मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं ले ले च लागतं Proud

ते ढिश्टॅक वगैरे मला नाही जमलं म्हणायला :हाहआ:
म्हणून बघितलं Lol

आदिती आणि जय -- दोघेही बथ्थड आहेत. त्याहून जास्त आअऊऊऊऊऊ. अन मग चढती भाजणी---- बॉस, मग इतर.... हुशार म्हणजे रजनी !!!!!!!!!!!!

There is only one cafe/restro exists on the whole earth : "Cafe MoonLight"

Nobody has any other place to eat/spend time in whole Mumbai.

एलदुगो आणि काही मराठी सीरीयल्स मधले रेस्तराँज म्हणजे कुठल्यातरी बंगल्यात टेबलं लावून ठेवल्यासारखी वाट्तात. इंटीरीअर मधे फरक पाहीजे ना...

त्यांच्या अॉफिससारखेच केफेचेही नियम असतील -फक्त चक्रम व विक्षिप्तांनाच प्रवेश. आणि उधार बंद ऐवजी तिथे लिहीलेले असेल - लॉजिक बंद.

पण अरविंदकाकाना मुलं आहेत ना? स्मित>> पण बायको नाहीये! हे लॉजिक आहे? हो हेच लॉजिक आहे. एक घटस्फोटित स्त्रीही आहे तिलोत्तमा. पण तिलाही नवरा नसल्यामुळे त्यामुळे तीही एम्प्लॉयी म्हणून चालते. हो हेच आणि असंच लॉजिक आहे असं समजावा बरं तुम्ही स्वतःला.
लग्न झालेलं असलं की सांसारिक कटकटी असतात. जोडीदारापायी फार वेळ जातो. त्यामुळे ऑफिसातला (प्रेझेन्टेशनं) द्यायचा बहुमूल्य वेळ वाया जातो. त्यामुळे लग्न इज नो नो. किंवा लग्न करा, पण मग ही नोकरी सोडा असं स्वच्छ(?) लॉजिक आहे. आता अरविंदचा वेळ बायको नसल्यामुळे मुलांच्या काळजीपायी जातो त्याचं काय हा प्रश्न पडू द्यायचा नाही.

जय टॅन झालाय किती. प्रेझेन्टेशन्स देऊ देऊ दमला बिचारा.

तुमच्यापैकी कोणीतरी एकदातरी आपल्या खर्‍या बॉसशी आणि खर्‍या क्लायंटशी अदिती जसं बोलते तसंच बोलून दाखवा बरं.

खर्‍या बॉसशी आणि खर्‍या क्लायंटशी अदिती जसं बोलते तसंच बोलून दाखवा बरं.>>> होना बॉसला विचारायच तुम्हाला हसता येत??? आणि तुम्ही लग्न का नाही केलं??? Uhoh

रीया.... Happy
लकीली मी पण बोलू शकतो ! टचवूड!
फक्त माझे मॅनेजर्स फ्रेन्डली नसून, मीच फार फ्रेंडली आहे Proud

कालचा अख्खा एपीसोड--फ़क्त मूनलाईट कॅफ़े वर होता-
आधी आदिती-नंदिनी, अवि-आदिती मग नंदिनि-आउ परत आदिती-जय...तेच दळण किती दळायचे.. आता ते दळण सुद्दा लाजुन परत सुपात जावुन बसेल
संवाद लेखकाला काही काम नाही...

मूनलाईट कॅफे नावाचा कॅफे अस्तित्त्वात असेलच तर तो त्या संवाद लेखकाच्या किंवा सिरेलीच्या संबंधित लोकांच्या मालकीचा असावा. प्रमोशनच करतायत त्या कॅफेचं.

>>> संवाद लेखकाला काही काम नाही... <<<
तर तर, बहुतेक त्याने एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम देखिल लिहिला असेल..... प्रत्येकी दोन तीन पात्रे/शब्द/विषय/विशेषणे/क्रियापदे/स्थळे/नाम फीड केली की आला मजकुर तयार होऊन.... ओप्शनला किती पाने/शब्दसंख्या हवी तेही देता येत असेल....

त्या सुबोध भावेला टूरीझमचा धंदा असलेलं ऑफीस काढायचं होतं की संघाची शाखा ?<<<<<सोलिड गुगलि.........मस्तच (अहो वाचताना फसकन हसले आणि चहा सांडला ना हातावर) Rofl

त्या सुबोध भावेला टूरीझमचा धंदा असलेलं ऑफीस काढायचं होतं की संघाची शाखा ? <<<
लग्न करू नये.. सारखे नियम लावतोय म्हणून संघाची शाखा... Happy

काल दिलेल्या यादी प्रमाणं किराणा सामान आणलेल्या पिशव्या पाहिल्या का? आठवड्याची भाजी यापेक्षा जरा जड असते! आणि काकूंनी घरच्यासवयीप्रमाणं आदितीला सामान चेक करायला सांगितलं तर ही मठ्ठ त्या माणसालाच विचारते, आणलंय ना सगळं बरोबर? हिलाच एक प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे, किराणा यादी कशी तपासावी? Lol
अतिशय गोपनीय चर्चेत चहा कांदापोहे खाताना ठरल्याप्रमाणे जय चायना साठी प्रेझेंटेशन बनवून पैसे कमावणार आहे. जय व सुहास मिलिटरी इंटेलिजन्सशी संलग्न तर नव्हेत? Proud

Pages