आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
मी आधी म्हटल्याप्रमाणे मार्था ही महा-उत्साही बाई. डॅनीला खुश करण्यासाठी काहीही करताना मागे-पुढे बघायची नाही! डॅनीला बोट रायडिंग करायला फार आवडायचं. पायानं अधु असल्यानं हाताने वल्हवता येईल अशी त्याची स्पेशल नाव होती. पण डॅनीला दिशा-ज्ञान नव्हतं. त्यामुळे नावेत दरवेळी त्याच्याबरोबर कोणीतरी असणं आवश्यक असायचं, जेणे करुन परत काठावर कसं यायचं हे त्याला सांगायला. जनरली, या कामासाठी स्वयंसेवक असतात. फक्त वसंत आणि शिशिरातच या रायडिंगसाठी जाता यायचं, या सीझन मधलं हे पहिलं रायडिंग होतं आणि मार्थाला मी आधीच सांगुन टाकलं की कुठल्याही स्वयंसेवकाची गरज नाही. मी आहे. मग काय त्या सुंदर दिवशी आम्ही सकाळी आठलाच घरातुन बाहेर पडलो! जिथे बोटींग ला जायचं ते लेक सुरसी हे दीड तासावर. नेहमीप्रमाणे प्रवास सुंदरच झाला.
गाडीत मी, मार्था,हंस रुवेदी आणि डॅनी. त्यावेळी मार्थाची जुनी हिरवी गाडी होती! नेहमीप्रमाणे मार्थाने गाडी स्वीस राना कुरणांतुन नेली. मि. भास्कर पण प्रसन्न होते.
वाटेत एका छोट्याशा खेड्यात एक बॅझिलिका होती. मार्थाने तिथे गाडी थांबवली. मग आमची चौकडी बॅझिलिका मधे घुसली. खरं एव्हढ्याशा त्याखेड्यात एका मध्यवर्ती टेकडीवर वसलेली ती प्रचंड वास्तु. तिथेच कडेला त्यांची सिमेटरी होती देखिल होती.
त्यालाच अॅटॅच्ड अशी ननरी होती. आणि ननरी आणि बॅझिलिकाला जोडणार्या पॅसेज मध्ये सुंदर हिरवळ होती!
मधल्या पॅसेज वर पिसार्यासारखे हे वेगवेगळे झेंडे मांडले होते.
मग आत गेलो बॅझिलिकाच्या मुख्य गाभार्यात.
हे तिथले शोभिवंत छत!
आणि छतावरले भव्य चित्र!
स्वित्झर्लंडचे एक वैशिष्ट्य असं की गाव कितीही छोटे असो, तिथल्या मुख्य चर्च मध्ये ऑर्गन असतोच असतो आणि दर रविवारी तो युज पण केला जातो!
मुर्त्यांना सोन्याचा मुलामा दिलेला!
हे मुख्य पुजा स्थान!
आतल्या भिंतींवर पण झेंडे गाडलेले होतेच!
बॅझिलिकेच्या भोवती दगडी कुंपण होतं जे तिला गावापासुन वेगळं ठेवत होतं.
हे त्या कुंपणातलंच एक छोटंसं दार. त्यातुन ये जा करायची!
आणि हे कुंपणाबाहेरंचं जग. अगदी छोटं गाव पण त्याला स्वतःच सुंदर गावठाण होतं. हे असं काही बघितलं की लक्ष्यात येत की युरोप हे फक्त निसर्गामुळे संदर नाही, पण ह्या अशा छोट्या गावठाणांची जी निगा ठेवली जाते त्यामुळे देखिल.
