स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी !

Submitted by kulu on 25 March, 2015 - 08:32

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065

मी आधी म्हटल्याप्रमाणे मार्था ही महा-उत्साही बाई. डॅनीला खुश करण्यासाठी काहीही करताना मागे-पुढे बघायची नाही! डॅनीला बोट रायडिंग करायला फार आवडायचं. पायानं अधु असल्यानं हाताने वल्हवता येईल अशी त्याची स्पेशल नाव होती. पण डॅनीला दिशा-ज्ञान नव्हतं. त्यामुळे नावेत दरवेळी त्याच्याबरोबर कोणीतरी असणं आवश्यक असायचं, जेणे करुन परत काठावर कसं यायचं हे त्याला सांगायला. जनरली, या कामासाठी स्वयंसेवक असतात. फक्त वसंत आणि शिशिरातच या रायडिंगसाठी जाता यायचं, या सीझन मधलं हे पहिलं रायडिंग होतं आणि मार्थाला मी आधीच सांगुन टाकलं की कुठल्याही स्वयंसेवकाची गरज नाही. मी आहे. मग काय त्या सुंदर दिवशी आम्ही सकाळी आठलाच घरातुन बाहेर पडलो! जिथे बोटींग ला जायचं ते लेक सुरसी हे दीड तासावर. नेहमीप्रमाणे प्रवास सुंदरच झाला.
गाडीत मी, मार्था,हंस रुवेदी आणि डॅनी. त्यावेळी मार्थाची जुनी हिरवी गाडी होती! नेहमीप्रमाणे मार्थाने गाडी स्वीस राना कुरणांतुन नेली. मि. भास्कर पण प्रसन्न होते.

वाटेत एका छोट्याशा खेड्यात एक बॅझिलिका होती. मार्थाने तिथे गाडी थांबवली. मग आमची चौकडी बॅझिलिका मधे घुसली. खरं एव्हढ्याशा त्याखेड्यात एका मध्यवर्ती टेकडीवर वसलेली ती प्रचंड वास्तु. तिथेच कडेला त्यांची सिमेटरी होती देखिल होती.

त्यालाच अ‍ॅटॅच्ड अशी ननरी होती. आणि ननरी आणि बॅझिलिकाला जोडणार्‍या पॅसेज मध्ये सुंदर हिरवळ होती!

मधल्या पॅसेज वर पिसार्‍यासारखे हे वेगवेगळे झेंडे मांडले होते.

मग आत गेलो बॅझिलिकाच्या मुख्य गाभार्‍यात.

हे तिथले शोभिवंत छत!

आणि छतावरले भव्य चित्र!

स्वित्झर्लंडचे एक वैशिष्ट्य असं की गाव कितीही छोटे असो, तिथल्या मुख्य चर्च मध्ये ऑर्गन असतोच असतो आणि दर रविवारी तो युज पण केला जातो!

मुर्त्यांना सोन्याचा मुलामा दिलेला!

हे मुख्य पुजा स्थान!

आतल्या भिंतींवर पण झेंडे गाडलेले होतेच!

बॅझिलिकेच्या भोवती दगडी कुंपण होतं जे तिला गावापासुन वेगळं ठेवत होतं.

हे त्या कुंपणातलंच एक छोटंसं दार. त्यातुन ये जा करायची!

आणि हे कुंपणाबाहेरंचं जग. अगदी छोटं गाव पण त्याला स्वतःच सुंदर गावठाण होतं. हे असं काही बघितलं की लक्ष्यात येत की युरोप हे फक्त निसर्गामुळे संदर नाही, पण ह्या अशा छोट्या गावठाणांची जी निगा ठेवली जाते त्यामुळे देखिल.

तळ्याजवळ पोहोचलो बरं आता. तळ्याच्या एक बाजुला स्वीस पॅराप्लेजिक सेंटर ची भव्य इमारत आहे, त्यात त्यांचं प्रशिक्षण केंद्र, दवाखाना आणि पुनर्वसन केंद्र पण आहे. इथेच डॅनीच्या पायावर शस्त्रक्रीयादेखिल झाली होती. त्यांच्याच गॅरेज मध्ये डॅनीची नाव होती. आम्ही ती डिसलॉज करुन तळ्याच्या काठाला नेली! आणि त्यात मागे डॅनी वल्हवायला आणि पुढे मी असे बसलो!

