रविवार सुट्टीचा दिवस , म्हणून सकाळी सकाळी पायीच फिरायला बाहेर पडले. कोकण एक्सप्रेस - कर्वे पुतळा अस करत मृत्युंजयेश्वर च्या मंदिरात गेले.
सकाळी कोणीच नव्हत मंदिरात. फक्त दोन भटजी, साफसफाई करणाऱ्या मावश्या आणि मी. शांतता भरून राहिली होती मंदिरात. एरवी कुणीना -कुणीतरी असतच. जोरात घंटा वाजवून आत शिरले , मनातले विचार पूर्णपणे बाजूला पडलेले आणि फक्त सुरेख सजावट केलेली पिंड दिसत राहिली.
अचानक एक छोटस माऊ च पिल्लू समोर आल आणि जोरात ओरडायला लागल, मी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मग साहजिकपणे त्या माऊपाशी गेले . बहुधा त्याला तहान आणि भूक अस दोन्ही लागली असावी. कारण जेव्हा मी तीर्थ आणि प्रसाद घ्यायला गेले तिथे पण मागे मागे येउन नाजूक आवाजात ओरडून काहीतरी सांगत राहील. मी त्याला २-३ साखरफुटाणे दिले, त्याने आनंदात मटकावले. मग अजून थोडे दिले, ते खाऊन त्याने तीर्थाच्या आसपास पडलेले पाणी पण प्यायले. यानंतर स्वारी एकदम खुशीत आली आणि दुडू दुडू धावत मंदिराच्या मागच्या बाजूला जायला लागली. मी बघायला गेले कि आता काय करतायत बाजीराव तर मागे पण साखर फुटाण्यांचा छोटा breakfast सुरु होता . मजा वाटली मला. या सगळ्यामध्ये जवळपास अर्धा तास गेला म्हणून निघावं म्हटलं आणि मागे वळले तर दोन्ही गुरुजी माझ्याकडे हसून बघत होते कि काय सुरु आहे ह्या पोरीच? आणि मी अचानक मागे वळल्यावर त्यांना आणि मला - आम्हा दोघांनाही कसनुस झाल, दोन मिनिट एकमेकांकडे बघितलं आणि मग हसू लागलो सगळेच. काय मजा होती , मी मांजराला आणि गुरुजी मला कुतूहलतेने बघत होतो.
त्यांचा निरोप घेऊन मी निघाले आणि बाहेरच्या कठड्यावर गाणी ऐकत बसले. एक ५ मिनिटांनी तिथे एक छोटी गरीब मुलगी तिच्या छोट्या भावासोबत आली. मारुतीला मनोभावे नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घालायला वर गेली. मी तिला निरखत राहिले. ती मुलगी नेहमी मंदीराच्या बाहेर तिच्या आईसोबत बसलेली मी बघितली होती . तिचे नमस्कार करतानाचे भाव बघून मला काहीतरी वाटून गेल. काय ते नक्की नाही सांगता येणार.. आणि त्या नंतर विचारांची मालिका च सुरु झाली. माझ्या कडे इतक काही असताना १० पैकी ८ वेळा मी देवाकडे काय काय मागत असते आणि मग हि आत्ता त्याच्याकडे नक्की काय मागत असेल …. असे आणि बरेच काही विचार मनात येउन गेले. या सगळ्यामध्ये मी तिच्याकडे एकटक बघत राहिले होते, अगदी नकळत.. तिने नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, सगळ त्या छोट्या भावाला सांभाळत. नंतर स्वतःला आणि त्या भावाला पण अंगारा लावला. सगळ झाल्यामुळे ती जायला वळली आणि तीच लक्ष माझ्याकडे गेल... परत तसच झालं ... आता यावेळी मला कळेना एकदम काय कराव पण तरी आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो आणि तिने अतिशय गोड स्मित हास्य केल. आम्ही हसलो एकमेकांकडे बघून .
माझ्या नकळत माझ्या डोळ्यातून पाणी आल. का ते अजूनही नाही कळल. आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा प्रसंग उभा राहतो आणि तेंव्हा मनात भरून राहिलेला आनंद अजूनही ताजा आहे याची जाणीव होते. काय असेल या आनंदाच रहस्य ??
परिस्थितीने जर एका ताईला आई
परिस्थितीने जर एका ताईला आई बनवलेले पाहिले की होते असे जसे तुमचे झाले..
बहुतेक,
असो,
कोकण एक्सप्रेस - कर्वे पुतळा अस करत मृत्युंजयेश्वर च्या मंदिरात गेले.
>>>
कुठले शहर?
(No subject)
खरंय … इतक्या लहान वयात अशी
खरंय … इतक्या लहान वयात अशी समज दुर्मिळच …
आणि हो ह्या लेखातलं शहर म्हणजे - पुणे … ! आणि त्यातूनही कोथरूड … !
छान लिहिले आहे मनमानसी तुम्ही
छान लिहिले आहे मनमानसी तुम्ही !!
ऋन्मेऽऽष तू म्हणतो आहेस ते खरय....बर्याचदा असे होते खरे...बर्याचदा त्या मागे काही ठोस कारण ही नसते खरं तर...
पु.ल. म्हणतात तसे...आपण फारच भाबडे असतो, आणि खरं पहायला गेले तर असे भाबडे असणे ही चांगलेच आहे की...अजुन पुर्णपणे मशीन झालो नाहीये आपण...माणुस पण टिकुन आहे ह्याचेच लक्षण मानायचे हे...नाही का ?
बादवे ऋन्मेऽऽष...कोकण एक्सप्रेस गाडी वाटली ना तुला ? ते एक हॉटेल आहे अरे.
छान लिहीलंय! आवडलं!
छान लिहीलंय! आवडलं!
Thank you Prasann आणि
Thank you Prasann आणि जिज्ञासा...:D
मला एक प्रश्न आहे. इथे नॉर्मल मराठीत type का करता येत नाही ?? सगळे शब्द एकत्र होतात …
सध्या मी दुसरी कडे type करून इथे कॉपी - पेस्ट करतेय … Please मदत करा…