तळ्याजवळ पोहोचलो बरं आता. तळ्याच्या एक बाजुला स्वीस पॅराप्लेजिक सेंटर ची भव्य इमारत आहे, त्यात त्यांचं प्रशिक्षण केंद्र, दवाखाना आणि पुनर्वसन केंद्र पण आहे. इथेच डॅनीच्या पायावर शस्त्रक्रीयादेखिल झाली होती. त्यांच्याच गॅरेज मध्ये डॅनीची नाव होती. आम्ही ती डिसलॉज करुन तळ्याच्या काठाला नेली! आणि त्यात मागे डॅनी वल्हवायला आणि पुढे मी असे बसलो!
हे ध्यान मीच!
ही आमची धिटुकली
आणि त्यावेळी सुरसीने खुप आनंद दिला, एव्हढसं तळं पण आयुष्यभर पुरुन उरेल एव्हढा आनंद दिला त्याने! अनिलांचीतळ्याकाठी ही कविता सार्थ करणारं सुरसी
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत
दुर कडेला वसलेलं दिसतंय ते नॉटविल नावाचं खेडं! ह्या खेड्यात जन्माला येणार्यांनी नशिब काढलं खरंच!
जवळ जवळ तासभर आत होतो. मजा आली. डॅनी एकदम आवडीने वल्हवत होता. अंगात असलेली प्रचंड ऊर्जा जी एरव्ही वापरता येत नाही, ति इथे बिनधास्त वापरत होता!
सगळं झाल्यावर आलो पून्हा निस्तब्ध तळ्याच्या काठी!
मग डॅनीची आवरा-आवर!
मग जेवायला त्याच संस्थेच्या कँटीन मध्ये!
हा जेवणानंतरचा मस्त केक!
मग बर्याच गपा मारल्या आम्ही तिथे बसुन. अगदी मार्थाच्या बालपणापासुन ते तिच्या घटस्फोटापर्यंत. स्वीस मुलाशी लग्न करायला नकार देऊन आधीच आई वडीलांची नावडती झालेली, मग साऊथ आफ्रिकेत जाऊन १२ वर्षे स्वीस बँकेत तिने जॉब केला. तिथेच लग्न केलं. नंतर स्वित्झर्लंड मधे परत आल्यावर नवर्याचे बाहेरचे नको ते उद्योग सुरु झाले. त्याच काळात डॅनीचा जन्म, आधीच प्रीमॅच्युअर बेबी, त्यात मेनिंगोकोकल इन्फेक्शन झालं, डॅनी पॅराप्लेजिक झाला! इकडे तर आई वडीलांनी बोलायचं पण सोडुन दिलेल. नवर्याशी घटस्फोट झाला. हे सगळ सोसुन आयुष्याला पुरुन उरलेली ही बाई आज माझ्यासमोर बसुन म्हणते, One must live life! Its just amazing! Literally!!
आता परतीचा प्रवास सुरु. ५ वाजले होते. उन्हे कलायला लागली.
सगळीकडे पुरीया धनश्री भरुन राहिलेला!
ही माझी सावली
मार्थाने सुर्यास्त दाखवण्यासाठी एका टेकडीवर नेल मला!
सुर्यास्ताच्या वेळी सुरसीचं एक वेगळंच रुप दिसलं मला!
त्याची एक बाजु अंधारात आणि दुसरी प्रकाशात!
अनिलांनी जे म्हटलंय, ती इच्छा आज पुर्ण झाली
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
आता असं वाटतंय तू तिथे
आता असं वाटतंय तू तिथे असताना मी यायला हवं होतं, म्हणजे अशा सुंदर जागा बघता आल्या असत्या... सुंदर फोटो आणि लेखन.
आणि मार्थाला भेटायला नक्कीच आवडलं असतं !
कुलु कसल्या रे ठाशीव रंगरेषा
कुलु कसल्या रे ठाशीव रंगरेषा उधळून दिल्या आहेस इथे ! फोटोज आहेत की चित्रं पाहातेय कळेनासं झालं. डोळे निवले. अनिलांचं तळं तुझ्यामुळे दिसलं. मस्त निरीक्षणं एकेक तुझी ! मार्थाला सलाम फक्त.
