Submitted by संपदा on 3 March, 2015 - 05:52
मंजूडीच्या कॉर्न चाट पाककृतीवर पूनमने केलेली फर्माईश या बाफस्वरूपात पूर्ण करण्यात येत आहे :). चला तर मग, लिहा आपापल्या आवडत्या कॉर्नच्या पाककृती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉर्न भेळ. साहित्यः २ वाट्या
कॉर्न भेळ.
साहित्यः २ वाट्या उकडलेले मक्याचे दाणे,१ कान्दा, १ टॉमेटो, मीठ, तिखट पावडर, चाट मसाला, लिम्बु रस पाव चमचा.
कृती: कान्दा+टॉमेटो बारीक चिरुन घेणे, त्यात मक्याचे दाणे घालणे.
त्यातच तिखट, मीठ, चाट मसाला व लिम्बाचा रस घालुन सर्व नीट कालवणे. भेळ तयार.
वरच्या भेळीत थोडं अमुल बटर
वरच्या भेळीत थोडं अमुल बटर घातल की अजुन अफलातुन लागत ते प्रकरणं.
कॉर्न पॅटीसः कुठल्याही
कॉर्न पॅटीसः
कुठल्याही मक्याचे दाणे भरडसर वाटून त्यात उकडलेला बटाटा, आलं-मिरचीची पेस्ट, मीठ घालून एकत्र करून पॅटीस वळून तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करायचे. सॉस/ चटणीबरोबर गट्टम!
यात पौष्टिकतेसाठी बोगातु घालता येतो. मटार कोबी इत्यादी भाज्या घालता येतात. तसंच ओट्स भाजून घेऊन त्याची भरड घालता येते. सोयाचंक्स भिजवून पिळून घेऊन भरड वाटून घालता येतात.
आमचा फेव. ब्रेक्फास्ट :
आमचा फेव. ब्रेक्फास्ट :
उकडलेले मक्याचे दाणे + ओरिगोनो + अमूल बटर - आयत्यावेळी ३० से. मावेत गरम करायचे
चटपट दाणे: साहित्य : मक्याचे
चटपट दाणे:
साहित्य : मक्याचे दाणे, शेंगदाणे भाजलेले, लिंबू, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर. साखर मीठ,
तव्यावर किंवा ग्रिल पॅन मध्ये तेल घालून त्यात फोडणी करायची, व दाणे मक्याचे दाणे टाकायचे. हाय हीट वर फिरवून घ्यायचे. मस्त खरपूस क्रिस्प झाले की सर्व्ह करताना लिंबू कोथिंबीर घालायची. मीठ व साखर तव्यावर असतानाच घालायचे.
कॉर्न दोसा: अमेरिकन कॉर्नचे दाणे, मीठ व रवा मैदा. ताक. कॉर्न मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे व ताक, रवा मैदा घालून दोश्याचे पीठ बनवून दोसे टाकायचे. ह्यातच कोथिंबीर मीठ मिरची आले जिरे घातले तर वरून चटणी नाही लागणार बटर बास होईल.
मक्याची उसळ व पुलाव पण करतात. तो ही मस्त लागतो.
तव्यावर नुसते ड्राय रोस्ट
तव्यावर नुसते ड्राय रोस्ट करणे आणि त्याला भाजण्यासारखे काळे डाग पडू लागले की थोडे तूप, मीठ व आवडत असेल त्याला तिखट, लिंबू पिळून भूट्टा टाईप करून खाणे
कणीस भाजुन खाणे
कणीस भाजुन खाणे
आज ट्रेनिंगमध्ये लंच ला
आज ट्रेनिंगमध्ये लंच ला खाल्लेला कॉर्न चा प्रकार...
