश्यक होते....
रॉहू.......... अगदी बरोबर.
रॉहू.......... अगदी बरोबर.
फक्त या अश्या घरांमधे नैसर्गिक थंडावा/ टेम्परेचर मेन्टेनन्स असायचा.
एस्पेश्यली हे घर तर १०० वर्षांपूर्वीचे असावे. घरमालक म्हणाले .........घर विकणार म्हणजे जागा विकणार आणि गिर्हाइक घर पाडून त्यातल सागवानाचा रियूज करणार कारण हे उत्तम प्रतीचे सागवान आहे.
वॉव मस्त माहिती आणि फोटोज
वॉव मस्त माहिती आणि फोटोज
खुप मस्त, माहिती आणि फोटो
खुप मस्त, माहिती आणि फोटो दोन्हीही.
म नु षी ताई खुप छान लिहिता
म नु षी ताई खुप छान लिहिता तुम्ही....
पॉली हाऊस बddl खुप मst माहिती मि ळाली..
प्र ची.. त र आ हा हा....
A1 एव्हढेच म्हणीन!
A1 एव्हढेच म्हणीन!
वेका, नरेश माने, सायलीआणि
वेका, नरेश माने, सायलीआणि अतृप्त............धन्यवाद.
फोटो पाहूनच इतक प्रसन्न
फोटो पाहूनच इतक प्रसन्न वाटल.तिथ गेल्यावर किती वाटत असेल.धन्यवाद मानुषी.
वा सुंदर उपक्रम आहे हा...
वा सुंदर उपक्रम आहे हा... फोटो छानच
Pages