सुरेखच रे अनिलांचं
सुरेखच रे
अनिलांचं तळं........अगदी खरं भारतीताई
मस्तच.. कुलू मार्थाला
मस्तच..
कुलू मार्थाला क्लासिकलचं वेड लावलंस की नाही..
दिनेश +१०० सुप्पर्ब!!!
दिनेश +१००
सुप्पर्ब!!!
कुलू तुमच्या प्रवासवर्णनांची
कुलू तुमच्या प्रवासवर्णनांची वाट बघते मी. फारच ओघवती भाषा आहे तुमची.
सुंदर फोटोज. सिमेटरी तर एखादं
सुंदर फोटोज.
सिमेटरी तर एखादं पेंटिंगच वाटतयं.
अहाहा कुलु, क्या बात है. सो
अहाहा कुलु, क्या बात है.
सो नाईस ऑफ यु. तुझ्याबरोबर आम्हाला फिरवतोस.
नवऱ्याला पण दाखवले. तो पण इम्प्रेस झालाय तुझ्यावर, काय सुंदर फोटोग्राफी आहे, किती सुंदर लिहितो हा आणि संगीताचे पण ज्ञान.
ती मार्था पण तुझ्यासारखीच नाईस आहे रे.
शेवट पण सुंदर.
अरे कुलु काय अप्रतीम रित्या
अरे कुलु काय अप्रतीम रित्या दाखवतोयस ते स्वित्झरलन्ड!
लिखाण फोटो .......!
की युरोप हे फक्त निसर्गामुळे संदर नाही, पण ह्या अशा छोट्या गावठाणांची जी निगा ठेवली जाते त्यामुळे देखिल.
+१००.
पूरिया धनश्री ऐकू आला बरं!
आणि अनिलांची कविताही ठायी ठायी दिसली.
लगे रहो!
कुलु जियो... एकदम जनसम्मोहिनी
कुलु जियो... एकदम जनसम्मोहिनी झालाय हा लेख...
कुलु जियो... एकदम जनसम्मोहिनी
कुलु जियो... एकदम जनसम्मोहिनी झालाय हा लेख... >>>> आपने तो मेरे मुंह की बात छीन ली ...
खरंच, एखाद्या बुजुर्ग उस्तादजींनी एखादा सुंदर राग -विस्तार करावा आणि त्या रागाला काही सुरेख आकार असावा (फोटोग्राफी) आणि सुगंधही ... इतका अप्रतिम लेख .....
रंग रंग रंग आणि ही उधळण सुंदर
रंग रंग रंग आणि ही उधळण सुंदर सुंदर करून गेले....दृष्टी आणि मनही. आरशासारखे सारे काही चकचकीत असा जो वाक्यप्रयोग आपण वेळोवेळी करतो त्याचे मूर्तीमंत उदाहरण प्रत्येक चित्रात अगदी स्पष्टपणे उमटले आहे.
तुझी लेखनशैलीही किती फ़ुलली आहे ते अगदी सहजपणे जाणवत आहे. तरीही एक किरकोळ सूचना करण्याची इच्छा झाली आहे. सुरुवातीला तू लिहिले आहेस.... "...आमची चांडाळ चौकडी बॅझिलिका मधे घुसली....." ~ हे वाक्य बदल आणि "आमची चौकडी बॅझिलिका मधे घुसली." एवढेच कर. कशाला या देखण्या चित्राला त्या नकोशा वाटणा-या नामाचा ठिपका ?
"हे ध्यान मीच" या चित्रातील तुझ्या डोक्यावरील टोपी सध्या माझ्या घरात आहे, हे तुला माहीत आहे ना ?
तुला दुपारच्या झोपेवर नेहेमीच
तुला दुपारच्या झोपेवर नेहेमीच विजय मिळो .
मस्तच तळ अन मस्तच लेखन. लिहित रहा रे.