- वाफवलेले स्वीट कॉर्न, थंड
- हलकी ग्रील केलेली लाल, पिवळी, हिरवी सिमला, मोठे तुकडे करून अन थंडगार करून
- ऑऑ, काळीमीरी खरडून + लिंबू + मीठ
सगळं एकत्र केलेलं, गार गार खायला छान वाटलं. यात बरेच वेरीएशन्स करता येतील. ऑऑ ची एक मस्त टेस्ट होती या सॅलडला. कच्ची सिमला पण धावेल बहुधा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी या क्लबात आहे, हे वे सां न ल...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी आजन्म मेंबर!! कॉर्न आणि
मी आजन्म मेंबर!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉर्न आणि मोड काढलेले मूग(हे पाणी न घालता) उकडून घेऊन आवडेल ते मटेरिअल घालून सलाड. जरा रिच करायचं तर मग बटरवर कांदा, भरड मिरपूड वगैरे हलकं परतून, गिचका न होऊ देता सगळं मिसळयचं. नुसत्या मिठापासून अगदिइ ऑऑ किंवा इतर सिझनिंग घालण्यापर्यंत अनेक कॉम्बिनेशन्स करता येतात! मौजा ही मौजा!
उपमा करताना कॉर्न आणि मोड
उपमा करताना कॉर्न आणि मोड आलेले मूग घालते
फॅन नाही पण आवडते खायला. मस्त
फॅन नाही पण आवडते खायला. मस्त पाकृत्या आल्यात.
भुट्टे का कीस : उपम्यासारखीच
भुट्टे का कीस : उपम्यासारखीच कृती
स्पिनॅच कॉर्न बेक पण छान
स्पिनॅच कॉर्न बेक पण छान लागतो.
उकडलेला बटाट्याचे मॅश, त्यात चवीपुरते मीठ मिरेपूड व थोडे कॉर्न फ्लोअर घालून.
स्पिनॅच प्युरी व उकडलेले मक्याचे दाणे ह्याचे मिश्रण. आता कॅसरोल ला तेल लावून पहिले पोटॅटो मॅश थापायचे व वरून प्युरी - मका मिश्र्ण, थोडे ब्रेड क्रम्स अॅड करून घालायचे. मिक्क्ष पातळ नसावे. साधारण केक बॅटर कन्सिस्टन्सी. मग वरून अमूल किंवा चेडर चीज घालायचे व थोडे ब्रेड क्रम्स आणि अमूल बटर दोन ड्लॉप्स. मग वरील चीज ची परत ब्राउन सोनेरी होईपरेन्त बेक करायचे. व सर्व्ह करायचे.
स्पिनॅच कॉर्न एकदम विनिन्ग काँबो आहे. सॅडविच मध्ये पण छान लागते.
आजन्म सभासद.. स्वीट कॉर्न
आजन्म सभासद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वीट कॉर्न कच्चे पण छान लागते
स्वीट कॉर्न चे दाणे कढ ईत भाजायचे.. मधे मधे तुप, मिठ आणि जिरे पुड घालत जायचे..खरपुस वास आला की डिश मधे काढुन घ्यायचे आणि खिडकित बसुन..कोसळणारा पाउस बघत खायचे
कोर्न अनि पालक चे कोम्बिनेशन
कोर्न अनि पालक चे कोम्बिनेशन पन सुन्दर लागते.
कोर्न पालक पुलाव, कोर्न पालक पराथा
कॉर्न सूप कोणालाच आवडत नाही?
कॉर्न सूप कोणालाच आवडत नाही?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉर्न वाफवून घ्यायचा, मिक्सरमधून कॉर्न + दूध फिरवायचे, गाळायचे. मीठ आणि मिरपूड घालून उकळायचे.
गरमागरम, क्रीमी सूप तयार. स्लर्प!
झक्कास पाक्रु
झक्कास पाक्रु
बडोद्यात एक हॉटेल आहे जिथे
बडोद्यात एक हॉटेल आहे जिथे फक्त कॉर्नचे पदार्थ मिळतात! छान हॉटेल आहे पण मी नाव विसरले!
पुण्यात काही वर्षांपूर्वी
पुण्यात काही वर्षांपूर्वी झाले होते 'कॉर्न क्लब' सुरू. ब-याच ठिकाणी त्यांच्या शाखाही होत्या. पण बंदच पडले ते
तिथे मिळणार कॉर्नचे सर्वच पदार्थ मस्त असायचे. त्या दुकानाचे नावही मस्त लिहिले जायचे. आता मल्टीप्लेक्सेसमध्ये वाफवलेला कॉर्न मिळतो- बटर आणि अन्य मसाले घालून- त्याची सुरूवात कॉर्न क्लबमध्ये झाली.