हे ध्यान मीच!

ही आमची धिटुकली

आणि त्यावेळी सुरसीने खुप आनंद दिला, एव्हढसं तळं पण आयुष्यभर पुरुन उरेल एव्हढा आनंद दिला त्याने! अनिलांचीतळ्याकाठी ही कविता सार्थ करणारं सुरसी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत

दुर कडेला वसलेलं दिसतंय ते नॉटविल नावाचं खेडं! ह्या खेड्यात जन्माला येणार्‍यांनी नशिब काढलं खरंच!

जवळ जवळ तासभर आत होतो. मजा आली. डॅनी एकदम आवडीने वल्हवत होता. अंगात असलेली प्रचंड ऊर्जा जी एरव्ही वापरता येत नाही, ति इथे बिनधास्त वापरत होता!

सगळं झाल्यावर आलो पून्हा निस्तब्ध तळ्याच्या काठी!

मग डॅनीची आवरा-आवर!

मग जेवायला त्याच संस्थेच्या कँटीन मध्ये!
हा जेवणानंतरचा मस्त केक!

मग बर्‍याच गपा मारल्या आम्ही तिथे बसुन. अगदी मार्थाच्या बालपणापासुन ते तिच्या घटस्फोटापर्यंत. स्वीस मुलाशी लग्न करायला नकार देऊन आधीच आई वडीलांची नावडती झालेली, मग साऊथ आफ्रिकेत जाऊन १२ वर्षे स्वीस बँकेत तिने जॉब केला. तिथेच लग्न केलं. नंतर स्वित्झर्लंड मधे परत आल्यावर नवर्‍याचे बाहेरचे नको ते उद्योग सुरु झाले. त्याच काळात डॅनीचा जन्म, आधीच प्रीमॅच्युअर बेबी, त्यात मेनिंगोकोकल इन्फेक्शन झालं, डॅनी पॅराप्लेजिक झाला! इकडे तर आई वडीलांनी बोलायचं पण सोडुन दिलेल. नवर्‍याशी घटस्फोट झाला. हे सगळ सोसुन आयुष्याला पुरुन उरलेली ही बाई आज माझ्यासमोर बसुन म्हणते, One must live life! Its just amazing! Literally!!

आता परतीचा प्रवास सुरु. ५ वाजले होते. उन्हे कलायला लागली.

सगळीकडे पुरीया धनश्री भरुन राहिलेला!

ही माझी सावली Proud

मार्थाने सुर्यास्त दाखवण्यासाठी एका टेकडीवर नेल मला!

सुर्यास्ताच्या वेळी सुरसीचं एक वेगळंच रुप दिसलं मला!
त्याची एक बाजु अंधारात आणि दुसरी प्रकाशात!

अनिलांनी जे म्हटलंय, ती इच्छा आज पुर्ण झाली

हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

One must live life .. अगदी .
इतक्या सुंदर ठिकाणी जर कुणी डिप्रेशन मधे जात असेल तर त्याला शब्दशः एलियन म्हणावं..
काय एक एक जागेची ओळख करुन देताय कुलु तुम्ही .. अगदी आखुन माखुन कोरलेल्या आहेत.. सगळ काही कॅन्व्हास वाटतयं .. प्रेमात पडायला सुंदर आहे स्वित्झर्लंड Happy .. तरीच मी म्हटल लोक हनीमुनला इथ का जातात ते..
अप्रतीम .. शब्द अपुरे पडताहेत मला भावना व्यक्त करायला..
आणि काय मस्त ओनर आहे तुमची.. इतक छान जुळवून घेणारी ..
आम्हाला इथे मेले भाऊ आला तरी डोळे वटारुन बघणारेच भेटलेत .. असो..
खरच खुप खुप सुंदर आहेत सगळे प्रचि आणि लेखनहि Happy

प्रिती, टीना, साधना, सुजा धन्यवाद Happy
आम्हाला इथे मेले भाऊ आला तरी डोळे वटारुन बघणारेच भेटलेत .. असो..>>>>>>>> उडदामाजी काळे गोरे म्हणायचे अन सोडुन द्यायचं टीना. मुळात बाहेर कुठेही फारसं दुसर्‍याच्या मॅटर मध्ये स्वतःहुन नाक खुपसणे नाहीच, त्यामुळे डोळे वटारुन बघणे वगैरे नाहीच जवळ जवळ! Happy

Pages