काय गोड लिहिलय... कवीतेचा
काय गोड लिहिलय...
कवीतेचा चपखल वापर...
मस्तच लिहलयं
मस्तच लिहलयं
मस्तच तळ >>>>> सॉरी इन्ना
मस्तच तळ >>>>> सॉरी इन्ना ...........पटकन वाटलं कुलूने काय तळायला घेतलंय?
नंतर लक्षात आलं ळ वरचा अनुस्वार चुकून राहिलाय.
राँग विंडो
राँग विंडो
मस्त..
मस्त..
अप्रतिम प्रचि आणि सुन्दर
अप्रतिम प्रचि आणि सुन्दर वर्णन ,पु भा प्र
कुलु, तुमचे स्वित्झर्लंडचे
कुलु, तुमचे स्वित्झर्लंडचे सगळे भाग पाहिले. अप्रतिम फोटो. एकदम आखिव रेखिव चित्रासारख्या.
लिखाणदेखिल सुंदर...
काय मस्त सफर घडवलीस रे कुलु!
काय मस्त सफर घडवलीस रे कुलु! अप्रतिम लेखन, फोटु......
लेखन व फोटो दोन्ही अप्रतीम!
लेखन व फोटो दोन्ही अप्रतीम!
दिनेश, मानुषी, मामा, भारती
दिनेश, मानुषी, मामा, भारती ताई, अमेय, दाद, अंजु, रश्मी, मंजुताई, मधु-मकरंद, इन्ना, अनिरुद्ध, लंपन, चनस, श्री, वर्षु, चर्चा, हिम्स्कुल खुप खुप आभार! तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन मी बघितलेला स्वित्झर्लंड इथे पोहोचविण्याचा उत्साह वाढतो!
दिनेश, तु खरंच यायला हवं होतंस. मस्त फिरता आलं असतं अजुन!
मामा, तुम्ही म्हणताय तो बदल केला
अंजु तुझ्या नवर्याला पण धन्यवाद दे!
दाद, भारती ताई, पुरंदरे काका ........काय भारी प्रतिक्रिया दिलेत तुम्ही! पुन्हा पुन्हा वाचल्या!
हायझेनबर्ग, राँग विंडो का?
हिम्सकुल मार्थाला कुठलंही संगीत खुप ऐकलं की डोकं दुखायचं! तिला सतार आवडायची पण. निखिल बॅनर्जी ऐकायची माझ्याबरोबर.
अतिसुन्दर फोटो !
अतिसुन्दर फोटो !
खूप सुंदर सिरीज आहे ही तुमची,
खूप सुंदर सिरीज आहे ही तुमची, कुलु! नेत्रसुखद आणि तितकंच छान लेखन सुद्धा. आवडलं.
कविता, मार्था, तळे आणि फोटो
कविता, मार्था, तळे आणि फोटो सगळेच छान!
खूप सुंदर आणि मनापासून लिहिलाय हा लेख.
निव्वळ अप्रतिम !! प्रत्येक
निव्वळ अप्रतिम !! प्रत्येक फोटो सुंदर आणि लिखाणही कवितेसारखं ओघवत..मनाला खूप आल्हाद वाटतो असा सुरेख निसर्ग बघून ...
निलेश, साती, मैथिली, rmd खुप
निलेश, साती, मैथिली, rmd खुप खुप धन्यवाद
छानच लिहिलय. मार्था भेटणं
छानच लिहिलय.
मार्था भेटणं नशीब आहे. बोटीचे पुर्ण चित्र टाकायचे ना?
आणि हो, इतक्या लहान वयाचे ( अवघे २५) असून सुद्धा चांगली आवड आहे.
लिहित रहा... (वय सांगू नका परत .. दोन भागात वाचले) ह. घ्या.
झंपी थांकु या भागात कुठे वय
झंपी थांकु या भागात कुठे वय आलंय
Pages