मायबोलीवरही भरपूर पाकृ आहेत कॉर्नच्या. कॉर्न आणि मका दोन्ही शोधा.
आरतीची स्वीट कॉर्नची नाही, साध्या कणसांची ही रेसिपी मला आवडते- http://www.maayboli.com/node/29349
ब-याच ठिकाणी त्यांच्या शाखाही
ब-याच ठिकाणी त्यांच्या शाखाही होत्या. पण बंदच पडले ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>
अगं एफसी रोड ला आहे एक असलं दुकान अजुनही
मी या क्लबात नसल्याने फारसं जाणं होत नाही तिकडे पण एका मित्राच्या म्हणण्यानुसार छान आहे ते
बॉईल केलेले स्वीट कॉर्नच कणीस
बॉईल केलेले स्वीट कॉर्नच कणीस पण फार भारी लागतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103357.html?1178913157 ह्ये दिसत का बघा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103930.html?1150794446 ह्ये पण
मी एकदम सोप्पं सूप करते, ते
मी एकदम सोप्पं सूप करते, ते अशाप्रकारे:
स्वीट कॉर्न वाफलेले - १ अख्खं पाकिट
१ मध्यम कांदा
३-४ पाकळ्या लसणाच्या
मीठ, मीरपूड
अमूल बटर
फ्रेश क्रीम (ऐच्छिक)
कांदा आणि लसूण बारीक चिरून बटरवर परतून घ्यावा. त्यातच कॉर्नचे उकडलेले दाणे घालून थोडंसं परतून घ्यावं.
रूम टेंपरेचरला आल्यानंतर मिक्सरमधून मस्त वाटून घ्यावं.
कढई किंवा पातेल्यात काढून त्यात हव्या त्या कन्सिस्टंसीचं पाणी घालून उकळून घ्यायचं आणि वरून मीठ, मिरेपूड आणि फ्रेश क्रीम घालून निवांत ओरपावं!
छान आहे धागा. मला corn आवडतात
छान आहे धागा.
मला corn आवडतात पण गावठी. स्वीट नाही.
सगळ्यात घालते मी गावठी मिळाले तर. सलाड, पोहे, पुलाव, बिर्याणी, मसाले भात, खिचडी, maggi, पास्ता etc सगळ्यात दाणे घालते.
रस्सा भाज्या केल्या तर कणसाचे तुकडे करून त्याच्यात टाकते.
मलाही गावठी मका आवडतो. स्वीट
मलाही गावठी मका आवडतो. स्वीट कॉर्न अजिबात आवडत नाही.
गावठी मक्याची डाळ ऑस्सम होते!
गावठी मक्याची डाळ ऑस्सम होते! अन्जू. केश्वि, तुमची रेस्पी लिहा बरं मक्याच्या डाळीची.
मक्याची डाळ म्हणजे?
मक्याची डाळ म्हणजे?
मक्याची डाळ म्हणजे?>> हां. हा
मक्याची डाळ म्हणजे?>> हां. हा एक प्रश्न आहेच. जिसको वाटली डाळ कहते है, पर जिस्में मका रहता है, वो. तुम करती होगी लेकिन नाव वेगळा रहेगा शायद.
पूनम मक्याची डाळ म्हणजे काय.
पूनम मक्याची डाळ म्हणजे काय. मी नाही करत.
माझी आई मका किसून चिवडा करायची पूर्वी पण मी कधीच नाही केला. मस्त व्हायचा. रेसिपी माहिती नाही.
अश्विनी, पूनम बहुतेक चणा दाळ
अश्विनी, पूनम बहुतेक चणा दाळ घालुन केलेल्या रेसेपीबद्दल बोलत असेल. गावठी मका किसुन भिजवलेल्या चणा/ हरबरा डाळीत घालायचा त्यातच जीरे, हिरवी मिर्ची, असल्यास लसुण घालुन सगळे भरडसर वाटुन खमन्ग फोडणीत हे परतायचे, वरुन लिम्बु पिळुन कोथिन्बीर घालायची. हेच का?
Pages