मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> अतिशय गोपनीय चर्चेत चहा कांदापोहे खाताना ठरल्याप्रमाणे जय चायना साठी प्रेझेंटेशन बनवून पैसे कमावणार आहे. <<<<
Sad माझ्या नावच्या अ‍ॅक्टरकडून हे काय काय करवून घेताहेत? शोभत नाही हो..... Proud

अहो लिम्बुभाऊ, मागे त्या सुहासने ( जयचा मित्र) जयच्या सान्गण्यावरुन केतकर काकान्चा पाठलाग केलेला असतो आणी बाकी परिस्थिती जय-अदिती खोटे बोलुन लपवतात म्हणून काका भडकतात.

तरी काका बोल्तात की अजून काही खोटे असेल तर मला आत्ताच सान्गा, नन्तर मी ऐकणार नाही. तर जय-अदिती बोलु पहातात ( त्यान्चे ऑफिसमध्ये लपवलेले लग्न वगैरे) तर काकु त्याना बोलु देत नाहीत.

धन्य ही सिरीयल आणी धन्य आम्ही पहाणारे.

तरी काका बोल्तात की अजून काही खोटे असेल तर मला आत्ताच सान्गा, नन्तर मी ऐकणार नाही. तर जय-अदिती बोलु पहातात ( त्यान्चे ऑफिसमध्ये लपवलेले लग्न वगैरे) तर काकु त्याना बोलु देत नाहीत.>> म्हणजे सगळे खरे अजुन सांगितलेच नाही Uhoh आणि काकू का म्हणे लपवतात???? बहुदा सिरेलीत पाणी घालायला Proud

ओके ओके... थ्यान्क्स.
काल माझे टीव्हीकडे लक्ष नव्हते, मी कॉम्प्युटरवर एक्सेल मधे फॉर्म्युले लावत बसलो होतो.

Mi pahatch nahi..
Tyache title track sodle ki baki kahi avdat nahi.. "tujhyasave asuni tujhyavina jagayache reeeeeeee kase" te hi gayikechi lay avadli mhanun

तुज्यासवे असुनी
तुज्याविना जगायचे रे कसे ?

अनोळखी नसुनि
अनोळखी मानयाचे कसे ?

अन्तरात् राहुणी अन्तर कसे नाते ?
नाते कोणते जपु अन कसे ?
हसता हसता आसु टीपने

तुज्यासवे ......

तुज्याविना……

नकोसा तरी हवा

का रे दुरावा असा……

का रे दुरावा हा ……
थोडा विसावा ……

का रे दुरावा
का रे दुरावा

मी ही मालिका बघत नाही.. पण पहिल्यापासून काकूंप्रमाणे काकाना खरं न सांगायला काही कारण होतं का? की पाणी घालण्यासाठी ... Happy

जर केतकर काकांनी टिळकांना घराबाहेर काढले तर अरूण नलावडेंचा रोल संपणार. संपवायचाच असेल (बजेट) तर मग ते नक्की बाहेर काढतील.

ऑफिस मध्ये मोठ्या वयाच्या माणसाला काका म्हणतात का ? नवरे काका/अरविंद काका? काही तरी विचित्र वाटत . म्याडम आणि सर म्हणायला पाहिजे न ?

घरगुती वातावरण आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. Happy
त्या अविनाशच्या आईला पण आऊ म्हणतात... मॅडम म्हटलेले आवडत नाही त्यांना.

कैच्याकै.
घरगुती वातावरण पाहिजे पण घरोबा केलेला चालत नाही .
इथली चर्चा वाचून , तुनळीवर काही रँडम भाग बघितले .
त्या आउ दाभोळकरांशी कीती लाडात बोलत होत्या .
" पण आमची तुमच्या बद्द्ल एक तक्रार आहे "
जुई छान आहे . आणि ती दूसरी , भवानीच आहे .

त्या आउ दाभोळकरांशी कीती लाडात बोलत होत्या .
" पण आमची तुमच्या बद्द्ल एक तक्रार आहे ">>> Rofl

त्यांच्याकडे संवादच नसतात रोज बोलायला. एक नसलेल्या इश्यू घेऊन दळत बसतात झालं!

ति त्यांची रिसेप्शनिस्ट नैना का नसते आजकाल? Uhoh
रजनी पण गेले काही भाग गायब आहे. तिला शिसारी असेल या पाणिदार सिरियलची Proud

रजनी पण गेले काही भाग गायब आहे. तिला शिसारी असेल या पाणिदार सिरियलची <<< एखादी मूवी मिळाली असेल.

आली की रजनी परत. तिचे ड्रेस लय भारी असतात, मला लय म्हन्जी लयच हेवा वाटतु. आता अरविन्दकाकाना काढुन त्यान्च्या जागी नवीन अकाउन्टन्ट घेणारेत म्हणे. नवरे फुदकत होते ही बातमी अदितीला सान्गताना.

गुढीपाडव्याची रजनीची साडी, नेकलेस आणि हेअरस्टाईल मला आवडली.
अदीतीच्या पोपटी ब्लाऊजचे ट्रान्स्परंट हात आवडले.
तिलोत्तमाच्या अ‍ॅसेसरीज आवडल्या.

पियु +१
रजनी आणि तिलोत्तमा...मस्त दिसत होत्या.. रजनी असल्याने...बाकी काही ऐकले/पाहिले नाही.
रजनी एकटीच नवरें ना नवरे म्हणते उगाच काका म्हणत नाही.. नाही आदर तर नाही..बेधडक!

कोणाला जीवाचे महाबळेश्वर करायचेय या उन्हाळ्यात? तिथे मी असल्याच अ‍ॅसेसरीज बघीतल्या. जाऊन या बरे. नाहीतर गेला बाजार मॉल, एम जी रोड किन्वा लक्ष्मी रोड भटकुन या.

ती अदिती काय माठ आहे का ? फटा फट बोलत का नाही ? सगळ्याचं काहीतरी ऐकून घेत बसते. आतून ऐकून
आलेय कि अरविंद ना काढल नाहीये. पटकन सांगाव ना सगळ्यांना . बाहेर येउन सगळ्याचं ऐकत का बसते? .

Pages