पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.
एकीकडे परिधानमंत्री स्वच्छता अभियानाचे महत्व रेडीओ, टीव्ही, हॅम, फॅक्स, टेलेक्स, टेलिफोन, वर्तमानपत्र इ. माध्यमांद्वारे सांगताहेत. तर आता केंद्रात आणि राज्यात देखील त्यांच्याच पक्षाचे सरकार येऊनही या समस्येसाठी पावलं उचलली जात आहेत असं चित्र दिसत नाही. पुण्यात खासदार आणि आमदारही भाजपचेच आले आहेत. आता मनपाची निवडणूक व्हायची वाट बघायचीये का ?
या निमित्ताने शहरी नागरीकांची कचरा निर्माण करण्याची क्षमता आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत असलेली उदासीनता यावरही बोलूयात. तसंच आजूबाजूच्या गावांचा बळी न घेता कचरा व्यवस्थापन कसे करता येईल याबद्दलच्या सूचना, कल्पना यांचे स्वागत आहे.
आपत्ती ही संधी असते.
आपत्ती ही संधी असते. सध्याच्या कच-याच्या आपत्तीतून जगातली सर्वोत्कृष्ट कचरा व्यवस्थापन व्यवस्था कशी लागू करता येईल हे पण आताच पहायला पाहीजे.
आपण कचरा जाळण्याचे तंत्र स्विकारलेले आहे. याबद्दलचे सीपीसीबी नॉर्म्स उपलब्ध आहेत. इतर ठिकाणचे विशेषतः जिथे कडक पर्यावरणविषयक नियम आहेत अशा कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी काय स्टँडर्ड्स आहेत, ते लागू करता येईल का, त्यासाठी काय करावे लागेल याबद्दलही चर्चा करूयात.
कालच एमपीसीबीचा फॉर्म
कालच एमपीसीबीचा फॉर्म भरला.
तुमच्या घरातल्या कचर्याचे निर्मूलन करण्यासाठ शुभेच्छा!
माझ्या घरात अजिबात कचरा नाही.
माझ्या घरात अजिबात कचरा नाही. आमच्या सोसायटीतही कचरा नाही. पण हा कुठेतरी रत्याच्या कडेला टाकला जातो.सध्या पुण्यात कचरा उचलला जात नाही.
परिधानमंत्री स्वच्छता
परिधानमंत्री स्वच्छता अभियान.... ? ? ?
१६ मे च्या आधी मौनीसिंग,
१६ मे च्या आधी मौनीसिंग, मौनीबाबा असे शब्द प्रचलित होते तसंच हे...हसून खेळून घ्यायचं असतं ते. अर्थात एखाद्या पार्टीला नाही आवडत.
पुणे असो वा मुंबई, कोणत्याही
पुणे असो वा मुंबई, कोणत्याही शहरातल्या माणसांच्या कचरा-विल्हेवाट सवयी / दुर्लक्ष हा पक्षातीत, सरकारातीत विषय आहे व येणार्या काळात शहरी आणि ग्रामीण माणसे यांदरम्यान, आपापसात अढी / आकस निर्माण करेल असा पाण्यापाठोपाठचा मुद्दा ठरू घातला आहे.
पण इथे येऊन पाहतो तर कचरा हा मुद्दा नाहीच्चे तर मग चालू द्या
नुसतं बोलून काय फायदा
नुसतं बोलून काय फायदा पॅराजंपे
काय केलं पाहीजे ?
काय केलं पाहीजे ?