Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्झॅक्टली मला राग आला तो
एक्झॅक्टली मला राग आला तो दाभो च्या अन्प्रोफेशनॅलिझम चा. उमदा बिझनेसमन आहे ना, मग घरगुती किंवा वैयक्तित वाद बाजूला ठेवून निव्वळ तेव्हढे च कामापुरते संबंध ठेवू शकत नाही? प्रत्येक्जण अशी टोका ची भूमिका कशी काय घेतो?
बेअरिंग घ्यायचं तरी किती?
बेअरिंग घ्यायचं तरी किती? मध्यरात्री जय एकटा खिडकीत उभा राहून. दु:खी विचार करतोय आणि हे पाहून आदिती तात्काळ झोपेतून उठून त्याच्या मागे जाऊन उभी राहते - तिच्या नेहमीच्या शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवणार्या नम्र मुलीच्या बेअरिंग मधेच ओढणी एका साईडला घेऊन. मध्यरात्री, झोपेतून उठून तेही नवर्याच्या पाठमोरी.
आशुडी.
आशुडी.:हहगलो:
आणि ही बया आदिती कांदा
आणि ही बया आदिती कांदा चिरायचं सोडून रडत बसली होती आणि लगेच उशिर झाला म्हणून कांदे तसेच ठेवून हापिसला निघून पण गेली.
तिकडे हापिसात सगळ्यांनी पिवळी वेष्टणं एका हातात उचलून घरी नेली.
लॅपटॉप दिलेत तर इन्स्टॉलेशन वगैरे काही नाही का?
दक्षि
दक्षि
लॅपटॉप दिलेत तर इन्स्टॉलेशन
लॅपटॉप दिलेत तर इन्स्टॉलेशन वगैरे काही नाही का?
>>
मला घना आठवला हे वाचून. लॅप्टॉप फॉर्मॅटिंग
छे गं दक्षिणा. आधी देवाचा
छे गं दक्षिणा. आधी देवाचा फोटो व आरत्या डाऊनलोड होणार मग इंस्टॉलेशन वगैरे फालतू कामं. कंपनीचं नाव काय आहे? देव ट्रेव्हल्स.
नवरेंना नाही का दिला laptop? निदान एक handycam तरी द्यायचा रिपोर्टिंग किती सोपं झालं असतं त्यांचं.
आशुडी
आशुडी
या सिरिअलचं टायटल साँग द्या
या सिरिअलचं टायटल साँग द्या बरं कोणी तरी वाचायला
ए ते सेरियलवाले वाचित अस्तील
ए ते सेरियलवाले वाचित अस्तील का हो इथले वरचे सगळे?
वाचित असतील खरेच, तर मात्र सुधारणा दिसायला हवी हो..... !
बायदिवे, माझ्या ऑफिसच्या
बायदिवे, माझ्या ऑफिसच्या कॉम्प्युटरवर, आठएक जीबीचा डाटा फक्त देवीदेवतांचे फोटो, आरत्या, स्तोत्रे, वेद, सूक्ते वगैरेंच्या पीडीएफ, वगैरेचा आहे.
नवरेंना नाही का दिला laptop?
नवरेंना नाही का दिला laptop? निदान एक handycam तरी द्यायचा रिपोर्टिंग किती सोपं झालं असतं त्यांचं.>>>
तिकडे हापिसात सगळ्यांनी पिवळी
तिकडे हापिसात सगळ्यांनी पिवळी वेष्टणं एका हातात उचलून घरी नेली.
लॅपटॉप दिलेत तर इन्स्टॉलेशन वगैरे काही नाही का? >>>
ट्रॅव्हल कंपनीत काम करतात ना ही लोक , मग लॅपटॉप मिळतात पर्फॉर्मन्स बोनस म्हणून ???
बर आहे . आमचा बॉस टॅबच्या पण गोष्टी करत नाही . आयटी मध्ये असूनही
>>>> आमचा बॉस टॅबच्या पण
>>>> आमचा बॉस टॅबच्या पण गोष्टी करत नाही <<<<
टॅब??? लॅपटॉप?????? स्वप्नात बघतो आम्ही ते.........
आमच्या इथे तर अजुन जुने पिक्चरट्यूबचेच स्क्रिन आहेत, LCD वगैरे काही नाही....
डोळे फुटलेत माझे या स्क्रीनमुळे....
Travel & Tours कंपनीमधे
Travel & Tours कंपनीमधे Presentation कसले असते?
की हल्ली भारतात कंपन्या आपल्या कामगाराना दर महिन्या दोन महिन्याने Travel Tours साठी पाठवतात?
एकीकडे तीर्थयात्रेची टूर काढतेय कंपनी (आठवते: सिनियर सिटीझनची टूर काढताना डॉक्टरची सोय हवी असे मायेने सांगणार्या आऊ..)
हे 'आऊ' म्हटले मी मला 'ललिता' म्हणणारा शक्तीकपूर आठवतो. ...
भा प्र - ट्रॅवल कंपनीचे
भा प्र - ट्रॅवल कंपनीचे क्लाएंट म्हणजे भटकायला जाणारे लोक असा मज बापडीचा गैरसमज होता. ते दाभोळकर नक्की कसला बिझनेस करतात म्हणून देव कंपनीचे क्लाएंट होते? आणि नक्की कसली प्रेझेंटॅशन्स सतत दिली की ट्रॅवल कंपनीचा व्यवसाय उत्तम चालतो? सारख्या सारख्या फायली का लागतात म्हणे यांना? (ज्या रिप्लेस करून पेपरलेस करून इमेली नि नेटचा वापर करून कॉर्पोरटाइझ करतायत म्हणे?)
गोगा पण कंपनी काय करते हे
गोगा
पण कंपनी काय करते हे मात्र नक्कीच संशयास्पद आहे
चला.... काल एकदाचे परत
चला.... काल एकदाचे परत सामावले बोवा दोघे एकमेकांच्या मिठीत ! नै त काय? कित्ती ते टेन्शन लागलं होत जय अदितीमधिल दुरावा पाहून...... !
परवा सोनेरी लॅपटॉपचा सीन
परवा सोनेरी लॅपटॉपचा सीन पाहण्यात आला. त्यावेळी इला भाटे कर्मचारी काकांना सांगतात, की आता अकाऊण्टस कागदावर नाही, सगळी लॅपटॉपवरच होतील. तेव्हा त्या काकांचा करूण क्लोज-अप दाखवला.
म्हणजे आता जुन्या पिढीला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला कसं अवघड जातं ते दाखवणार बहुतेक
'कोण आहे जयचा पहिला क्लायण्ट?' या प्रश्नात जसे एपिसोडच्या एपिसोड घालवले, तसे आता 'झालं का काकांचं लॅपटॉपी अकाऊण्ट टॅली?' या प्रश्नात २-४ महिने घालवायला वाव आहे.
जयने पहिला क्लायण्ट पटकावल्यामुळे तसंही आता त्याच्या कामातला पब्लिकचा इण्टरेस्ट कमी झालेला असणार
बाकी..स्वरूप +१०००
आख्खं ऑफिस एका वेळी एकाच क्लायण्टवर काम करत असतं का?
आख्खं ऑफिस एका वेळी एकाच
आख्खं ऑफिस एका वेळी एकाच क्लायण्टवर काम करत असतं का?>>> "आख्ख्या ऑफीसात कोणीतरी कधितरी काम करतं का" हे जास्त योग्य आहे का
>>>> आख्खं ऑफिस एका वेळी एकाच
>>>> आख्खं ऑफिस एका वेळी एकाच क्लायण्टवर काम करत असतं का?>>> "आख्ख्या ऑफीसात कोणीतरी कधितरी काम करतं का" हे जास्त योग्य आहे का <<<<<
बाकी काही म्हणा, माझ नशीब चांगलय की आमची लिम्बी असे समजुन चालत नाही, की त्या मालिकेत जशी ऑफिसेस/कामे दाखवली आहेत, तशाच प्रकारे लिम्ब्याचेही ऑफिस/काम(?) असेल..... !
ज्यांच्या बायका आपापल्या वडील/नवरा/भाऊ/दीर वगैरेंची ऑफिसेस/कामे सेरियलीतल्याप्रमाणेच असतील असे समजुन चालत असतिल, त्या त्या वडील/नवरा/भाऊ/दीर वगैरेंची मला दया येत्ये.
अकाऊंट्ससाठी सॉफ्टवेअर
अकाऊंट्ससाठी सॉफ्टवेअर वापरणं, ईमेल्सवर काम करणं हे आजच्या जमान्यातले विषय तरी आहेत का? १९९५ मधली सिरियल आहे ही! ही सिरियल फ़्रस्ट्रेट करते आहे दिवसेंदिवस!
लॅपटॊप्स दिले, मग त्या डेस्कटॉपांचं काय? शोभेला का होईना, ठेवलेत ते समोर. तेही वापरत नाहीतच. अशाने ई-कचरा वाढतो. पण जाऊदे त्यांना ई-कचरा म्हणजे काय हेही माहित नसेल.
आऊ हे संबोधन अतिशय पकाऊ आहे!
पूनम किती गं वैतागलीयेस
पूनम किती गं वैतागलीयेस
रीया
रीया
Travel & Tours कंपनीमधे
Travel & Tours कंपनीमधे Presentation कसले असते?>>>
गोगा आणि ९, दाभोळकर हे देव ट्रॅव्हल्सचे कॉर्पोरेट क्लाएंट आहेत.
सोप्या शब्दांत सांगायचं तर दाभोळकरांच्या कंपनीतले लोकं ऑफिसच्या कामासाठी जगभर जात असतील त्यांच्यासाठी सर्व प्रकारची प्रवास मदत (ट्रॅव्हल सोल्युशन्स) देव ट्रॅव्हलतर्फे होणार. प्रेझेंटेशन्स हिशोबाची... एवढे लोकं अमूक ठिकाणी गेले तर आमचे चार्जेस एवढे असतील, व्हिजाही हवा असेल तर एवढे चार्जेस होतील, दोन महिने आधी तारीख कळली तर विमानाचे तिकिटं एवढ्या किंमतीवर खेचू शकू.. अशी सर्व परम्युटेशन्स-काँबिनेशन्स प्रेझेंटेशनद्वारे सादर केली जातात.
मालिका बंडलच आहे, १९९५ मधली आहे आणि पाणी घालघालून पात्तऽळ केलेली आहे हे अगदी २००% खरे!!
दाभोळकर हा माणूस जर त्याचा
दाभोळकर हा माणूस जर त्याचा स्टाफ जगभर फिरेल या ताकदिचा बिझनेस करत असेल तर त्याच्याकडे जय सारख्या अति सामान्य माणसाचा अपमान जातीने (स्वतः) करण्याइतका वेळ असेल? आयमिन आयडीयली असायला हवाय का?
लॉजिकली विचार करण्यावर
लॉजिकली विचार करण्यावर लेखक-निर्माते-दिग्दर्शकांनी वेळ दवडला असता तर तुम्हा-आम्हाला या बाफवर टिपी करता आला असता का?
जय सारख्या अति सामान्य
जय सारख्या अति सामान्य माणसाचा अपमान जातीने (स्वतः) करण्याइतका वेळ असेल?
>>
तो अतिसामान्य माणुस त्याचा नावडता जावई असेल तर नक्कीच असेल.
अशा पुरुषांना फार इगो असतो. कोणी दुखावला की गेला तो
दक्षे वॅलिड पॉईण्ट आहे!!
दक्षे वॅलिड पॉईण्ट आहे!!
लॉजिकली विचार करण्यावर
लॉजिकली विचार करण्यावर लेखक-निर्माते-दिग्दर्शकांनी वेळ दवडला असता तर तुम्हा-आम्हाला या बाफवर टिपी करता आला असता का?<<<<<<<<<+१०० स ह म त.
कृपया नम्र विनंती कोणीही आपले लोजिकल डोके वापरून या सिरियल पहात असतील तर त्यांनी या धाग्यांवर लिहिण्यायेवजी या सिरियल्स साठी जे लिखाण करतात (लेखक) त्यांना ट्युशन द्यावी.
जाहिरात : आमच्या इकडे सिरियल लेखनासाठी मार्गदर्शन दिले जाइल (फुकटात)!!!!!!!!!!!!!
Take it lightly
Pages